काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया
रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाहरूखचे सिनेमे या यादीत
शाहरूखचे सिनेमे या यादीत टाकले आहेत >>>> पुढचा चक्क नसता तरी चाललं असतं.
आम्ही मात्र बाहुबलीच्या पुढे चक्क लावणार
चक्क बाहुबली या यादीत
दोन्ही बाहूबली म्हणा
दोन्ही बाहूबली म्हणा
आमिर खान आणि त्याच्या भावाचा
आमिर खान आणि त्याच्या भावाचा मेला नामक भयाण सिनेमा. बसमधे होतो म्हणून बघितला. भयानक बोअर. आमिर खानच्या भावाच्या अभिनयाच्या कारकीर्दीच्या शवपेटिकेवर हाणलेला शेवटचा खिळा!
बापरे! बोअर स्टोरी, बोअर अभिनय, कंटाळा येईपर्यंत चालणारी लांबलचक गाणी. दिव्य होते.
डंब अँड डंबरमधील पोलिस, बियर बाटली वगैरे प्रसंग जसाच्या तसा उचलला होता.
दोन्ही आईबाप चांगले अभिनेते असले तरी अपत्याला अभिनय येईलच असे नाही ह्या सिद्धांताचे जिवंत उदाहरण म्हणजे ट्विंकल बाई!
अशा पिक्चर्स मधे बाप नंबरी
अशा पिक्चर्स मधे बाप नंबरी बेटा दस नंबरी ला तोड नाही. एक दोन सॅम्पल सीन्स पाहा:
https://www.youtube.com/watch?v=Xv1BuNdrNY0
https://www.youtube.com/watch?v=Ob2h4qJ0Ods
Some of the silliest comedy आहे ही. पण दर वेळेस प्रचंड हसवतात हे सीन्स. माझे ऑल टाइम फेवरिट्स.
मै प्रेम कि दिवानी हू, हम साथ
मै प्रेम कि दिवानी हू, हम साथ साथ है, कभी खुशी कभी गम, आप का सुरुर, दिल का रिश्ता, फना, रा वन, राम गोपाल वर्मा की आग, जानी दुश्मन, आप मुझे अच्छे लगने लगे, मेला
दोन्ही बाहूबली म्हणा>>>+१
दोन्ही बाहूबली म्हणा>>>+१
मेला चित्रपटामुळे आमीर खान
मेला चित्रपटामुळे आमीर खान बद्दलचा आदर प्रचंड वाढलेला. तो माणूस आपल्या भावासाठी काहीही करू शकतो. अगदी त्याच्या लेव्हलला जाऊन अभिनय करू शकतो. ज्याने मेला आमीरच्या भरवश्यावर थिएटरमध्ये पाहिला असेल तो तर मेलाच असेल.
दोन्ही बाहूबली म्हणा
दोन्ही बाहूबली म्हणा
>>>
हो खरं तर दोन्हीच.
पण पहिला मी मोबाईलवर पाहिलेला त्यामुळे माझी पहिल्याबद्दल तक्रार नाही
अगदी त्याच्या लेव्हलला जाऊन
अगदी त्याच्या लेव्हलला जाऊन अभिनय करू शकतो. >>>
अगदी त्याच्या लेव्हलला जाऊन
अगदी त्याच्या लेव्हलला जाऊन अभिनय करू शकतो. >>>
मुख्य धारेतले हिंदी चित्रपट
मुख्य धारेतले हिंदी चित्रपट सर्वात जास्त पैसा मुंबई सर्कलमध्ये कमावतात. पण खरा हिंदी भाषिक पट्टा म्हणजे यूपी-बिहार-छत्तीसगड-झारखंड. अशा ठिकाणी मात्र भोजपुरी चित्रपट जास्त पाहिले जातात. आतातर मुंबईतही हे चांगला गल्ला जमवतात. आपल्याला कितीही बकवास वाटले तरी मेला, यमला पगला दिवाना अशा चित्रपटांचे कौशल्य हे की भोजपुरीच्या प्रेक्षकांना हे चित्रपट आपलेसे वाटतात आणि त्यामुळेच चालतात व अजुनही बनवले जातात.
भोजपुरी तो बस्स नाम से बदनाम
भोजपुरी तो बस्स नाम से बदनाम है
सलमानचे कित्येक रटाळ बंडल बकवास चित्रपट भोजपुरी चित्रपटांना हसणारेही बघतातच की..
हॅल्लो ब्रदर
हॅल्लो ब्रदर
भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात वाईट पकाऊ बिनडोक सिनेमा. यातील सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संगितकार, गीतकार, सगळेच मंदबुध्दी मथ्थड मोड मधे होते.
Roy अतिशय बकवास चित्रपट!
Roy
अतिशय बकवास चित्रपट!
काल फॅमिली एक डिल हा डब
काल फॅमिली एक डिल हा डब चित्रपट २ तास पाहण्याचा योग आला.
दाढी आणि मॉहॉक कट केलेला टकाटक फॉर्मल्स मधला नायक बरंच काही करतो.
शेरलॉक च्या थाटात पळवलेल्या नायिकेचा पत्ता शोधुन काढतो.तिच्यावर अतिपर्संग करु पाहणार्याने भिरकावलेली बियर हातात झेलतो.आणि बरेच काही.
केवळ आम्ही सगळे पॅरलली बरीच कामं करत होतो, आमचं ६ वर्षाचं रत्न रंजक कथा असल्याप्रमाणे चित्रपट पाहत होतं आणि चॅनल सारखे बदलायला टाटा स्काय रिमोट चं बटन बिघडलंय या ३ सबळ कारणांमुळे दो ओ ओ ओ ओ न तास पाहिला.
दाढी आणि मॉहॉक कट केलेला
दाढी आणि मॉहॉक कट केलेला टकाटक फॉर्मल्स मधला नायक बरंच काही करतो. >>>
हॅपी न्यु इयर दिलवाले धूम - ३
हॅपी न्यु इयर
दिलवाले
धूम - ३
काही चांगले सिनेमे सोडलेत तर
काही चांगले सिनेमे सोडलेत तर सगळेच हिंदी सिनेमे रटाळ, बंडल, बकवास!
अति चालले आहें.. बाहुबली रताल
अति चालले आहें.. बाहुबली रताल कसा काय..
बाहुबली
बाहुबली
अति चालले आहें.. बाहुबली रताल
अति चालले आहें.. बाहुबली रताल कसा काय..
>>>>
बंडल आणि बोकवास हे मान्य तर
येस.. बंदल नक्कीच... रताल
येस.. बंदल नक्कीच... रताल नाहीय पण..
ओके
ओके
आवडला हा प्रामाणिकपणा
मला स्वत:ला बंडल पिक्चर बघायला बोर होते. म्हणून 99 टक्के बण्डल पिक्चर मला रटाळही वाटतात.
अरे मस्त धागा
अरे मस्त धागा
असे खुप सिनेमे आहेत
देव आनंद चा सच्चे का बोलबाला.....
मिथुन श्रीदेवी चा गुरु
राज कपुर राजेंद्र कुमार चा दो जासुस
राजेंद्र कुमार चा गोरा और काला
आमिर जुही चा तुम मेरे हो--- ह्यात दोघे नाग असतात
अनुपम खेर व प्रतिभा सिन्हा चा गुदगुदी
रामसे बंधुंचा सन्नाटा, दरवाजा,
करण अर्जुन --- दारुड्या राखीचा संवाद " आयेंगे... मेरे करण अर्जुन आयेंगे"
मनोज कुमार व दिलीप कुमार चा क्रांती--- महा बोअर
धर्मेंद्र चा जलजला
अनिल कपुर व जुही चा डेव्हीड धवन चा अंदाज---- एकदम चावट संवाद
मनोज कुमार आणि रेखा चा क्लार्क
गंगा जमुना सरस्वती
पुकार, मर्द, कुली........
असे बरेच शिनेमे कॉलेज ला असताना पाहिले. आमच्या कॉलेज जवळ एक थेटर होतं. तिकडे मॅटीनीला रोज नवा सिनेमा दाखवायचे... तेंव्हा लेक्चर बंक मारायची चांगली सोय म्हणुन हे पाहिले गेले....
नंतर ही ही सवय सुटली नाही
अक्षय सोनाक्षी चा जोकर ( हा सिनेमा पाहिला म्हणु निर्माती फराह खान हिने माझी खणा नारळाने ओटी भरली होती.... खरच... विचारा तिला...:फिदी:)
अक्षय-शिल्पा-सुनील चा धडकन---- ह्या सिनेमाने जाम इन्स्पायर केलं.... सुनील शेट्टी २ वर्षांनी शिल्पा ला भेटतो तेन्व्हाचा त्याचा डायलॉग२लय भारी आहे " दो साल पहिले मेरे पास फुटी कौडी नही थी... और आज... आज मेरे पास पाचसौ करोड है...".... काय बीजीनेस करत असेल तो राव??? हा मोठ्ठा प्रश्न आहे.....
शाखाचा हॅप्पी न्यु इयर, ---- अभिषेक बच्चन.... य्याक...
अय्या...... मह म्हाम्हा.... मुर्ख सिनेमा
अजुन खुप आहेत....
रामसे बन्धुंच्या सिनेमांवर
रामसे बन्धुंच्या सिनेमांवर वेगळा धागा काढण्या येवढे ते रट्टाळ आहेत.
तसेच देव आनंद चे म्हातार्पणीचे सिनेमे... म्हणजे साधारण हीरा पन्ना नंतर चे
तसेच राज कपुर आणि दिलीप कुमारचे म्हातार्पणीचे सिनेमे.... अगदी रटाळ. कुठे थांबावे हे कळत नाही ह्या लोकांना
राजेश खन्ना चा अवतार ---- बापरे काय भयानक सिनेमा....
करण अर्जुन चाण्गला होता की..
करण अर्जुन चाण्गला होता की..
फॉर ए चेण्ज हाच एक पिक्चर ज्यात सलमानने शाहरूखला टक्कर दिलेली आणि फायटींगच्या दृश्यात त्याला खाल्लेला..
" " दो साल पहिले मेरे पास
" " दो साल पहिले मेरे पास फुटी कौडी नही थी... और आज... आज मेरे पास पाचसौ करोड है...".... काय बीजीनेस करत असेल तो राव??? हा मोठ्ठा प्रश्न आहे" - मोकीमी, ह्याचं उत्तर तोच देतो. 'मै रुका नही, चलता गया, चलता गया'. अशा रितीनं त्याचा धंदा 'चालला'. मला तुझं आहे तुजपाशी मधला 'चालणार्यचं भाग्य उजळतं - म्हणजे पोस्टमन सगळ्यात भाग्यवान' डायलॉग आठवला होता.
मोकीमी, ह्याचं उत्तर तोच देतो
मोकीमी, ह्याचं उत्तर तोच देतो. 'मै रुका नही, चलता गया, चलता गया'.
>>>>>
तुम्हाला चक्क हा डायलॉग आठवला
"तुम्हाला चक्क हा डायलॉग
"तुम्हाला चक्क हा डायलॉग आठवला" - असे महत्वाचे डायलॉग्ज विसरून कसं 'चालेल'?
मोकिंम ने काहीही लिस्ट बनवलाय
मोकिंम ने काहीही लिस्ट बनवलाय... स्वताला न आवडले म्हणजे रताल का
Pages