Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी हा प्रश्न मुद्दाम विचारला.
मी हा प्रश्न मुद्दाम विचारला. स्लीप पॅरालिसिसचा त्रास मलासुद्धा आहे म्हणजे होता. असा त्रास असणाऱ्या बऱ्याच जणांना भेटले. कुणीतरी छातीवर बसून गळा दाबतंय असाच अनुभव त्या प्रत्येकाने सांगितला. पण माझा त्रास त्यापेक्षा पण जास्त होता. स्लीप पॅरालिसिस अवस्थेत हात पाय हलवता येत नाहीत कि तोंडातून काही शब्द निघत नाही. शरीराचा कुठलाही अवयव हलवता येत नाही. मला या अवस्थेत आजूबाजूला वेगवेगळी माणसे दिसायची. आत्तापर्यंत ७ - ८ वेळेला या प्रकारचा अनुभव घेतला असेन. पण नंतर स्वतःच त्या अवस्थेला कंट्रोल करायला शिकले.
रिया जी,
रिया जी,
एक प्रश्न पडला आहे कि हा जो काहि Sleep paralysis नावाचा आजार आहे, त्याचा अनुभव नेहमीच येतो कि कसे? कारण मी कम्पनीच्या कामासाठी काहि दिवस गुजरात ला राहिलो होतो तिथे एका होटेल मध्ये मला असा अनुभव आला होता, दुसर्या दिवशी मी होटेल बदलले,पण नन्तर मला काही हा असा अनुभव आला नव्हता म्हणजेच दुसर्या होटेल मध्ये,म्हणुन विचारल.
अनिरुद्ध
मलापण स्लिप पॅरॅलिसीसचा त्रास
मलापण स्लिप पॅरॅलिसीसचा त्रास होता.
आता जवळ जवळ बंद झालाय.
गेली तिनेक वर्ष झाला नाही.
मला स्लीप पॅरालिसिसचा अनुभव
मला स्लीप पॅरालिसिसचा अनुभव सर्वात पहिल्यांदा नवीन घरी आला. त्यावेळी फक्त कुणीतरी गळा दाबतंय एवढाच वाटत होतं. त्यानंतर ऑफिसच्या कामासाठी रत्नागिरीला गेले असताना हॉटेलमध्ये रात्री आला. तो रूम प्रशस्त होता. रात्री स्वप्न पडले आणि अचानक जाग आली. हातपाय हलवता येत नव्हते आणि माझ्या पलंगाच्या बाजूलाच दोन स्त्रिया बसलेल्या दिसल्या. अगदी चेटकिणीसारख्या खदाखदा हसत होत्या. त्यानंतर ओरडण्याचा प्रयन्त्न करूनही तोंडातून शब्द फुटत नव्हता . अतिशय पॅनिक झाले होते. नंतर अगदी शरीराला एक झटका बसून सर्व नॉर्मल झाले. हालचाल करता येऊ लागली आणि त्या बायकाही समोर दिसत नव्हत्या. अशाप्रकारचे काही अनुभव नंतर घरी आले. त्यातला एक तर खूपच भयानक होता. त्यावेळची माझी स्थिती कल्पनाही करवता येणार नाही इतकी वाईट झाली होती.
नंतर नेटवर गुगलून व मानोसपचार तज्ञाशी बोलल्यावर ह्या प्रकाराला स्लीप पॅरालिसिस म्हणतात हे कळले आणि भीती बरीच कमी झाली. आता हा त्रास जवळजवळ बंदच झाला आहे.
स्लीप परालिसिस की स्लीप अ
स्लीप परालिसिस की स्लीप अॅपनिआ?
तसा अनुभव मला बरेचदा आलाय...
तसा अनुभव मला बरेचदा आलाय... शेवटचा दहा वर्षे आधी, होस्टेलात राहत असतांना, तो एकदम शिखर होता. सात आठ जण माझ्या अंगावर बसलेत आणि माझ्यासोबत भयंकर काहीतरी करत आहेत असा. त्या अवस्थेत 15 ते वीस मिनिटे राहिलो असेल.होस्टेलात असे अनुभव जास्त वेळा आले. काही मित्रांनाही तरंगत असल्याचे अनुभव यायचे. हे अनुभव स्वप्नांचा एक प्रकार असावा असे तेव्हाही वाटलेलं, अमानवीय काहीसं असेल असं वाटत नाही. पण ठाम आपण काय बोलू शकत नाही. शरीरावर ताबा नसणे डोळे सुद्धा ना उघडणे अगदी बुब्बुळे हलवता न येणे पण पूर्ण जागृत अवस्था हि भयंकर स्थिती असते. त्याची कारणमीमांसा म्हणून मेंदू शक्यता शोधत असावा आणि त्यामुळे भ्रम होत असावेत.
चेतन्य... तुम्हाला जो अनुभव
चेतन्य... तुम्हाला जो अनुभव आलाय तो नॉर्मल ड्रीम आहे..
लुसिड ड्रीम मध्ये आपल्याला समजते की आपण ड्रीम मध्ये आहोत... समजून पण ड्रीम चालू असत.. आणि यु केन do थिंग्स which उ अल्वेस फंटासायिस abt..
मी मध्यंतरी dmt - the spirit
मी मध्यंतरी dmt - the spirit molecule नावाचे पुस्तक वाचलेलं.. १-२ वर्ष झाली असतील.
नानाकळांचा अनुभव वाचून त्याची आठवण झाली. नीट लिहायला
वेळ मिळेपर्यंत रुमाल.
Sleep paralysis चा गेल्या १२
Sleep paralysis चा गेल्या १२ वर्षात ७-८ अनुभव आहेत. पण पहिला अनुभवच पक्का लक्षात आहे. नंतर हे sleep paralysis आहे हे कळल्यावर त्याची भीती गेली.
मी night shift करून घरी झोपले होते, भिंतीकडे तोंड करून. आई दुपारी शाळेत जाण्यासाठी म्हणून तयारी करत होती त्याच खोलीत. म्हणून मी तिच्याकडे वळून काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते. पण तो प्रयत्नच राहिला. दुसऱ्या कुशीवर वळताच येईना. असं वाटत होतं की शरीर तसंच आहे आणि मी आईकडे वळून बघत आहे. (पिक्चर मधे नाही का दाखवत आत्मा शरीरातून थोड्या वेळासाठी बाहेर येतो. तसंकाही)३-४ वेळा प्रयत्न केले आणि मग खूप भीती वाटली. अचानक खडबडून जाग आली. आणि आई खरंच शाळेत जाण्यासाठी तयारी करत होती. फक्त तीची साडी वेगळी होती. बाकी मला जे जाणवलं तेच चालू होतं त्या खोलीत. झोपेत तर माझं तोंड भिंतीकडे होतं.
त्यानंतर ५-६ वेळा अनुभव आले पण असे लक्षात नाही राहिले. पण छातीवर कुणीतरी बसल्याचा अनुभव नाही. फक्त काहीच हालचाल करता येत नाही आणि नंतर खडबडून जाग येते. बस इतकंच
अनिरुद्ध माझी आजी आता नाहीये
अनिरुद्ध माझी आजी आता नाहीये त्यामुळे मी काही सांगू शकत नाही प्ण वरील काही अनुभवांमधे तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असावं ही आशा आहे
ह्या धाग्यावर सायंटिफिक लिहून
ह्या धाग्यावर सायंटिफिक लिहून त्याला पॅरालाईझ करायचा हेतू नाहीये.
स्लीप पॅरालिसिस हे ब्रेनचा नॉर्मल हाऊस किपिंग जॉब चालू असल्याचे लक्षण आहे. रोज रात्री ब्रेनची फरशी त्यात दिवसभरात सांडलेल्या कचर्याचे वर्गीकरण करून ती फिनाईल टाकून लक्ख धुतली जात असतांना 'पिसो मोजाडो' 'फरशी ओली आहे' ' फ्लोअर ईज वेट' असा बोर्ड लागलेला असतो. फिनाईलचे पाणी ईकडे तिकडे धावतांना ना आगा ना पिछा असलेली स्वप्नं (पाण्यातून जसा करंट जातो तसे) चालू होतात. हे डोक्यात चालू आहे ते फॉरमॅटिंग आहे खरे नाही हे ब्रेन ला माहित असते, हॉरर मुवी मधले भूत आठवणे, वाईट प्रसंग आठवणे, जुना संकटातला प्रसंग आठवणे, अश्या भितीदायक अनेकानेक गोष्टींवर तुम्ही ऊठून रिअॅक्ट करून स्वतःला ईजा करून ठेवू नये म्हणून फिजिकल अॅक्टिविटीचा स्वीच फरशी ओली असतांना ऑफ केलेला असतो.
म्हणून संकटात आहोत असे वाटत असूनही आपण ओरडू, पळू, मारू किंवा जोराने श्वास घेवू शकत नाही. फरशी वाळली की स्वीच पुन्हा ऑन होतो. पण या दरम्यान नेमकी थोडीफार जाग आल्यास आपल्याला पडत असलेल्या स्वप्नाच्या अनुषंगाने हालचाल करण्याचा मोह होतो बॉडीला जर्कही बसतो. तरूण निडर मुलांची स्वप्न वेगळी असतात त्याचे परिणाम आणि जर्क ही वेगळे असतात ' फ्लोअर ईज वेट' चा बोर्ड ऊठल्यावरही ऑन असू शकतो
सिनेमात दाखवतात तसे वाईट स्वप्नं पडून दचकून ऊठला तसे शक्यतो होत नाही.
बाकी चालू द्या
हाब, तुम्ही म्हणताय त्या
हाब, तुम्ही म्हणताय त्या दोन्ही गोष्टी मी अनुभवल्यात, दचकून जागे होणे ही अनुभवलं आहे, पण स्लीप पॅरॅलीसीस हा वेगळा प्रकार आहे,
तुमच्या स्पष्टीकरणाने जास्तीचे प्रश्न उभे राहिलेत, वेगळा धागा काढलात तर बोलुया...
तरूण निडर मुलांची स्वप्न
तरूण निडर मुलांची स्वप्न वेगळी असतात त्याचे परिणाम आणि जर्क ही वेगळे असतात ' फ्लोअर ईज वेट' चा बोर्ड ऊठल्यावरही ऑन असू शकतो >>>
फक्त काहीच हालचाल करता येत
फक्त काहीच हालचाल करता येत नाही आणि नंतर खडबडून जाग येते. >> मला पण असा अनुभव आहे. हातपाय हलवता न येणे, ओरडावेसे वाटून पण आवाज न निघणे, स्वप्न आहे हे समजत नाही, जीव कासाविस होतो, आणि खाडकन जाग येते. नंतर पण किती वेळ जोरात धडधडत असते.
>>> स्लीप परालिसिस की स्लीप अ
>>> स्लीप परालिसिस की स्लीप अॅपनिआ? <<<< काय की.....
कैतरी इंग्रजी नाव दिलय इतक कळतय... नशिब यात "सिंन्ड्रोम" हा शब्द वापरला नाहीये.. !
या बाबत माझी मते वेगळी आहेत.
वर काही पोस्ट मधे दिलेल्या विवेचनानुसार (हायझेनबर्ग), मेंदुची कार्यप्रणाली काहि एक काम करीत असताना असे होऊ शकते हे मान्य. किंबहुना , मोस्ट ऑफ दि टाईम्स, तसेच होत असते.
मात्र त्याव्यतिरिक्तही "स्वप्नसृष्टी" अगाध आहे असे माझे ठाम मत आहे.
विशिष्ट जागी झोप्ल्यासच वरील अनुभव येणे.... बरे तर बरे, कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्याला त्या विशिष्ट जागीच तोच अनुभव येणे, व नंतर चर्चेमध्ये सर्वांना तो अनुभव तिथेच आलाय हे निष्पन्न होणे, यास निदान मी तरी "कौटुंबिक्/सामुहिक स्लिप प्यारालिसिस/सिन्ड्रोम" म्हणू शकत नाही !
या व्यतिरिक्त भविष्यात घडणार्या घटनांचे इत्थंभुत स्वप्न पडणे यासही मी असला कसला प्यारालिसिस वा सिंड्रोम म्हणु शकत नाही.
मलाही एकदा अनुभव आला होता ..
मलाही एकदा अनुभव आला होता .. रूममेट कोणीच नव्हत्या म्हणुन एकटिला रूम मधे झोपाय्ला लागलं.. नुकतिच नोकरी जॉइन केली होती.. मी रूम मेट च्या सिंगल बेडवर झोपले होते थोडा आतल्या बाजुला आहे.. भिती वाटणार नाही म्हणुन..
रात्री कधितरी जाग आली पालथी झोपले होते .. सरळ होताच येइना.. उठताच येत नव्हत ..कोणी तरी खाली दाबल्यासारख
प्रयत्न करुन थकुन तशिच झोपले आणि झोप पण लागली.. सकाळी ओके वाटल.. पण रात्री खुप भिती वाटली होती
काय हे भुताटकी धाग्याचा पार
काय हे भुताटकी धाग्याचा पार विज्ञान धागा केला!

असे विषय भरकटविणे बरे नव्हे!
झोपेत कोणीतरी गळा, दाबतय
झोपेत कोणीतरी गळा, दाबतय श्वास कोंडलाय, हालचाल करता येत नाही हे एवढ़यावरच भूताटकी का मर्यादित होतेय ?
स्वप्नदोष किंवा इतर काही विकार असलेल्यास सुद्धा झोपेत अनेक अनुभव अगदी जीवंत खरेखुरे असेच वाटत असावेत त्यामुळे वरील अनेक घटनांत हां स्लिप परालिसिस वगैरे असेलसुद्धा पण जेव्हा जागृत अवस्थेत अमानवीय हस्तक्षेपाची अनुभूती येते तेव्हा शारीरिक बदल म्हणजे अंग शहारणे, केस उभे राहणे, मन खुप अस्थिर वाटणे आणि अनामिक हुरहुर लागून राहणे हे (विविक्षित ठिकाणी गेल्यावर) नक्की घडते ज्याला कुठले साइंटिफिक कारणपुष्टी नसावी.
माझा जो हॉस्टेल मधला अनुभव
माझा जो हॉस्टेल मधला अनुभव आहे त्याच बेडवर झोपल्यावर मित्राला तरंगत असल्याचा अनुभब आला होता...
पण असो, स्पष्टीकरणात मजा नाही, अनुभव मात्र बेकार असतो.....
अरेरे, धाग्यावर कोण नविन भुत
अरेरे, धाग्यावर कोण नविन भुत आल आहे ते पहायला धागा उघडला तर ईथे आज काही वेगळिच भुत दिसली. भुतांचे अनुभव संपलेकी काय?
"अनिरुद्ध माझी आजी आता नाहीये
"अनिरुद्ध माझी आजी आता नाहीये त्यामुळे मी काही सांगू शकत नाही प्ण वरील काही अनुभवांमधे तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असावं ही आशा आहे"
नाहि रियाजी, वर अम्बज्ञ म्हणतात, त्या प्रमाणे अजुन गैर समज वाढले आहेत, असो , मी जो अनुभव घेतला तेव्हा मी पूर्ण्पणे जागा होतो माझ्या छातिवर दड्पण येउन श्वास घ्ययला त्रास होत होता,हात पाय जखड्ल्या सारखे झाले होते, तसेच त्या होटेल मधला कर्मचारि ती रूम घेउ नाकोस असे सुचवत होता, कारण मी अगोदर ज्या रूम मध्य होतो त्या रूम वर काहितरी चावत होते म्हनुन मी रात्रि ११:३० ला रूम चेन्ज केलि होती, असो पण हा अनुभव मला दुसर्या होटेल मध्ये नाहि आला असो.
मला या सगळ्या मानसिक गोष्टी
मला या सगळ्या मानसिक गोष्टी वाटतात..
असो! हा धागा भुतांच्या गोष्टींचा आहे, तेंव्हा त्याच ऐकुयात... जास्त चिकित्सा केली की त्यातली मजा जाते
"मला या सगळ्या मानसिक गोष्टी
"मला या सगळ्या मानसिक गोष्टी वाटतात..
असो! हा धागा भुतांच्या गोष्टींचा आहे, तेंव्हा त्याच ऐकुयात... जास्त चिकित्सा केली की त्यातली मजा जाते"
म्हणजे याचा अर्थ ज्या कोणाला याचा अनुभव येतो ते सर्व मनोरुग्ण आहेत/असावेत असा घ्यायचा का?
अनिरुद्ध
__/\__
__/\__
सध्याच्या मोडर्न सायन्सच्या
सध्याच्या मोडर्न सायन्सच्या कक्षेत न येवू शकणाऱ्या बाबीना असे आपण अव्हेरु शकत नाही.
चौथ्या मितिला आपण कसे कुठल्या उपकरणातून मोजणार ?
प्रकाशाच्या वेगापेक्षाही अनेक पटीत वेगवान एलियन्स यान आपण सध्याच्या कॅमेरा/तत्सम उपकरणात नाही न बंदिस्त करु शकत तसेच हे अमानवीय क्षेत्र आहे जे अनुभूती तर देते पण लैब साठी सैम्पल नाही पुरवू शकत कारण आपल्या कड़े मोडर्न सायन्स अजुन त्यादृष्टीने विकसित नाही झालय
मनुष्य अनुभूतीच्या काही
मनुष्य अनुभूतीच्या काही मर्यादा असतात... त्याच्या बाहेर त्याला काही जाणवत नाही. जाणवत नाही म्हणजे असत नाही असे नसते.
म्हणजे याचा अर्थ ज्या कोणाला
म्हणजे याचा अर्थ ज्या कोणाला याचा अनुभव येतो ते सर्व मनोरुग्ण आहेत/असावेत असा घ्यायचा का?
>>>
आता कसं बोललात ! तुमच्या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे.
जो भुतंखेतं मानतो त्याने
जो भुतंखेतं मानतो त्याने मनावेत...जो नाही मानत त्यान नाही मानू
असू देत की.. आपण सगळेच मोठे आहोत, कशाला कोनाला काही शिकवायला/ पटवायला जाताय?
जाणवत नाही म्हणजे असत नाही
जाणवत नाही म्हणजे असत नाही असे नसते.>> +१११
मनोरुग्ण..? या लॉजिकने तर ९९
मनोरुग्ण..? या लॉजिकने तर ९९.९९ टक्के लोकसंख्येला मनोरुग्ण ठरवायला लागेल.
Pages