यह बरसोंकी वोही सिगरेट है ... साहिरला आठवताना : डूडल आर्ट

Submitted by rar on 8 March, 2017 - 11:39

आज ८ मार्च. साहिर लुधियानवी ह्या कमालीच्या मनस्वी आणि प्रतिभावंत कवीचा जन्मदिवस. माझ्या फार जवळच्या माणसांपैकी एक साहिर.
आज, त्याच्या जन्मदिवशी त्याची आठवण तर आलीच, पण त्याचबरोबर आठवण झाली मागच्या २५ ऑक्टोबरला , त्याच्या मृत्यूदिनी त्याला आठवताना आपसूकच रेखाटल्या गेलेल्या डूडलची.
आज ते डूडल मायबोलीकरांबरोबर शेयर करतीये, २५ ऑक्टोबरच्या रायटपसकट.
------------------------
Remembering Sahir…
२५ ऑक्टोबर. साहिर मनात कायमच रेंगाळत असतो, आज त्याची आठवण अधिकच गडद. Sahir, whose poems have constantly accompanied me in hospital rooms, in research labs, along paths frequently and less frequently travelled from seashores to high mountain peaks. मनात अनेक वर्ष असूनही साहिर आजवर लिखाणात उतरवण्याची हिंमत झाली नाहीये माझी. साहिर म्हणलं की मला अशीच हाँट करते, आठवत राहते अमृता प्रीतमची 'आग की बात' ही कविता.
यह आग की बात है
तुने कभी सुनायी थी
यह बरसोंकी वोही सिगरेट है
जो तुने कभी सुलगायी थी
माझी आवडती कविता. कधीतरी भाषांतर करायची म्हणून परत परत वाचत राहते, पण ही सिगरेट हातात घेण्याचं धाडस अजूनही करू शकले नाहीये. आज साहिर, अमृता, त्यांना जोडणारी सिगरेट हे सगळं अवघ्या २-३ मिनीटात अचानक कागदावर उतरलं ते हे असं.
हर फ़िक्र को धुँवे में उड़ाता चला गया
मैं जिंदगीका साथ निभाता चला गया |

sahir_1b.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहिरच्या गैरफिल्मी कविता कधी वाचल्याच नाहीत, पण त्या फिल्मी गाण्यांतूनच तो किती उत्तम कवी होता हे दिसून आले. या सुंदर ओळखीकरता धन्यवाद Happy

छान लिहिलयं. ते उर्दुत काय लिहिलयं ?

हर फ़िक्र को धुँवे में उड़ाता चला गया
मैं जिंदगीका साथ निभाता चला गया | >>> सहीच

काही वर्षापूर्वी पेपरमध्ये साहीर लुधियानवी यांची ताज महल ही कविता (की गझल? माझं ज्ञान एकदम तोकडे आहे) वाचली... एकदम मस्त...
http://www.sahirludhianvi.com/blog/index.php/2006/11/05/poetry/taaj-mahal/

त्यावेळेस पेपरमधे बहुतेक ती सिनेमातल्या "एक शेहनशाहने बनवाके हसी ताज महल, सारी दुनियाको मोहब्बत की निशानी दे दी" ह्या गाण्याच्या contrast मधे मांडलेली. त्यामुळे का कोण जाणे सिनेमातले गाणे ही त्यांनीच लिहिले असा माझा समज झालेला... आणि एकाच गीतकाराचे दोन विरुद्ध टोकाच्या संवेदनशीलता उमजून भारी वाटलेलं. आता शोधताना समजले चित्रगीत शकील बदायुनी यांनी लिहिलेले...

लेख आणि डूडल मस्त आहे! Happy

या कवितेला अजूनही काही पूर्व पीठिका आहे. ती कळली कि या कवितेचा एक वेगळाच पैलू दिसू लागतो.
साहिर लुधियानवी आणि अमृता या जगावजगळ्या कथेची..
साहिर एकदा म्हणाले होते ,
There was a sorrow which I inhaled like a sigarette and there are a few songs which I flicked off ,like ashes from the sigarette !