Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २
युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २
या धाग्यावर "Submitted by मेधावि on 22 May, 2012 - 04:58" ही आणि इथून पुढल्या पोस्टी वाच. सगळं ज्ञान आहे!
चर्चेला पूर्णविरामाची पोस्ट - फायनली...मी २५ वाट्या रवा भाजून ठेवला व त्याचा पाणि न घालता उपमा मिक्स करून ठेवले व त्याचे ५ भाग केले. लागेल तसे वापरायचे असे ठरवले. उकळलेले पाणि घातले की २ मि. मधे उपमा तयार होईल असे. उपमा, ब्.व, नारळाची बर्फी चहा/कॉफी असा मेनू होता. ५३-५४ लोक्स आले. टोटल २० वाट्यांचा उपमा पुरला. कोणताही पदार्थ लिमिटेड नव्हता ..ब.व सकट. बव १०० पुरले. ७-८ उरले.
४० मुले आणि १२ मोठे यांच्या
४० मुले आणि १२ मोठे यांच्या साठी इडली चटणीचा बेत आहे....२५० इडल्यांसाठी साधारण किती उडीदडाळ आणि इडली रवा लागेल?
चटणी साठी किती नारळ लागतील?
सोबत तवा पुलाव + रायतं आहे....
प्लीज मदत करा....
२ आमटीच्या वाट्या तांदूळ
२ आमटीच्या वाट्या तांदूळ किंवा ईडली रवा आणि एक वाटी उडीद डाळ या प्रमाणात साधारण १६ मध्यम इडल्या होतात. एकदम मोठ्या रेस्टॉरन्टमध्ये मिळतात त्यापेक्षा थोड्या लहान.
आभारी आहे सिंडरेला..
आभारी आहे सिंडरेला..
तवा पुलाव आणि रायतं आहे तर
तवा पुलाव आणि रायतं आहे तर २५० ईडल्या जास्त नाही का होणार? इतक्या ईडल्या मी केल्या नाहीत पण जास्त जेवण बनवायचा अंदाज आहे म्हणून विचारतेय
खरं तर तवा पुलाव अन रायतं
खरं तर तवा पुलाव अन रायतं याबरोबर इडल्या हा मेन्यूच ऑड आहे ! सगळे भाताचे प्रकार होतील. सोबत आलू पराठे - मेथी पराठे अथवा मग इडल्यांबरोबर बटाटेवडे / मूग भजी / पाईनॅपल शीरा असं काहीतरी हवं.
खरं तर तवा पुलाव अन रायतं
खरं तर तवा पुलाव अन रायतं याबरोबर इडल्या हा मेन्यूच ऑड आहे ! सगळे भाताचे प्रकार होतील. सोबत आलू पराठे - मेथी पराठे अथवा मग इडल्यांबरोबर बटाटेवडे / मूग भजी / पाईनॅपल शीरा असं काहीतरी हवं.>>> +१
पाणी प्यायचा 1 ग्लास तांदूळ
पाणी प्यायचा 1 ग्लास तांदूळ आणि तितक्याच उडीद डाळीच्या प्रमाणात 35 इडल्या होतात माझ्या
मला पण कालच वाटलं होतं तवा
मला पण कालच वाटलं होतं तवा पुलाव रायतं असेल तर बरोबर पराठे पुरी भाजी. इडली चट णी असेल तर बरोबर लेमन राइस पुलीहोरा, यल्लो राइस बिसीबेले भात असे जास्त छान वाटेल. पण सर्व तांदुळाचे प्रकार होतील.
सर्वांना धन्यवाद..... इडली
सर्वांना धन्यवाद..... इडली चटणी हा मेन मेन्यू आहे.... त्यामुळे तो जास्त प्रमाणात करायचा आहे.... तवा पुलाव कमी करू असा विचार केला.... मेन्यू औड वाटत असेल तर तिखट पुरया कशा वाटतील?
मी मायबोलीवर नवीन आहे... लिखाणात चुका होतात...:)
इडली-चटणी अन तिखट पु-या कोरडं
इडली-चटणी अन तिखट पु-या कोरडं होईल हो. सांबार करणार नसाल तर व गोड ठेवायचे असेल तर वर लिहील्याप्रमाणे शिरा/श्रीखंड असे जे आवडेल ते करू शकता. गोड नसेल करायचे तर उपमा, आलू-मेथी पराठे अश्या ऑपशनचा विचार करा.
इडली चटणी , सांबार , पायनॅपल
इडली चटणी , सांबार , पायनॅपल शीरा/फ्रुट सॅलड/गुलाबजाम बास आहे खरतर. भाताची गरज नाही. वाढदिवस असेल तर केक असेल.
मोठ्यांसाठी कॉफी आणि लहांनासाठी ज्युस/फळ वगैरे ठेवा. अगदीच काही हव असेल एक्स्ट्रा तर सँडविचेस वगैरे . किंवा शेवयाचा उपमा किंवा सुरळीच्या वड्या .
मायबोलीकरांची खरंच खूप मदत
मायबोलीकरांची खरंच खूप मदत होते.... सुचवलेल्या पर्यायांपैकी १ फायनल करेन... सर्वांना धन्यवाद ... __/\__.
२५ माणसांसाठी रगडा पॅटीस आणि
२५ माणसांसाठी रगडा पॅटीस आणि शिरा करायचा आहे. तर वाटाणे,बटाटे,रवा किती घ्यावा लागेल? थोडे जास्त झाले तरी चालेल.>>>>>>>
९ तारखेला सर्व झाले.जवळ जवळ ३० माणसे (घरातील पकडून)झाली.मी, १३ वाट्यंचा शिरा केलाहोता. रगडा-पॅटीससाठी सव्वादोन किलो बटाटे,पाऊण किलोच्यावर पां.वा.घेतले होते.यात शिरा भरपूर उरला.तेव्हा एवढ्या माणसांकरिता १०-११ वाट्यांचाच शिरा पुरेसा होतो.रगडापॅटीस नशीबाने कट टू कट झाले.
धन्यवाद योकु आणि मायबोलीकर!
उद्यान एक्स्प्रेसनी बंगलोर ते
उद्यान एक्स्प्रेसनी बंगलोर ते पुणे प्रवास करणार आहे. त्या दिवशी रात्रीचं जेवण, दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवणासाठी आयडिया पाहिजेत. कोरड खायला सहसा आवडत नाही. पोळी/पुरी/भात/भाजी खात्रीचे टिकाऊ प्रकार सुचवा प्लिज. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे शक्यतो गाडीतील जेवणखाण विकत घ्यायचे नाही.
कुरमुर्यांचा चिवडा / भडंग /
कुरमुर्यांचा चिवडा / भडंग / खारे शेंगदाणे / पॉपकॉर्न / खारी-गोड बिस्किटं / बेकरीतली हँडमेड बिस्किटं / केक्स / फरसाण / बाकरवड्या / अंड खात असाल तर उकडलेली अंडी (ही न सोलता न्यायची, वेळेवर सोलून खायची) / फळं / काकड्या / मोबाईल / चार्जर्स / पॉवरबँक्स / हेडसेट / पुस्तकं / कादंबर्या / आयपॅड वा टॅब असेल तर ई-पुस्तकं / वायफाय डोंगल इ इ इ ही महत्त्वाची तयारी. सटरफटर खायला आणि वेळ घालवायला काहीतरी असं फार लागतं गाडीत. स्पेशली लांबचा प्रवास असेल तर.
ल्हान पोट्टे असतीन त त्याय्ची तयारी दूद, ब्येबी फूड, कपडे इ...
बाकी कपडे वगैरे घ्यालच.
लोणचं, कोरड्या चटण्या (तीळ, शेंगदाणा, कारळं, आवडत असेल तर जवस, पापड भाजून चुरा करून चटणी इ)
ताक, दह्याचे पॅक्स घेऊन जाता येतील किंवा ट्रेन मध्ये विकत घेता येतील.
संध्याकाळी - लाल भोपळ्याच्या पुर्या/ पराठे, बटाट्याची भाजी, दही-भात, आवडत असेल तर काही स्वीट (विकतचं)
नाश्त्यात - खाकरा, बेसनाचे/ रव्याचे इ प्रकारचे लाडू (यात बरेच प्रकार करता येतील/ विकत मिळतील)
दुसर्या दिवशीच्या दुपारच्या जेवणात - पराठे / ठेपले, कोरडा झुणका, भाज्यांचं लोणचं इ (या वेळेपर्यंत भाताचा प्रकार बहुतेक टिकणार नाही.)
खरंतर सकाळी स्टेशन वर गरम नाश्ता प्रकार सहज मिळायला हवाय. पण पाऊसपाण्याच्या दिवसांत काळजी घेतलेली बरीच...
लाल भोपळ्याच्या गोड किंवा
लाल भोपळ्याच्या गोड किंवा तिखटाच्या पुर्या करता येतील. त्यांच्या बरोबर तोंडी लावायला केचप / जॅम चे पाऊच घेऊन जाता येतील. तसेच तेल / तूप चटणी एकत्र करून घेता येईल (साधी चटणी कोरडी वाटू शकते)
भाजी न्यायची असेल तर बटाटा ऐवजी पिठ पेरून कांदा, मेथी अशा भाज्या नेता येतील.
चित्रन्न , पुलिहोरा वगैरे घेता येतील की जे खुप कोरडे होत नाहीत. पण योकु म्हणातोय तसं भात दुसर्या दिवशी पर्यंत खराब होऊ शकतो.
दोन सॉफ्ट साइडेड
दोन सॉफ्ट साइडेड इन्सुलेटेड पॅक्स असले तर एकात संध्याकाळसाठी गरम जेवण आणि एकात सकाळी / दुसर्या दिवसासाठी गार जेवण नेता येईल.
रात्रीच्या जेवणाला भरपूर भाज्या घालून मसाले भात, पोळ्या, उसळ असे नेता येईल. घरातून निघताना गरम करुन घट्ट झाकणाच्या डब्यात घालून मग इन्सुलेटेड पॅक मधे ठेवायचे. ३-४ तास तरी बर्यापैली वॉर्म राहते जेवण.
ब्रेकफास्ट साठी इडली, अप्पे, मिश्र डाळीचा ढोकळा, हंडवो , मफिन्स, बॉइल्ड एग्ज्स
लंच साठी तिखट मीठाच्या पुर्या, पराठे / धपाटे/ थालीपीठ + दही .
आइस पॅक नसेल तर पाण्याच्या बाटल्या ३/४ भरुन फ्रीज करायच्या आणि त्या ठेवायच्या कूलर मधे. वाटेत एखाद्या स्टेशनवर ज्युस स्टॉलमधुन आइस घेउन कुलर मधे भर घालता येईल.
काकडी , गाजर, द्राक्षे, केळी, सफरचंदे, चिकू , संत्री नेता येतील स्नॅक म्हणून.
हल्ली गाडीत इलेक्ट्रिक
हल्ली गाडीत इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असतो ना?
आय.पी. घेऊन जा आणि जेवण गरम करून खा.
Thank you योकु, धनि, मेधा,
Thank you योकु, धनि, मेधा, अमितव. सध्या रात्री भाताचा प्रकार, ब्रेकफास्ट ला इडली-पोडी / केक आणि अमूल कूल आणि दुपारी मसाला पुरी / विकतचे श्रीखंड किंवा भोपळा घारगे असे ठरवते आहे. गार खाल्लं तरी ठीक ते चांगलं लागेल असे बघते.
ह्यावेळेस विमानाच्या तिकिटापेक्षा 2 tier एसी महाग पडलंय तरी चाललोय. ह्याआधी गाडीने गेलो तेव्हा पावसाळा नव्हता आणि सोलापूर ला उतरून पुढे टॅक्सीने गेलो. त्यामुळे फक्त रात्रीच्या जेवणाचे बघितले. त्याआधी दोनदा कार चालवत गेलो होतो. बहुतेक आजकाल वेळेच्या आणि सुट्ट्यांच्या अडचणीमुळे गाडी प्रवास बंदच झालाय. एकंदर बऱ्याच वर्षांनी पूर्ण गाडी प्रवास होणार आहे.
प्रवासात थोडं लाईटच खायला
प्रवासात थोडं लाईटच खायला हवं खरं तर! डिनर ला कोरडी भेळ, (चिरलेला कांदा टोमॅटो- कोथिंबीर , चंचेची चटणी वेगळे घ्यावे) किंवा फोडणीचा भात व ताक .
ब्रे फा ला इडली, फळे, चहा- कॉफी, ब्रेड (सॉस- चटणी व बटर वेगवेगळी न्यायचे)
लंच ला पुर्या- पराठे, दह्याचा पॅक, लोणचे, सुकी भाजी
हा धागा वाचुच नये..
हा धागा वाचुच नये.. सुचवलेल्या पदार्थांची नावं वाचुन भुक लागते...
मागे मी दिड दिवस ट्रेनमध्ये
मागे मी दिड दिवस ट्रेनमध्ये प्रवासात घालवलेला तेव्हा केरळी सहप्रवाशांनी त्यांच्या ग्रुप मधल्या प्रत्येकासाठी केळीच्या पानात बांधलेला tamrind राईस घेतलेला. तोच त्यांनी तिन्ही वेला खाल्ला. सोबत उकडलेले अंडे. त्यांच्या मते पाण्याचा अंश उडेपर्यंत चिंच उकळून त्यात भात नीट परतून घेतला तर 2 दिवस अजिबात खराब होत नाही. वर पुलिओगेरे लिहिलेय तोच tamarind राईस. त्यांनी छोटी छोटी पाकिटे बनवलेली प्रत्येकासाठी, प्रत्येक वेळेसाठी वेगळी. त्यामुळे पॅक केल्यानंतर थेट खाण्यासाठीच उघडली.
हो ना आनंदी अगदी खरं.
हो ना आनंदी अगदी खरं.
हो ना आनंदी Lol अगदी खरं.....
हो ना आनंदी Lol अगदी खरं.........
धाग्याचं शीर्षक चुकलंय का?
धाग्याचं शीर्षक चुकलंय का? "बेत काय करावा?" असं हवंय का?
योकूंच्या प्रतिसादातलं हे आता
योकूंच्या प्रतिसादातलं हे आता वाचलं
{मोबाईल / चार्जर्स / पॉवरबँक्स / हेडसेट / पुस्तकं / कादंबर्या / आयपॅड वा टॅब असेल तर ई-पुस्तकं / वायफाय डोंगल इ इ इ}
धन्यवाद मंडळी. भेळेची आयडिया
धन्यवाद मंडळी. भेळेची आयडिया आवडली आहे.
रोज नवेनवे पदार्थ (मेथी मटर मलाई, पिझ्झा, बर्गर, बिर्याणी) सुचवत आहे आणि मला फक्त हे टिकणार नाही सांगायचं काम उरलंय :( मुख्य टेन्शन मी पुरेसे खायला आणीन का आहे उद्यानला pantry नसल्यामुळे मंडळींना already कसं होणार ची काळजी आहे. झालं तर बुकिंग करतानाच प्लॅटफॉर्मवरचे खाऊ देणार नाही सांगितले होते . त्यामुळे बंगलोर / गुंतकल ची बिर्याणी, वाडीचं आम्लेटपाव, सोलापूरचा डोसा / पावभाजी आणि दौंड नाहीतर कुर्डुवाडी चे बटाटेवडे असे सगळे बाद आहे त्याबदल्यात पुण्यात पाऊल ठेवल्या ठेवल्या खायला सुरुवात करण्यात येणार आहे.
बाकी डिजिटल / इ-प्लॅनिंग माझं डिपार्टमेंट नाही.
खाकरे न्या. सोबत दही पॅक.
खाकरे न्या. सोबत दही पॅक.
तिखटा मिठाच्या पुर्या ,
तिखटा मिठाच्या पुर्या , छुंदा
अजुन एक माझ्या बाईने सांगितलेली कांद्याच्या चटणीची रेसिपी अशी आहे
४-५ कांदे, एक अख्खा लसुणाचा गड्डा, सुकं खोबरं, मीठ, तिखट, हिंग, (फोडणीचं साहित्य)
कांदे, लसुण पाकळ्या, खोबरं इ. सगळं मिक्सर मध्ये बारिक करायचं दाताला लागायला हवं असेल तर खूप पेस्ट नाही करायची. किंचित तेलाची फोडणी करून त्यात हे मिश्रण हळद, हिंग घालून परतायचं, भरपूर तिखट घालून परतायचं आणि गोळा करायचा.
चटपटीत असल्याने नुसत्या पोळी बरोबर चालते आणि वर टिकते बरिच. (निदान २-३ दिवस)
पोळी, भाकरी, दही भात, दुध भात, तिखट मिठाच्या पुर्या, खाकरे इ. बरोबर नक्की चांगली लागेल.
Pages