Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परवाचा एपी बॅक प्रमोशन एपी
परवाचा एपी बॅक प्रमोशन एपी होता का? किती ती कौतुक लावल होतं राधिकानी बॅंकवाल्यांचं आणि त्या बँक मॅनेजर ने पण आमची बँक अशी अन् तशी..
शाळेतली टीचर विचारतीये राधीका ला फोन करुन, तुमचं आणि रेवतीचं अजुन बोलणं नाही का म्हणुन?!! टीचर्स ना एव्ह्डा वेळ असतो आयांना फोन करून त्यांच्याशी बोलत बसायला?
राधिका ग्रॅज्युएट आहेना मग
राधिका ग्रॅज्युएट आहेना मग बोलता येत नाही फ्लुएंट ते ठीक पण ती चुकीचं सांगतेय एवढं तरी समजायला हवंना.>>>>>
ते विसरले हो राधिकाला पूर्वी आपण पदवीधर केलेले...
किती किती गोष्टी लक्षात ठेवायच्या एवढ्या पाणीदार कालवणात बिचाऱ्या लेखक दिग्दर्शकाने..
परवाचा एपी बॅक प्रमोशन एपी
परवाचा एपी बॅक प्रमोशन एपी होता का? किती ती कौतुक लावल होतं राधिकानी बॅंकवाल्यांचं आणि त्या बँक मॅनेजर ने पण आमची बँक अशी अन् तशी..>>>> नैतर काय. ती राधिका पण त्या मॅनेजर शी नागपुरी भाषेत बोलत होती ते मात्र खटकल. नुसत सामान्य मराठी भाषेत बोलायला हिच काय जात होत? निदान बाहेरच्यानशी बोलताना तरी त्यान्च्याच भाषेत बोलाव की.
तिचे कधी 'माझं' असतं तर कधी
तिचे कधी 'माझं' असतं तर कधी 'माह्या' असतं
राधिका ग्रॅज्युएट आहेना मग
राधिका ग्रॅज्युएट आहेना मग बोलता येत नाही फ्लुएंट ते ठीक पण ती चुकीचं सांगतेय एवढं तरी समजायला हवंना.>>>>>
ते विसरले हो राधिकाला पूर्वी आपण पदवीधर केलेले... >>>> ते हेही विसरले की, आपण असेही दाखवले होते की, राधिका अर्थव कडून इन्ग्रजी कविता ( ती गुड, बेड, गुड अशी काहीतरी कविता होती) चान्गल्या प्रकारे पाठ करवून घेत होती, आणि पाठ करून झाल्यानन्तर ती त्याला fluently व्हेरी गुड सुद्दा पण म्हणाली होती. अचानक राधिकाला (आणि लेखकाला) कुठून साक्षात्कार झाला की, आपल्याला English बोलता येत नाही ते.
झाली का मीटीन्ग ?
झाली का मीटीन्ग ?
राधिका समिधा सीन आवडला मला.
राधिका समिधा सीन आवडला मला.
त्या शनायाला कसं अलाऊड केलं होतं मिटींगला, मला आश्चर्य वाटलं.
तो भैताड गॅरी त्या शन्याला
तो भैताड गॅरी त्या शन्याला कायम कडेवर कॅरी करत असतो ना, म्हणून अलाऊड केले असेल त्या लाऊड गर्लला.
काल राधिकातै ने परत वेणी
काल राधिकातै ने परत वेणी उडवली .
रेवतीने , गॅनाया ( गॅरी आणि शनाया ) ला काय धमकी/ज्ञान दिलं , काही कळलं नाही.
राधीका , समीधाला टोमणे मारत होती की खरचं बोलत होती , हे ना समिधा ला कळलं , ना आम्हाला .
अथर्वच्या वर्गात फक्त ५-६ मुलं आहेत ?
शनाया निदान शाळेत येताना तरी पूर्ण कुरता घालून आली शकली असती ना .
राधाक्का समिधाला टोमणेच मारत
राधाक्का समिधाला टोमणेच मारत होती. ती म्हणते ना कि मला फाडफाड बोलता येत नाही पण बोललेलं समजतं हे त्या शन्याला समजतच नाही...हे समिधासाठी होते. एकतर आपण हिच्या घरात राहतो तर कश्याला हिला बोलून अजून अडचणी वाढवायच्या म्हणून ती समिधाला सरळ काही बोलली नाही. उलट जास्त गोड बोलून गप्प केलं.
शाळेमध्ये असे सगळ्यांसमोर मोठ्याने मुलांची अधोगती सांगतात का?
पालक सभेपेक्षा राधाक्काचे विंग्रजी कौतुक सभा जास्त वाटली
पालक सभेपेक्षा राधाक्काचे
पालक सभेपेक्षा राधाक्काचे विंग्रजी कौतुक सभा जास्त वाटली+१००००० .
बाप रे.... केव्ढ्या मोठ्यांदा
बाप रे.... केव्ढ्या मोठ्यांदा ती भयंकर वेणी उडवली... घाबरलेच की...मला वाटलं आता गॅरीच्या तोंडावर आपटतीये की काय येवढी मोठी वेणी.... पण वाचला बाबा...
दक्षिणा......
दक्षिणा......
अथर्व च्या शाळेतल्या दोन बाया इंग्रजीत गॅरिला अथर्व विषयी कम्प्लेन्टस आहेत त्याची कारणं विचारतायत. तो आय डोन्ट नो म्हणतो. तर राधिका उठून म्हणते "मॅम शॅल आय स्पिक इन इंग्लिश?" Uhoh
"शॅल आय स्पिक इन इंग्लिश?" मधे बोलण्यासाठी परवानगी मागायची असेल तर, "कॅन आय से समथिंग" विचारायला हवं ना?
मला हे आठवून इतकं हसायला येत होतं...जेव्हा तो भाग प्रसारित झाला तेव्हा.......आणि घरी कुणाला ते इतकं काही खटकलं नाही....म्हणून अजूनच !
आणि अथर्व च्या वर्गात मोजून ५-६ विद्यार्थी ? काहीही..पालकसभा....!!!!
मालिकांचं लिखाण जर रिव्यु ला
मालिकांचं लिखाण जर रिव्यु ला पाठवलं तर लालेलाल होउन जातील ते पेपर्स....
राधिकाचं वेणी उडवणं जाम
राधिकाचं वेणी उडवणं जाम डोक्यात जात.
आणि अथर्व च्या वर्गात मोजून ५-६ विद्यार्थी ? काहीही..पालकसभा....!!!!>>> एक ओपन हाऊस सोडली तर आमच्या शाळेतही पालक सभा ह्या ग्रुप प्रमाणे असतात. एका ग्रुप मधे १०-१२ पालक.
>>>> तो भैताड गॅरी त्या
>>>> तो भैताड गॅरी त्या शन्याला कायम कडेवर कॅरी करत असतो ना, म्हणून अलाऊड केले असेल त्या लाऊड गर्लला. <<<< ओ, त्या शनायाला काही बोलायचं काम नै...
इतके दिवस मालिका (जबरदस्तीने) बघुन बघुन आता मला ती शनायाच जास्त आवडायला लागली आहे (तिच्या अॅक्टिंगमुळे/दिसण्यामुळे) असे कालपरवाच डिक्लिअर केलय लिंबीच्या समोर छातीठोकपणे !
मग्ग? घाबरतो काय कुणाला? तो ग्यारी नै घाबरत तर मी तरी का घाबरावं कुणाला?
खरंच शनाया तिचं काम
खरंच शनाया तिचं काम इमानेइतबारे करतेय. अॅक्टींग पण मस्त आणि दिसतेही छान.
हो मला पण आवडली शनाया. तिचा
हो मला पण आवडली शनाया. तिचा आवाज पण छान आहे.
रसिका चान्गली करतेय भुमिका पण
रसिका चान्गली करतेय भुमिका पण अनिता दाते च उगाच ओठ वेन्गाडुन बोलण खुप लाउड वाटत.
परवा ती राधिका शनायाला म्हणत
परवा ती राधिका शनायाला म्हणत होती की, तुला साधा मुलाचा अभ्यास सुद्दा घेता येत नाही, तुझ्या शिक्षणाचा काही उपयोग नाही.
शनायाने अर्थवचा अभ्यास घेतला होता की, उलट तीच त्याचा अख्खा homework करत होती. राधिकाने त्यावेळी तिकडे असायला हवा होत.
फक्त नशिब एवढच की, शनायाने कैकैयीला महाभारतात ढकलल नाही.
रेवतीने , गॅनाया ( गॅरी आणि
रेवतीने , गॅनाया ( गॅरी आणि शनाया ) ला काय धमकी/ज्ञान दिलं , काही कळलं नाही. >>> माझ्या मैत्रिणीच्या वाटयाला पुन्हा जाण्याची हिम्मत करु नका अस बोलली ती त्यान्ना.
रेवतीला राधिकाच कौतुक वाटल, पण तस तिने तिच्यासमोर दाखवले नाही.
गॅनाया>>>
अनिता दाते खर्या आयुष्यात
अनिता दाते खर्या आयुष्यात सुशिक्षीत असेलच ना. तिलाही ते shall I speak in English खटकले नाही? किती अडाणी ती पालक मिटिंग. ती टीचर राधिकापेक्षा बेकार बोलत होती. एवढुश्या मुलाच्या कसल्या कंप्लेंट्स नी काय. हो मला पण हल्ली शनायाच आवडते.
आज मी चक्क आख्खा भाग बघितला.
आज मी चक्क आख्खा भाग बघितला. अॅज अ chara. गुरुनाथ अतिशय स्वार्थी आहे. Award साठी तो खूप खोटं बोलू शकतो, सोडून दिलेल्या गावठी वाटणाऱ्या बायकोला, आपली बायको आणि कसा सुखी संसार etc नाटक करू शकतो.
त्यामुळे मागे एक सीन का प्रोमो बघितला त्यात त्याचेच बाबा म्हणतात ते पटलं मला की शनायासाठी बायकोला सोडणारा गुरु, तिसरी अजून जास्त आवडली त्याला तर तो शनायाला सोडेल. शनायाने सावध व्हायला हवं.
सद्ध्या तरी गुरुनाथ हा
सद्ध्या तरी गुरुनाथ हा शनायासाठी एटीम आहे. उद्या कधी तिला लग्न करावेसे वाटले तर ती तिच्या वयाच्या मुलाशी करणार आहे. 'गॅरी माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे, मला नाही त्याच्याशी लग्न-बिग्न करायचे' अशी ती मागे त्याने लग्नाचे विचारल्यावर मैत्रिणीला बोलली होती.
ओके मग प्रश्नच मिटला. पण
ओके मग प्रश्नच मिटला. पण शनायाने दुसरं ए टी एम शोधून ठेवावं
ओके मग प्रश्नच मिटला. पण
ओके मग प्रश्नच मिटला. पण शनायाने दुसरं ए टी एम शोधून ठेवावं Lol
दुसरे ATM ओफीस मधे रेडि आहे पण त्याची withdrawal limit कमी आहे
दुसरे ATM त्या ऑफिस मधे
दुसरे ATM त्या ऑफिस मधे टेंडर काढून झालेल्या फॉरिनर्स च्या जेवणाच्या वेळी आणि त्या आधी ऑफिस मधील अपमान एपिसोड मधे दिसला नाही. मला वाटलं गेला सीरियल सोडून.
शनाया स्मार्ट आहेच.. ती अथर्व
शनाया स्मार्ट आहेच.. ती अथर्व बरोबर व्हिडिओ गेम पण सफाईने खेळत होती....अनलाईक राधक्का....
नोटाबंदी पासून ए टी एम वर फार रांगा असतात ना?
अथर्व शनाया नि गॅरीकडे का
अथर्व शनाया नि गॅरीकडे का राहतोय??
>>> राधिकाचं वेणी उडवणं जाम
>>> राधिकाचं वेणी उडवणं जाम डोक्यात जात. <<<<< अगदी अगदी.
अन त्या अथर्वच "बोबडे बोलण" अन ते तसेच चालवुन घेणे अगदी डोक्यात जाते.
नशिब आपले की डायरेक्टरला अजुन सुचलेनाही की शनाया/राधिकालाही त्याच्या बरोबर बोबड बोलायला लावायच....
Pages