अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लोल Wink . फ्रिस्को मध्ये १% प्रॉपर्टी टेक्स आहे ! !मजाच! एन जी ची घरं घेवू जावी तिकडे.
१% ने लोन मग कय मौजा ही मौजा

कोणी बर्ड अँड फॉर्चून सिरिज चे पंखे आहेत का?
मला सॉलिड आवडतात, मागच्या क्रायसिस वरची ही बघा

https://www.youtube.com/watch?v=mzJmTCYmo9g

१ टक्के नाही, जास्त आहे. ती व्हॅल्यू , टॅक्सेस आणि HOA हे फिल्ड्स ऑप्शनल आहेत. ते टाकले की पेमेंट ३८०० पेक्षा जास्त होईल. त्यामुळे फार मजा नाही, इकडं येऊन घर महाग करू नका. Happy

अरे भाऊ अपवाद नाही हा. लिटरली मिलियन्स मध्ये नं आहे हा. ( सेकंड होम* + व्हेकेशन होम असे मिळून ) * इन्वेस्टमेंट म्हणून आणि रेन्ट साठी. सेकन्ड होम ओनर्स नं असा सर्च दे, मग मी मागे कधीतरी वाचल्या प्रमाणे फक्त व्हेकेशन होम नं हा १.६ मिलियन च्या जवळ जाणारा आहे. रेन्टल होम्स नं वेगळा. >> प्रायमरी होम्स बद्दल बोललाय ना अमित ? (एक पाऊल मागचे लिहितोय आम्हि Wink दुसरे घर घ्यायला वेळ आहे अजून )

फ्रिस्को मध्ये १% प्रॉपर्टी टेक्स आहे ! !मजाच! ए >> त्यात मधे school tax included नाहिये रे.

एक पाऊल मागचे लिहितोय आम्हि Wink दुसरे घर घ्यायला वेळ आहे अजून >> अरे पण मी नेहमी चार ने पुढे आहे त्याचे काय? Wink

खरे तर तू काही पोस्ट मागे आहेस आता. तो टॅक्स सबसिडीमुळे घर घेतील, ह्या कल्पनेच्या विरुद्ध आहे, तिथून सुरूवात झाली. तिथून पुढे मग मी सेकंड होम वाले पण सबसिडीमुळे घर घेतात असे लिहिले. अन माझे उदा दिले, मग त्यापुढे रेंटल व्हेक्शन होम पोस्ट होती. ( जी तू कोट केलीस वर) पण मुळ मुद्दा सबसिडीचा होता. जी सेकंड होमला पण मिळते.

तात्या अमितच्या पोस्टची सुरूवात बघा (त्याने तुझ्या पोस्टला उत्तर दिलेले)
"६००-७०० के होम मार्केट वाढेल आणि त्याच वेळी लो एन्ड होम मार्केट मध्ये < ३००००० मंदी येईल. , असा मात्र माझा स्वतःचा अंदाज आहे. कारण त्यांच्यासाठी आता "इन्सेंटिव्ह" राहिला नाही. अर्थात माझा अंदाज चुकू शकतो. >>
हे कन्क्लूजन काही पटलं नाही. प्रायमरी हाउस लोकं रहायला घेत नसून टॅक्स मध्ये ब्रेक मिळावा म्हणून घेतात का?"

तूही ६००-७०० के घर लोक investment property बद्दल म्हणत असशील असे मला अजूनही वाटत नाहिये. असो.

३% ने FHA loan घेऊन घर घेतलं तरी ते सस्टेन करता येणार असेल तर ठीक
आणि साधारण ट्रेंड पाहता व्याज दर वाढणार च आहेत यापुढे,
जेव्हा बँका कमी क्रेडिट वाल्याना, कमी डाऊन पेमेंट वाल्याना लोन देत नाहीत तेव्हा ओरडा होतो की डिस्क्रिमिनेशन करतात म्हणून,दुसऱ्या बाजूने जेव्हा फोरक्लोझर ची वेळ येते तेव्हा असा ही ओरडा होतो की यांनी लोकांना फसवलं, टर्म्स नीट समजावून सांगितल्या नाहीत, लोन घ्यायला फशी पाडलं इत्यादी
आणि हे सगळं फार पूर्वी नाही ८-१० वर्षांपूर्वीच घडलं आहे, तरीही पुन्हा बेधडक सुरु असेल (either banks encouraging people to go for a FHA loan with 3% down payment OR people willing to do it on their own etc.) तर गोंधळाकडे वाटचाल सुरु आहे एकूण हाऊसिंग मार्केट ची असेच म्हणावे लागेल

जेव्हा बँका कमी क्रेडिट वाल्याना, कमी डाऊन पेमेंट वाल्याना लोन देत नाहीत तेव्हा ओरडा होतो की डिस्क्रिमिनेशन करतात >>> असे झाले आहे का इतक्यात कधी? लोन बाबत इतरत्र जसे फेडरल डिस्क्रिमिनेशन चे नियम असतात तेच असणार.

बूमिंग मार्केट मधे अगदी ०% डाउन ने दिली गेली घरे तरी बँकेच्या दृष्टीने खूप रिस्क नसतो, कारण पैसा वसूल होऊ शकतो. पण मार्केट स्थिरावू लागले, किंवा पडू लागले तर तो रिस्क भयंकर वाढतो. मध्यंतरी बँकांच्या लोन रिस्क बाबतही कमर्शियल कंपन्यांच्या ऑडिट बाबत सारबेन्स-ऑक्सली सारखे बेझेल-२ ही आले होते. सध्या त्यानुसार बँका वागत असतील. त्यामुळे लोन रिस्क असला तरी बँकांनी त्याप्रमाणात रिझर्व अमाउण्ट ठेवण्याची सक्ती होती (अजूनही असेल).
http://www.investopedia.com/terms/b/baselii.asp

असामी अ‍ॅग्रीड. दोन गोष्टीत सरमिसळीचे मुद्दे आले. पण प्रायमरी वर ओपिनियन डिफरंस असू शकतो. असे मी आधीच लिहिले.

प्रायमरी घराचा माझ्या मुद्द्याला फा ने ऑलरेडी खोलात जाऊन एक्झप्लेन केले आहे. त्याचे कॅली चे २००० रेंट चे पोस्ट. मला वाटलं ते कव्हर होईल, पण विचारलेस आहेत तर ..

बे एरिया तर सोड अगदी डॅलसमध्येही १६०० -२००० किराया देण्यापेक्षा लोकं बजेट मध्ये न येणारे ५३० ते ५५०,००० चे घर पाहून ( यु नो राईट Happy ) प्रायमरी घराचे बजेट वाढवा ( ४५०/ ७५ पासून) ह्या मताला येण्यास मार्केट भाग पाडत आहे. कारण हवे तिथे मिळतच नाहीये.
मग माणूस डेल्टा कॉस्टचा विचार करायला सुरु करतो. बजेट चा डेल्टाला ( म्हणजे से ४५० चे बजेट पण घर ५३० शिवाय ) आणि सबसिडी जास्त झाल्यामुळे ( ती आधीही ४५० ला मिळणार होतीच. ) आणखी थोडा जास्त टॅक्स ब्रेक मिळणार हे गाजर समोर आहे. तेवढीच पडलेल्या भगदाडाला थोडी फार माती लावण्यास मदत होते. अन्यथा मग आणखी १०-१२ मैल लांब राहायला जाणे हा पर्याय आहेच.

मी डॅलसचे उदाहरण दिले, पण सगळ्याच मोठ्या शहरात हीच परिस्थिती आहे. हवे तिथे जास्त द्या नाहीतर लांब जा. मग घर प्रायमरी कि सेकंडरी हा मुद्दाच नाही. त्यामुळे मी अजूनही माझ्या मुद्द्याला कवटाळून बसलो आहे. Happy पण आधीच लिहिल्यासारखं दुसरे कोणी माझ्या ( आणि बहुदा फारएंडच्याही) थॉट प्रोसेसला अ‍ॅग्री होणारही नाहीत.

अर्थातच सबसिडी गेन हे जितके कर्ज कमी तितका तो गेन डिसिजन मेकिंग मध्ये न्युट्रलाईज्ड होत जातो. त्यामुळेच मी लोअर व्हॅल्यू होम्सबद्दलचे माझे मत वेगळे मांडले.

आणि ह्या सगळ्या चर्चेत त्या माणसाला ४५० ऐवजी ५५० कर्ज मिळेल आणि तो ते फेडू शकतो, असे बँकेला वाटेल, हे गृहित धरलेले आहे. आणि हे आकडेही उदाहरणादाखल आहेत. एखाद्या छोट्या शहरात हेच आकडे ३०० अन ३५० असेही असू शकतात.

वर कुणि तरी लिहील्याप्रमाणे अजून अनेक बदल चालू आहेत व होतीलहि. आणि स्टँडर्ड डिडक्शन कमी करण्या ऐवजी फार तर १००० डॉ. ने वाढवतील.

प्रॉपर्टी टॅक्सचे काय?
न्यू जर्सी मधे अनेक लोक आहेत ज्यांचे इन्कम कमी पण वैद्यकीय खर्च व प्रॉपर्टी टॅक्स फार. इतरत्रहि अनेक बेबीबूमर लोकांचे वैद्यकीय खर्च खूप. त्यांना आयटमाइज करणेच फायद्याचे - नि स्टँडर्ड डिडक्शन दुप्पट नाही केले तर त्यांचा टॅक्स वाढेलच - थोडासा तरी. श्रीमंतांचे टॅक्सेस ४ % ने कमी केले तर जेव्हढे टॅक्स डॉलर कमी होतील, त्यावर असल्या छोट्या मोठ्या रक्कमेने काय फरक पडणार? कसले गरीबांचे नि मिडल क्लासचे टॅक्सेस कमी करतात हे - यांना माहितच नाही गरीब नि मिडल क्लास मधले लोक यांचे प्रॉब्लेम टॅक्स पेक्षा वेगळेच नि किती तरी जास्त आहेत!

लहान धंद्यांवरील टॅक्स कमी केले तर कदाचित ते धंदा वाढवून नोकर्‍या तरी निर्माण करतील. मोठ्या कॉर्पोरेशन पैकी किती कॉर्पॉरेशन भरपूर टॅक्स भरतात? ट्रंपने काय केले?
असेनात का टॅक्सेस जास्त श्रीमंत लोकांचे?

काहीतरी उगाच खेळत बसायचे!

त्यापेक्षा गणित, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग नि वैद्यकशास्त्र यांच्या शिक्षणासाठी नि संशोधनासाठी पैसे खर्च करा.

ट्रिकल डाऊन इकॉनॉमी मुळे प्रत्यक्षात काय फायदे झाले या बद्दल कुठे काय वाचायला मिळेल?
कारण मा़हा विश्वास नाही की त्यामुळे अमेरिकन लोकांच्या नोकर्‍या वाढल्या. धंदे मोठे झाले असतील पण सगळ्या नोकर्‍या परदेशीयांना - कारण ज्यांचे टॅक्सेस कमी होतात त्यांना अमेरिकन लोकांच्या नोकर्‍यांची काही काळजी नाहीये. मान्य आहे स्टॉक होल्डर लोकांचा फायदा झाला पण स्टॉक घेऊ न शकणारे पण नोकरीवर अवलंबून असलेले लोक किती आहेत? (उत्तर- ट्रंपला मत देणारे लोक)
नि असे कुठे सिद्ध केले आहे की सोशल मिडिया, उबर सारखे धंदे टॅक्स कमी केल्यामुळे वाढले नाहीतर वाढले नसते!

आणि ह्या सगळ्या चर्चेत त्या माणसाला ४५० ऐवजी ५५० कर्ज मिळेल आणि तो ते फेडू शकतो, असे बँकेला वाटेल, हे गृहित धरलेले आहे. >> आणि हे होम मॉर्टगेज इण्टरेस्ट डिडक्शन मधे धरले किंवा नाही धरले तर हे इक्वेशन बदलते हाच पॉईण्ट होता माझाही.

इतरत्रहि अनेक बेबीबूमर लोकांचे वैद्यकीय खर्च खूप. त्यांना आयटमाइज करणेच फायद्याचे - नि स्टँडर्ड डिडक्शन दुप्पट नाही केले तर त्यांचा टॅक्स वाढेलच - >> हा ही महत्त्वाचा पॉइण्ट आहे. त्या वयोगटात रिपन्ब्लिकन वोटर्स जास्त आहेत (सन्माननीय अपवाद वगळून Proud ), ते ते डिडक्शन दुप्पट ठेवायला भाग पाडतील असे वाटते.

या बदलातील दोन मेजर गोष्टी अजून इथे फारशा आलेल्या दिसत नाहीत.

१. आल्टरनेटिव्ह मिनिमम टॅक्स रद्द - यामुळे वेगवेगळ्या काड्या करून टॅक्स वाचवणार्‍यांना एक चाप होता. तो आता जाईल. याचा फायदा अपर मिडल क्लास व त्यावरच्या लोकांना जास्त आहे.
२. चाइल्ड केअर रिबेट्स वाढले आहेत - दोन्ही पालक नोकर्‍या करत असतील व त्यामुळे मुलांचे आफ्टर स्कूल केअर वगैरेंचे खर्च पूर्वीपेक्षा जास्त टॅक्स रिबेट मधे येतील. याचे नक्की "नंबर्स" अजून समजले नाहीत.

प्लॅन्ड पेरेंटहूड, ईपीए आणि हेल्थ इंस्टीट्युटला पैसे मिळणार, डिफेन्सला जेवढे मिळणार होते त्यापेक्षा कमी पैसे मिळणार, आणि ज्या गोष्टी ट्रंपच्या क्लोज टू हार्ट होत्या त्या वॉल ला पैसे नाही, सॅन्चुअरी सिटीज ला पैसे मिळणार फेडरल कट्स नाही, डी-पोर्टेशन फोर्सला पैसे नाही.
https://www.washingtonpost.com/news/powerpost/wp/2017/05/01/whats-in-the...

पीबीएस वगैरे बर्‍याच गोष्टींचे फण्डिंग चालू राहणार आहे. जेवढी भीती मीडियाने घातली होती तेवढा बदल दिसत नाही. हा डेम्स चा विजय आहे, आणि मीडियाने वेळेवर दिलेल्या बातम्यांचा परिणाम, की ते आधीचे नुसतेच पोश्चरिंग होते माहीत नाही.

म्हणजे काहीतरी "डील" करून काहीतरी पास करायचे त्यात फक्त श्रीमंतांचा टॅक्स कमी एव्हढे झाले की झाले. बाकीचे गेले खड्ड्यात. खरा उद्देश फक्त तेव्हढाच आहे, बाकीचे आपले उगाच काहीतरी, बदलायचे म्हणून. जमले तर ठी़क, लोक ओरडले तर पुढल्या बजेट मधे पुनः काहीतरी उलट सुलट करायचे. खेळ आहे नुसता खेळ.
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या चा दररोज अनुभव येतो.

हा डेम्स चा विजय आहे, आणि मीडियाने वेळेवर दिलेल्या बातम्यांचा परिणाम, की ते आधीचे नुसतेच पोश्चरिंग होते माहीत नाही. >> रिप. पुरेशी मतं नाहीत हेच कारण असावे. डेमस ची मतं हवी तर त्यांना हवे ते पॉईन्ट हवे. Happy निर्णय कसे होतात ते किती स्लो असतात हे ट्रंपच्या अजूनही गावीच नाही. तो आपला मनाला येईल ते 'प्रामाणिकपणे' बोलतो.

तसे एका अर्थाने ते ही प्रामाणिकच आहे. कारण तो ज्यांच्याशी बोलतो ते म्हणजे फॉक्स, ब्राइटबार्ट ई. लोकांना माहीत नसावे.

ओबामाकेअर रद्द केले

डीटेल्स इथे आहेत. जरा क्लिष्ट आहे, पण एक दोन ठळक गोष्टी म्हणजे ५० पेक्षा जास्त एम्प्लॉयीज असणार्‍या बिझिनेस वाल्यांना हेल्थ इन्शुरन्स देणे सक्तीचे नाही. याचा बोजा अर्जंट/इमर्जंन्से केअर वर म्हणजे पर्यायाने करदात्यांवरच पडणार. प्री-एक्झिस्टिंग कंडिशन वाल्यांना कव्हरेज होते ते ही सक्तीचे नसेल इन्शुरन्स कंपन्यांना.

बाकी टॅक्स क्रेडिट वगैरे आहेत पण त्याचे इन्कम लिमिट्स माहीत नाहीत. आपल्या नेहमीच्या टॅक्स मधे थोडा भाग कमी होईल बहुधा, जो ओबामाकेअर फण्ड करण्याकरता वापरला जात होता.
http://money.cnn.com/2017/05/04/news/economy/obamacare-republican-health...

ओबामाकेअर रद्द केले >>> हाऊसमधे पास झाले आहे, सिनेटमधे अजून व्हायचे आहे. हाऊसमधेपण अगदी कमी फरकाने पास झाले आहे.

इन्शुरन्स कंपन्यांच्या लॉबीचा प्रचंड विजय!
बाकी कुणाला काय फायदा?
बर्‍याच लोकांना इन्शुरन्स घेणे परवडणार नाही असे म्हणतात. कारण मला नाही वाटत, टॅक्स क्रेडिट पुरेसे पडेल एकूण आमच्या सारखे, जे लोवर मिडल क्लास आहेत त्यांना टॅक्स क्रेडिट तर मिळणार नाहीच, पण त्यांचे इन्शुरन्स कदाचित रद्दच होतील किंवा प्रिमियम वाढतील. आता इन्कम टॅक्स कमी होईल म्हणतात म्हणजे आम्हाला एक दिवस स्टार बकची कॉफी परवडेल!
ठीक आहे, रिपब्लिकन लोकांना गरीब किंवा कमी श्रीमंत लोक नकोच आहेत.

हा कायदा घाई घाईने पास करण्यात लोककल्याणाचा हेतू जास्त की ओबामा विरुद्धची खुन्नस जास्त हा प्रश्नच आहे.

हाऊसमधे पास झाले आहे, सिनेटमधे अजून व्हायचे आहे. >>> हो ते राहिले लिहायचे. थॅंक्स.

हा कायदा घाई घाईने पास करण्यात लोककल्याणाचा हेतू जास्त की ओबामा विरुद्धची खुन्नस जास्त हा प्रश्नच आहे. >>>> दुर्दैवानं ओबामा विरुद्धची खुन्नस हा आणि हाच हेतू / अजेंडा दिसतोय ट्रंपच्या प्रत्येक गोष्टीत. ओबामानं केलेली प्रत्येक गोष्ट 'रीपील' करायची आहे. अजूनही या व्यक्तीला मला 'माझा प्रेसिडेंड' म्हणता येत नाही.

कॅलिफोर्निया प्रेसिडेंशीअल प्रायमरी मार्च मध्ये उरकायचा प्लान करतंय. जेणेकरून जास्त लेव्हरेज मिळेल आणि टेक इट फॉर ग्रॅन्टेड होणार नाही. सिनेट मध्ये पास झाले, असेम्ब्ली मध्ये बाकी आहे.
इतर राज्यांनी त्याच्या आधी यायचा प्लान केला तर गव्हर्नर आणखी आधी पण आणू शकतात.

कॅलिफोर्नियाने एकदा तरी रिपब्लिकन उमेदवाराला इलेक्टोरल कॉलेज मधून भरघोस मते द्यावीत, ग्रॅण्टेड धरले जाउ नये म्हणून. काही मजाच नसते. मला तर यार्ड साइन सुद्धा बघितल्याचे आठवत नाही.

दुर्दैवानं ओबामा विरुद्धची खुन्नस हा आणि हाच हेतू / अजेंडा दिसतोय ट्रंपच्या प्रत्येक गोष्टीत.>>+१११
ओबामाच्या सगळं विरुद्ध करायचं, नंबर ऑफ गोल्फ ट्रिपा सुद्धा.... :)) तेही स्वतःच्या खाजगी रिसॉर्ट वर Happy

ट्रंपने प्रचारादरम्यान हे अनेकदा स्पष्ट खणखणीतपणे म्हटले होते की ओबामाकेअर रद्द करणार आहे. आणि निवडून आल्यावर तो ते करत आहे. आश्वासन दिले, ते निदान काही लोकांना तरी आवडले आणि ते पाळले ह्यात तत्त्वतः काहीही चूक नाही. ओबामा केअर हे एक हाताबाहेर गेलेले, अर्थव्यवस्थेवर ताण पाडणारे, उद्योजकांची कोंडी करणारे प्रकरण आहे. अशी त्याची भूमिका होती.

जर ही ओबामाबद्दलची खुन्नस असेल तर असेना का. ओबामा काही देव नाही की त्याला विरोध करणे महापाप समजले जावे!

हायझनबर्ग, हे तुझ्याकरता.
https://finance.yahoo.com/news/buffett-medical-costs-tapeworm-american-e...
This a comment from Buffett in the article
“The one thing I can tell you, if it goes through the White House … anybody with a $250,000 adjusted gross income and a lot of investment income, is going to have a huge tax cut,” Buffett said. “When there’s a tax cut, either the deficit goes up or they get the taxes from somebody else.”
तू जी शक्यता वर्तवली होती तुझ्या पहिल्या पोस्टीत तीच इथे दिलेली आहे. It absolutely made sense and it was a good point. Happy

ट्रंपने प्रचारादरम्यान हे अनेकदा स्पष्ट खणखणीतपणे म्हटले होते की ओबामाकेअर रद्द करणार आहे. ............ ओबामा काही देव नाही की त्याला विरोध करणे महापाप समजले जावे!
सबूर, सबूर.
ओबामाच काय, ट्रंप पण देव नाही. नि प्रचार करताना अनेकदा स्पष्टपणे म्हंटलेल्या गोष्टी आता हळू हळू बदलताहेत.
पण ओबामा केअर रद्द करून त्या जागी जे आणायचे ते तरी धड असावे ना? -
विशेषतः त्याने किती लोकांचे भले होईल, याचा काही विचार? किती घाई ती?
की आधी उजवा हात दुखत होता तर तो बरा करताना डावा हात मोडून ठेवायचा असले करायचे नि म्हणायचे मी सांगितले तसे केले.
निवडून येणे वेगळे नि नंतर राज्य करणे वेगळे.
मूळातच त्याच्या कित्येक कल्पना बर्‍याच लोकांना पसंत नव्हत्या - ज्यांना होत्या त्यांच्यापेक्षा तीस लाख जास्त लोकांना नव्हत्या. नि मूर्खासारखे वागेन म्हणायचे नि तसेच वागायचे नि त्यालाच थोरपणा,शहाणपण म्हणायचे?

Pages