रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26

काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थिएटर मध्ये जाऊन पाहिलेले : बाबूल (२००६) आणि क्यूँ हो गया ना आणि आताचा फॅमिली कट्टा - सिनेमा ठिक असेलही पण मला ते कथानक कणभरही आवडलं नाही Totally cringe-worthy central idea.. कसाबसा पाहीला Uhoh

टिव्हीवर पाहिलेला आणी प्रचंड निराशा केलेला चित्रपट म्हणजे दुनियादारी. शेवटपर्यत वाटत राहिले की "का पाहतोय आपण हा चित्रपट?"

दुनियादारी, मोहोबते, टाईमपास २
सलमान आणि अरबाज खानचा हिरो नं १ की काहीतरी
टायगर श्राॅफचा कुठला तरी कराटे वाला पिक्चर. मुंबई पुणे बसमध्ये पाहिला होता.

झूम बराबर झूम... बोल ना हलके हलके या गाण्याकरता (या गाण्यांचं अ आणि अ सादरीकरण हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे!) आणि प्रिती झिंटा करता पाहिला होता. तेवढंच सिनेमात चांगलं आहे, असं अजूनही ठाम मत आहे.

माहेरची साडी.. मातोश्री आणि त्यांचं भिशी मंडळ यांच्याबरोबर गेलो होतो. का गेलो तर, कार्ट्याला घरी कुठे सोडायचं एकटं असं सर्वानुमते ठरलं होतं ! आख्खं विजय टॉकीज मुसमुसत होतं आणि मी कोण मुसमुसत नाहीये (माझ्या सारखंच) हे शोधण्यात बिझी होतो !

कुंग फु योगा ( हा चित्रपट बघुन असं वाटलं की लेक बघते ते छोटा भीम चे एपिसोड जास्त भारी असतात..
या पिक्चर मधे सिंह उलटी करतो, साप कानाला चावलेला माणुस जिवंत राहातो फक्त त्याचा कान लांब होतो,जॅकी चॅन नाचतो, अचानकच एक सेकंदात खलनायकाचं मन बदलुन तो जॅकी सोबत नाचु लागतो. ई ई हे बघायचं असेल तर नक्की बघा) >>>> मला बघायचा होता . गेल्या आठवड्यात जाणार होतो थेटरात . पण राहिलं Happy

थेटरात पूर्ण बघितलेले पिक्चर :
सिलसिला है ये प्यार का ( कॉलेजमध्ये मैत्रीणीला चंद्रचूड भयंकर आवडायचा , तिच्यासाठी अक्खा ग्रूप गेलेला )
रूद्राक्श ( ऑफिसच्या पैशानी टीम आउटिन्ग करायच होतं , कुठलातरी भन्नाट फालतू पिक्चर बघायचा म्हणून १२-१३ लोक एकत्र गेलेलो )
शिखर (का बघितला माहित नाही Sad )
गजनी ( मी आणि माझी बहिण आमिर खान चे चित्रपट चुकवत नाही म्हणून गेलेलो. भयानक पकाउ आणि अतिरंजित , हिंसक )

टशन
हिम्मतवाला-अजय देवगण
झूम बराबर झूम
धूम-३
रॉकी हँडसम
सगळे थेटरात बघीतले आहेत ! Sad

नाना साठी म्हणून काही पूर्ण पाहिलेले त्यात एकात तर अमिताभ पण होता, तब्बू होती पोलीस ऑफिसर असला भिकार होता
नानाचे अजूनही काही आहेत
एकात तो मेंटल असतो मनीषा कोईराला बरोबर
मनीषाचा अमीर सोबतचा बोटीवरचा

मराठी मध्ये आजोबा
उर्मिला मातोंडकर चा

कुछ कुछ होता है, कहो ना प्यार है, कोई मिल गया,
शाखाचे जवळपास सगळे चित्रपट असह्य असूनही काहीतरी चांगले घडेल, तो मरेल अशा आशेने पहिले, पण डर आणि अंजाम सोडून कुणी अपेक्षा पूर्ती नाही केली. बाझिगर मध्ये मरतो एकदाचा
स्वदेस आणि चक दे हे सणसणीत अपवाद

मै प्रेम कि दिवानि हुं
मिस्टर या मिस
जॅकि श्रॉफ नसिरुद्दिन संगीता बिजलानि चा लक्षमणरेखा.
अय्या
आशिकि२

तलाश

या चित्रपटावर मला "पी.एच.डी" करण्याची फार फार इच्छा आहे.

नाना साठी म्हणून काही पूर्ण पाहिलेले त्यात एकात तर अमिताभ पण होता, तब्बू होती पोलीस ऑफिसर असला भिकार होता>>>>>>>>
ओ तोच तो कोहराम

एकात तो मेंटल असतो मनीषा कोईराला बरोबर>>>>>>>>> अग्निसाक्षी
मनीषाचा अमीर सोबतचा बोटीवरचा>>>> मन

हे सगळे पाहिलेले मी पण
मन तर असह्य बोरींग कॅटेगरीत आहे

टीव्हीवर : व्हॉट्स युवर राशी

थेटरात क्राउचिंग टायगर हिडन ड्रॅगन - तोपण हिंदीत डब्ड. बॉसनेच नेलेलं ऑफिसच्या टीमला.

अग्निसाक्षी नाही, नाना वेडा असतो आणि त्याला डॉक्टर शहाणं करतात पण तो मनीषा आणि अजून एक कुणीतरी असतो, दोघींच्या नादात परत वेडा होतो, मग डॉक्टर पण वैतागतो आणि बसा बोंबलत म्हणतो असं काहीतरी होत त्यात.

मन तर महा भयाण होता

अरे हम दिल दे चुके सनम राहिलाच
मास्टरपीस
बेडकासारखे डोळे करणारी ऐश्वर्या, तुपट अभिनय करणारा अजय आणि बनियन मध्ये झुरळ गेल्यासारखे बोलणारा सलमान.
ऐश्वर्याला बघायला म्हणून ताल, क्यो हो गया ना, रावण, असले भयाण अत्याचार सहन केलेत.

च्यायला या रुंम्याचे लै कामाला लावले
मला तर जवळपास सगळ्याच हिंदी चित्रपटांना या यादीत घालावं वाटत आहे
ढोबळ मानाने
सूरज बदजात्या संपूर्ण
सुभाष घई संपूर्ण
राम गोपाल वर्मा - सांगायला पाहिजेच का
बरेचसे साऊथ मधून डब केलेले परंतु ए आर रहमान चे जादुई संगीत असलेले, जीन्स, हम से है मुकाबला, हिंदुस्थानी इ.इ.
गोविंदा, कादर खान, करिश्मा, शक्ती कपूर असलेले अपवाद - दुल्हेराजा कितीही वेळा बघू शकतो, मूर्तीमंत आचरटपणा एन्जॉय करायला

अग्निसाक्षी नाही, नाना वेडा असतो आणि त्याला डॉक्टर शहाणं करतात पण तो मनीषा आणि अजून एक कुणीतरी असतो, दोघींच्या नादात परत वेडा होतो, मग डॉक्टर पण वैतागतो आणि बसा बोंबलत म्हणतो असं काहीतरी होत त्यात. >>

युगपुरुष

आदिती उडता पंजाब चांगला आहे, मला बघायचाय.

कधी कधी नवरा डब्ड साऊथ मुवीज लावतो, ते येता जाता काम करता करता जबरदस्ती मधे मधे बघितले जातात, कधी सारखे सारखे हॉलिवूड अ‍ॅक्शन तेच तेच बघत बसतो. ते पण मधे मधे बघितले जातात. अर्थात मला काम असेल तेव्हाच रिमोट त्याच्या हातात देते म्हणा Wink . पण अशावेळी जेव्हा चिरंजीव येऊन टिव्ही बंद करतात तेव्हा मज्जा येते.

ग्निसाक्षी नाही, नाना वेडा असतो आणि त्याला डॉक्टर शहाणं करतात पण तो मनीषा आणि अजून एक कुणीतरी असतो, दोघींच्या नादात परत वेडा होतो, मग डॉक्टर पण वैतागतो आणि बसा बोंबलत म्हणतो असं काहीतरी होत त्यात.>>> Rofl

ऎवढ्या चित्रपटात अजूनही कोणी RGV कि आग चा उल्लेख केलेला नाही
मी अजूनही असा/अशी व्यक्ती शोधतोय जीने/ज्याने हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितला असेल

ऋन्मेSS ष फार मोठी लिस्ट राव अश्या रटाळ चित्रपटांची

इतक्यातच येऊन गेलेल्या चित्रपटांपैकी तर "मोहेंजोदारो" सगळ्यात वरती आहे यादी मध्ये

काहीतरी चांगले घडेल, तो मरेल अशा आशेने पहिले,
>>>
आठवेल तशी लिस्ट देतो...
१) डर
२) बाजीगर
३ )अंजाम
४) डुप्लिकेट
५) आर्मी
६) करन अर्जुन
७) शक्ती
८) डॉन
९) कल हो ना हो,
१०) जब तक है जान
११) ओम शांती ओम
१२) रावण
१३) फॅन
१४) आणि अगदी आताचा रईस Happy

कोणाला आणखी आठवले तर भर टाका

गर्लफ्रेंड सोबत वॅलेंटाईन डे च्या दुपारी पाहिलेला " एक मै और एक तू"
हिरो कोण तर तो मामू चा भांजा इम्रान खान .. सोबत करीना होती बहुतेक.. हो तीच होती वाटते..
तिकीटाचे तर अफाट पैसे मोजलेले.. सोफ्यावर आडवे तिडवे लोळत पिक्चर बघायला.. तिथेच गाढ झोपून जावेसे वाटलेले..
एवढा मनस्ताप.. या स्टार किडसनी गंमत मजा म्हणून एकत्र येत आईबापाचे पैसे उडवायला एखादा पिक्चर काढायचा आणि आपण आपल्या खिशातले पैसे खर्च करून यांना अक्षरशा काहीही सिरपैर नसलेल्या पिक्चरमध्ये बघायला जायचे... स्वतःचाच राग आलेला..

बरसात , आ अब लौट चले , करिब , बादल , हमारा दिल आपके पास हे , रन , दिल क्या करे , बिछ्छु , आयना का बायन , पुन्हा गोन्धल पुन्हा मुजरा ... अजुन बरेच आहेत

रन >>> हा अभिषेक बच्चनचा ना? त्यातली त्या कव्वा बिर्याणी गोबर महाराजची कॉमेडी मस्त आहे.

ज्याला कोणाला बघायचे आहे त्याने हे एवढेच बघा रन मध्ये - धमाल आहे - https://www.youtube.com/watch?v=AGMHfxJeSt0

Pages