सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
आयरिस...अपने घर भी फुल्या...
आयरिस...अपने घर भी फुल्या...
साईड व्ह्यु..
.
.
.
टॉप व्ह्यु..
.
मस्तच जागू.. तुला कौशीच झाड
मस्तच जागू.. तुला कौशीच झाड पहायला मिळाल..कित्ती मज्जा..
आम्ही पाहिलेल्या लाल गुंजांना अगदी छोटा काळा ठिपका होता..
पांढर्या गुंजांना काळा ठिपका नव्हता तसेच रतनगुंजांना (ज्या लाल रंगाच्या होत्या) सुद्धा काळा ठिपका नव्हता..
या गुंजा बहोत इंटरेस्टींग प्रकार वाटतोय..खुप वेगवेगळं दिसताय गुंजा गुंजातच..खोदकाम करावं लागेल..
या धाग्यावर मधुनच एक चक्कर
या धाग्यावर मधुनच एक चक्कर मारली की केव्हढी माहीती मिळते. कमाल आहात सर्व लोक.
रतन गुंजेला काळा ठिपका नसतो
रतन गुंजेला काळा ठिपका नसतो ती आकाराने जरा चपटी, मोठी आणि पूर्ण लालच असते. त्या बघुन मला लिव ५२ गोळ्याच आठवतात
मुंबईत आढळणार्या झाडांबद्दल हा एक छान लेख सापडला.
बरोबर मॅगी..
बरोबर मॅगी..
लेखाबद्दल धन्यवाद...सद्ध्या मी डहाणूकरांच हिरवाई वाचतेय
दिनेशदा सुरेख फोटो सर्वच.
दिनेशदा सुरेख फोटो सर्वच. जास्वंद बघितली की बाप्पाच आठवतो.
टीनाताय, मी आय इ वर हाय.
आईग्गं! दमले मी सगळं वाचून
आईग्गं! दमले मी सगळं वाचून
हे माझ्याकडुन -
आयरिस लिली, थेट द्रोणागिरी (उत्तराखंड) हून
वॉव मस्तच.
वॉव मस्तच.
अदीजो, काय सुंदर रंग आहे
अदीजो, काय सुंदर रंग आहे फुलांचा !
वा अदिजो,
वा अदिजो,
खुपच सुंदर रंग.. सद्ध्या मी निळाईच्या प्रेमात आहे..
सुन्दर फोटो दिनेश दा ...
सुन्दर फोटो दिनेश दा ... कांचन फुल सुरेख
Sterculia foetida flower
Sterculia foetida flower टाकुन सर्च करा.>>>>>>> हो जिप्सी.हेच ते झाड .मला नाव कळले ते झकास झाले.कारण त्याची खाली झुकलेली पाने बघून नेहमी अस्वस्थ वाटायचे.का ते नाही माहीत.काल्-परवा भरपूर फळांनी लगडलेले झाड पाहून रहावेना.
अवलची लिंक वाचली.तीच फळे पण मी हिरवीच पाहिली होती.
टीना, अज्ञान दाखवल्याशिवाय ते अज्ञान आहे हे कळत नाही असे आमचे पुलकाका म्हणतात(शब्दांत फेर्फार असावा...संदर्भ पूर्वरंग)
पुन्हा तुम्हा सर्वांचे आभारच.
देनेशदा, प्रचि मस्तच.
हे आपलं असच सगळी माहिती एकत्र
हे आपलं असच सगळी माहिती एकत्र असावी म्हणुन..
.
(No subject)
फोटु इना....
हे कुठले फुल? झाडाची पानं
हे कुठले फुल? झाडाची पानं आपट्या सारखी होती. आज वोटींगला MIDC officeला गेले, तिथे पाहिलं .
रेणु,
रेणु,
गुगल क्रोम मधे दिसतील फोटो..
तू दाखवलेलं फुल कांचनच आहे.. पानं आपट्याच्या आकाराची पण बरीच मोठी असतात.
मागच्या पानावर दिनेशने पांढर्या कांचनच फुलं टाकलय..
या कांचन ला कचनार असेही म्हणतात.
इंग्रजी कॉमन नेम - Orchid Tree
शास्त्रीय नाव : Bauhinia variegata
Thanks, टिना.खरं तर"फुलं पानं
Thanks, टिना.खरं तर"फुलं पानं " हा माझा प्रांत नाही , पण इथे वाचुन वाचुन नवीन काही दिसले की उत्सुकता वाटते. आणि नजर ही भिरभिरते थोडी हिरवळ दिसली की. (हलके घ्यावे )
त्यात काय हलके
त्यात काय हलके
खरं तर"फुलं पानं " हा माझा प्रांत नाही , पण इथे वाचुन वाचुन नवीन काही दिसले की उत्सुकता वाटते.>> चला माझ्याच लाइनवर आहे म्हणायचं तुमीबी.. मला हिरवाई आवडायची म्हणुन या ग्रुपवर आली..इथे आल्यावर प्रत्येकाचं या विषयातलं प्रेम आणि ज्ञान पाहिल्यावर नाही काही निदान रोजची बागेतली आजुबाजुची झाडे, प्राणी, पक्षी तरी नावाने लक्षात ठेवू म्हणुन सुरु झालाय माझा प्रवास.. खुप सार्या छोट्या मोठ्या गोष्टी कळल्या मला या धाग्यामुळे...थँक्स टू जागू अँड टिम _/\_
मस्त गप्पा, माहिती आणि प्र.ची
मस्त गप्पा, माहिती आणि प्र.ची.. खुप छान धावतोय धागा!!!
दा पाम बद्द्ल ची माहिती खुप छान, आणि तो कांचन, डोळ्यात बदाम...
शाल्मली...
सायु,
सायु,
अगं तू फोटोमधे दिलेली काटेसावर उर्फ शाल्मली उर्फ सेमल आहे...
शात्रीय नाव Bombax ceiba
पिचकारी/स्पथेडीया>> पिचकारी किंवा स्पॅथोडीया वेगळा..
त्याच शात्रीय नाव Spathodea campanulata
हे बघ त्याचा फोटो..
.
ओह ! बरोबर आहे...धन्स टीना
ओह ! बरोबर आहे...धन्स टीना
दुरुस्त केलय टीना..:)
दुरुस्त केलय टीना..:)
नागपुरच्या उन्हात...अरे व्वा.
नागपुरच्या उन्हात...अरे व्वा...
यवतमाळला आहे का हे झाड बघावं लागेल मला एकदा..गावात तर नाहीच दिसलं कधी..आजुबाजुच्या जंगलात असावं मात्र..
नक्की असेलच टीना..:)
नक्की असेलच टीना..:)
टीना, या दिवसातच हे झाड उठून
टीना, या दिवसातच हे झाड उठून दिसणार. याची ठेवण पण खासच असते, पायर्यापायर्यांची.. सावर, पळस, पांगारा फुलावर असले कि पक्षी, खारी यांची नुसती लगबग चाललेली असते.
हो ना दिदा..
हो ना दिदा..
शाल्मलीचा पहिला फोटो खूप
शाल्मलीचा पहिला फोटो खूप आवडला. असा पूर्ण फोटो बघून अगदी ते झाड बघितल्याचा आनंद मिळाला.
Sterculia foetida flower
Sterculia foetida flower टाकुन सर्च करा.>>>>>>> हो जिप्सी.हेच ते झाड .मला नाव कळले ते झकास झाले.कारण त्याची खाली झुकलेली पाने बघून नेहमी अस्वस्थ वाटायचे.का ते नाही माहीत.काल्-परवा भरपूर फळांनी लगडलेले झाड पाहून रहावेना.
अवलची लिंक वाचली.तीच फळे पण मी हिरवीच पाहिली होती.>>>>देवकी, अतिपरिचयात अवज्ञा. कित्येकदा आपल्या आसपास असलेली हि झाडे आपल्या लक्षात येत नाही. पण फुलोरा आल्यावर, पान गळतीनंतर यांच्याकडे नजर आपोआपच वळते.
जंगली बदामाची हे अजुन काही
जंगली बदामाची हे अजुन काही फोटोज
स्थळः- सागर उपवन (बीपीटी गार्डन, कुलाबा, मुंबई)
तारीखः २१.०२.२०१७
|
|
|
|
मस्तच फोटो जिप
मस्तच फोटो जिप
Pages