एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
स्वतःच्या अभ्यासासाठी लेखक त्याच्या बायकोला आणि ८ महिन्याच्या मुलीला घेउन मदुमलाई या अभयारण्यात प्राण्यांवर अभ्यास करण्यासाठी त्याकाठी असलेल्या मसिनगुडी गावात दोन वर्षांसाठी वास्तव्याला राहिलेला. यात त्याने त्याचे पूर्ण अनुभव वर्णिले आहे पण फार ओघवत्या शैलीत. फार रसिक, साहित्यिक अशी भाषा नसली तरी साध्या साध्या जगण्यातलं जंगलाच तत्वज्ञान मात्र मस्त मांडलेल आहे यात.. एखाद्याला गोष्टी सांगायच कसब फार छान अवगत असतं, तसं लेखकाला आहे हे नक्कीच..
काय नाहीए या पुस्तकात.. लेखकाचं निसर्गप्रेम, प्राणीमात्रांविषयीचा अभ्यास, त्यांची निरिक्षणं अन जोडीला त्याच्या अभ्यासासोबतच इतर विषयांचा अभ्यास अन माहिती, व्यक्तिचित्रण, त्याचं संगीतप्रेम, सुरांबद्दल असलेली माया, त्याचा कलासक्त असलेला हात, एखादा अनुभव पुरेपुर अनुभवयाचा ध्यास, त्याची तल्लीनता, जंगलातले तत्वज्ञान, तेथील लोकांबाबत असलेला अभ्यास सारं काही यात सामावलेलं आहे..
पण हि सारी माहिती इतक्या वेगळ्या पद्धतीने एकमेकात समरसुन येते कि वाचणारा एका क्षणासाठीही कंटाळत नाही..जोडीला हरेक प्रकरणानंतर आलेल्या त्याच्या कविता, चारोळ्या म्हणजे चेरी ऑन द टॉप..
मला वाटतं हे पुस्तक प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित तर करेल पण प्रत्येकाची हे पुस्तक वाचल्यानंतरची अनुभुती सर्वतः भिन्न राहिल.. एखाद्याला यातील जंगलवाटा खुणावेल तर कुणाला त्याचा अभ्यास, कुणी त्यातील कवितांवर भाळेल तर कुणाला त्या कवितेतील चित्र भुलवतील, एखाद्याला जंगलाबाबतचा वेगळा पैलु दिसेल तर एखाद्याला त्यात लेखकाने वर्णिणेल्या राग/सुरांच्या अनुभुतीचा नवा आयाम मिळेल.. फार थोडी पुस्तक इतके अनुभव, दृष्टी एकत्र देतात..
पुस्तकातील अनुभव हे १९८८ ते १९९१ काळातील आहे. त्यात आलेले मॅगझीन पेजेस वरील फोटो हे सुद्धा त्याच काळातले..
या पुस्तकाच्या प्रकाशनाकरीता बर्याच संस्थांनी आर्थिक योगदान दिले पण वेळोवेळी त्या मॅगझीन पेजेस वरील सुंदर प्रकाशचित्र अन् त्याखालील माहिती वाचायला जाताना ह्यांच्या त्यांच्या सौजन्याने असं लिहिलेलं दिसतं तेव्हा दाताखाली खडा आल्यासारखा वाटला मला. अधिक मला खटकलेली एक गोष्ट म्हणजे प्रकरणागणिक एक अनुभव संपल्यावर त्याची प्रकाशचित्रे समोर भलत्याच प्रकरणात मधेच टाकलेली. आपण नविन अनुभवात पूर्ण गुंतल्यावर चालु प्रकरणाशी काहिही संदर्भ नसलेली प्रकाशचित्र अशी भसक्कन समोर आली कि उगा लिंक तुटते.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती हि शुभदा प्रकाशनाची ज्यात आणखी काही प्रकाशचित्रे, लेखकाचे स्केचेस तसेच काही प्रकरणांचा समावेश करुन अरण्यवाक् प्रकाशनाने दुसरी आवृत्ती छापून आणली. विशेष म्हणजे केवळ हे पुस्तक परत छापुन आणायच्या हेतूने 'आरण्यवाक्' या जंगलासाठी काहिही हे तत्व जोपासणार्या संस्थेने प्रकाशन क्षेत्रात उडी घेतली.
'एका रानवेड्याची गोष्ट' या पुस्तकाचे लेखक श्री कृष्णमेघ कुंटे यांनीसुद्धा याच जंगलाबद्दल हे पुस्तक लिहिलं. या जंगलात जाण्याकरीता बर्याच अंशी श्री मिलिंद वाटवे यांचा सहभाग होता. तसेच त्या पुस्तकात 'आरण्यक' या पुस्तकाचे बरेच संदर्भ असल्यामुळे याच्या दुसर्या आवृत्तीला जोर चढला.
मी शांकलीकडून आणलेली या पुस्तकाची दुसरी आवृत्ती वाचली.
संग्रही ठेवावं वा न ठेवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण एकदातरी मिळवून वाचावं असं हे पुस्तक आहे मात्र..
सुरुवातीला प्रस्तावना म्हणुन इंदिराबाई संत यांनी लेखकाला पहिल्या आवृत्ती निमित्त लिहिलेलं पत्र दिलेलं आहे. १९९४-९५ मध्ये मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मिती निमित्त राज्य पुरस्कृत असलेलं हे पुस्तक इंदिरा संत, व. पु. काळे, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गाबाई भागवत अशा बर्याच नामवंतांनी वाखाणलेले आहे..
मिळवून वाचाच एकदा..
बुकगंगावर आऊट ऑफ प्रिंट दिसतयं..
शोधावं लागेल..
मुखपृष्ठ जालावरुन..
.
.
तळटिप : थोपूवर दोन ग्रुपवर हे पोस्टलयं मी पण थोपू ह्या ओपन फोरमवरील कचरा फारसा पसंद नसल्याने येथे सुद्धा लिहितेयं.
२०१६ च्या वर्षाऋतूपासुन सतत कानावर पडलेलं आरण्यक हे नाव पुस्तकरुपाने सुद्धा समोर येईल असं खरचं वाटलं नव्हतं. नावावरुन या पुस्तकाकडे मी ओढल्या गेले.. कळून येतयं कि आरण्यक हे नाव आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या सार्या गोष्टीच मनावर गारुड करुन भुलवणार्या आहेत
छान लिहिलंयस टिना! मला पण
छान लिहिलंयस टिना! मला पण आवडेल हे पुस्तक वाचायला. कोणाकडे आहे का बघते आता.
छान परिचय. नक्कीच वाचायला
छान परिचय. नक्कीच वाचायला आवडेल.
यावर सुद्धा अॅड टु विश लिस्ट केलंय.
मस्त लिहिलंयस !
मस्त लिहिलंयस !
छान लिहिलंय.. त्या काळात
छान लिहिलंय.. त्या काळात बाकिचा मिडीया नसल्याने शब्दांवर भर होता. पण सध्या व्हिज्यूअल मिडीया प्रभावी असल्याने, वाचकाला खिळवून ठेवण्यासाठी प्रभावी शब्दकळा पाहिजे आणि फोटोंची भर हवीच.
आरण्यक हे नितान्त सुन्दर
आरण्यक हे नितान्त सुन्दर पुस्तक आहे.
बाकि लेख उत्तमच !
डॉ. मिलींद वाटवे गरवारे
डॉ. मिलींद वाटवे गरवारे महाविद्यालयात सुक्ष्मजीवशास्र विभागात प्राध्यापक होते आणी वस्तीगृहाच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणुन कधीकधी यायचे त्या वेळेला अनौपचारीक गप्पांमधुन त्यांच्या ह्या वास्तव्यादरम्यानचे लहानमोठे किस्से ऐकायला मिळाले होते. आणी मग कुतुहलापोटी आरण्यक हे पुस्तक मिळवुन वाचल्याचे आठवत आहे.
टिना, छान परिचय. तुझा लेख
टिना, छान परिचय. तुझा लेख वाचताना हे पु स्त क घ्यायचेच असे मनाशी ठरवले आणि 'बुकगंगावर आऊट ऑफ प्रिंट दिसतयं' हे वाचून वाइट वाटले. तरी बघते कुठे सापडते का?
टीना, छान लिहिलंयस..
टीना, छान लिहिलंयस..
छान लिहीलयस टीना......
छान लिहीलयस टीना......
मिही आधी कृष्णमेघच एका रानवेड्याची यात्रा आधी वाचल आणि त्यातल्या संदर्भातुन नंतर आरण्यक...
<<< २०१६ च्या वर्षाऋतूपासुन सतत कानावर पडलेलं आरण्यक हे नाव पुस्तकरुपाने सुद्धा समोर येईल असं खरचं वाटलं नव्हतं. नावावरुन या पुस्तकाकडे मी ओढल्या गेले.. कळून येतयं कि आरण्यक हे नाव आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या सार्या गोष्टीच मनावर गारुड करुन भुलवणार्या आहेत >>>
हा परिच्छेद विशेष आवडला....
छान लिहिलंयस टीना मला या
छान लिहिलंयस टीना मला या लेखनप्रकारामध्ये फक्त मारूती चितमपल्ली आणि व्यं. मा. हेच माहिती होते. तुझ्यामुळे अजून चांगली नावं कळली.
थँक्यु ऑल...
थँक्यु ऑल...
बरोबर दिदा..
लक्की यु गिरीकंद..
सापडलं तर मलापन सांग सामी..
निरु ..
सुलक्षणा, अगं माझ्या या सार्या पुस्तकांसोबत ओळखी निसर्गाच्या गप्पा (घरची बाग हा ग्रुप) या धाग्यावरील सभासदांकडून झाल्या.. आणि हि सारी पुस्तके मी माबोकर शांकली व शशांक पुरंदरे यांच्याकडून मिळवली आहे..वाचायला...
छान लिहिलंयस .
छान लिहिलंयस .
मस्तच लिहिलंंय.....
मस्तच लिहिलंंय.....
मिही आधी कृष्णमेघच एका
मिही आधी कृष्णमेघच एका रानवेड्याची यात्रा आधी वाचल आणि त्यातल्या संदर्भातुन नंतर आरण्यक...>> निरु, तुम्ही कधी (कोणत्या साली) वाचलं आरण्यक ? जस्ट क्युरिअस
साधारणपणे 2004 साली....
साधारणपणे 2004 साली....
टीना, मस्त ओळख करून दिली आहेस
टीना, मस्त ओळख करून दिली आहेस.मिळवते आणि वाचते आता .
थँक्यु अन्जू आणि शशांक
थँक्यु अन्जू आणि शशांक
साधारणपणे 2004 साली....>>झाली म्हणायची १२ वर्षे...कल्पक नाव आहे..
टीना, मस्त ओळख करून दिली आहेस.मिळवते आणि वाचते आता .>> नक्की वाच ममो .. किती दिवसांनी दिसलीस इथे तू मला...
मस्त लिहिलंयस टीना.
मस्त लिहिलंयस टीना.
टीना, मस्त ओळख
टीना, मस्त ओळख
छान समिक्षा !
छान समिक्षा !
पुस्तक वाचायल हवे !
छान लिहीलयस ग.. पुस्तक
छान लिहीलयस ग.. पुस्तक वाचलेच पाहिजे आता... शोध घेते..