आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई वेड्यासारखे खेळले नाहीत तर सहज जिंकतील.>>>>
हरले तर वेड्यात काढणे पण वेड्यांचा अपमान!!
आणि पुण्यासोबत चौथ्यांदा हारायची संधी पण गमावतील! Wink

सिमन्स ऐवजी शर्माने ओपन करायला हवे होते, त्या निमित्ताने स्पिनर्स आधी वापरायला लागले असते किंवा रोहितला पसर विरुद्ध सेटल होता आले असते. सिमन्स ऐवजी लंकेच्या त्या प्लेयरला घेऊन खेळायला हवे होते. सिमन्स एकदम ऑफ वाटतोय, नेहमीची फ्ल्ञुअन्सी नाहि दिसत.

" पुण्याच्या भीतीने जिंकतात की नाही! " - Happy

पुणे वि. मुंबई फायनल. माझा अंदाज पुणं जिंकावं असा आहे. स्मिथ, धोनी सारखे मोठ्या मॅचेस जिंकण्याचा अनुभव गाठीशी असणारे खेळाडू ही पुण्याची ताकद ठरू शकेल.

सध्याच्या फॉर्मवर माझेही बॅकिंग पुण्याला. तसेही पुण्याला ब्याकिंग असतेच कायम. पुण्याविरूद्ध खेळत नसले, तर मुंबई. मुंबईला अनकण्डिशनल बॅकिंग फक्त साहेबांच्या टायमाला होते Happy

पूर्ण स्पर्धेदरम्यान मुंबई अतिशय चांगले क्रिकेट खेळली आहे, सर्व खेळाडूंनी contribute केले आहे. बुमराह ची स्पेशल over नि पांड्याने दिंडाची बिनडोक शेवटची ओव्हर फोडून काढणे हे ह्या वेळचे दोन हायलाईट होते त्यामूळे मुंबई चे जिंकणे मनापासून आवडेल.

कोलकता अंतिम फेरीत पुन्हा पुण्याकडून मुंबईचा पराभव होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती. बहुदा पुण्याकडून मुंबई पुन्हा एकदा हारावी म्हणून १०० धावांचे नाममात्र लक्ष्य कोलकता ने ठेवले होते. Wink

रॉबिन पुन्हा एकदा अपयशी ठरला. जेव्हा पासून त्याने दुखापतीतून परत आला आहे तेव्हा पासून त्याने १० धावांच्या वर स्कोर केला नाही. अशा वेळी कालच्या मॅच मधे पठाण ऐवजी रॉबिन ला बसवायला हवे होते. एक तर रॉबिन मुद्दामुन करतोय अथवा त्याचे काहीतरी सॉलिड बिनसले आहे.

उद्या जर पुन्हा पुण्याने मुंबईला धूळ चारली तर
लागोपाठ ४ मॅचेस मध्ये हरवून 'चारी मुंड्या चीत केले' हा वाक्य प्रयोग अक्षरशः खरा होईल! Happy

आणि मुंबईने पुण्याला हरविले तर मुंबई म्हणेल 'आपने ३ मारे लेकीन हमने सिर्फ एकही मारा वो भी सॉलीड'!

गेले एक दोन मॅचेस मधे पार्थिव पटेल फार सुरेख खेळत आहे असे दिसले. त्याचे शॉट्स बघायला फार छान वाटतात. परवा तो सूर्यकुमार ही चांगले शॉट्स मारत होता. रोहित शर्माने ही एक दोन मस्त मारले. २०-२० मधे क्लासिकल क्रिकेट शॉट्स दिसले की मजा येते.

लागोपाठ ४ मॅचेस मध्ये हरवून 'चारी मुंड्या चीत केले' हा वाक्य प्रयोग अक्षरशः खरा होईल! Happy

आणि मुंबईने पुण्याला हरविले तर मुंबई म्हणेल 'आपने ३ मारे लेकीन हमने सिर्फ एकही मारा वो भी सॉलीड'! >>> हे सही आहे, कृष्णा Happy

Pages