काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया
रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याच्या subtitles केल्यात >
त्याच्या subtitles केल्यात >>. मग तो मनातला राग असंतोष खदखद, शिव्याओव्यांच्या स्वरुपात उतरला नाही ना subtitles मध्ये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Main prem ki diwani hun
Main prem ki diwani hun
Aap muze acche lagne lage
Hum tumhare hain snm
Ms dhoni
Kyon ki
Ra One ( ha pn ek mental suicide ahe)
Mann
Yaadein
Mohabbatein
Yeh jawani hai diwani (
Yeh jawani hai diwani ( bapre kasa pahu shkle dev jaane )
A dil hai mushkil
Phir herapheri
And many more ......
लॉल भारी आहे धागा आणि
लॉल भारी आहे धागा आणि प्रतिसाद
फ्लाइंगजाट-उडतापंजाब, येरझरा वगैरे वाचून मजा आली.
मी थिएटरमधे पाहिलेले रबंब चित्रपट:![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
* सपने - काजोल, प्रभुदेवा, अरविंदस्वामी. अगागा फारच बेक्कार :-|
* काटें
* बागबान - अमिताभ, हेमा, सलमान
* मंगल पांडे
* गरम मसाला - अक्षय, जॉन
* काइट्स - हृतिक
* मुक्ता बर्वेचा पहिला चित्रपट ज्यात अतुल कुलकर्णी होता. माय गॉड पथेटीक होता अगदी! आणि त्याचं कौतुक ऐकलेलं मी
आता मी थिएटरमधे जाणंच बंद केलंय. घरी टिवीदेखील नाही. युट्युबवर महिन्यातून एखाद चित्रपट पाहते. फक्त नेटप्लानचे पैसे जातात![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
===
अन्जु, मी 'बाहुबली फुल मुव्ही' असे युट्युबवर सर्च केलं आणि २ तास १७ मिन्टांची क्लिप पाहिली. तेव्हा मलादेखील काय तो शिन्मा झेपला नव्हता. पण दुसरी ३+ तासांची क्लिप पाहिल्यावर व्यवस्थित कळला आणि आवडला. पहिल्या क्लिपमधे एकुणेक गाणी आणि त्यांच्या आसपासची ३-४ मिनीटं गायब होती.
शेवटाचा सिन जस इंद्रकुमारच्या
शेवटाचा सिन जस इंद्रकुमारच्या चित्रपटात नेहमी असत कुठल्याही गोष्टीला आग लावून सात फेरे चालतात. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सांगायचीही चोरी व्हावी असा
सांगायचीही चोरी व्हावी असा जंजीर (नवीन) थेटरात जाऊन पाहिला. हा सिनेमा पाहील्यानंतर न्यूनगंड निर्माण झाला होता. पण मित्रमैत्रिणींनी, आप्तेष्टांनी आम्ही तर रामगोपाळ वर्माचा आग पाहीलाय असे सांगून धीर दिला ..
युटुब सर्फिंग करतांना "मेरे
युटुब सर्फिंग करतांना "मेरे रश्के कमर तुने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया.." हे गाणे ऐकले आणि प्रचंड आवडले. रिपीट मोड मधे ऐकते आहे.
इथे लिहायचे कारण की मी पुर्वी ह्रिथिक सोनम चा मुव्ही पाहिला होता. इथे ह्या धाग्यावर लिहीण्या योग्य होता.
हे गाण ऐकल्यावर त्या पिक्चरच नाव शोधायचा प्रयत्न केला पण त्यात अजुन एक गाण सापडल "धीरे धीरे". पिक्चरच नाव काही सापडल नाही. कोणाला माहित आहे का? की असा काही मुव्हीच नाहीये? आणि मी आधी अल्बम वैगरेच बघितला होता?
ईथे काही या काळातील टॉप टेन
ईथे काही या काळातील टॉप टेन रटाळ बंडल बकवास पण मोठी स्टारकास्ट असल्याने कदाचित बघितले गेलेले चित्रपट दिले आहेत..
तुम्ही यातला कोणता पाहिला आहे का?
मी एक रावण च !
https://www.youtube.com/watch?v=i8tgkha1FtY
लंच बॉक्स पाहिला आताच... बरेच
लंच बॉक्स पाहिला आताच... बरेच दिवस ऐकून होतो, आज योग आला किंवा वेळ काढला.
https://www.youtube.com/watch?v=vv1CzZxw6hA
आधी अर्धा तासच पाहिला. तेवढ्यात हा धागा आठवला. फारसे काही वेगवान घडत नव्हते. ना ड्रामा, ना अॅक्शन, ना कसली रिअॅक्शन. मध्येच तो नावाझुद्दीन सिद्धीकी येऊन काही फारसे मजेशीर नसलेले डायलॉग मारत होता. असे वाटले नुसते कलाकार चांगले घेऊन ठेवलेत. पण पिक्चर बनवायला गरजेच्या ईतर गोष्टी विसरलेत. म्हटले ईथे एंट्री होणार आज. पण त्यासाठीही चित्रपट पुर्ण बघणे गरजेचे होते. त्यासाठी उर्जा मिळायला अर्ध्या तासाने एक कॉफी ब्रेक घेतला. म्हटले छोटासाच आहे, एका कॉफीच्या जीवावर बघून जाऊ.
पण पुन्हा बघायला घेतले आणि हळूहळू अडकत गेलो. एकेकाच्या कॅरेक्टरमध्ये. तसे अचानक अभिनय उच्च दर्जाचा वाटू लागला. अगदी बारीकसारीक छटा, अगदी आपल्यासमोरच घडतेय ईतके नैसर्गिक, आणि तरीही तो अभिनयच वाटावा असे. चित्रपटाचा शेवट जवळ येताच डोक्याला भुंगाही लागला. शेवटच्या पंधरा मिनिटात हलकेफुलके ट्विस्ट आणि टर्नही आले ज्याने शेवटाबद्दल उत्कंठा वाढली. पण शेवट झाला आणि डोके पुन्हा एकदा भंजाळून उठले. अरे ते भेटतात की नाही ... नक्कीच भेटत असणार, पण पुढे काय ???? उत्तर नाही मिळाले तर आज रात्रभर झोप नाही, घिरट्या घालत राहणार ही सारी कॅरेक्टरे डोक्यात ..
नि:शब्द
नि:शब्द
लव के लिये कुछ भी करेगा
रुद्राक्ष
देशद्रोही (हरे राम!)
जन्नत
क्रूक
अय्या...
अय्या...
बस याच्या पुढ कोणीच नाही..
सपने - काजोल, प्रभुदेवा,
सपने - काजोल, प्रभुदेवा, अरविंदस्वामी. अगागा फारच बेक्कार >>एकदम बरोबर. या चित्रपटातील ओ की ठो काही कळले नाही.
काजोल अरविन्दस्वामी ला सोडून प्रभुदेवाच्या प्रेमात पडते हे तर फारच झाले.
अरविन्दस्वामी ला सोडून
अरविन्दस्वामी ला सोडून प्रभुदेवाच्या प्रेमात पडते हे तर फारच झाले.>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काजोल अरविन्दस्वामी ला सोडून
काजोल अरविन्दस्वामी ला सोडून प्रभुदेवाच्या प्रेमात पडते हे तर फारच झाले. >>> उलट मला तो शेवट पटला. तिने दिसण्याला महत्त्व दिले नाही उलट "माझ्यावर कोण प्रेम करतो, माझा सांभाळ करेल" या बेसिस वर निवड केली. अरविंद स्वामी पण तिच्यावर प्रेम करत होता पण त्याने स्वतः तिला मिळवण्यासाठी प्रयत्न नाही केले त्याने प्रभुदेवाला पुढे केले. इथे तो चुकला. स्वतःचे प्रेम मिळवण्याकरीता स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात.
दिसण्याला महत्त्व फक्त आपल्या उत्तरेकडील लोक देतो. साउथचे हिरो बघितले तर आपल्या बॉलिवूड चित्रपटात व्हिलन शोभतील असे आहेत तरीपण त्यांच्या चित्रपटांना तुफ्फान गर्दी असते. बॉलिवूडचे हिरो स्वतःचे हिरोपण टिकवण्यासाठी काय काय करतात. केस काय उगवतात, सिक्स पॅक्स काय बनवतात, अँटी एजिंग काय करतात. असला प्रकार साउथ वाल्यांकडे अजुन फोफावला नाही. तिकडचा हिरो धनुष सारखा काडी पैलवान पण असतो तर अजित सारखा पुर्ण पांढरे करडे केस असणारा सुध्दा चालतो. रुबाबदार मिशी असलेला नागार्जुन जिथे चालतो तिकडे सोज्ज्वळ चेहरा असलेला विजय सुध्दा सुपरस्टार पद कायम राखतो. विक्रम, सुर्या, अल्लु अर्जुन सारखे वेगवेगळे प्रयोग करणारे हिरो देखील आहे.
बॉलिवूड मधे एंट्री साठी रुबाबदार दिसणे सिक्स पॅक्स डोलेशोले असणे क्लिन क्लिअर चेहरा, हटके हेअर स्टाईल जसे आवश्यक आहे
तसे साउथवाल्यांसाठी नाही.
विहीर, आंधळी कोशिंबीर, नाच, ए
विहीर, आंधळी कोशिंबीर, नाच, ए दिल है मुश्कील
दीपस्त तुमचे म्हणणे बरोबर
दीपस्त तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण हे साउथ मधले पन्नाशीचे (दिसायला आणि वयानेही) हीरो विशीच्या नायिकेबरोबर नाचतात ते पचनी पडणे जरा जडच जाते. आणि साउथच्या नायिका सगळ्या हटकून उत्तरेकडच्या गोर्या असतात : ( हीरोच्या दिसण्याला महत्व नाही पण नायिकेच्या दिसण्याला, रंगाला नक्कीच महत्व आहे तिथे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हीरोच्या दिसण्याला महत्व नाही
हीरोच्या दिसण्याला महत्व नाही पण नायिकेच्या दिसण्याला, रंगाला नक्कीच महत्व आहे तिथे << नाही . बर्याच सावळ्या अभिनेत्री तिथे आहे. ते ही ० फिगर नसणार्या.
आता आता तम्मन्ना वगैरे आल्या आहे
वानगीदाखल एखादा सौथेंडीयन
वानगीदाखल एखादा सौथेंडीयन पोस्टर येऊद्या ज्यात देखणा हिरो आणि रुपाने साधारण हिरोईन अशी जोडी आहे.
हे अविश्वास दाखवायला मागत नाहीये तर मी सौथेंडियन चित्रपट फॉलो करत नसल्याने कल्पना नाही.
पण जर चीकू म्हणतात तसे,
"हीरोच्या दिसण्याला महत्व नाही पण नायिकेच्या दिसण्याला, रंगाला नक्कीच महत्व आहे तिथे "
असे असेल तर चूकच आहे.
मायबोली पण रटाळ .............
मायबोली पण रटाळ ...................................... होत चालली आहे.
मशीन ....... काही सीन बघताना
मशीन ....... काही सीन बघताना बाजीगर आठवतो.. तेच लोक आहेत. दिलिप ताहिल , जॉनी लिव्हर .... ब्याक ग्राउंडला ओम शान्ति ओम गाण्याचे म्युजिक आहे
संजय दत्त आणि अजून 4 कार्टून
संजय दत्त आणि अजून 4 कार्टून असलेला कुठलातरी चित्रपट अधून मधून दिसत असलेला गोवा बघत सहन केलेला. त्यात अधून मधून तरी हसू येत होते. नंतर फर्दीन, संजय, बिपाशा असलेला एक चित्रपट आणि सुनील शेट्टी असलेला अजून एक तथाकथित विनोदी चित्रपट कण्हत, कुंथत कधी संपतोय अशी वाट बघत पाहिला. रणबीर कपूरच्या रॉकस्टारमध्ये चक्क झोप काढली. पण तरीही मी चित्रपट अर्धवट सोडून थेटराबाहेर पडेन असे कधी वाटले नाही, शेवटी पैसे आपल्याच खिशातून गेलेले असतात ना. पण तो योग मुंबई टू गोवा चित्रपटामुळे आला. आज कुठलातरी चित्रपट पाहायचाच म्हणून थेटरात गेलो आणि जो मिळाला तो पाहायला बसलो. सुरवातीपासून जो आचरट पणा सुरु होता तो गाडी सुरु झाल्यावर संपेल आणि चित्रपट व्यवस्थित सुरु होईल हि वाट बघत असताना अचानक इंटेर्वलचा बोर्ड झळकला. तो बोर्ड बघून सगळी आशा संपली आणि मी सरळ 'मी घरी चालले, तुम्हा मंडळींना पुढे बघायचंय तर बघा' सांगून बाहेर पडले. सोबतची मंडळी पाय आपटत बाहेर पडली.
आता दहा ठिकाणी रिव्ह्यू वाचल्याशिवाय थेटरात जातच नाही.
साऊथमध्ये इथल्यासारख्या
साऊथमध्ये इथल्यासारख्या लुकड्या हिरविनी चालत नाहीत हो भाऊ. तिथे धष्टपुष्ट खात्यापित्या घरातल्या मुली लागतात. आत्ता आत्ता कुठे तिथे बारकुंड्या पोरी दिसायला लागल्यात. जयललिताला पडद्यावर पाहिलंय का? तिथल्या सगळ्या सुबक देखण्या ठेंगण्या ठुस्क्या असायच्या. तिथल्या मानाने हिंदीत खूप लवकर बारकुंड्या मुली फेमस व्हायला लागल्या. नाहीतर इथेही वैजयंती, आशा पारेख, नंदा, मीना कुमारी अशा बलदंड बायांनी कारकीर्द गाजवलीय.
झुम बराबर झुम मुंबई ते आंबोली
झुम बराबर झुम मुंबई ते आंबोली प्रवासाचे 8 तास सतत रिपीट करून पाहिला गेला. मी सुरवातीची काही मिनिटे पाहून डोळे बंद केले पण कान बंद नाही करू शकले. त्या चित्रपटात असलेल्या सगळ्या लोकांचा जबरदस्त नॉशीया आलेला बरीच वर्षे. त्यापैकी एकाचाही दुसरा कुठलाही चित्रपट मी नंतर पहिला नाही.
मायबोली पण रटाळ .............
मायबोली पण रटाळ ...................................... होत चालली आहे.>>>> हा हा हा. यात नवीन काय हाय? आताशा मायबोलीवर कुणी लिहीनासेच झले आहे.
हा खरे तर वेगळ्या धाग्याचा
हा खरे तर वेगळ्या धाग्याचा विषय आहे....
रटाळ, बंडल, आणि बकवास ..... तरीही पुर्ण वाचले गेलेले धागे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रटाळ, बंडल, आणि बकवास .....
रटाळ, बंडल, आणि बकवास ..... तरीही पुर्ण वाचले गेलेले धागे <<<, बरेचसे विनोदी लिखाणाचे धागे, ज्यात काय विनोदी आहे हे शोधावे लागते.
गंभीर ललित लेखन जे वाचताना हसू येते.
प्रशांत नारायण आणि के के मेनन
प्रशांत नारायण आणि के के मेनन सारखे तगडे कलाकार चित्रपटाच नाव छल.
गेलो बघायला.
आम्हाला वाटल ट्रेलर असेल पण लक्षात आल, अरे!! हाच चित्रपट आहे. आज गुरुवार शेवटचा शो म्हणून दुसर्या दिवशीची पोस्टर्स लावलेली.
तो चित्रपट होता अखियों से गोली मारे: गोविन्दा रविना तक्ती कपूर
छल चा छळ झाला.
तो मानसिक आघात इतका जबरदस्त होता की के के मेनन प्रशांत नारायणचीच भिती बसली.
या यादीत बाहुबलीला टाकायला
या यादीत बाहुबलीला टाकायला हरकत नाही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदीच रटाळ बण्डल बकवास नसला तरी जो वेळ आणि पैसा खर्च केला तो बुडला असेच वाटले. मात्र त्यावर मायबोलीवत धागे काढता आले, बरंच काही लिहिता आले हेच काय ते समाधान
या यादीत बाहुबलीला टाकायला
या यादीत बाहुबलीला टाकायला हरकत नाही.. >>>>> काडीराम रूणम्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आबासाहेब, वैयक्तिक यादी आहे.
आबासाहेब, वैयक्तिक यादी आहे. काही लोकांनी चक्क शाहरूखचे सिनेमे या यादीत टाकले आहेत. ज्याची त्याची नावड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages