Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शनाया घरी येणार बहुतेक रहायला
शनाया घरी येणार बहुतेक रहायला राधिकाच्या परवानगीने >>> हे कधी दाखवल
किंवा मग 'सवत माझी लाडकी'
किंवा मग 'सवत माझी लाडकी' टाईप वळवतील आणि मग साक्षात्कार. मग मध्यच मनिष वैगेरे.. >>>> येस, असच दाखवतील वाटत. राधिका शनायाकडून घरची कामे जबरदस्तीने करुन घेईल. शनाया सुद्दा गुरुला मिळवण्यासाठी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न करेल. नाहीतरी टायटल song मध्ये हेच दाखवलेय ना. नन्तर शनायाला साक्षात्कार होईल की गृहीणी होणे किती कठीण असते ते. राधिका कस manage करते हे? खरच ती किती ग्रेट आहे. मग दोघीन्ची मैत्री होईल. राधिका शनायाचे श्रेयसशी लग्न लावून देईल. आणि अशा रीतीने सिरियल सम्पली.
रेवती मस्त दिसत होती काल
रेवती मस्त दिसत होती काल साडीमधे.>>>>=+११११११
रेवतीने स्लिवलेज ब्लाउज घातलेला राधिकाच्या सासरेबुव्वान्ना बरा चालतो, पण शनायाचे छोटे कपडे बघून तिला "हि आपली सन्सकृती नव्हे." बोलतात.
आई गं... अजून एव्हढं
आई गं... अजून एव्हढं दाखवणारेत का.... मला वाटलं संपून ऱ्हायली ना ओ आता ही सिरिअल…
आई गं... अजून एव्हढं
आई गं... अजून एव्हढं दाखवणारेत का.... मला वाटलं संपून ऱ्हायली ना ओ आता ही सिरिअल…:हाहा:
सगळ्यानी कौतिकाचे ४ शब्द
सगळ्यानी कौतिकाचे ४ शब्द बोलायची आयडिया कैच्याकै वाटली .
एक्दम जानीच्या डोजेची आठवण झाली .
रेवती मस्तच दिसत होती . नेहमीच्या सरळ्सोट केसांपेक्शा हा लूक एकदम मस्त .
राधीकेला , जरा वेगळी साडी आणि हेअरस्टाईल द्यायची ना . तिथे पण जरी काठाची साडी .
गुप्ते पण मस्त हां .
गुरु सरांच्या बायकोच्या वाढदिवसाला , ऑफिसमधली मंडळी होती????
नशिब , कपूर सरांना आमंत्रण नाही धाडले .
गुरु का नविन नवर्यासारखा सारखा लाजत , मुरकत होता ??
रेवतीने स्लिवलेज ब्लाउज घातलेला राधिकाच्या सासरेबुव्वान्ना बरा चालतो, पण शनायाचे छोटे कपडे बघून तिला "हि आपली सन्सकृती नव्हे." बोलतात.>>> बहुतेक त्यांचा आक्षेप , शनायाच्या शॉर्ट्स वर होता , ईथे रेवतीची साडी टाचेपर्यन्त असल्यामुळे प्रोब्लेम नसावा .
सर्वांचे भाषण ऐकून वाटले
सर्वांचे भाषण ऐकून वाटले सीरिअल संपणार असे वाटून आनंद झाला होता !
पण हरकत नाही माझ्यासाठी हि सीरिअल संपली . दुसऱ्या चांगल्या कथा , नाटक काहीच उरले नाही झी कडे म्हणून पाणी टाकत आहेत ...!
मला वाटले की शनाया "मैं तेरे
मला वाटले की शनाया "मैं तेरे बच्चे की मां बनने वाली हूं" असे काही बोलेल. घोर अपेक्षाभंग झाला
(No subject)
राधक्काच्या वाढदिवसाच्या
राधक्काच्या वाढदिवसाच्या साडीचा ब्लाउज खरंच गंडला होता का मलाच असा भास होत होता ??? आढ्याच्या इथे?? (हाच शब्द असावा गेस ...) मागून ओढल्यासारखा वाटत होता बहुतेक....
आढ्याच्या इथे?? >>> आढा
आढ्याच्या इथे?? >>> आढा म्हणजे काय???
आढा म्हणजे काय??? > खांद्यावर
आढा म्हणजे काय??? > खांद्यावर.
मागून ओढल्यासारखा वाटत होता बहुतेक....> हो . मागून ओढल्यासारखा वाटत होता. शिकाऊ टेलर ने शिवल्यासारखा.
मलाही नक्की आठवतं नाहीये पण
मलाही नक्की आठवतं नाहीये पण बहुतेक खांद्याच्या इथे , बाहीला जोडणाऱ्या शिलाईच्या इथल्या जागेला आढी म्हणत असावेत अस आई ने लहानपणी सांगितलेले असावे अस वाटतंय...
शिकाऊ टेलर ने शिवल्यासारखा>>>
शिकाऊ टेलर ने शिवल्यासारखा>>> हो ना...
म्हणजे घाईघाईत शिवला खरा पण लूज झाल्यामुळे सेफ्टीपिनने ऍडजस्ट केल्या सारखा वाटला....
कपडेपट मोस्ट्ली गंडलेलाच असतो
कपडेपट मोस्ट्ली गंडलेलाच असतो शिरेलिंचा.
१४ फेब ला नाही का गवरी ने पण एक भिकार ब्लाऊज घातला होता.
बहुतेक त्यांचा आक्षेप ,
बहुतेक त्यांचा आक्षेप , शनायाच्या शॉर्ट्स वर होता , ईथे रेवतीची साडी टाचेपर्यन्त असल्यामुळे प्रोब्लेम नसावा .>>>> सहमत
मला वाटले की शनाया "मैं तेरे बच्चे की मां बनने वाली हूं" असे काही बोलेल. >>> हो ना, ती गुड न्यूज म्हणत होती तेव्हा मला धडकीच भरली.
या शनायाला स्वतचे डोके नाही का? ति सगळ इशाच्या सागण्यावरुन करतेय. 'तु गुरुला अस सान्ग, तस सान्ग' जी दुसर्यान्च्या डोक्याने चालते ती कसली खलनायिका?
जी दुसर्यान्च्या डोक्याने
जी दुसर्यान्च्या डोक्याने चालते ती कसली खलनायिका?>>> हो. तिकडे तुजीरं मध्ये सुद्धा चंदा जेव्हा नंदिताला खबरा देते आणि तिला कट रचायला प्रोत्साहीत करते तेव्हाच नंदिता काहितरी करते अन्यथा कोडे सोडवणे, मासिके चाळणे, नखे रंगविणे यात रमलेली असते बिचारी.
या मालिकेत तरी इशाला सुद्धा गॅरीच्या पैशावर मजा करायची असते, पण चंदाचे काय? आपले घरदार सोडून पाठराखिण म्हणून आली आहे, कामचुकारपणा करत आरामात राहते तरी पण उगाच नंदिताला भडकवते आणि तिची बोलणी पण खाते.
तेव्हाच नंदिता काहितरी करते
तेव्हाच नंदिता काहितरी करते अन्यथा कोडे सोडवणे, मासिके चाळणे, नखे रंगविणे यात रमलेली असते बिचारी.
.. +१
आता गुरु राधिकाला चक्क
आता गुरु राधिकाला चक्क बोटींग ला घेऊन जातो व (ऑफ ऑल साँग्ज.....!!!) " भोलीसी सुरत आखोमे मस्ती...दूर खडी शरमाये..... आए हाये " हे गाणं म्हणताना दाखवलाय!!! कहर आहे ही मालिका...!!!
काय ते राधिकाचं लाजणं....................... गुरुची ताई शोभत्ये....!!
आंबट गोड , अगदी अगदी!
आंबट गोड , अगदी अगदी!
मी ऑफिसातून येते लेट
मी ऑफिसातून येते लेट त्यामुळे मला ही मालिका पाहता येत नाही, मग मी झी मराठी च्या अॅप वर पाहते. त्याला नंबर असतात त्यामुळे उलट सुलट पाहिले जातात. काल पाहिला त्यात राधिका साडी नेसून देवळात जातेय आणि मनात म्हणतेय की सगळे माझा वाढदिवस विसरलेत. कधी झाला हा भाग?
आंबट गोड.... अगदी अगदी...
आंबट गोड.... अगदी अगदी...
दूर खडी शरमाये म्हटल्यावर तर खदा खदा दात काढले.... भीतीदायक....
नटुकाकी
नटुकाकी
राधिका खरोखरी अभिजित खांडकेकर समोर जून (महिना नव्हे, कोवळाच्या विरूद्ध चा जून) वाटते
दूर खडी शरमाये म्हटल्यावर तर
दूर खडी शरमाये म्हटल्यावर तर खदा खदा दात काढले.... भीतीदायक.... >
आता गुरु राधिकाला चक्क बोटींग
आता गुरु राधिकाला चक्क बोटींग ला घेऊन जातो व (ऑफ ऑल साँग्ज.....!!!) " भोलीसी सुरत आखोमे मस्ती...दूर खडी शरमाये..... आए हाये " हे गाणं म्हणताना दाखवलाय!!! >>> मनात मात्र त्याच्या अजून शनायाच आहे.
शनायाला राधिका-़़कुणाल-रेवतीचा प्लान कळलाय. काल प्रीकेप मध्ये दाखवल. आता ती गुरुला सगळ काही सान्गेल.
दूर खडी शरमाये म्हटल्यावर तर
दूर खडी शरमाये म्हटल्यावर तर खदा खदा दात काढले.... भीतीदायक.... >
राधिका कुणाल आणि रेवतीचा
राधिका कुणाल आणि रेवतीचा प्लान शनायाला कसा काय कळला?
कुणाल म्हणजे तोच ना जो शनायाचा एक्स बॉयफ्रेंड होता, आणि गुरूकडून लाख रुपये घेऊन ती त्याला देते.
राधिका कुणाल आणि रेवतीचा
राधिका कुणाल आणि रेवतीचा प्लान शनायाला कसा काय कळला? >> प्रीकॅप मध्ये दाखवतात की ते तिघे बोलताना शनाया त्याना बघते .
तिला संशय येतो . आता ती बहुतेक गुरुला सांगणार किन्वा काहीतरी छडा लावेल नाहीतर ईशाला सांगेल .
मी मधे बघायला सुरुवात केलेली
मी मधे बघायला सुरुवात केलेली ही मालिका पण आता सोडली. फार ताप झाला डोक्याला. त्या बड्डेपासून नाही बघितली.
हे देवा, हि राधिका रेवतीच्या
हे देवा, हि राधिका रेवतीच्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करण कधी बन्द करणार? तिकडे रेवती मी, दुसर लग्न करणार नाही, नेहाला एकटीने साम्भाळीन म्हणते." आणि ही भैताड सुबोधला लग्नासाठी convince करुन मोकळी सुद्दा झाली! तिला आपल्या मैत्रिणीच्या भावनान्ची, मनाची पर्वाच नाही. ती रेवती सुद्दा राधिकाला पर्सनल सल्ले देते पण ते एका मर्यादेपर्यन्त. ती राधिकाच्या आयुष्यात सारखी सारखी घुसत नाही हिच्यासारखी.
रेवतीने तिच्याशी patch up केल तेच चुकल. आता जर पुन्हा जर राधिका सुबोधशी लग्न कर कर म्हणून हिच्या मागे लागली, तर सरळ रेवतीने सोसायटी आणि मुम्बईच सोडून जाव कायमच.
राधिकाने नको तिथे नाक खुपसण्यापेक्षा स्वतचा नवरा आणि करिअरकडे लक्ष दयाव.
अस व्हायला पाहीजे की, रेवतीने तिच्याशी कायमची मैत्री तोडायला हवी आ़णि गुरुने शनायाकडे पुन्हा जायला हव. म्हणजे हिला अक्कल येईल कायमची.
Pages