आबांची बुलेट धाडधाड आवाज करत अनाथाश्रमासमोर येऊन थांबली. हा आवाज सर्वाँच्याच, विशेषत: मॅनेजर बाईंच्या परिचयाचा होता. त्यांचं स्वागत करायला ती धावत बाहेर आली. एककाष्ठी धोतर नेसलेले अन खानदानी फेटा घातलेले आबा आकडेबाज मिशीआडून हसले. गाडीच्या एका अंगाला दूध वाटायला वापरतात तशी मोठी प्लास्टिकची कॅन लटकवलेली होती. आबांनी कॅनचं झाकण उघडलं अन आत हात घालून शंभरीच्या पाच गड्ड्या बाहेर काढल्या. सवयीप्रमाणे बाईंनी पुढे होऊन पैशांचा स्विकार केला. आभार मानणं आबाला आवडत नाही अन आग्रह केला तरी ते थांबणार नाही हे माहीत असल्याने बाई आत निघून गेल्या. आबांची गाडी पुन्हा रस्त्याने धावू लागली.
एका हॉस्पिटलमध्ये दोन गरजू पेशंट्सना पैशांची गरज होती, आबांनी ती भागवली, उत्तम काम करणाऱ्या एका समाजसेवी संस्थेकडे काही पैसे पोचते केले. नेहमीच्या चौकात येताच सगळ्या भिकाऱ्यांनी त्यांना गराडा घातला. आबांनी सर्वांच्या चेहऱ्यावर एक नजर फिरवली. गरीबी अन अपंगत्वाचं नाटक न करणाऱ्या चार गरजूंना निवडून त्यांना पैसे वाटले.
संध्याकाळ झाली तशी आबांनी आपली बुलेट शहराबाहेर काढली. गजबजाट हळूहळू मागे पडू लागला, दिव्यांचा झगमगाट मंद होऊ लागला. गाडी आडवाटेच्या रस्त्यावरून पुढे जाऊ लागली.
रस्त्याच्या मधोमध दगडांची पाळ रचलेली पाहून आबांनी गाडी थांबवली. रस्ता मोकळा करायला ते खाली उतरले…अन तेवढ्यात, बाजूच्या झाडीत लपलेला एक आडदांड माणूस रस्त्यावर आला.
“काय रे म्हताऱ्या, खुप पैसा झाला न तुझ्याकडं.”
“नाही बाबा. मह्याकडं तर एक छदामबीन नाही.”
आबानं दोन्ही खिसे उलटेपालटे करून दाखवले.
“मी काय तुला च्युत्या वाटलो का रे. दिवसभर पाठलाग करत होतो तुझा मी. त्या दुधाच्या कॅनीतून पैसे काढून तू लाखो रुपये वाटले हे मी माझ्या डोळ्यांनी पाह्यलं.”
आबा काहीच बोलले नाही.
“थांब इथंच, हलू नको.” चोर हातातला सुरा नाचवत दरडावला.
त्यांच्यावरची नजर न हटवता तो बुलेटजवळ गेला. आबांनी चोरखिशातून दोन डब्ब्या बाहेर काढल्या. एका डब्बीतून तंबाखू घेतली अन दुसरीतला चुना त्यावर मळायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात चोरानं कॅनचं झाकण उघडलं अन आत हात घातला. पण कॅन रिकामी होती. तो रागाने समोर आला अन आबाच्या मानेवर सुरा टेकवला.
“म्हताऱ्या यात तर काहीच नाही. पैसे कुठं लपवले सांग.”
“संपले भाऊ पैसे.”
“हे पाह्य, मी दोन खून केलेले आहेत, तिसरा मुडदा पाडायला कमी करणार नाही. चुपचाप पैसे दे.”
“बरं देतो. पण आधी ही तंबाखू त खाऊ दे.”
चोराने आबाच्या मानेवरचा चाकू बाजूला केला. आबांनी तंबाखू अजून थोडी मळली अन तिन बोटांच्या चिमटीत पकडली. तळहातावरची उरलेली तंबाखू त्यांनी हवेच्या फुंकरीने उधळून लावली. तंबाखूच्या त्या कणांनी चोराभोवती फेर धरला अन पुढच्याच क्षणाला त्याच्या शरीराचा कणनकण सोनेरी वाळूत रूपांतरित झाला. चमचम चमकणारी ती वाळू नागमोडी वळणं घेत बुलेटला अडकवलेल्या कॅनमध्ये शिरली.
आबांनी चिमटीतली तंबाखू तोंडात सारली. बुलेटजवळ जाऊन त्यांनी कॅनमध्ये हात घातला. ती अर्ध्याहून जास्त पैशांच्या गड्ड्यांनी भरलेली होती. त्यांनी मिशीला पीळ दिला अन धोतराचा सोगा सावरत बुलेटवर टांग टाकली.
ती गाडी आता शहराच्या दिशेने जाऊ लागली होती.
-------------------------------------------------------
आवडली अद्भुतिका
आवडली अद्भुतिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असं खरंच झालं तर किती मजा येईल असा बालीश विचार तरळून गेला
भारीच !
भारीच !
पैसे नव्हते ना???....नन्तर
पैसे नव्हते ना???....नन्तर कुठून आले????
मस्तच! आवडली
मस्तच! आवडली
अप्रतिम अद्भुतिका !
अप्रतिम अद्भुतिका !
छान
छान
मस्तं.
मस्तं.
किती पैसे निर्माण करायचे हे
किती पैसे निर्माण करायचे हे किती माणसं वापरले याच्यावर अवलंबून नाही तर त्यांच्या पापांवर अवलंबून आहे. कमी पापी गुन्हेगार असतील तर कॅन भरायला तिन चार लोकंपण लागू शकतात, खुप जास्त गुन्हे केलेला एक माणूसजरी घेतला तरी कॅन भरून जाते कधीकधी.
एकदा तर म्हणे एका माणसातच कॅन भरून उतू गेली होती. शिल्लकची सोनेरी रेती मग आबाला धोतरात बांधून घ्यावी लागली होती. ख्या: ख्या:
- (संदर्भ: पारावरच्या गप्पा )
कावेरीजी, कथा संपली. पैसे
कावेरीजी, कथा संपली. पैसे तयार करण्याचं आबांचं एक सूत्र आहे :
बाखूचे कण + (क्ष पापी शरीर) = सोनेरी वाळू ....१
१ मधील सोनेरी वाळू + (जादूचा) कॅन = कॅनभर पैसे
(No subject)
मस्त....
मस्त....
मस्त आहे अद्भूतिका विनयजी
मस्त आहे अद्भूतिका
विनयजी तुमच्या लिखाणाची पंखी व्हायला लागलेय मी. तुमचा धागा म्हटलं कि आधी वाचून काढते. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Oh thanks grenjar
भारी कथा,आवडली
भारी कथा,आवडली
एकदा बारामती,एकदा नागपूर,एकदा मुंबई, नाशिक असाहि फिरवा कि आबांना, कॅन काय घेऊन बसलात ट्रक भरतील ☺️
एकदा बारामती,एकदा नागपूर,एकदा
एकदा बारामती,एकदा नागपूर,एकदा मुंबई, नाशिक असाहि फिरवा कि आबांना, कॅन काय घेऊन बसलात ट्रक भरतील
>> ख्या: ख्या:
खरंय
मी पण तंबाखू खायला सुरुवात
मी पण तंबाखू खायला सुरुवात करते आता :-p
मी पण तंबाखू खायला सुरुवात
मी पण तंबाखू खायला सुरुवात करते आता :-p
>> ख्या: ख्या: जरूर. फक्त वारं उलट्या दिशेने आहे असं पाहून फुंकर मारा, नाहीतर तुमचीच सोनेरी वाळू व्हायची
(No subject)
आवडली....छान लिहीता तुम्ही...
आवडली....छान लिहीता तुम्ही...
बोटात मज्जा हाय तुमच्या!
बोटात मज्जा हाय तुमच्या! (लेखणीत म्हटलं असतं पण type केल्यामुळे बोटात म्हणतेय)
प्रतिसाद वाचून मज्जा वाटली
प्रतिसाद वाचून मज्जा वाटली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !!
मस्त !!
मस्तच. आवडली अद्भूतिका. तुमचे
मस्तच. आवडली अद्भूतिका. तुमचे सगळेच लिखाण नेहेमीच आवडते. लिहित रहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.
छान.
मस्त !!
मस्त !!
मस्तय
मस्तय
मला खुप आवड्तात तुमच्या कथा,
मला खुप आवड्तात तुमच्या कथा, पण हि कईच्या कईच...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वेगळच की..आवडल
वेगळच की..आवडल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी
भारी
आशु
एकदा बारामती,एकदा नागपूर,एकदा मुंबई, नाशिक असाहि फिरवा कि आबांना, कॅन काय घेऊन बसलात ट्रक भरतील >>>
मस्तय !!!!
मस्तय !!!!
Pages