Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23
आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.
पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Love you Mumbai Indians......
Love you Mumbai Indians.........
Awesome win...... Mumbai
Awesome win...... Mumbai deserve it.....
अंबानींनी किती पैसे दिले ते
अंबानींनी किती पैसे दिले ते शोधायला पाहिजे आता. >>> बास्का राव , पण मजा आली.
पुणे जस्ट पुल्ड अ साउथ
पुणे जस्ट पुल्ड अ साउथ आफ्रिका. मुंबई जिंकली!?
>>>
हाहा. That's good one.
भारी झाली मॅच. दर ipl ची एक फायनल बघितली की बरं वाटतं
Mumbai Indian Rocks! Hip hop
Mumbai Indian Rocks! Hip hop hurrae
असं असतं Pune university चं
असं असतं Pune university चं
किती पण चांगला लिहा
१ मार्काने राहतो पेपर
मुंबई इंडियन्स जिंकले.
मुंबई इंडियन्स जिंकले. अभिनंदन!
पुढल्या वर्षी पुणे टीम नसेल
पुढल्या वर्षी पुणे टीम नसेल असे सगळीकडे म्हणत आहेत. म्हणजे काय? सगळ्या नवीन टिम येणार ipl मध्ये की टीम नावे तीच राहणार पण सर्वच्या सर्व खेळाडू लिलावात येणार?
मॅच हातात असुनहि पुणे
मॅच हातात असुनहि पुणे शेवटच्या ओवर्स कच्यालिंबु सारखे खेळले. ऑफ्साइडला केवळ एकच फिल्डर (रायडु) असतानाहि स्मिथने त्याच्याच हातात हलवा दिला; दे डिडंट डिझर्व टु विन...
स्मिथ ने इतकी संथ सुरुवात का
स्मिथ ने इतकी संथ सुरुवात का केली याची कारणे त्याने दिली पाहिजे एकीकडे रहाणे अॅव्हरेज बघून खेळत होता तर दुसरीकडे स्मिथ २२ चेंडूमधे अवघ्या १० धावा काढून उभा होता. तिथुनच आवश्यक धावांची ६.५०ची सरासरी ७-८ वर जाऊन उभी राहिली. रहाणे आऊट झाला तरी स्मिथ चाचपडत खेळत होता. खेळपट्टी संथ होती परंतू इतकी संथ नव्हती की तुम्ही १-२ धावा काढून धावफलक हलता ठेवता येऊ नये. धोनी आणि स्मिथ यांच्यात तर कोण जास्त चेंडू वाया घालवणार याची स्पर्धाच लागली होती. धोनी ऐवजी तिवारीला उतरवले असते तर कदाचीत मॅच लवकर संपवली असती. धोनी सेट होण्यास वेळ घेतो. परंतू तो वेळ स्मिथ ने फार आधीच खाउन टाकलेला होता. त्यामुळे तो वेळ आणि नंतर धोनीने घेतलेला वेळ दोन्हींमुळे इतरांना मॅच वाचवण्याकरीता वेळच उरला नाही.
स्मिथ चा अनाकलनीय स्लो खेळ,
स्मिथ चा अनाकलनीय स्लो खेळ, धोनी चा फिनीशर म्हणून उतरता काळ, शेवटच्या ओव्हर ला पहिल्याच बॉल ला बाऊंड्री बसल्यावर सगळ्यांनी केलेला ग्लोरी शॉट चा प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या मुळाशी आल्या.
अरेरे 'द ग्रेट फिनिशर'
अरेरे 'द ग्रेट फिनिशर' कानिटकरच्या क्रिकेट वंशजांना त्याचा वारसा पुढे चालवता आला नाही.
गोयंका काय म्हणतोय आता?
माझ्यासाठी ह्याचे स्पष्टीकरण
माझ्यासाठी ह्याचे स्पष्टीकरण एकदम सोपे आहे. मॅचच्या सुरूवातीपासून थेट शेवटच्या काहि overs पर्यंत whatever can go wrong for MI went wrong. Things were overly skewed in favor of Super Giant. शेवटच्या २-३ overs मधे law of averages caught up with them big time. Every strategy MI employed worked. तसही पुणे मिडल ओव्हर मधे स्लो खेळतेच, ह्यात नवीन काहीच नाहिये. कालच cricinfo वर हे stats होते.
पांडयाची इनिंग मास्टर क्लास होती. He is not as talented or agile as Smith is. MI was in complete dire state when Pandya came in. Soon he was the only last recognizing batsman left. He eschewed his cross bat shots and hunkered down to stay till the end. He showed patience to wait for the balls which he can hit straight down to take spongy pitch out of question. Brilliant mature inning which came at pressure situation and gave MI fighting chance at the title. It was not as flashy as innings Pant or Lynn's, it was not as monstrous as likes of Warner or Amla but it came at perfect time at most difficult situation possible. I will say it was probably the best inning of the IPL 2017.
गोयंका काय म्हणतोय आता? >> गोयंकाला धडा शिकवायला धोनीने असे केले वगैरे मुक्ताफळे सुरू झाली आहेत. धडाच शिकवायचा असता तर नेमके गोयंका 'धोनीला जे आता जमत नाही' असे म्हणतोय तेच करून (जिंकून दाखवून) दाखवणे जास्त मीठ चोळल्यासारखे झाले असते ना ?
असामी, टोटली. दोन तीन सिक्सेस
असामी, टोटली. दोन तीन सिक्सेस मारून "एक लुहार की" करून दाखवता आले असते.
सुरूवातीपासून रन रेट च्या मागे होते पण विकेट्स असल्याने कॅच अप करतील असे वाटले होते. ते झालेच नाही.
अनू मलिक होता ना तो जोरात ओरडत असल्यासारखा दिसणारा?
मॅचेस बघत होतो पण इकडे येउन
मॅचेस बघत होतो पण इकडे येउन लिहायला निवांत वेळ मिळाला नाही.... वीकेंडला लिहतो जमले तर सविस्तर!
धडाच शिकवायचा असता तर नेमके
धडाच शिकवायचा असता तर नेमके गोयंका 'धोनीला जे आता जमत नाही' असे म्हणतोय तेच करून (जिंकून दाखवून) दाखवणे जास्त मीठ चोळल्यासारखे झाले असते ना ? >> कॉलिंग ऋन्मेऽऽष ऑन धिस, कॉलिंग ऋन्मेऽऽष ... असामी कसा चुकीचा आहे ते सांग बरं त्याला.
कृणालच्या इनिंगबद्दल सहमत,
कृणालच्या इनिंगबद्दल सहमत, असामी. लास्ट बॉलवर सिक्स गेला असता तर अजूनच रिवार्डींग अर्धशतक झाले असते.
मॅन ऑफ द सिरिज कुणाला दिले ?
मॅन ऑफ द सिरिज कुणाला दिले ? क्रिकईन्फो वर काही नीट कळाले नाही.
स्पर्धेआधी ज्यांना भरपूर
स्पर्धेआधी ज्यांना भरपूर किंमत देउन साइन अप केले गेले त्यांच्यापैकी बेन स्टोक्स हाच फक्त चमकलेला दिसतोय. तो ही शेवटी नसणार होता हे माहीत असूनही पुण्याने खूप पैसे दिले त्याला. बाकी कोणी चमकले का. एकूणच त्यांच्या कॉण्ट्रॅक्ट ची किंमत व त्यांचा परफॉर्मन्स यांचा ग्राफ बघायला मजा येइल.
हायझेनबर्ग, स्टोक्स एमव्हीपी
हायझेनबर्ग, स्टोक्स एमव्हीपी ठरला. आजकाल प्लेयर ऑफ द टूर्नामेंटला हे म्हणतायत वाटतं.
फारएण्डा, थंपीला किती पैसे
फारएण्डा, थंपीला किती पैसे मिळालेले मला आठवत नाही, पण वर धाग्यात फेफने त्याला लॉटरी लागली म्हटलंय. त्याचा परफॉर्मन्स ओव्हरऑल चांगला वाटला. तो ईमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला.
धन्यवाद भा! माझ्यामते स्टोक्स
धन्यवाद भा! माझ्यामते स्टोक्स लाच मिळणे अपेक्षितं होते.
ओके. थंपीबद्दल मलाही माहीत
ओके. थंपीबद्दल मलाही माहीत नाही. उनाडकट, त्रिपाठी, पार्थिव पटेल वगैरे सुद्धा चांगले खेळले. इरफान पठाण ला शेवटी घेतलाच नाही असे दिसते. तो ताहिर दिसला पुण्याच्या मॅचेस मधे.
त्याचा परफॉर्मन्स ओव्हरऑल
त्याचा परफॉर्मन्स ओव्हरऑल चांगला वाटला. तो ईमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला. >> तो शमीचा वारसदार ठरू शकेल. झहिर, शेन बाँड (watch बुमराह) सारख्याच्या पंखांखाली येण्याची गरज आहे.
एकूणच त्यांच्या कॉण्ट्रॅक्ट ची किंमत व त्यांचा परफॉर्मन्स यांचा ग्राफ बघायला मजा येइल. >> ताहिर, अमला, पवन नेगी, कमिन्स, कर्ण शर्मा नि मिचेल जॉन्ह्सन ने पैसा वसूल करून दिला असे म्हणून शकतो.
MVP चा अर्थ MVP for his team असा असेल तर बुमरा ला मिळायला हवे होते. त्याच्याशिवाय MI किती मॅचेस हरले असते हे बघा. वॉर्नर नि गंभीरबद्दल पण हेच म्हणता येईल पण MI जिंकल्यामूळे बुमराहचे पारडे जड. स्टोक्स सुरूवातीला अजिबात खेळला नव्हता. मधल्या फेजमधे त्याच्याशिवय पुण्याचे पानही हलणार नाही असे वाटले होते पण पुण्याने त्याचा लॉस सहज absorb केला.
हो, स्टोक्सशिवाय अजून एकच नाव
हो, स्टोक्सशिवाय अजून एकच नाव सहजी डोळ्यासमोर येते ते म्हणजे कृणाल. पण स्टोक्स वॉज मोर इंपॅक्टफुल, नो डाऊट.
उनाडकत फायनली अक्रमला त्याच्यात दिसलेले गुण आपल्यालाही दाखवायला लागला असे दिसते. इंटरनॅशनल लेव्हलला कितपत पुढे जाईल काय माहीत.
हो, थंपीवर अजून वर्क होण्याची
हो, थंपीवर अजून वर्क होण्याची गरज आहे, पण ते झाले तर ही कॅन बीकम सिरीयसली गुड असे वाटले.
मिचेल जॉन्सन आणि कर्ण शर्मा ... मध्येच आले आणि मॅचेस काढून दिल्या. बेस्ट इन्व्हेस्टमेंट.
उनाडकत बद्दल समोरच्या बाजूने
उनाडकत बद्दल समोरच्या बाजूने कमी कुवतीचा बॉलर असताना पाटा खेळपट्यांवर त्याने विकेट घेईपर्यंत मी त्याच्याबद्दल मत बनवायचे नाही असे ठरवलय. आधी स्टोक्स नि ताहिर बरोबर बॉलिंग करण्याचा नि प्लेऑफ्स बॉलर्सला सूटेबल पिचेसवर मॅचेस असण्याचा नक्कीच फायदा झालाय. (शार्दूल ठाकूरबद्दल पण हेच म्हणू शकतो पण at least तो गेले २-३ seasons रणजी मधे खोर्याने विकेट्स काढतोय - धवल कुलकर्णीचा वारसदार ) तो उनाडकत फिल्डींग करताना किती वेळा डोक्यावर पडतो राव.
मध्येच आले आणि मॅचेस काढून दिल्या. बेस्ट इन्व्हेस्टमेंट. >> खरय, MI चे auction बघून डोक्याला हात लावला होता. turned out to be one of the best. Very strong backups for every key position.
ऑलटाईम आयपीएल ११ मध्ये कोहली,
ऑलटाईम आयपीएल ११ मध्ये कोहली, गेल, रैना, रोहित शर्मा, नरीन , भुवनेश, आणि अश्विन ला सगळ्यांची पसंती आहे.
धोनीचा कधी कोहलीशी तर कधी एबीडीशी क्लॅश होतो आहे. सेहवाग आणि गंभीर क्लॅश होत आहेत आणि झहीर/ नेहरा.
यादव/ भुवनेश / बुमराह/अश्विन/ जडेजा आणि शमी/कु. यादव रिझर्व मध्ये. मस्तं बोलिंग लाईन अप आहे टीम ईंडियाची.
"एकूणच त्यांच्या कॉण्ट्रॅक्ट
"एकूणच त्यांच्या कॉण्ट्रॅक्ट ची किंमत व त्यांचा परफॉर्मन्स यांचा ग्राफ बघायला मजा येइल." - ज्यांना लॉटरी लागली असं म्हटलं गेलं, त्याविषयी हि लिंक बघा
http://www.espncricinfo.com/indian-premier-league-2017/content/story/108...
हैद्राबादसाठी राशिद खानही
हैद्राबादसाठी राशिद खानही चांगली फॉरेन ईन्वेस्टमेंट ठरला.
युवराज, मॅक्सवेल, फॉकनर, गप्टील, बाझ, युसुफ पठाण, कोहली, गेल, एबीडी, कार्तिक, नायर, ईशांत शर्मा, रायुडू (कमी ईनिंग्स खेळला म्हणा) ह्यांचे पर्फॉर्मन्स फारंच लॅकल्स्टर ठरले.
त्यातल्या त्यात धवन, रैना, ऊथप्पा, हरभजन, साहा, पार्थिव चांगले खेळले
Pages