आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! हे गणित समजून घेण्याची फार ईच्छा आहे.
तीन वर्षात एखादी टीम एकदाच चँपियन होईल असे गृह्रीत धरले तर प्राईझ मनीपेक्षा जास्तीच खर्च तर प्लेअर्सच्या खरेदीवर झाला.
तिकिट विक्री, जाहिराती आणि प्रक्षेपणाचे हक्क हे सगळं धरून रेवेन्यू आणि प्रॉफिटचं गणित कसं आहे?

थोडक्यात फ्रँचाईझी टीम नफा कसा कमवते?

आय्पीलची एव्हढि हवा असुनहि बर्‍याचशा टिम्स अजुनहि प्रॉफिटेबल नाहित; मुंबई धरुन. आणि या रिपोर्ट नुसार ज्या टिम्स प्रॉफिटेबल आहेत त्यांनी जेमतेम १०-१५ करोड नफा मिळवलेला आहे. एव्हढा नफा तर मुंबईत एखादा उडपीवाला शेट्टीहि मिळवतो. दहा वर्षांनंतरहि अशी परिस्थिती, याचा अर्थ बिझ्नेस मॉडेल चुकलंय का?..

दिल्ली ने टॉस जिंकून बॉलिंग घेतलीये. आज मॉरीस, आणी मॅथ्यूज आणी नाहीयेत. त्यांच्या ऐवजी सॅम्युएल्स आणी कमिन्स आहेत. म्हणजे एक ऑलराऊंडर कमी. बॉलिंग चांगली केली पाहीजे आणी मॅक्कलम, इशान किशन, स्मिथ, रैना, कार्थिक कंपनीला रोखलं पाहीजे. निम्म्याहून जास्त सीझन उलटल्यावर ह्या दोन टीम्स ची ही पहिली मॅच आहे.

या मॅच ला आता पूर्वीच्या वर्ल्ड कप मधे श्रीलंका वि. झिम्बाब्वे मॅच असे तशी कळा आल्यासारखी वाटत आहे. बंगलोर त्यांच्याही खाली आहेत म्हणा Happy

"या मॅच ला आता पूर्वीच्या वर्ल्ड कप मधे श्रीलंका वि. झिम्बाब्वे मॅच असे तशी कळा आल्यासारखी वाटत आहे. " - फा, 'अजून जीव आहे'. Wink

"राइनाचे सोडलेले कॅचेस नडणार आहेत दिल्लीला. He is extremely dangerous player once he is set." - नडले ऑलरेडी. गुजराथ २००+ कडे वेगाने चालले आहेत. फिंच, किश, नंतर जडेजा आणी फॉकनर पुष्कळ बॅटींग शिल्लक आहे.

Cricket is a funny game. मागच्या मॅच ला मॅन ऑफ द मॅच झालेला शामी आज पूर्ण प्रभावहीन ठरला.

रैना चुकीच्या वेळी बाद झाला. पण तरीही दोनशे झालेत. It will be hell of a chase. आजचा बेस्ट शॉट कार्थिकने ने नदिमला कव्हरवरून मारलेला सिक्स.

शमी हा बिलकुल T20 चा बॉलर नाहीये..... तो आपला टेस्ट वगैरेला ठीक आहे!
मागच्या सीझनमध्ये त्याने काही मॅचेस घालवल्या होत्या बकवास बॉलींग करुन
आज रैना आणि कार्तिक मारत असताना एखादी ओव्हर कमिन्स किंवा रबाडाला देउन बघायला हरकत नव्हती!
असो..... आज मॉरीस नाहीये (का म्हणे?)..... तेंव्हा पहील्यापासूनच जोर लावला पाहिजेल
एखादा पिंच हिटर पण पाठवून बघायला हरकत नाही!
आज करुण नायर चांगला खेळेल अशी अपेक्षा आहे!

सॅमसन बॅटींग करत असताना सोनी किंवा जडेजाला एखादी over power play मधे द्यायला हरकत नाही. पेस नसेल तर सॅमसन चे टायमिंग गंडू शकते, विशेषतः ह्या विकेटवर.

संगवान १४०+ मधे कधी गेला राव ? थंपी सिरीयसली फास्ट आहे राव. यादवच्या पावलावर जातो कि अ‍ॅरनच्या देव जाणे.

पंत एकताच जिंकून देणार असे दिसतेय. काय खेळतोय राव, खल्लास. फॉकनरला कोहली ने २०१२ मधे असा चोपलेला. नकल बॉल एव्हढा class read करतोय.

सॅमसन ला स्पिन खेळता येतोय हे सिद्ध करतोय. Hopefully कोहली match बघत असेल ही.

पंत जबरदस्त!
फटक्यावेळी बॅटचा आवाज असा येतो जसे भोवरयाला खवडे देऊन फोडतात तसे बॉल फोडायला मारतो Happy

पंतचा पहिलाच बॅकफूट सिक्स पाहता थोडी पंतची ब्याटींग बघूया म्हणून बाहेर खुर्चीवर बसलोय कधीचा .. ते बसूनच आहे Happy

पंत ने सुरूवातीला संगवान ला स्क्वेअर लेग बाऊंड्री वरून मारलेली सिक्स पाहून मला तरूणपणीचा युवराज आठवला. अप्रतिम खेळले दोघही. संजू च्या ३१ बॉल्स ६१ मधे ७ सिक्सेस आहेत, एकही फोर नाही.

दिल्ली ने आता डोकं ताळ्यावर ठेवून जिंकावं.

पुढचा महत्वाचा सामना .. मुंबईशी आहे.
तो जिंकला तर आत्मविश्वासही अफाट वाढेल. मी मुंबई समर्थक आहे, पण आता मुंबई पहिल्या दोनात कशीही पोहोचेनच याची खात्री वाटत असल्याने दिल्लीला जिण्कताना बघायला आवडेल...

अब जाके कहीं जरासा सुकुन आया है दिलको!

मस्त जिंकली आजची मॅच.... म्हणजे आज बॅटींगला उतरतानाच जिंकायच्या इराद्याने उतरल्यासारखे वाटत होते!

पंत.... यु ब्युटी!
काय खेळलाय गडी.... एकदम फिअरलेस!
सॅमसन पण एकदम कडक.... एकदम ग्रेसफुल ॲटेक होता त्याचा!

पण मॉरिसला का बाहेर बसवले हा प्रश्नच आहे माझ्यासाठी.... इंज्युअर्ड होता का तो?
कमिन्स डेथ ओव्हर मस्त टाकतोय.... रबाडानेही आज चांगले रोखले शेवटीशेवटी.... पण मॉरिस आणि रबाडा गेल्यावर कमिन्सच्या जोडीला कोण करणार डेथ ओव्हर्स?
शमी बिलकुलच बेभरवशाचा आहे.... हिल्फेनहौसला खेळवतील कदाचित!

पंत आउट झाल्यावरचे रैनाचे जेश्चर आवडले मला..... दिल जीत लिया यार रैनाने!
अश्याच "जंटलमन्स गेम" बद्दल बोलत होतो मी!

काल चारही भारतीय बॅट्समन तुफान खेळले... रैनाचे अगदीच डॉली कॅचेस सोडले.. पण दोन्ही रन आउट जबरी होते.. आणि अ‍ॅंडरसननी घेतलेला कॅच पण जबरी होता.. सलग तीन सिक्स मारुन बॉलरचे पार खच्चीकरण करतात राव.. आणि कुठेही टाकला तो बॉल तरी सिक्स जाते..

काल सॅमसन अन पंत आणि परवा त्रिपाठी कड्डक्क खेळले.

परत एकदा टी २० साठी अंडर २५ टीम करायला पाहिजे २००७ सारखी.
सीनियर्सवरचा ताणाही कमी होईल अन यंगस्टर्सनाही एक्सपोजर मिळेल. संधी मिळाल्यावर नायर कॅप्टन म्हणूनही बरं काम करतोय पण बॅटिंग गंडलिये.
तसाच कुणीतरी नॅशनल टीमचा कॅप्टन केला तर त्याचंही ग्रूमिंग मस्त होईल अन नव्या दमाच्या टीमचं जेलिंगही जमून येईल.

सॅमसन ने सांगितलेला पंत चा किस्सा आवडला. लागोपाठ दोन सिक्सेस मारल्यावर तो सिंगल घेण्याचा विचार करत होता. तेव्हा पंत त्याला येऊन म्हणाला की 'ज्यादा सोच मत| अगर बॉल मारनेलायक है, तो मार दे|' एकदम सेहवाग अ‍ॅटीट्यूड! द्रविड ने घेतलेल्या ईंटरव्ह्यू मधे त्याने हा किस्सा सांगितला. त्यांनी द्रविड ला तुझा खेळ बघूनच शिकलो म्हटल्यावर द्रविड ची रिअ‍ॅक्शन पण मस्त होती. 'तुम्ही माझी फारसे व्हिडीओज बघितले असण्याची शक्यता नाही, नाहीतर असे खेळला नसता' :). जाता जाता द्रविड ने त्यांना पुढच्या वेळी मॅच संपवून या असंही सांगितलं.

आज पंजाब वि. बंगलोर. पंजाब ला पहिल्या चारात येण्याची आणी आरसीबी ला त्यांना अपसेट करण्याची संधी आहे.

परवाच व्हॉट्सअ‍ॅप वर एक जोक वाचला. 'मालक गावात नसताना, नोकर धंद्याची कशी वाट लावतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आरसीबी ची टीम', Happy

अ‍ॅण्ड धीस इज होईस्टेड इन द स्काय, मॅक्सिमम ! टाईम फॉर अ ग्रीनरी - इन द गार्डन सिटी. किंवा यु आर किडीग मी. अ‍ॅब्स्युलटली किडींग मी ... अन अजून काय काय.

डॅनी मॉरिसन ! IPL च्या मजेत आणखी मजा आणतो. कुणा कुणाला तो आवडतो. Happy

परवाच व्हॉट्सअ‍ॅप वर एक जोक वाचला. 'मालक गावात नसताना, नोकर धंद्याची कशी वाट लावतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आरसीबी ची टीम', >>> Lol

पण एकूणच नेहमीचे सुपरस्टार्स या वेळेत एकदम इन्व्हिझिबल दिसत आहेत. परवा जडेजा बोलिंग ला आला, तेव्हा मला लक्षात आले की हा ही आयपीएल मधे आहे :). पूर्वी भारतात ५००/४ करणारी आपली ८०/९० मधली गँग परदेशात गेली की १००/६ दिसत तसे आरसीबीचे सध्या दिसते. गेल, एबी, कोहली, केदार जाधव - सध्या नुसते कागदावर. भारताची टीम "ऑन पेपर" भारी आहे म्हणत तसे Happy

Pages