Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खर्या आयुष्यात अनेक प्रकारचे
खर्या आयुष्यात अनेक प्रकारचे लोक असतात.
गुरुसारखे नवरे पदोपदी दिसतात.
माझ्या एका मैत्रिणीचा आर्मीतला नवरा, सुटीला घरी आला की ओवाळून वगैरे घ्यायचा, लाड करून घ्यायचा आणि आठ दिवसानी त्याचे आईवडील परत त्याच्या घरी गेले की सरळ हिला सांगायचा "आता मी जातो 'दुसरी'कडे" इतका शेमलेस.
राधिका अती आदर्श दाखवली आहे खरी.
पण निर्णयाला न येईपर्यंत अशी प्रत्येक स्त्री जुळवून घेण्याचा प्रयत्न करतेच ना.
राधिकाला ही संयम संपताना दाखवणे गरजेचे आहे.
अन्यथा बायकानी शेवटपर्यंत सहन करावे आणि नवर्याना न सोडता त्याना सुधारण्याचे प्रयत्न करावे असा पायंडा मालिका पाडू पहाते आहे असेच moral of the story निघेल, जे चुकीचे आहे.
स्टँप पेपर वर सही केली घरच्या
स्टँप पेपर वर सही केली घरच्या घरी की झालं का घर राधिका च्या पण नावावर?
त्यासाठी काही रजिसट्रेशन वगैरे ची काहीच गरज नाही ना.
स्टँप पेपर वर सही केली घरच्या
स्टँप पेपर वर सही केली घरच्या घरी की झालं का घर राधिका च्या पण नावावर?>>आपण तरी झालंच समजायचे. तसेही खोलात जाऊन ती प्रक्रिया बघण्यात काही मजा नाही येणार
आता नाना-नानीकडे राहून स्वयंपाक, त्यांच्याकडे येणार्यांचे चहा-पाणी करुन आणि एक-दोन वेळा चाळीतल्या बायकांना मसाले कुटायला लावून राधिका 'मोठी उद्योजिका' होऊन स्वतःच्या पायावर उभी आहे हे पण आपण मानतो ना तसेच काही समजून घेऊ
हे लोक्स अर्ध घर राधिकाच्या
हे लोक्स अर्ध घर राधिकाच्या नावावर कर अस म्हणत होते. अस करता येतं का घर दोघांच्याही नावावर कर असं जास्त योग्य आहे?
sonalisl +1
sonalisl +1
अय्या पाहिला मागच्या आठवड्यात
अय्या पाहिला मागच्या आठवड्यात. अनिता दातेचे कौतुक वाटले. एकदम वर्साटाईल का काय ते म्हणावेसे वाटले.
>>>स्टँप पेपर वर सही केली
>>>स्टँप पेपर वर सही केली घरच्या घरी की झालं का घर राधिका च्या पण नावावर?>>आपण तरी झालंच समजायचे. तसेही खोलात जाऊन ती प्रक्रिया बघण्यात काही मजा नाही येणार Happy
आता नाना-नानीकडे राहून स्वयंपाक, त्यांच्याकडे येणार्यांचे चहा-पाणी करुन आणि एक-दोन वेळा चाळीतल्या बायकांना मसाले कुटायला लावून राधिका 'मोठी उद्योजिका' होऊन स्वतःच्या पायावर उभी आहे हे पण आपण मानतो ना तसेच काही समजून घेऊ ----
हा हा, ... आलिया भोगासी
गुरुची आइ पण नागपुरीच बोलते
गुरुची आइ पण नागपुरीच बोलते पण तिच इतक अॅनॉयिन्ग वाटत नाही जितक राधिकाच वाटत.
गुरुची आइ पण नागपुरीच बोलते
गुरुची आइ पण नागपुरीच बोलते पण तिच इतक अॅनॉयिन्ग वाटत नाही जितक राधिकाच वाटत.>> हो.
राधाक्का आता घरात पुर्वीप्रमाणेच बोंबलत फिरायला लागली.
ह्यात परत गुरु-शनाया अफेअर
ह्यात परत गुरु-शनाया अफेअर चालू झालं ना, मागे प्रोमो बघितला होता. मग समजलं नाहीये का कोणाला, राधिका घरी कशी आली. सिध्द वगैरे करुन मानाने घरी परत येणार होती असं काहीतरी मागे म्हणाली होतीना.
मी या मालिकेचा एकच एपिसोड,
मी या मालिकेचा एकच एपिसोड, तोही अर्धवट पाहिला. बायको नवर्याला घर दोघांच्या नावावर करून दे असं सांगते तो भाग.
बाकी मालिकेची कथाकल्पना, व्यक्तिरेखा, संवाद याबद्दल काही लिहायचं नाही. पण दिसलेली टेक्निकल गोष्ट. तो नवरा बाहेर गेल्यावर उरलेल्या ५ डोक्यांची चर्चा चालते. त्यात अरुण नलावडे नवर्याच्या वडिलांच्या उजव्या हाताशी थोडे पुढे उभे होते. म्हणजे विकेटकीपरच्या शेजारी स्लीप असते तसे. पण दोघांचीही तोंड एकमेकांकडे नाही, तर कॅमेर्याकडे. त्यांची पोझ विचित्र होतीच. पण लाँग शॉटमध्ये ते वर म्हटल्यासारखे उभे असले, तरी क्लोज अपमध्ये मात्र अरुण नलावडे त्या वडिलांकडे पाहून बोलत असल्यासारखे दिसले.
म्हणजे त्याच सीनमध्ये क्लोज अप घेताना वेगळा अँगल? प्रत्येक वाक्यानंतर प्रत्येक पात्राचा क्लोज अप, तो ही स्टॉक शॉट कारण आलटून पालटून तीच एक्स्प्रेशन्स आणि जेस्चर्स दिसत होती.
कथा, पटकथा, संवाद लिहिणारे पाट्या टाकतात हे उघड आहे. पण इथे शूटमध्येही पाट्या टाकल्यात.
मुळात इतक्या रिग्रेसिव्ह मालिकेला मायबोलीकरांचा इतका प्रेक्षकवर्ग मिळावा याचेही नवल वाटते..
>>>राधाक्का आता घरात
>>>राधाक्का आता घरात पुर्वीप्रमाणेच बोंबलत फिरायला लागली.>>>
हो ना... भैताड मालिका..... राधक्का आधीसारखीच तर वागतीये... बोंबाबोंब, सगळ्यांना चहा नाश्ता, डब्बे..... म्हणजे मग इतकं बाहेर वगैरे राहून थोडी सुधारणा व्यवहारज्ञान आलंय वैगेरे नाहीच.. मध्ये तो थोडा नांगर डोक्यावर फ़िरव्यून, इंग्लिश ची दोन वाक्य म्हणून मेकओवर करण्याचं नाटक केलं त्याचं पुढे काहीच नाही... आणि मानाने का बोलवायचं पण हिला जर ही भैताड आहे तशीच राहिली तर.. गॅरी परत मॉडर्न शनाया कडेच जाणार ना... आणि गॅरी आणि राधक्का मध्ये, फक्त दोघांमध्ये जरा डिटेल संभाषण,माफीनामा किंवा प्रेमाचे दोन शब्द पण नाही दाखवले.. त्यांच्यात नवरा बायको पेक्षा मालक आणि घरातल्या कामवाल्या काकू असच नातं आहे असं वाटतं... आणि परत तेच चालू आहे शनाया कशी चुकतेय ,मी कसं तिला दूर ठेवणार यांच्यापासून... काहींच्या काही...अस नाही की आपला नवराच बाहेरख्याली आहे.. सोडून द्यावा... पण आहेच परत यांची काय चूक नाही..मी विश्वासाने माह्या नवरा आणि संसार परत मिळवला म्हणे.... नाच म्हणावं मग...
भरत ,मला ही तोच डाऊट आला.. बहुतेक अरुण नलावडेंचे शॉट्स वेगळे शूट केलेत आणि एकत्र शॉटला डमी बसला आहे बहुतेक कारण त्यात फक्त शर्टाची बाही दिसत्येय...
ते नाना नानी घरच्या सुनेला
ते नाना नानी घरच्या सुनेला डाफरतात आणि राधाकाला मात्र डोक्यावर बसवले आहे हे मला काही पटत नाही. तिला चक्क किती सपोर्ट आहे इतका नसतो कधी अश्या परिस्थितीत टाकलेल्या बायकोला. तो गुरु खरेच कलाकार आदमी दिसतो आहे. परवा कलर्स का बिग टीव्हीवरच्या मालिकेची झाइरात ऐकली.. एक नवरा दोन बायक कसे संभाळतो व त्यात कसे विनोद निर्माण होतात इत्यादि. हाउ कॅन धिस बी ओके एवर. ?
समिधा एक्दम बरोब्ब्बर बोलते ,
समिधा एक्दम बरोब्ब्बर बोलते , " राधिकाने स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये " .
राधिका घरी परत आली याचा आनंद , ती आणि गुरु सोडून सगळ्याना झालाय .
मी एक एपि पाहिला त्यात तो
मी एक एपि पाहिला त्यात तो गुरु मनात म्हणत होता की आता राधिका परत आलीये म्हणजे बेडरुममधेच झोपावं लागेल. आणि मग जबरदस्ती अथर्वला आमच्यासोबत झोप म्हणत होता.
राधिका नक्की कसला स्वाभिमान घेउन आलीये? गॅरेला ना जुन्या आठवणी आल्या, ना तिच्याबद्दल प्रेम वाटलेलं दाखवलंय. उलट अजुनही ती त्याला आवडत नाहीये हेच दिसतंय.
गुरुने तिच्या नावावर अर्ध घर
गुरुने तिच्या नावावर अर्ध घर केल आणि तिला घरी बोलावलं , म्हणजे मानाने बोलावलं असं तिचं आणि ईतरांच म्हणणं आहे बहुतेक .
आणि घरी येउनही ती नवर्यासाठी कौतुकाने स्वयंपाक करण्याखेरीज काही करताना दिसत नाही आहे .
राधाक्का आता घरात पुर्वीप्रमाणेच बोंबलत फिरायला लागली.>>> अगदी बरोबर . उगाच नाही समीधाला शांत शांत वाटतय तिच घरं
राधाक्का आता घरात
राधाक्का आता घरात पुर्वीप्रमाणेच बोंबलत फिरायला लागली >>> खरये. केवढा तो आवाज.
ह्यांच्या वॉशिंग मशिन मधुन धुतलेल्या कपड्यातुन पाणी कस गळते किती विचित्र वाटते ते असे गळणारे कपडे बल्कनीत वाळत घालायचे. आणि बरोबर तो छोटा टीशर्ट होता तो तर पुर्ण ओला पण झाला नव्हता.
पण इथे शूटमध्येही पाट्या
पण इथे शूटमध्येही पाट्या टाकल्यात.>>>हो. असे बरेच सीन आहेत. वेगवेगळे चित्रीकरण केलेले.
उलट अजुनही ती त्याला आवडत नाहीये हेच दिसतंय.>>> नाहीच आवडत त्याला ती. ती मोठमोठ्याने बोलत असते तेव्हा वैतागतो तो पण तिने विचारल्यावर म्हणतो कि तुझेच घर आहे तुला हवे तसे वाग. ती बेडरुमचे दार बंद करुन आत येते तेव्हा कावराबावरा होतो बिचारा सगळं नॉर्मल होईपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही असे काही बोलून लगेच झोपतो.
एक नवरा दोन बायक कसे संभाळतो व त्यात कसे विनोद निर्माण होतात इत्यादि.>>>लोकांना यात विनोद कसा दिसतो हेच कळत नाही मला.
गुरुने तिच्या नावावर अर्ध घर केल आणि तिला घरी बोलावलं , म्हणजे मानाने बोलावलं असं तिचं आणि ईतरांच म्हणणं आहे बहुतेक .>>>ते नानांचे डोके!! गुरुनाथ ने घरी बोलावल्यावर ती लगेच जायला तयार होते. पण नाना तिला घर नावावर करुन घ्यायचे सुचवतात.
कालच्या भागात शेवटी राधाक्काचा डायलॉग होता, खोटेपणा असू नये असा काही.....या बाईने शनायाच्या बाबतीत खोटेपणाच केलाय ते विसरली... डबल ढोलकी!!!
सगळे जुने एपिसोड्स पाहतेय
सगळे जुने एपिसोड्स पाहतेय सध्या अॅप वर. शनायाचा मित्र केडी आलाय तिथवर पाहिले आज. त्याला चक्क बरे डायलॉग दिलेत. जसे की बोलायची इच्छा असेल तर कोणतीही वेळ चांगली. किंवा आपल्या प्रश्नाला आपल्या पेक्षा जास्त न्याय कुणी देऊ शकत नाही. गुरूला कळलंय की कुणाल प्रकरण हे राधिका आणि रेवतीने शिजवलं आहे.
पुढे काय होईल याची उत्सुकता लागली आहे.
दक्षिणा...पुढे काय होईल याची
दक्षिणा...पुढे काय होईल याची उत्सुकता ..? असाच भैताड पणा....आणि माह्या नवरा माह्या नवरा चालू राहील तिचं......!!
नटुकाकी.... तुमचा सात्वीक संताप समजू शकतो.
आणि गॅरी आणि राधक्का मध्ये, फक्त दोघांमध्ये जरा डिटेल संभाषण,माफीनामा किंवा प्रेमाचे दोन शब्द पण नाही दाखवले.. त्यांच्यात नवरा बायको पेक्षा मालक आणि घरातल्या कामवाल्या काकू असच नातं आहे असं वाटतं...... हिला तसंच हवंय ना. त्याची ती तशीही ताईच शोभते.....गॅरी अगदी चिमण्या तोंडाचा बच्चा दिसतो तिच्या समोर ! राधक्का शब्द मस्त आहे!
एवढ सगळं पाल्हाळ दाखवुन काय
एवढ सगळं पाल्हाळ दाखवुन काय साध्य झालं नक्की
राधिकाचं जोरात बोलणं, गावजेवण घालण, दुधवाल्यापासुन - त्या कोणत्यातरी काकांना चहापाणी करण चालू आहेच.
शनायच शॉपिंग, पिझ्झा वगेरे खाण चालूच आहे
गॅरीच घरवाली - बाहेरवाली पण चालू आहे
मग हे सगळॅ कशाला दाखवल? सगळ तर मागच्या पानावरुन पुढे चालू आहे
लेखकाला चकवा लागलाय
लेखकाला चकवा लागलाय
लेखकाला चकवा लागलाय >>>>
लेखकाला चकवा लागलाय >>>>
(No subject)
लेखकाला चकवा लागलाय >>>>:हाहा
लेखकाला चकवा लागलाय >>>>:हाहा:
लेखकाला चकवा लागलाय>>>
लेखकाला चकवा लागलाय>>>
लेखकाला चकवा लागलाय>>>
लेखकाला चकवा लागलाय>>>
आई शप्पत... कसली हसले मी....
राधिकाला बहुधा फक्त घरात परत
राधिकाला बहुधा फक्त घरात परत जायच होत बाकी नवरा तिला कितपत हवा होता हे देवच जाणे, शनायाला घरातुन काढुन आपण परत घरात गेलो की मिळाला का मान?
आता तर गुरु कोणावरही प्रेम
आता तर गुरु कोणावरही प्रेम करत नाही, ना राधिकावर, ना शनायावर. त्याला माहीतीय, राधिका फक्त घराची, आपली काळजी घेऊ शकते, आणि शनायाला फक्त त्याचा पैसा हवाय. म्हणून तो आता दोघीन्ना फसवतोय. दोघीन्ना आपल्या तालावर खेळवतोय. ते राधिका-कुणाल-रेवतीचा plan कळल्यावर गुरु राधिकावरच जुन प्रेम इतक्या लवकर विसरतो? मग ते प्रेमपत्र, प्रिय राधा म्हणण, बोटिन्ग वै वै सगळ नाटक होत वाटत.
राधिकाने मसाल्याचा बिझनेस सोडून दिला वाटत घरी परत आल्यावर.
परवा कलर्स का बिग
परवा कलर्स का बिग टीव्हीवरच्या मालिकेची झाइरात ऐकली.. एक नवरा दोन बायक कसे संभाळतो व त्यात कसे विनोद निर्माण होतात इत्यादि. हाउ कॅन धिस बी ओके एवर. ? >>> कलर्स वर आलीये अशी मालिका भाग बकुळ भाग नावाची. त्यामध्ये सुद्दा त्या दोन नायिका शनाया आणि राधिका सारख्या दाखवल्यात. काल प्रोमो मध्ये दाखवल होत.
Pages