Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23
आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.
पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
RCB बद्दल गम्मत अशी आहे कि,
RCB बद्दल गम्मत अशी आहे कि, त्यांचि बॅटींग हे त्यांचे बलस्थान आहे नि नेमके तेच बर्याच मॅचेस मधे ढेपाळले आहे. consistent opening नसल्याचा तोटा जाणवतोय. अॅबे पण मोठ्या injury layoff मधून येतोय त्यामूळे तो issue आहे. नि मुख्य म्हणजे फुटकळ प्रमाणात केदार जाधव वगळता एकही भारतीय खेळाडू खेळला नाहीये नीट.
परत एकदा टी २० साठी अंडर २५ टीम करायला पाहिजे २००७ सारखी. >> हे पटकन वाचायला चांगले वाटते पण दोन मुख्य मुद्दे आहेत
१. पंत काय इशान किशन काय कोणीच consistently खेळलेले नाहिये. consistent खेळणारे जुनेच आहेत - गंभीर, उथ्थप्पा, पार्थीव, रैना वगैरे. तेंव्हा पूर्णपणे टीम पंइत, इशान किशन, राणा, सॅमसन, त्रिपाठी ह्यांच्या भरवशावर सोडणे भयंकर रिस्की आहे.
२. टीम चा दुसरा अर्धा भाग बॉलिंग : एक थंपी वगळता परत भुवी, बुमराह, यादव हेच मुख्य effective ठरलेले आहेत. फक्त स्पिन मधे कुलदीप, पांड्या नि चहल हे consistent आहेत.
२.
पार्थिव अजूनही कॅचेस सोडतो का
पार्थिव अजूनही कॅचेस सोडतो का रे? :). तेवढे लक्ष देउन बघितले नाही.
गंभीर बद्दल मात्र रिस्पेक्ट! त्याचे काय कोणाशी जमत नाही की काय माहीत नाही, पण २०११ नंतर त्याला चान्सेस कमीच मिळालेत असे वाटते. असामी - तू काहीतरी लिहीले होतेस पूर्वी की एक दोन दा संधी मिळून त्याने फारसे काही केले नाही, पण नक्की लक्षात नाही. २०११ च्या नं १ टीम पैकी तोच एक अजून 'सिलेक्टेबल' असावा.
केदार, डॅनी मॉरिसन च्या
केदार, डॅनी मॉरिसन च्या बाबतीत +१. मस्त कॉमेंट्री करतो तो. अंजुम चोप्रा, लिसा स्थळेकर, इशा गुहा, मेलनी जोन्स पण आवडतात. छान बोलतात.
फा, एकदम चपखल उपमा दिलीस. आज आरसीबी ची बॉलिंग मस्त चाललीये. पंजाब अगदीच अडखळतय.
आज पंजाब ने १२५+ केल्या तरी
आज पंजाब ने १२५+ केल्या तरी आव्हानात्मक ठरतील सध्याच्या आरसीबी ला ह्या मोसमात ७० पेक्षा कमी धावात आटोपण्याची कामगिरी दोनदा बजावली आहे विराट फलंदाजीची फळी असलेल्या ह्या संघाने!!
Maxwell ला ढापला..... सरळसरळ
Maxwell ला ढापला..... सरळसरळ नो बॉल होता!
केदार जाधव काय फालतू किपींग
केदार जाधव काय फालतू किपींग करतोय राव!
असामी - तू काहीतरी लिहीले
असामी - तू काहीतरी लिहीले होतेस पूर्वी की एक दोन दा संधी मिळून त्याने फारसे काही केले नाही, पण नक्की लक्षात नाही. >> टेस्ट मधे रे, basically sort pitch balling चा problem यायला लागल्यावर स्टान्स बदलूनही फरक पडलेला नाही. त्यात मुरली विजय, राहुल नि धवन असे तीन तीन जण दावा करायला लागल्यावर गंभीर पाठी जाणे साहजिक होते. कॅप्टन च्या politics चा त्यात किती वाटा असेल हे माहित नाही.
पार्थीव भरपूर सुधारला आहे प्रत्येक बाबतीमधे असे माझे मत आहे.
नो बॉल नव्हता तो. रूल
नो बॉल नव्हता तो. रूल प्रमाणे लँडींग महत्त्वाचे आहे. तिथून पायाची लांबी घेतली तर तो क्रिझ मध्ये येतो. पण मॅक्सवेलने आणखी ३० एक काढायला हवे होते. थोडी मजा आली असती.
विकेट मेडन, टी २० मध्ये !
विकेट मेडन, टी २० मध्ये !
असामी - गॉट इट. जुन्या
असामी - गॉट इट. जुन्या लोकांना पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन करता यावे असे मला सर्वांबद्दलच नेहमी वाटते. अगदी सिद्धू च्या जमान्यापासून. मधे त्याला संघात आतबाहेर अनेकदा केले होते. मला आठवते त्याच्या १९९८ च्या सीझन च्या आधी मी मित्रांशी वाद घातले होते त्याला कसोटीत घ्यायला पाहिजे म्हणून. आणि १९९८ ला ऑसीज विरूद्ध तो जबरी खेळला होता. वॉर्न ला भरपूर धुतला होता.
तसेच गांगुली बाबत २००६ मधे, २००७ वर्ल्ड कप नंतर सचिन बाबत, नंतर सेहवाग ही, २०११ मधे द्रविड बाबत. या सर्वांना ती संधी मिळाली व त्यांनी तिचा फायदा करून घेतला. होप गंभीर ला एकदा मिळेल.
गंभीरला संधी मिळाली होती
गंभीरला संधी मिळाली होती मागच्या वर्षी. पण एकाच मॅच मध्ये आणि तो आउट झाला. गंभीर मला आवडतो पण आता त्याला संधी मिळणे अवघड होत चालले आहे कारण बेंच वाढत आहे.
नो बॉल नव्हता तो. रूल प्रमाणे
नो बॉल नव्हता तो. रूल प्रमाणे लँडींग महत्त्वाचे आहे. तिथून पायाची लांबी घेतली तर तो क्रिझ मध्ये येतो. >> हे बाल कि खाल काढल्यासारखे वाटलेले मला. त्याची टाच हवेत होती नि तो भाग रेषेवर होता त्यामूळे technically no ball असायला हवा होता असे मला वाटते. पायाचे projection वगैरे काढायला लागणे म्हणजे भारीच किस काढलाय असे वाटते.
कोहली ने अगदीच अनाकलनीय
कोहली ने अगदीच अनाकलनीय निर्णय घेतला. बद्री ची एक ओव्हर ठेवून त्याने वॉटसन ला शेवटची ओव्हर का दिली ते कळलं नाही. १९ रन्स गेल्या. स्लो विकेटवर बद्री ने कदाचित इतक्या रन्स दिल्या नसत्या.
अर्थात आरसीबी ला १३९ रन्स सहज जमतील असं वाटतय.
बरोबर आहे तुझे आणि स्वरूपचे.
बरोबर आहे तुझे आणि स्वरूपचे. पण थर्ड अम्पायरने कानून हे हाथ बडे लंबे होते है, असे आज सकाळीच वाचले असावे, म्हणून तो रुल लावला. अश्या वेळेस पूर्वी बॅट्समनला बेनिफिट ऑफ डाउट पण मिळायचा पण टेक्नॉलॉजीमुळे असे रुल आता प्रत्यक्षात येत आहेत.
तो राहिला असता तर १६० नक्की असते आणि मॅच अगदीच एकतर्फी झाली नसती. ( RCB इथून जिंकतील असे वाटते आहे, पण ह्या वाटन्याची त्यांनी वाट लावली आहे यंदा. )
पण थर्ड अम्पायरने कानून हे
पण थर्ड अम्पायरने कानून हे हाथ बडे लंबे होते है, असे आज सकाळीच वाचले असावे, म्हणून तो रुल लावला. >>>
मला तर मुळात स्पिनर ने
मला तर मुळात स्पिनर ने ओव्हरस्टेप करून नोबॉल टाकणच पटत नाही. अरे, एव्हढासा तो रन-अप, फार तर एखादी छोटीशी उडी आणी तरीही पाय ४ फूटाच्या बाहेर पडतो हे lack of discipline आहे. त्यातून तो युझवेंद्र चहल ईतका छोटासा आहे की आक्खा झोपला तरी क्रीझ मधे मावेल.
फेरफटका म्हणजे आयपीएल चा
फेरफटका म्हणजे आयपीएल चा नानू सरंजामे !
(No subject)
संदीप शर्मा वि. अॅबे मस्त झाली मॅच. नेहमीप्रमाणे अॅबेने निराशा केली. Epitome of RCB in 2017
तो युझवेंद्र चहल ईतका छोटासा
तो युझवेंद्र चहल ईतका छोटासा आहे की आक्खा झोपला तरी क्रीझ मधे मावेल. >>
पण स्पिनरचा नो बॉल हे अक्षम्यच आहे.
चौघेही पुढे येत बाद झालेत..
चौघेही पुढे येत बाद झालेत..
पैसे खाल्लेले का.. तसेही आपण बाहेर आहोत तर ज्या सग्घाला चान्स आहे त्याला जिंकवा
RCB is making match out of
RCB is making match out of this
फा, नानु सरंजामे
फा, नानु सरंजामे
असामी, मॅच शुरू होतेही खतम हो गया|
अॅर्अन ला का बॉलिंग दिली
अॅर्अन ला का बॉलिंग दिली असावी. त्याच्या पेसला एजेस जाअणार नाहित का ?
डीडीचा सपोर्टर म्हणून आज
डीडीचा सपोर्टर म्हणून आज पंजाब हरावे असे फार्फार वाटतेय पण बंगलोर हातातली मॅच काढून द्यायच्या मागे लागलेत पंजाबला!
आणि विराट फलंदाजीने पुन्हा
आणि विराट फलंदाजीने पुन्हा कमी धावसंख्येत हारून दाखविले!
आता कॅल्क्युलेशन काय आहे.
आता कॅल्क्युलेशन काय आहे. सध्या चार च्या खाली असलेल्यांपैकी फक्त पंजाब ला चान्स आहे, का इतरांनाही आहे?
उद्याच्या दोन्ही मॅच इण्टरेस्टिंग आहेत.
पंजाब आणि दिल्ली दोघांना
पंजाब आणि दिल्ली दोघांना चान्स असेल..
बेंगलोर तर गिणतीतच नाहीत, गुजरातही काल आटोपले असावेत.
यात आणखी एक मजा म्हणजे
यात आणखी एक मजा म्हणजे पहिल्या दोनात यायलाही एक चुरस असते कारण सेमीला एक्स्ट्रा चान्स मिळतो.. तिसरे किंवा चौथे आले तर मात्र कप जिंकायला अनुक्रमे तिघांनाही सलग हरवावे लागते.. एका अर्थी क्वार्टरला पोचल्यासारखेच आहे ते.. म्हणजे नॉकआऊटचा विचार करता टॉप 4 नाही तर टॉप 8 .. आणि एकूण संघही आठ
अॅरन ला का बॉलिंग दिली असावी
अॅरन ला का बॉलिंग दिली असावी ह्यापेक्षा सुद्धा मला आधी हा प्रश्न पडला होता की त्याला का खेळवलं? मग लक्षात आलं की 'ह्याला झाका, त्याला काढा' असा प्रकार आहे पंजाब कडे. अॅरन नाहीतर ईशांत असे चॉईसेस आहेत. अॅरन ला काही कळत होतं की मॅच कुठे आणी काय चाललीये की नाही असा प्रश्न पडावा ईतकी निर्बुद्ध बॉलिंग करत होता.
बंगलोर जिंकावी आणी जिंकेल असं वाटत होतं. पण nothing seems to be working for RCB lately. मला वाटलं होतं की नेगी-बद्री शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचतील. एकदा तसं झालं की प्रेशर सम-समान वाटलं जातं. पण नेगी आणी बद्री दोघांनीही ब्रेन-फ्रीझ झाल्यासारख्या विकेट्स टाकल्या. बंगलोर ला वॉटसन ला खेळवायची ईतकी नितांत गरज आहे का? तो त्याच्या 'use by date' पासून कित्येक मैल पुढे आलाय असं वाटतं. शेवटी कमी वाईट खेळलेली टीम जिंकली.
उद्या दोन्ही मॅचेस मस्त आहेत. पुणे-हैद्राबाद आणी दिल्ली-मुंबई.
"गुजरातही काल आटोपले असावेत."
"गुजरातही काल आटोपले असावेत." - गुजराथ आणी आरसीबी, दोघही बाहेर आहेत. गुजराथ कडे आता उरलेल्या ४ मॅचेस मधे फॉरिन प्लेयर्स साठी ऑप्शन्स पण नाहीयेत. मॅक्कलम पण बाहेर पडलाय इंज्युरीमुळे. आता फॉकरन, फिंच, स्मिथ आणी चिराग सुरी ह्यांनाच खेळवावं लागणार आहे.
Pages