काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया
रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्याकडचे शैक्षणिक चित्रपट
आमच्याकडचे शैक्षणिक चित्रपट यादीत नाहीत हे पाहून समाधान वाटलं.
चेन्नई एक्स्प्रेस.
चेन्नई एक्स्प्रेस.
हा परतीच्या विमानाला सहा तास वेळ होता म्हणुन वाटेवरील थिएटरमध्ये बघतीला. अहमदाबाद विमानतळावर तेव्हा (आणि आताही विशेष) टाईमपासला वाव नव्हता आणि थकलोही होतो, तेव्हा चित्रपटगृहातच आराम करत बसणे पसंत केले.
असंभव!!
असंभव!!
हो, अशा नावाचा चित्रपट होता एक. नासिरुद्दीन शाह, अर्जुन रामपाल आणि प्रियांका चोप्रा.
गुलशन राय चा होता. खूप अपेक्षा घेऊन गेलो होतो.
पण एक्दम बंडल.
रटाळ, बंडल, बकवास ..... आणि
रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !
--
Zero !
बद्रि की दुल्हनिया
बद्रि की दुल्हनिया
हे आत्मघातकी साहस किल्ली नसल्याने आणि किल्ली वाले मेम्बरं 3 तास महत्वाच्या कामासाठी शहरात गेल्याने.
अय्या
विमानात पाहिला.अत्यंत नाईटमेअर पिक्चर आहे.
सिमरन....
रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !>>> हम्पी शर्मा की दुल्हनिया
सिमरन....
भंगार चित्रपट... अर्धा सोडून निघोन आलो थेटरातुन
किल्ली नसल्याने>> मी कुठे होते?
बद्रि की दुल्हनिया>> आम्ही थेटरात पाहिलाय हा सिनेमा
आलिया गोड दिसलीये..
बेवफा एक विवाह ऐसा भी
बेवफा
एक विवाह ऐसा भी
बेवफा
बेवफा
मी नुसता पाहिला नाही तर त्याचे सबटायटल्स केलेत.
अक्षरशः फ्रेम बाय फ्रेम... प्रचंड टाहो!!!!!
दुःखात सुख एव्हढच की
बेवफा,
प्यारे मोहन,
मै प्रेम की दिवानी हुं
अंदाज (अक्षय, लारा, प्रियांका)
लेडीज टेलर (राजपाल यादव)
हे असले चित्रपट पहायचे मला पैसे मिळाले
दिलवाले शाहरूखचा,
दिलवाले शाहरूखचा,
ABCD: Any Body Can Dance १ आणि 2
भयानक पांचट सिनेमे.
राईस
राईस
हा का पाहिला असा मनात अजून प्रश्न आहे.टीव्हीवर चालू होता.चॅनल बदलायला कंटाळा आला होता.पिक्चर पावसासारखा टीव्ही वरून गळत होता.गवार निवडून झाली.
अनु राईस का रईस?
अनु राईस का रईस?
सपने मेला
सपने
मेला
गवार निवडून झाली. >> हे एक
गवार निवडून झाली. >> हे एक बरं झालं त्यातल्या त्यात
असे पिक्चर गवार, मेथी, अंबाडी
असे पिक्चर गवार, मेथी, अंबाडी,करडई निवडता यावी म्हणूनच बनवलेले असतात ☺️☺️
गलगले निघाले
गलगले निघाले
मायबोली आशीर्वाद आणि पायस
मायबोली आशीर्वाद आणि पायस कृपेने नाचे नगीन गली गली ५०० mb डाटा खर्च करुन पाहिला आणि दोनतिन दिवस ट्रैफिक असो की दुपारची झोप... कानात कायम आपली स.अ ची पुंगी वाजत होती.
मायबोली आशीर्वाद आणि पायस
मायबोली आशीर्वाद आणि पायस कृपेने>>> असाच शेषनाग पाहिला होता...
संपतच न्व्हता तरी पायस ह्यांनी लिहीलेल पडद्यावर पाहण्यसाठी सहन केला
नाचे नागिन जरा तरी बरा आहे त्या मानाने
घ्या हे पायसदान.
संपादीत.
ABCD: Any Body Can Dance १
ABCD: Any Body Can Dance १ आणि 2 >>>>> ABCD 2 ची गाणी छान होती. चित्रपट मात्र अजून बघितला नाही.
Abcd हे दोन्ही पिक्चर हे
Abcd हे दोन्ही पिक्चर हे मुख्यतः डान्स लव्हर्स साठी चांगले नाच,कोरिओग्राफर ना चांगली प्रसिद्धी यासाठी बनले आहेत.त्यात कथा आहे म्हणून आहे.नुसते नाच दाखवले तर अर्धा तास लागेल आणि तिकीट लावून चित्रपट बनणार नाही.
Abcd हे दोन्ही पिक्चर हे
Abcd हे दोन्ही पिक्चर हे मुख्यतः डान्स लव्हर्स साठी चांगले नाच,कोरिओग्राफर ना चांगली प्रसिद्धी यासाठी बनले आहेत.त्यात कथा आहे म्हणून आहे.नुसते नाच दाखवले तर अर्धा तास लागेल आणि तिकीट लावून चित्रपट बनणार नाही. >>>>>> ++++++++१११११११
भिकार दर्जा रटाळ सिनेमे जे
भिकार दर्जा रटाळ सिनेमे जे पूर्ण बघितले -
बर्फी -
ओक्टॉबर - वरून धवन
रेस 3 - सलमान वाला
धोम 3- अमीर वाला
सदमा
मुंबई पुणे मुंबई 1
हरामखोर
इंग्लिश बाबू देशी मेम
गोल्ड ( अक्षय चा)
व्हेन हॅरी मेट सेजल
नो स्मोकिंग - अनुराग कश्यप
तशन
मोस्टली पूर्ण बघितले कारण ठेतर मध्ये होतो.
च्रप्स तुमच्या यादीत २
च्रप्स तुमच्या यादीत २ चित्रपटांचा दिगदर्शक असा माणूस आहे, जो कुठल्याही चित्रपटाची चिता रचू शकतो.
विजय कृष्ण आचार्य!
ठग्स ऑफ हिंदुस्थान दिगदर्शीत करणारा महाभाग हाच. आणि हा जेव्हा थेटर बाहेर फिरत असतानाचा व्हिडीओ युट्युब वर आला, तेव्हा एक यूजरने कमेंट केली, हिम्मत तो है बंदे मे, अकेला घुम रहा है!!
Thugs बरोबर हट्रिक मारली
Thugs बरोबर हट्रिक मारली त्याने. तशन, धूम 3 आणि thugs
धूम3 मला आवडतो.कितीही अ आणि अ
धूम3 मला आवडतो.कितीही अ आणि अ असला तरी 2 आमिर खान मरताना, आणि 2 भावांमधलं नातं पाहून रडू आलं.
अबकड एक मला तर आवडलेला.
अबकड एक मला तर आवडलेला.
यीणफॅक्ट लागला की मी त्याचे काही सीन्स ईस्पेशली क्लाईमॅक्स पुन्हा पुन्हा बघतो.
मौसम, तेरी मेरी कहानी हे
मौसम, तेरी मेरी कहानी हे शाहिद कपूरचे दोन घाणेरडे, रटाळ फाल्तू चित्रपट लाज नसल्यासारखे पूर्ण बघितले होते. कचराकुंड्या अक्षरशः.
टशन थेटरात जाऊन बघितलेला याचे
टशन थेटरात जाऊन बघितलेला याचे आजही दुःख होतेय. त्यातला सुसह्य भाग करीना-अक्षयचे फलक तक साथ... गाणे व त्याच्या आसपासचा भाग. बाकी सगळा फालटू, बंडल, बकवास....
चार्ली के चक्करमें
चार्ली के चक्करमें
तेरी मेरी कहानी >>>>>>>>
तेरी मेरी कहानी >>>>>>>> हयाचा विषय प्रेमकथा असली तरीही वेगळा होता. पण नीट प्रेझेन्ट करता आला नाही.
अबकड एक क्लाईमॅक्स पुन्हा पुन्हा बघतो >>>>> क्लायमॅक्सचा 'गणपती डान्स' तर छान होता. अन्गावर शहारे येतात अक्षरक्षः त्यावेळी.
Pages