Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23
आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.
पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
For me it was great call by
For me it was great call by Umpire Ravi to not give yesterday's wide to Rohit Sharma. Those white lines are just guidelines. When batsman moves , the wide line moves . If yous start giving those wides (and people give them) bowlers will be helpless
त्याही पेक्षा आजकाल विराट
त्याही पेक्षा आजकाल विराट किंवा काल रोहित अंपायरशी जसे वागतात त्याचा मला प्रचंड राग येतो . तुम्ही कितीही चांगले प्लेअर असला तरी अंपायरला रिस्पेक्ट हा दिलाच पाहिजे . अगदी तो चूक असला तरी .
For me it was great call by
For me it was great call by Umpire Ravi to not give yesterday's wide to Rohit Sharma. Those white lines are just guidelines. When batsman moves , the wide line moves . If yous start giving those wides (and people give them) bowlers will be helpless >>> केदार एकदम सहमत.. पण परवाच्या मॅच मधे असाच एक बॉल दुसर्या अंपायरने वाईड दिला होता... तेव्हा तो वाईड नव्हता असेच वाटले... बॅट्समन जर त्या पांढर्या रेषेच्या जवळच जात असेल तर ती रेषा अपोआपच बाद धरली पाहिजे कारण तिथे टाकलेला बॉल हा सहजपणे मारण्यासारखा असतो.. लेग साइडला स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड दिला जातो पण जर बॅट्समनच लेग स्टंपच्या बाहेर असेल आणि बॉल त्याच्या पायांच्या मधे असेल तर तो वाईड होत नाही तसेच आहे...
काल शर्मानी शांततेत घेतले असते तर मॅच जिंकली असती.. नको तिथे आगाऊपणा केला त्यानी... (द्रविड, सचिन, रहाणे ह्यांच्या पैकी कोणी असते तर अजिबात विचलीत न होता पुढचा बॉल कसा उचलता येईल ह्याचा विचार केला असता त्यांनी) सहज शक्य होते ३ बॉल मधे १० रन्स..
"त्याही पेक्षा आजकाल विराट
"त्याही पेक्षा आजकाल विराट किंवा काल रोहित अंपायरशी जसे वागतात त्याचा मला प्रचंड राग येतो . " - हे सगळं आयपीएल किंवा देशांतर्गत स्पर्धेत चालतं. आयसीसी इवेंट्स / आंतरराष्ट्रीय सामन्यात सगळेच व्यवस्थित वागतात. हे त्यांच्या वागण्याचं समर्थन नाहीये.
खरं तर मला दुसर्या बाजूने असंही वाटतं की अंपायर ही क्रिकेट मधे sacred cow असण्याचंही कारण नाही. डीआरएस मुळे एक चांगला फरक पडलाय म्हणजे अंपायरची चूक होऊ शकते आणी ती सुधारण्याची संधी आहे हा एक मानसिकतेतला बदल. खरं तर ऑन-फिल्ड अंपायरचा एखादा निर्णय चुकला आणी ते जर टीव्ही अंपायच्या लक्षात आलं तर तो लगेच बदलायची सुद्धा सोय असायला हवी.
>>त्याही पेक्षा आजकाल विराट
>>त्याही पेक्षा आजकाल विराट किंवा काल रोहित अंपायरशी जसे वागतात त्याचा मला प्रचंड राग येतो
मला पण..... फक्त अंपायरच नाही तर प्रसंगी सहकारी/प्रतिस्पर्धी खेळाडू, प्रेक्षक यांच्याबाबतही इतके व्होकल, इतके आक्रमक होवू नये असे मला तरी वाटते!
"क्रिकेट इज जंटलमन्स गेम" हे सगळेच विसरत चाललेत बहुतेक.... अर्थात सन्माननिय अपवाद आहेत आणि म्हणूनच ते उठून दिसतात
स्वरूप, केदार -सहमत.
स्वरूप, केदार -सहमत.
आज बंगलोर - हैद्राबाद वॉशआऊट होणार असं दिसतय.
"क्रिकेट इज जंटलमन्स गेम" >>
"क्रिकेट इज जंटलमन्स गेम" >> हे अतिशय भंपक विधान आहे. अगदी WG Grace पासून आज स्टीव्ह स्मिथ पर्यंत इंग्लिश नि ऑसी खेळाडू नेहमीच gamesmanship करत आले आहेत. भारतीय खेळाडू ह्याउलट दडपणाखाली (colonial influence maybe ?) खेळत आले आहेत. जेंव्हा केंव्हा एखाद्या एतदेशीय माणसाने जरा काही वेगळे केले कि हा सूर लागलाच पाहिजे. (अगदी विनू मंकड ने मंकडींग केले तेंव्हापासून हे सुरू आहे - खुद्द ब्रॅडमन ने हा फेअर प्ले होता हे सांगितले होते कारण मंकडने नीत warning दिलेली होती आधी, पण मंकडींग करणे म्हणजे काहितरी टॅबु आहे असा आजही लोकांचा समज आहे - गेल्या वर्षात ह्यावर झालेली चर्चा बघा. असो, विषयांतर होईल) विशेषतः भारतीय commentators वारंवार हे gentleman's game बोलत असतात. शास्त्री कसा दर मॅच मधे एकदा तरी 'As long as XYZ is there you can not write off India/ABC' म्हणतोच. (मला कधी तरी gentleman's game हे gentleman's club सारखे आहे का असे विचारायचा मोह होतो ) फे फे म्हणतो तसे अंपायरींग हे sacred cow नाहीये. "डीआरएस मुळे एक चांगला फरक पडलाय म्हणजे अंपायरची चूक होऊ शकते आणी ती सुधारण्याची संधी आहे हा एक मानसिकतेतला बदल. खरं तर ऑन-फिल्ड अंपायरचा एखादा निर्णय चुकला आणी ते जर टीव्ही अंपायच्या लक्षात आलं तर तो लगेच बदलायची सुद्धा सोय असायला हवी." ह्याला पूर्ण अनुमोदन. अंपायरसकत सगळ्यांना त्याच्या चूका दहा वेळा TV वर reply मधे दिसत असताना त्यांना त्यांच्या मूळ निर्णयाला बाधीत राहायला लावून ओशाळवाणे करण्यात काय हशील आहे ? परत आधीच्या चूकीला over compensate करणे naturally होउ शकते जे परत अजून वाईट.
Game is great leveler वगैरे वाक्ये फक्त ऐकायला चांगली असतात. आपण खेळाडूंचा खेळ बघायला आलो आहोत नि अंपायरींग नाही हा मूळ मुद्दा विसरता कामा नये. "प्रसंगी सहकारी/प्रतिस्पर्धी खेळाडू, प्रेक्षक यांच्याबाबतही इतके व्होकल, इतके आक्रमक होवू नये असे मला तरी वाटते!" ह्याबाबत अंशतः सहमती. समोरचा कसा वागतोय त्यावर हे ठरावे. जाता जाता : मी आज परत रोहित शर्माचा तो बॉल पाहिला नि तो मला अजिबात अति आक्रमक वाटला नाही. त्याला अंपायरच्या निर्णयाचे आश्चर्य वाटत होते नि त्याने त्याचे उत्तर विचारले असेच वाटले. शेवटच्या over मधे अतिशय मह्त्वाच्या क्षणी as a captain and a player म्हणून एका uncommon निर्णयाचे स्पष्टीकरण मागणे चुकीचे वाट्त नाही.
च्यायला, ह्या लेखाखाली कसल्या
च्यायला, ह्या लेखाखाली कसल्या घाणेरड्या काँमेटस आहेत.
वा, वा असाम्याच्या आख्ख्या पोस्टला अनुमोदन.
"च्यायला, ह्या लेखाखाली
"च्यायला, ह्या लेखाखाली कसल्या घाणेरड्या काँमेटस आहेत." - 'घाणेरड्या!, बघू बघू' असो.. कुठला लेख?
तू लिंक काढली वाटतं.
तू लिंक काढली वाटतं.
"च्यायला, ह्या लेखाखाली
"च्यायला, ह्या लेखाखाली कसल्या घाणेरड्या काँमेटस आहेत." - >> मी पण बाफ वर खाली करून शोधले
अरे लोकहो, कसला घाण लेख
अरे लोकहो, कसला घाण लेख कॉमेंटस .. मला विपु तरी करा लिंक.., बरेच दिवस झाले काही छानसे घाणेरडे वाचले नाही.. अगदीच राहावले नाही तर माझेच जुने लेख चाळतो
केदार, now, you have opened a
केदार, now, you have opened a can of worms!
लोल फेफ.
लोल फेफ.
छानसे घाणेरडे वाचले नाही.. अगदीच राहावले नाही तर माझेच जुने लेख चाळतो >> किती ती ह ब्रॅ. पण कु ऋ मनाचा चांगला आहे हो. कु ऋ ला देऊन टाक. त्याला झोप यायची नाही. आणि मग खास त्यावर एक बाफ तो काढायचा.
>>अंपायरसकत सगळ्यांना
>>अंपायरसकत सगळ्यांना त्याच्या चूका दहा वेळा TV वर reply मधे दिसत असताना त्यांना त्यांच्या मूळ निर्णयाला बाधीत राहायला लावून ओशाळवाणे करण्यात काय हशील आहे ?<<
असं होतं? मग सगळीकडे कॅमेरे लावण्यात काय हशील?
क्रिकेटपेक्षा गॉल्फ खेळाडुंना लाइव कवरेज आणि कॅमेरा क्लोजअप्सचा मोठ्ठा फटका बसलेला आहे, आणि तो हि प्रेक्षकांनी नियमभंगाचं अपील केल्याने.
२०१३ मास्टर्स मध्ये चुकिच्या जागी बॉल ड्रॉप केल्याने टायगरला २ स्ट्रोक पेनल्टी बसली; आणि हे नोटीस केलं एका शहाण्याने फ्लोरीडात आपल्या घरात बसुन, टिवो रिवाइंड/प्लेबॅक करुन कंफर्म केल्यावर त्याने मास्टर्स च्या रुल्स कमिटीला कळवलं. दुसरी घटना याच वर्षी एलपीजीए टुर्नामेंटमध्ये - एका प्रेक्षकाने इमेल द्वारे लक्षात आणुन दिल्यावर लेक्झि थॉम्प्सनला पटिंग करताना बॉल चुकिच्या जागी ठेवल्याबद्द्ल २ स्ट्रोक पेनल्टी आणि नंतर चुकिचं स्कोरकार्ड साइन केल्यावद्दल २ स्ट्रोक पेनल्टी बसली. वरच्या दोन्ही उदाहरणात खेळाडुंची ऑनेस्ट मिस्टेक असल्याने बेनिफिट ऑफ डाउट त्यांना मिळायला हवा होता पण तसं न झाल्याने टायगरची १५वी मेजर आणि लेक्झिची पहिली एलपीजीए मेजर हुकली.
या घटनांनतर बरंच वादंग उठल्यावर युएसजीए ने नियमांत आता बदल केलेले आहेत...
असामी , तुमच्याशी काही अंशी
असामी , तुमच्याशी काही अंशी सहमत . पण आजकाल कोहली प्रत्येक एल बी डब्ल्यू अपील नंतर अंपायरला जाऊन का हे विचारतो , आर्ग्यु करतो त्याच समर्थन कस करायच ? तुमचा पाँटींग पण तस करायचा म्हणून ?
केदार समर्थन करायची काय गरज
केदार समर्थन करायची काय गरज आहे ? फक्त मी सहज चाळून पाहिले तर अजून एकही केस जिथे अंपायरने कोहली विरुद्ध excessive appeal करण्याबाबत आक्षेप घेतल्याची आढळली नाही. कदाचित कोहली चा एकंदर अॅग्रेसीव्ह डीमीनेर टीव्ही वर बघून तसे वाटत असेल अशी शक्यता लक्षात घेतली आहेस का ? एल बी डब्ल्यू हे भयंकर सब्जेक्टीव्ह आहे, परत रीप्ले मधे काय होउ शकले असते ते दिसत राहिल्यामूळे अंपायरला खेळाडूने विचारणे मला व्यक्तिशः चू़कीचे वाटत नाही. परत एकदा आपण खेळ बघायला जातो कि अंपायरींग ? चुकीच्या निर्णयाचा फटका गेम बदलायला कारणीभूत होउ नये असे माझे मत आहे.
असामीच्या पोस्टींन्ना अनुमोदन
असामीच्या पोस्टींन्ना अनुमोदन. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच वर्षानुवर्ष चालू असलेलं स्लेजिंग कुठल्या प्रकारे 'जंटलमन्स गेम' मध्ये बसतं हे तेच जाणे.
गांगुली कॅप्टन झाल्यापासून भारतीय खेळाडू आक्रमक व्हायला लागले आणि ते मला तरी पटतं आणि आवडतं.
कोलकता ची टॉस जिंकून बॉलिंग.
कोलकता ची टॉस जिंकून बॉलिंग. डॅरेन ब्राव्हो खेळतोय आज केकेआर कडून. पुण्याने फाफ ला घेतलय. दोन्ही टीम्स चांगल्या फॉर्म मधे आहेत. चांगली होईल मॅच असं वाटतय.
मनोज तिवारीच्या २-३ इनिंग्सने
मनोज तिवारीच्या २-३ इनिंग्सने धोनीच्या एकंदर approach मधे भारीच फरक पडलाय असे म्हणायला हरकत नाही.
उत्थप्पाला काय झाले आज एकदम.
उत्थप्पाला काय झाले आज एकदम. खतरा स्टंपिंग. गंभीर नि कुलदीप यादव ला मानले पाहिजे. धोनी नि स्मिथ असताना १७ वी ओव्हर दिली.
"गंभीर नि कुलदीप यादव ला
"गंभीर नि कुलदीप यादव ला मानले पाहिजे." - कुलदीप चा कॉन्फिडंस आणी अॅबिलिटी, दोन्ही जबरदस्त! धोनी आज एकदम मर्डरस मूड मधे वाटत होता.
१८२ पुरेसा स्कोअर आहे का? तसा ईम्रान ताहीर सोडून बाकी कुणीच फारसा भेदक बॉलर नाहीये पुण्याकडे.
नारायण आणि गंभिरला थांबवले तर
नारायण आणि गंभीरला थांबवले तर १० एक रन्सने जिंकतील.
सुंदरची उंची फास्ट बॉलरसाठी
सुंदरची उंची फास्ट बॉलरसाठी चांगली आहे.
तो उत्थप्पा असे शॉट्स खेळतो
तो उत्थप्पा असे शॉट्स खेळतो एखाद्या मॅच मधे नि मग तो देशासाठी खेळू शकला नाही ह्याचे वाईट वाटते. ... मग पुढच्या मॅच मधे तो लवकर बाद होतो नि सगळे नॉर्मल होते
"तो उत्थप्पा असे शॉट्स खेळतो
"तो उत्थप्पा असे शॉट्स खेळतो एखाद्या मॅच मधे नि मग तो देशासाठी खेळू शकला नाही ह्याचे वाईट वाटते. ... मग पुढच्या मॅच मधे तो लवकर बाद होतो नि सगळे नॉर्मल होते - Submitted by असामी on 26 April, 2017 - 12:15"
"Game is great leveler वगैरे वाक्ये फक्त ऐकायला चांगली असतात. - Submitted by असामी on 25 April, 2017 - 16:36"
असामी, काय चाललय काय?
हे उगाचच खुसपट काढलं मी. बाकी काही उद्देश नव्हता.
पण बरोबर आहे तुझं. असे कितीतरी आयपीएल स्टार्स आहेत की ज्यांच्या एखाद्या परफॉर्मन्स कडे किंवा सिझन कडे बघून, 'अरे, हा इंडियासाठी खेळायला हवा होता' असं वाटे वाटे पर्यंत पुढच्याच मॅच ला / डोमेस्टीक सीझन ला / आयपीएल ला 'हाच का तो प्लेयर' म्हणायला लावतात.
त्यावरून एक व्हिडीओ क्लिप ची आठवण झाली. https://www.youtube.com/watch?v=8Acu7iFK1ow
असामी आणि फेरफटका, पॉल
असामी आणि फेरफटका, पॉल वल्थाटी आठवतोय का?
भा, पॉल वल्थाटी आठवतोय.
भा, पॉल वल्थाटी आठवतोय. गिल्ख्रिस्ट ने त्याला नेक्स्ट बेस्ट थिंग म्हणून इअरमार्क केलं होतं. वल्थाटी आणी मनविंदर सिंग बिस्ला वन-मॅच वंडर होते आयपीएल चे.
मोहित शर्मा, गोणी असे बॉलरही
मोहित शर्मा, गोणी असे बॉलरही भारतीय टीम कडून आयपीएल मुळेच खेळले. गोणी वगैरे प्रचंड अॅव्हरेज बॉलर आहे, धोणीमुळे तो टीम मध्ये आला.
वल्थाटी आला तेव्हा गहजब झाला
वल्थाटी आला तेव्हा गहजब झाला होता. फेफ म्हणतो तसे गिलख्रिस्ट वगैरे सगळे सुटले होते. नंतर सगळे नॉर्मल झाले. उथप्पा तरी पुष्कळ बरा.
Pages