रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26

काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच दोन थुलथुलीत "फुगे" बघितले आणि "माझ्या बंडल पण पूर्ण बघितलेल्या" चित्रपटात एक नाव add झाले आहे..

हा हा .. थुलथुलीत फुगे Happy
कोणी डाव केला का तुमचा. कारण ट्रेलर पाहूनच काहीतरी बंडल प्रकार आहे हे समजत होते.. मी स्वजो शाखाचा फॅन असलो आणि त्यांचा चित्रपट चांगला निघावा अशी प्रार्थना करत असलो तरी पोस्टर किंवा ट्रेलर बघूनच ताडतो की पिक्चर कसा आहे, आणि बंडल असल्याचा संशय आल्यास किमान थिएटरात जाणे तरी टाळतो..

फुगेची दोन गाणी ऐकली तेव्हांच या सिनेमाच्या वाटेला जायचं नाही ठरवलेलं. कै च्या कै वेस्टर्न सुरावट, अगदी सामान्य शब्द आणि मधेच कसलाही संबंध नसताना गोवन संगीत (रेमोचं या या मयय्या ). संगीतकाराची कीव आली.

जान तेरे नाम
सावन कि आग ( असेच होते नाव)
बादशाह

अशी लिस्ट आहे एकेक मूवीचे नाव लिहिण्यापेक्षा. बर्‍याच ठोकळ्यांचे ठोकळे मूवी आहेत.

१) गोविंदाचे काही ममूवी
२) फारदिन खानचे जितके आलेले सगळेच मूवी
३) बेसिकली सलमान आणि शाहरुखचे बरेचसे मूवी( १९९४ - २००१६) ; एखादे तुरळक मूवी सोडल्यास
४) संजय दत्त
५) इमरान खान सगळेच
६) ऋतिक रोशन

काही मूवी आठवून सुद्धा आता मनाला त्रास होतो आपण केलेल्या चुकीचा तेव्हा न आठवलेलेच बरे.. Proud

>> अर्धपॉर्न ?? मोहोब्बते ???

हो. चिकण्या चोपड्या पोरी आणि पोरं. त्यांची अर्धी उघडी अंगे आणि त्यांच्यातील नैसर्गिक आकर्षण, एकमेकांची पप्पी घेणे, मिठ्या मारणे. कुणाचा तरी विरोध आहे म्हणून चोरून भेटणे इत्यादी. केवळ म्हणजेच प्रेमकथा नव्हे. पुरुष स्त्री मध्ये आकर्षण हे नैसर्गिकरीत्या असतेच. प्रेम कहाणी च्या नावाखाली तेच दाखवून प्रेक्षकांना अर्धवट उत्तेजित करणे म्हणजे अर्धपॉर्न नव्हे काय? म्हणूनच यश चोप्रा हा अतिशय सुमार दर्जाचा चित्रपट निर्माता होता असे माझे स्पष्ट मत आहे. आणि त्याचे चित्रपट पाहणे हा माझ्यासारख्यांसाठी तर भयंकर मानसिक छळ असायचा. अरे तुम्हाला खरेच प्रेम कथा दाखवायची तर दिसायला अत्यंत सुमार दर्जाची किंवा वय झालेली जोडी दाखवा आणि त्यांच्यात मानसिक पातळीवर किती उत्कट प्रेम असू शकते दाखवा. आणि तसा चित्रपट सुपरहिट करून दाखवा. मग मानेन.

कबाली .
ओवरहाईप्ड . अतिहिंसक .

अर्धपॉर्न मोहोब्बते>>>>>>>> Lol
तो फुगेचा ट्रेलर पाहून मला गे लोकांवर आधारीत आहे वाटलेला.>>>> हो मलाही. Lol

लव्ह स्टोरी २०५०
द्रोणा
कर्झ्झ्झ
रास्कल्स
आणि सेट मॅक्स कृपेने पुन्हा पुन्हा डोकं आपटू भयंकरः
जानी दुश्मन- एक अनोखी कहानी आणि तोच तो!
सूर्यवंशम!!

वर कोणीतरी उल्लेख केलेला माधुरी दीक्षित, सलमान व शाहरुख यांचा "हम तुम्हारे हैं सनम" हा चित्रपट सेट मॅक्स वर लागला आहे. इच्छुकांनी त्वरित लाभ घ्यावा.

पापी पेट का सवाल म्हणून काही सिनेमे पहावे लागले.
मी हिन्दी फिल्म्स ना फ्रेन्च सबटायटल्स करायचो.
मै प्रेम की दिवानी हुं (त्यातला जावेद जाफ्री आणि रूबी भाटीयाचा रटाळ सेक्वेन्स काढलेलापरत घातला म्हणून दोनदा करावा लागला पण CD पाहीला) हि एका चान्गल्या चित्रपटाची भिकार कॉपी होती.
इंसान (अक्षयकुमार ईशा देओल, थेटरात पाहिलेला)
लेडीज टेलर (राजपाल यादव , किम शर्मा यात त्याची हिरॉईन होती. लक्ष्याच्या भिकार मराठी चित्रपटाची अतिभिकार हिन्दी कॉपी)
वादा (अमिशा पटेल, अर्जुन रामपाल थेटरात पाहिलेला)
प्यारे मोहन (फरदीन खान विवेक ओबेरॉय see no evil hear no evil or एकापेक्षा एकची वाईट्ट कॉपि)

जितेन्द्र श्रीदेवीचे चित्रपट आपण का पहायचो हा प्रश्न आता पडतो

असाच एक हिंदी चित्रपट आहे, नाव विसरलो. त्यात क्लिंट इस्टवूडच्या दोन तीन पिच्चर्सची खिचडी आहे, प्रामुख्याने फॉर फ्यु डॉलर्स मोअर.
त्यात फिरोज खान क्लिंट इस्टवूड स्टाइल हॅट घालून घोड्यावरुन उगाच पडीक ठिकाणांतून फिरत असतो, बॅकग्राउंड्ला कधी या कधी त्या ओरीजीनल पिच्चरची थिम वाजत असते. अमजद खान व्हिलन, तो ही कुठल्या व्हिलनची कॉपी मारत असतो. अजुन दोन तीन हिरो याची त्याची कॉपी मारत असतात. सुरवातीला हसू आलं पण नंतर लक्षात आलं काहीच्या काहीच खिचडी आहे. गम्मत म्हणुन थोडाफार बघायला हरकत नाही, काय काय उपद्व्याप करतात निर्माते ते.

खोटे सिक्के, काला सोना टाइप असेल. तो घोड्यावरून फिरणारा फिरोज खान बघितल्याचे आठवते. अमजद ने कॉपी मारली असेल तर आश्चर्य आहे. तो बराच ओरिजिनल फ्लेवर द्यायचा रोल्स ना.

बहुतेक फॉर फ्यु डॉलर्स मोअर मध्येचः एक व्हिलन असतो ना, त्याच्या कडे साखळी लावलेलं जुनं घड्याळ असतं त्यातून मंजुळसं म्युझिक येत असतं. पहिल्या एंट्रीला तो ते म्युझिक ऐकताना मोठा किडा मारतो.. तसंच यात दाखवलंय. तो अमजद खान असावा असं मला वाटतंय, खात्री नाही.

"त्यात फिरोज खान क्लिंट इस्टवूड स्टाइल हॅट घालून घोड्यावरुन उगाच पडीक ठिकाणांतून फिरत असतो, बॅकग्राउंड्ला कधी या कधी त्या ओरीजीनल पिच्चरची थिम वाजत असते. " बहूदा "जलजला" असे नाव असावे असे वाटते या चित्रपटाच.

प्यारे मोहन (फरदीन खान विवेक ओबेरॉय see no evil hear no evil or एकापेक्षा एकची वाईट्ट कॉपि) >> हैला !! इथे प्यारे मोहन पाहिलेला दुसरा नग निघाला Lol मला वाटलं होतं की फक्त मीच तो बदनसीब आत्मा आहे ज्याने इतके त्रास सोसलेत Proud

हैला !! इथे प्यारे मोहन पाहिलेला दुसरा नग निघाला >>>> वेळीच शहाणा बघत अर्ध्या तासाने सोडलेला मी एक आहे. पण माझे ते वयंच तसले होते. होतात अश्या चुका अजाणत्या वयात. पण वेळीच सांभाळलो हे महत्वाचे.

मध्यंतरी बाणेदार की ठाणेदार नावाचा एक पिक्चर पाहिलेला. शेजारच्या काकांच्या आग्रहावरून. चॅनेल चेंज करताना टिव्हीवर दिसला तसे म्हणाले, लय भारी पिक्चर आहे, आमच्यावेळी फार्र गाजलेला, आम्ही थिएटरमध्ये पाहिलेला वगैरे लय कौतुक केले. त्यातले जुम्मा चुम्मा दे दे च्या धर्तीवर तम्मा तम्मा दे ग या गाण्याचे एक आख्खे कडवे गाऊन दाखवले. मला वाटले काकांना एवढे गाणे अजूनही आठवतेय तर नक्कीच काहीतरी भारी असेल. आणि फसलो...
आता ही पोस्ट करताना गूगाळून पाहिले तर १९९० सालचा पिक्चर निघाला. सत्तर ऐंशीच्या दशकातही ईतके टिपिकल पिक्चर निघत नसतील. हा खरेच गाजलेला? कदाचित अश्याच सो कॉलड गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांना मुक्ती द्यायला खान मंडळींचे आगमन झाले असावे.

उगीच खानांची पाठराखण करू नकोस. सूर्यवंशी , मेला , चाहत हे अनुक्रमे तुझ्या आवडत्या सलमान , आमिर, आणि शारूक खानांचे तितकेच रटाळ आणि भंकस पिक्चर आहेत !! Lol

सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत रे ! भिकार पिक्चर च्या कचाट्यातून कोणीच सुटलेलं नाही Lol

एम. एस. धोनी - अनटोल्ड स्टोरी. सुशांत सिंग, त्याच्या लव्ह स्टोरीज आणी त्याला थोडासा क्रिकेट चा तडका. महा-बोअरिंग!

तुझ्या आवडत्या सलमान , आमिर, आणि शारूक खानांचे >>> यातला आवडता एकच.. उगाच तिन्ही लादू नका. तिघांना मिळून पडणारे शिव्याशाप मी एकटा झेलू शकत नाही Proud

बाकी ओवरऑल ते येण्याच्या आधीच्या चित्रपटांबद्दल आणि ते आल्यानंतरच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास एका रद्दड काळातून त्यांनी चित्रपटसृष्टीला पुन्हा वर आणले हे कबूल करावेच लागेल... असो, तरी शाहरूखच्या बोअर झालेल्या तरी पुर्ण पाहिलेल्या चित्रपटांची यादीही मी लवकरच टाकतो. त्यात फेवर वगैरे काही नाही. उलट त्याचा बंडल चित्रपट बघणे म्हणजे आणखी त्रास असतो मला

उगाच तिन्ही लादू नका. तिघांना मिळून पडणारे शिव्याशाप मी एकटा झेलू शकत नाही >> असे असेल तर जनरलाईझ्ड स्टेटमेंट्स करू नयेत. उगीच " अश्याच सो कॉलड गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांना मुक्ती द्यायला खान मंडळींचे आगमन झाले असावे. " असे म्हणू नये. आपल्या कर्माची फळं भोगायला तयार रहा.

धनि ऋन्मेऽऽष
तुम्ही नीट वाचल नाहीत मी काय लिहीलाय ते.
अरे मी तो चित्रपट नुसता पाहीला नाही त्याच्या subtitles केल्यात म्हणजे अक्षरशः ओळी ओळीने पाहीलाय.

कॅप्ट्न एम
मै बलवान कसा विसरेन. आपण पहील्यांदाच एकट्याने चित्रपट पहायला गेलेलो. तशात लाईट गेल्यामुळे ६ चा सिनेमा ७ ला सुरू झाला आणि संपता संपत नव्हता. १० वाजले तरी पोर अजुन का आली नाहीत म्हणून घरच्यांनी जवळ जवळ गस्त घातलेली प्रकाश टॉकिजच्या भागात.
वर घरी आल्यावर आई म्हणाली काssssय मिथुनचा पिक्चर मला वाटलं हनुमानाचा असेल.
तुला माधुरीचा राजा आठवतोय आपण पहील्यांदा घामाघुम कंटाळून बाहेर पडलो आणि नंतर करू पैसे वसूल म्हणत परत जाऊन बसलो यथेच्छ नाव ठेवली.
शेवटाचा सिन जस इंद्रकुमारच्या चित्रपटात नेहमी असत कुठल्याही गोष्टीला आग लावून सात फेरे चालतात. यात तो पेद्रट संजय कपूर माधुरी बरोबर सप्तपदी घेतोय बॅग्राऊंडला प्रणम्य शिरसा देवम.... दोघही म्हणालेलो नशीब भीमरूपी नाही लावल.

इथे कोणी 'लेकीन' चा उल्लेख केलाय का?
लता निर्माती हृदयनाथच संगीत
सगळी गाणी आवडलेली, गुलजार दिग्दर्शक
कलाकारही सगळे आवडते,
गुढरम्य कथानक
आणि इतकी वाईट फजिती झाली.
आम्ही फक्त लेकीन....... एव्हढच म्हणू शकलो.

शेवटाचा सिन जस इंद्रकुमारच्या चित्रपटात नेहमी असत कुठल्याही गोष्टीला आग लावून सात फेरे चालतात. >>> Lol हे जबरी निरीक्षण आहे. मला 'दिल' मधले कोणाकडेतरी रागाने बघत मारलेले फेरे लक्षात आहेत.

काल की परवा जाल द ट्रॅप मध्ये अडकता अडकता वाचलो. चुकून माकून घायल घातक दामिनीचा सनी देओल दिसतो का बघूया म्हणत टीव्हीसमोर बसलो. थोड्यावेळातच एक अफाट द्रुश्य बघण्याचा योग आला. हिरोईनीच्या मैत्रीणींना काही कारणाने रिकी मार्टीन की कोणाच्या म्युजिकल शो ला जाता येत नाही. तर आपल्या सनी देओल ने काय करावे.... हो हो, तो तेच करतो जे कुठल्याही शाहीद हृतिक रणबीरने केले असते. ये रिकी विकी टिकी मार्टिन को भूल जाओगे ऐसा डान्स मै दिखलाता हू म्हणत टाळ्या पिटत भाईची नाचायला सुरुवात... आणि हिरोईनच्या मैत्रीणी चक्क त्याच्या अदावर फिदा.. बिचारे ज्युनिअर आर्टिस्ट., पोटापाण्यासाठी काय काय करावे लागते.

अरे मी तो चित्रपट नुसता पाहीला नाही त्याच्या subtitles केल्यात म्हणजे अक्षरशः ओळी ओळीने पाहीलाय. >> Rofl बापरे याचीतर कल्पना पण करवत नाही. पापी पेट क्या क्या करवाता है Lol

'दिल' मधले कोणाकडेतरी रागाने बघत >>सईद जाफ्री

हे बघ
https://youtu.be/EaNwZKuuimw?t=5m5s

Pages