अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

स्वाती२ - गृहकर्जावरचे व्याज अजूनही वजा करता येणार आहे. घराचे/स्टेट टॅक्सेस - त्याबद्दल स्पेसिफिकली कोणी उल्लेख केलेला आहे का लक्षात नाही. एवढे डीटेल्स वर्क आउट केले नसावेत अजून. कारण परवा ऐकलेल्या बातम्या ढोबळ होत्या. नंतर अजून डीटेल्स पाहिले नाहीत.

त्या दिवशी असे वाटले की सर्वसामान्य लोकांना टॅक्स चे कोड सोपे करण्याकरता असे अनेक डिडक्शन्स रद्द करून एकच स्टॅण्डर्ड डिडक्शन दुप्पट केले आहे. एकूण घोषणा तशा पद्धतीच्या वाटल्या. अजून त्या बिल ला मंजुरी मिळेपर्यंत असंख्य बदल होतील.

ओके फारएन्ड. घराचे इंटरेस्ट वजा करता येणार आहे तर मग ठीक आहे. घराचे आणि स्टेटचे टॅक्स वजावट जाणार आणि हेल्थ इंशुरन्सचे एम्प्लॉयरने भरलेले हप्ते इनकम धरणार असे काहीतरी आहे. बाकी एजुकेशनचे क्रेडिट्स वगैरेचे काय करणार आहेत कोण जाणे.

स्वाती२ .. स्टॅण्डर्ड डिडक्शन दुप्पट केल्याने जे लोक स्टॅण्डर्ड डिडक्शन क्लेम करत होते त्याचे कर कमी होणार आहेत. कालच एक सर्वे वाचला त्यात $१००,००० पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मध्ये ७५% लोक स्टॅण्डर्ड डिडक्शन वापरतात तर उच्च उत्पन्नात फक्त १९% स्टॅण्डर्ड डिडक्शन वापरतात ह्या सगळ्या लोकाना फायदाच होणार आहे.
स्टॅण्डर्ड डिडक्शन डबल केल्याने काही लोक पुर्वी itemized deduction करत होती , ( खास करुन ज्याचा सध्याचा दरानुसार स्टॅण्डर्ड डिडक्शन आणि itemized deduction मधिल फरक $१०००० पेक्षा कमी आहे) त्याना पण डबल स्टॅण्डर्ड डिडक्शन मुळे कर कमी लागणार आहे.
फार थोड्या उच्च मध्यम वर्गीय लोकाचा कर वाढणार आहे.

रिटायर्मेंट सेविंगला सरळसोट धक्का लागणार नाहीये पण गृहकर्जावरचे व्याज, घराचे आणि स्टेटचे टॅक्सेस वजा करता येणार नसतील तर तसेही कर्जाचे हप्ते आणि रिटायरमेंट सेविंग ही कसरत जड जाईल ना? मला यात मिडलक्लाससाठी काय चांगले असेल ते कुणी सांगेल का?
>>

स्वाती,

अगदी हेच प्रश्न लक्षात घेऊन मी लिहिले होते. माझ्या पोस्टचा गोषवारा :

२०१७ च्या टॅक्स रेटसला घेऊन पुढील वर्षी काय होईल हे गणित देऊन मांडली होती. सगळे डिडक्शन एकत्र करून आता २४००० पर्यंतचे डिडक्शन मिळणार असल्यामुळे फायदा कमीच असणार, पण तरीही माझ्यामते "नेट नेट" गेन हा मिडल आणि लोअर क्लासला होणार आहे. जर तुम्ही उच्च मध्यमवर्गीय असाल, तर तुमचे ब्रॅकेट बदलेल. आणि व्याजदर डिडक्शन घेण्यासाठी मग तुम्हाला आणखी महागाचे घर घ्यावे लागेल, अन्यथा तुम्ही जास्त टॅक्स भराल.

आणि हे सर्व एकत्र केल्यामुळेच ( सगळे आयटमाईज्ड) जसे अनेक विचार करत आहेत की एकदम बाजारात पैसा येईल तसे काही होणार नाही. कारण ही रॅडीकल स्टेप नाही. आत्तापेक्षा थोडा जास्त पैसा बाजारात असणार, पण त्यामुळे "इकॉनॉमी किकस्टार्ट " ( हा शब्द ट्रम्पचा आहे, माझा नाही) होण्यास मदत होईल. ६००-७०० के होम मार्केट वाढेल आणि त्याच वेळी लो एन्ड होम मार्केट मध्ये < ३००००० मंदी येईल. , असा मात्र माझा स्वतःचा अंदाज आहे. कारण त्यांच्यासाठी आता "इन्सेंटिव्ह" राहिला नाही. अर्थात माझा अंदाज चुकू शकतो.

केदार ,
तुम्हाला आणखी महागाचे घर घ्यावे लागेल, अन्यथा तुम्ही जास्त टॅक्स भराल>>..... माझ्या मते असे काही होणार नाही. जर जास्त महाग घर घेतले तर जास्त व्याज द्यावे लाजेल , जास्त property tax भरावा लागेल. आणि जो काही federal tax वाचणार त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतिल.

जास्त व्याज भरू, पण ते व्याज परत डिडक्ट करता येईल. कारण व्याज हे अजूनही डिडक्टेबल आहे. ते अजून गेलेले नाही. - ह्यावर आणखी आकडेमोड करून पाहतो.

तसेही जी लोकं ६०० - ७०० के + चे होम घेतात, त्यांच्या साठी प्रॉपर्टी टॅक्स हा प्रचंड महत्त्वाचा फॅक्टर जास्त नसावा असे मला वाटते, कारण फक्त "होम" पेक्षाही मग स्टेटसचा पण प्रश्न येत असल्यामुळे ही लोकं अनेक गोष्टी स्टेटस मेंटेन करायला खर्च करतात. . अर्थात घर घ्यावेच लागेल असेही नाही, कारण इतक्या इनकमचे लोकं नक्कीच घरात राहत असतील हे ही खरेच आहे.

पण हा प्लान वेल्स फार्गोने तयार केलेला आहे, त्यामुळे ती लोकं होम मार्केट पडू देतील असे वाटत नाही.

सध्या तरी कोणत्याही ठोस तपशिलाविना ढोबळ रूपरेषा जाहीर केली आहे ना?
सगळं ठरवून प्रत्यक्ष कायदा होईपर्यंत बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होतील.
राज्य सरकारं कर उत्त्पन्न कमी होऊन नुकसान होणार असेल तर या सगळ्याला विरोध करतील.
त्यामुळे आताच काही स्पष्ट समजणं तस कठीण वाटतंय.

>>जास्त property tax भरावा लागेल. आणि जो काही federal tax वाचणार त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतिल.<<

रियल इस्टेट टॅक्सेस डिडक्शन पुढेहि चालु राहिल असं वाटतंय...

६००-७०० के होम मार्केट वाढेल आणि त्याच वेळी लो एन्ड होम मार्केट मध्ये < ३००००० मंदी येईल. , असा मात्र माझा स्वतःचा अंदाज आहे. कारण त्यांच्यासाठी आता "इन्सेंटिव्ह" राहिला नाही. अर्थात माझा अंदाज चुकू शकतो. >>
हे कन्क्लूजन काही पटलं नाही. प्रायमरी हाउस लोकं रहायला घेत नसून टॅक्स मध्ये ब्रेक मिळावा म्हणून घेतात का?

मी फेड च्या रिसर्चची पेपर लिंक दिली आहे. तो पेपर वाच. त्यावरून निष्कर्ष काढलेला आहे. खूप व्यवस्थित मांडनी केली आहे. फक्त मला दोन पाने मागे जायचा कंटाळा आला आहे.

टॅक्स ब्रेक हा मोठा फॅक्टर असतो. आणि त्यामुळेच सरकार टॅक्स ब्रेक इन्सेटिंव्ह व्याजावर देते. तो फॅक्टर नसला असता तर होम मार्केट साठी अश्या इन्सेंटिव्हची गरजच नसली असती.

प्रायमरी होम शब्द तू वापरलास म्हणून .. हा थोडा फाटा आहे, थोडे हिस्ट्रीत जायचे तर प्रायमरी होम ओनरशिप ड्रीम ही बिल क्लिंटनची आयडीया होती. ते डीम मोठे होत होत एवढे झाले की पुढे काय झाले हे सर्वांना माहिती आहे. प्रायमरी रेसिडंस जर परवडत नसेल तर घ्यायची काही गरज नाही, असे माझे म्हणणे आहे.

अर्थात तुला माझा मुद्दा न पटनं समजू शकतो. ओपिनियन डिफरंसेस असू शकतात. Happy

ओके. वाचतो पेपर.
प्रायमरी होम अशा करता लिहिलं की इनवेस्टमेंटसाठी घर घेताना (ज्यात तुम्ही अर्थात राहणार नाही, सो रहायला छप्पर तुमच्याकडे ऑलरेडी आहे, सो तुमचे निर्णय घ्यायचे क्रायटेरिया वेगळे असतील) तू म्हणतोयस तसं झालं तर मी समजू शकतो.
थोडक्यात स्टॅ.डी. डबल झालं तर 'होम इंटरेस्ट वर काही क्लेम करता यावा' म्हणून व्यक्ती आपल्या घराचं बजेट बदलेल हे मला पचायला जड जातंय.

टॅक्स ब्रेक हा मोठा फॅक्टर असतो. >>> हो मलाही असेच वाटते.

ज्यांना घ्यायचे आहे ते घर घेणारच पण टॅक्स ब्रेक मुळे परचेसिंग पॉवर वाढायची. ती आता कमी होईल त्या रेंज मधे असलेल्यांची. तुम्ही जर $२००० रेण्ट देत असाल (बे एरियातील लोक अशी स्वस्त अपार्टमेण्ट्स सध्या कोठे आहेत विचारतील Happy ), तर $२००० मंथली घरासाठी देणे हे फायदेशीर समजले जाते कारण त्यात तुमचे मुद्दलही धरलेले असते, आणि त्यावर जो प्रॉपर्टी टॅक्स पडतो, साधारण तेवढी बचत तुमची इण्टरेस्ट च्या डीडकशन मधून होते (हा थंब रूल धरतात). त्यातला एक भाग काही लोकांकरता कमी होईल.

तात्या अमितच्या बोलण्यामधे point (Ctrl \ mind you) आहे. टॅक्स ब्रेक साठी घर हा विचार करणारे फारच कमी असतील. जे असा विचार करू शकत असतील ते primary residence (Ctrl \ mind you) बाबत करणे कठीण वाटतेय. म्हणजे टॅक्स ब्रेक मिळेल हे माहित नसेल असे नाही तर त्याचा किती impact (Ctrl \ mind you) होईल ह्याची कल्पना घेउन त्याप्रमाणे घर घेण्याचे बजेट वाढवणे वगैरे एव्हढा विचार करणारे मोजकेच असतील.

ते लक्षात आले आहे म्हणूनच लिहिले की ओपिनियन डिफरंस असू शकतो. इनफॅक्ट त्यासाठी मी लोअर इनकम ग्रूप मधले गणित मांडले होते. पण ते पोस्ट केले नाही. आता खरच कंटाळा आला, म्हणून पोस्ट करत नाही.

होम इंटरेस्ट वर काही क्लेम करता यावा' म्हणून व्यक्ती आपल्या घराचं बजेट बदलेल हे मला पचायला जड जातंय. >>

इनफॅक्ट मी स्वतः ह्या कॅटेगिरी मध्ये आहे. राहते घर असतानाही मी घरात गुंतवणूक केली कारण आधीच्या घराचे कर्ज फिटले होते, आणि मला टॅक्स देण्यापेक्षा पैसे जास्त घालून घर घेऊन त्यावर टॅक्स बेनिफिट घेणे आवडले कारण प्रेझेंट व्हॅल्यू पेक्षा फ्युचर व्हॅल्यू वर मी जास्त विचार केला. सो इट हॅपन्स असे माझे मत आहे.

तात्या पण तुमच्या सारखे असा विचार करू शकणारे किती असतील हा विचार करून बघा. तसे असते तर २००७ मधे जी वेळ आली ती आली असती का ? अपवादाने नियम सिद्ध होत नाही ना.

केदार >> राहते घर असतानाही मी घरात गुंतवणूक केली कारण आधीच्या घराचे कर्ज फिटले होते, >> ह्या केस मध्ये मी ही असेच केले असते. मी प्रायमरी होम (जे मी फर्स्ट होम या अर्थानेही लुजली वापरतोय) बद्दल म्हणूनच म्हटलं.
असामी तुझ्या पोस्ट (post) मध्ये टॅक्स, ब्रेक, बजेट राहिलं बघ Proud

अरे भाऊ अपवाद नाही हा. लिटरली मिलियन्स मध्ये नं आहे हा. ( सेकंड होम* + व्हेकेशन होम असे मिळून ) * इन्वेस्टमेंट म्हणून आणि रेन्ट साठी. सेकन्ड होम ओनर्स नं असा सर्च दे, मग मी मागे कधीतरी वाचल्या प्रमाणे फक्त व्हेकेशन होम नं हा १.६ मिलियन च्या जवळ जाणारा आहे. रेन्टल होम्स नं वेगळा.

इंट्रेस्टिंगली सगळ्या देशात, जिथे जिथे इंट्रेस्ट सबसिडी आहे तिथे लोकं परवडणेबल झाले की लोकं दुसरे घर घ्यायचा विचार करतात त्याचे महत्त्वाचे कारण बुलियन मार्केट आता पहिल्यासारखे नाही त्यामुळे घर / लॅन्ड मध्ये पैसे गुंतवणे होते.

तसे असते तर २००७ मधे जी वेळ >> ही बिल क्लिंटनच्या चुकलेल्या डेम पॉलिसज मुळे आली असे म्हणायचे धारिष्ट्य करावे का? Proud लोकं मला हळू हळू ट्रम्प सपोर्टर म्हणतील. Happy

अरे भाऊ अपवाद नाही हा. लिटरली मिलियन्स मध्ये नं आहे हा. >> हो प्रचंड संख्येने हे करणारे लोक असावेत, असे मी जितके ऐकले आहेत त्यावरून तरी दिसते.

प्रायमरी होम च्या बाबतीत डिडक्शन हा फॅक्टर असतो याच्याशी सहमत आहे. घर घ्यायचे का नाही हा निर्णय त्यावरून होईल असे नाही, पण किती रेंज मधे घर घ्यायचे हा होईल.

अमित Proud
(Ctrl \ mind you) >>>>> असामी Lol

या ते टॅक्स ब्रेक करता घर वगैरे मलाही पचायला जड जातं. फायदा म्हणून तो चांगला आहेच, त्याउपर एक्विटी पण तयार होते पण लायॅबिलिटी खुप मोठी असते असं वाटतं. म्हणजे आपण आपल्या आहे त्या रिसोरसेस वर खुप जास्त बेट करतो असं वाटतं अशा परिस्थिती मध्ये.

पण किती रेंज मधे घर घ्यायचे हा होईल.>>>> खुप महत्वाचा मुद्दा. ह्यात सुद्धा सध्या जर अपार्टमेंट मध्ये राहत असाल आणि त्याच साईजचं घर घ्ययाचं म्हणलं, साधारण २०% डाऊन करुन तरी रिझल्टिंग मंथली पेमेंट अपार्टमेंट रेंट पेक्षा खुप वर जातं. जास्त डाऊन पेमेंट केलत तर प्रश्नच मिटला पण २०% डऊन च्या केस मध्ये म्हणतोय.

लोल. ते खरे पण सबसिडीच्या मोहामुळे ४०० ऐवजी ४५० चे घर घेशील. जाऊ दे. घर घे. अन पेढे दे. सबसिडीचे तू अन ट्रम्प बघून घ्या.

डोंबल. साउथ बे मध्ये अपार्टमेंट मध्ये राहणार्याने घराची फुकट स्वप्ने बघणे आहे हे. जाउद्या. Lol

फा, कितीच्या रेंज मध्ये घर घ्यायचे हा मुद्दा- जर मी घर घेत असेल तर ह्याबाबती तुझ्याशी सहमत असेल, . पण FHA आणि PMI भरून ३% पासून सुरू करता येते. सध्या FHA लोन जोरात चालू आहे. काही ठिकाणी हाउसिंग मार्केट बबल मध्ये आहे. उदा डॅलस. अश्या ठिकाणी घर घेताना ६००,००० च्या २०% सेव्हिंग असेलच असे नाही, त्यामुळे लोकं PMI चा ऑपश्न पण स्विकारतात. कारण पगार हा १२०त ए १६० असा असू शकतो. हे झालं मध्यमवर्गीयांबाबतीत. पण गरीब लोकं तर हमखास FHA loans घेतात. कारण २०% ही खूप मोठी रक्कम आहे.

त्यामुळे आपल्यासारखे कन्झरवेटिव्ह लोकंच फक्त २०% डाउन देऊन घर घेतात. ( अर्थात त्यांचाही नं मोठा आहे, पण दुर्दैवाने परत एकदा मार्केट कधी कधी फोर क्लोजर कडे वाटचाल करत आहे असे मला वाटतं. - ऑन अ रेनी डे Proud )

साउथ बे मध्ये अपार्टमेंट मध्ये राहणार्याने घराची फुकट स्वप्ने बघणे >> च्च च्चं तुम्हाला या देशाच्या पॉलिसीज माहिती नाहीत. आमचं ऐका. मी वर पर्याय दिला आहे. FHA लोन घ्या. अन घेऊन टाका ड्रीम होम ! होऊ दे खर्च.

$६००,००० डॅलस साठी जम्बो कॅटेगरी मधे येणार ($४१७००० आणि वरती) तेव्हा मिनिमम २०% डाऊन करावेच लागणार ना? पी एम आय लोन जम्बो कॅटेगरी नसेल तरंच कमी डाऊन करून भरता येतो.

च्च च्चं तुम्हाला या देशाच्या पॉलिसीज माहिती नाहीत. >> Give him a break. तो आत्ताच या देशात आलाय आणि तो आल्यापासून ट्रम्प पॉलिसी सोडून सर्व काही बोलतोय Proud

पण FHA आणि PMI भरून ३% पासून सुरू करता येते. >>> FHA नसले तर सर्वसाधारण लोन ला मिनिमम डाउन लिमिट आहे का? बहुधा २-३ टक्केच असेल. आणि PMI सुद्धा तुमचे कर्ज ८०% च्या खाली आले की बंद होतो. बरेच लोक वापरताना पाहिले आहेत. विशेषत: बे एरियात.

रिअल इस्टेट बूम बहुधा सर्वच मेट्रो मार्केट्स मधे आहे सध्या. बबल ही असेल. कारण एका पॉइण्टच्या पुढे बँकांच्या लोकांना एकदा कर्ज देणे हा परफॉर्मन्स मेट्रिक धरला गेला की हजार पळवाटा काढल्या जातात.

हाब - आता तसे नाही बहुधा. बँका सुद्धा लोन स्प्लिट करून देतात. थेट अनुभव नाही.

PMI.PNG

फ्रिस्को मधील ( डॅलस्चे सबर्ब) ६५०,००० किमतीच्या घरावर १६% डाउन पेमेंट आणि ३० वर्षे कालावधी मध्ये PMI दाखवत आहे.

बँका सुद्धा लोन स्प्लिट करून देतात >> करेक्ट. डीम होम कडे घेऊन जाणारे खूप सारे रस्ते आहेत.

बायदवे हाब- परत नाही म्हणणार होतो हां. Lol म्हणून चित्रच टाकलं.

FHA नसले तर सर्वसाधारण लोन ला मिनिमम डाउन लिमिट आहे का? बहुधा २-३ टक्केच असेल >> FHA ला ३ मिनिमन आहे, पण उरलेले २ कर्जाने घेऊ शकतो

सध्या घर - डाउन पेमेंट १ टक्के पासून घर कर्ज मिळतं. प्रायव्हेट लेंडर्स डिफरंशील लोन द्यायला तयार असतात.

Pages