Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काबील की रईस बघताना "जग्गा
काबील की रईस बघताना "जग्गा जासूस" या पिक्चरचा ट्रेलर पाहिला. फारच हॅपनिंग ट्रेलर. उत्सुकता जागवणारा. रणबीर तर तसाही आपला फेव्हरेट. त्याला विविध अतरंगी रुपात बघायला मजा आली. एका द्रुश्यात तर अगदी अगदी हॅरी पॉटरच वाटला. एकेक सीन ईतका रोचक, एकेक फ्रेम ईतकी देखणी, हिरोईन म्हणून आपली कतरीना चिकणी, आणि सेम अॅप्लिकेबल टू रणबीर, की एखादा ईंग्रजी धमाल चित्रपटच हिंदीत रिमेक बनतोय असे वाटले. एकंदरीत ट्रेलर बघताच हा चित्रपट बघायचाच म्हणून नोंद करून टाकली.
आता पुन्हा आठवले तसे मुद्दाम यूट्यूब उघडून ट्रेलर शोधला. पुन्हा बघायलाही मजा आली. पण एक किडा डोक्यात वळवळू लागला. याचाही बर्फी तर नाही ना होणार? किंवा जे बर्फीने माझ्याशी केले तेच तर हा देखील नाही ना करणार? म्हणजे बर्फी पहिल्याच शनिवारी बघून मी कमालीचा प्रभावित झालेलो. पुढचे आठ दिवस तरी हा प्रभाव ओसरणार नाही याची खात्री होती. मात्र पुढच्याच दिवशी त्यातल्या ढापलेल्या सीन्सची चर्चा वाचली आणि अगदी खीर मिटक्या मारत संपवल्यावर तळाशी पाल दिसावी तसे झाले. एक चांगला चित्रपट बघितल्याचे समाधान क्षणात नष्ट झाले. पुन्हा कधी टीव्हीवर देखील बघितला गेला नाही. त्याची गाणीही ऐकावीशी वाटली नाहीत. मुळात तो चित्रपट मला आवडलाच नसता तर प्रश्नच नव्हता, पण अफाट आवडल्याने आणि त्यापेक्षाही महत्वाचे आपल्याकडे असा चित्रपट बनला याचा अभिमान वाटल्याने मग त्यामागचे सत्य समजल्यावर काहीतरी फसवणूक झाल्यासारखे वाटले.
असो, आशा करतो की जग्गा जासूस बाबत तसे नसावे. पण तसेच असण्याचे चान्सेस जास्त वाटताहेत. कारण ती शंका डोक्यात येताक्षणी मी जग्गाच्या दिग्दर्शकाचे नाव पाहिले. तर तोच निघाला - अनुराग बासू !
दोन्ही चित्रपटांना विकीवर कम्पेअर केल्यास सिनेमेटोग्राफर म्हणून कोणी रवी वर्मन दोघांमध्ये सामाईक आहे. म्हणजे हा पिक्चरही मोठ्या पडद्यावर बघायचा अनुभव बर्फीसारखा नेत्रसुखद असणार यात शंका नाही. आणि ट्रेलरमध्येही ते जाणवते. पण .... पुन्हा वरचे कारण आहेच.
ट्रेलर ईथे बघू शकता - जग्गा जासूस - https://www.youtube.com/watch?v=zBobLhXFBio
चांगला वाटला ट्रेलर,
चांगला वाटला ट्रेलर, इंटरेस्टिंग
मी रणबीर कपूरचा अजून कुठलाही चित्रपट पाहिला नाही. हा बघेन.
बर्फीत सीन्स ढापलेले हे माहिती नव्हते. जग्गू जासून ट्रेलर बघताना एक दोनदा द गॉड्स मस्ट बी क्रेझी चित्रपटांची आठवण मात्र झाली.
आशा करतो की त्यातून ढापलेले नसावे.
ध्यानीमनी चा ट्रेलर चांगला
ध्यानीमनी चा ट्रेलर चांगला वाटतोय.वेगळा.
मानव, या खालील लिंकांवर नजर
मानव, या खालील लिंकांवर नजर टाकल्यास समजेन की बर्फी कुठल्या खव्याची बनली होती
ईथे बघा - https://www.youtube.com/watch?v=aowIlRQag3Q
आणि म्हणे हा ऑस्करलाही पाठवलेला..
अवांतर - आपण रणबीरचा कुठलाही चित्रपट बघितला नाही म्हणालात, मला त्याचा आवडलेला एक मनोरंजक चित्रपट - अजब प्रेम की गजब कहाणी
ऋन्मेष,
ऋन्मेष,
'बर्फी'मधले काही सीन्स ढापलेले होते, असं आपण म्हणू शकतो. त्यावर असलेला चार्ली चाप्लीनचा प्रभाव तर अगदी उघडच होता. म्हणजे मी जेव्हा सिनेमा चि.गृ.त पाहात होतो तेव्हाही सुरुवातीचा चेस, नंतर सौरभ शुक्ला आणि रणबीरची पकडापकडी, शुक्लाचं दारात अडकणं वगैरे सीन्स मला 'चार्ली'चेच वाटले. त्यानंतर इतरही काही सीन्स इतर काही सिनेमांतून घेतलेले समजलं.
पण सिनेमाचा जो आत्मा होता, तो कुठून उचलल्यासारखा नाही वाटला. प्रेझेंट, फ्लॅशबॅक, फ्लॅशबॅकमधला फ्लॅशबॅक अशी उलटसुलट मांडणी खूप वेगळी आणि इन्टरेस्टिंग वाटली व आहेही. उचललेले सीन्स असले तरी त्यांचा कोलाज एक नवीन कथानक मांडण्यात केला आहे.
अनेकांना रणबीर आणि प्रियांकाची कामं आवडली नाहीयत. मला तर खूप आवडली. जोडीला इलियानाचंही काम सुंदर झालं आहे. खासकरून अखेरचा प्रसंग, जेव्हा मागे चालत येणाऱ्या रणबीरला इलियाना खुणेने सांगते की प्रियांका त्याला मागून हाक मारतेय आणि ते समजल्यावर तो केस वगैरे नीट करून मागे वळतो, तो सगळा सीन अप्रतिम जमला आहे.
त्यातली गाणीसुद्धा कुठल्या तरी फ्रेंच गाण्यांच्या नक्कला आहेत. शेवटी प्रीतमच !
पण मला ओव्हरऑल 'बर्फी' आवडला होता आणि आजही आवडतोच.
'जगा जासूस'चं ट्रेलर पाहूनही त्यावर इतर अनेक सिनेमांचा प्रभाव जाणवत आहे. सिनेमा रिलीज झाल्याबरोबर त्याचं व्यवस्थित पोस्टमोर्टेम करून येईलच, बर्फीप्रमाणेच ! त्यामुळे तुमचा पुन्हा अपेक्षाभंग होण्याची जवळजवळ खात्री आहे. माझा 'बर्फी'च्या वेळीही झाला नव्हता आणि आताही होणार नाही, त्यामुळे मी पाहीनच.
पण सिनेमाचा जो आत्मा होता, तो
पण सिनेमाचा जो आत्मा होता, तो कुठून उचलल्यासारखा नाही वाटला.
>>>
रसप कश्याला आत्मा म्हणत आहात. जर दोन अश्या म्हणजे शारीरीक मानसिक व्यंग असलेल्या जगावेगळ्या जीवांचे प्रेमप्रकरण म्हणत असाल तर मी दिलेल्या लिंकनुसार ते देखील ढापलेले कथानक आहे. याऊपर काही वेगळे म्हणत असाल तर कश्यावरून ते देखील ढापलेले नसेल. कदाचित तुम्हाला मला माहीत नसेल ईतकेच
बाकी आधीच कल्पना असेल तर माझी हरकत नाही, अगदी एखादा सुंदर ईंग्रजी चित्रपट जसाच्या तसा हिदीत आपल्या आवडत्या कलाकारांसोबत रिमेक होणार असेल तर तो बघायला आवडेलच. ईथे मात्र आधी हे सारे नवीन अदभुत वाटले आणि नंतर ते ढापलेले आहे हे समजल्याने फसगत झाली असे वाटले ईतकेच.
बाकी बर्फीमध्ये त्यांनी जो अभिनय केला त्याला तोड नाही. त्याला गालबोट लागल्याचे जास्त वाईट वाटले.
मानव, या खालील लिंकांवर नजर
मानव, या खालील लिंकांवर नजर टाकल्यास समजेन की बर्फी कुठल्या खव्याची बनली होती Happy
ईथे बघा - https://www.youtube.com/watch?v=aowIlRQag3Q
आणि म्हणे हा ऑस्करलाही पाठवलेला.. Wink
हायला, खरच की! एवढा ढापू असेल असे वाटले नव्हते.
बाकी रणबीर कपूरचा चित्रपट पहायची इच्छा बरेच महिन्यांपासून आहे. अजब प्रेम की गजब कहाणी बघेन.
नाम शबाना
नाम शबाना
ट्रेलर वरून जबरदस्त वाटतोय. तापसीला अगदी करिअरच्या सुरुवाती पासूनच चांगल्या आणि सशक्त भुमिका मिळू लागल्या आहे.
जग्गा जासूस इंडि जोन्सचा
जग्गा जासूस इंडि जोन्सचा भारतीय अवतार वाटतोय...
हा येतोय मे मध्ये - "बस नाम हि काफि है..."
नाम शबाना , गा झी अटँक ,
नाम शबाना , गा झी अटँक , कमाण्डो-2 -- ट्रेलर मस्त वाटतायत.
फिलौरी ..https://www.youtube
फिलौरी ..
https://www.youtube.com/watch?v=uCTr7MGFK0U
बघून पहेली चित्रपटाच्या दुखद आठवणी ताज्या झाल्या..
हा देखील तसाच रटाळ नसावा ही अपेक्षा..
हा बघीतला मी ... फिलौरीचा
हा बघीतला मी ... फिलौरीचा ट्रेलर म्हणतेय...
काही दिवसांपूर्वी 'लिपस्टीक अंडर माय बुरखा'चा ट्रेलर पाहिला..
मग कळलं कि या मुव्हीवरुन वादंग सुरु आहे.. आजकाल कुठल्या पाद्र्या गोष्टीमुळे लोकांच्या वा सेंसॉर बोर्डच्या भावना भडकतील साम्गता येत नाही..पिच्चर प्रदर्शित करायला बंदी आलीए म्हणे..खरं खोट देव जाणे...
Lipstick under my burkha
https://www.youtube.com/watch?v=EpHqeHF8NM0
इथे सरकार 3 चा ट्रेलर पाहता
इथे सरकार 3 चा ट्रेलर पाहता येईल..
http://erosnow.com/movie/watch/1058673/sarkar-3/6796335/exclusive-offici...
बाहुबली २ चा ट्रेलर आलाय का?
बाहुबली २ चा ट्रेलर आलाय का?
लायन चा ट्रेलर बघितला. खुपच
लायन चा ट्रेलर बघितला. खुपच आवडला. ह्याच आठवड्यात बघणार आहे.
इथे सरकार 3 चा ट्रेलर पाहता
इथे सरकार 3 चा ट्रेलर पाहता येईल.. >>> भारीये .
थेटरात जाउन बघणार
खूप अंगावर आला सरकारचा ट्रेलर
खूप अंगावर आला सरकारचा ट्रेलर .. और ज्यादा गुस्सेवाला अमिताभ फुल्लटू ओवरअॅक्टींग !!!
अमिताभ पुन्हा पुन्हा तेच तेच का करतोय समजत नाही.. एकवेळ तसंच तसंच परवडते, पण तेच तेच .. त्याच्यासारख्या कलाकाराने तरी हे नाही करायला पाहिजे..
अवदल सर्कर ३ ... बघ्नार नक्कि
अवदल सर्कर ३ ... बघ्नार नक्कि
लिप्पस्टीक बुरखा भारी आहे की
लिप्पस्टीक बुरखा भारी आहे की वंगाळ याचा अंदाज ट्रेलरवरून येणे कठीण.
बुरखा नावातच वादळ उत्पन्न करायची क्षमता आहे तर वाद झालाय यात नवल नाही..
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=rhmT2nfc6ko
विद्या बालन चा "बेगम जान"
भन्नाट संवाद.
आज काल मराठी मध्ये काही नविन
आज काल मराठी मध्ये काही नविन येताना दिसत नाही..आणि जे दिसल ते पाहिल...
एका पेक्षा एक ट्रेलर...
-- तलाव
-- कणिका..
-- माणुस एक माती - कारण...आजुन बरंच काही करायच बाकी आहे.. (हो हे नाव आहे सिनेमाच)
-- प्रेम संकट
आमच्या भाचीचा (आदिती इनामदार)
आमच्या भाचीचा (आदिती इनामदार) नवीन चित्रपट येतोय 'पूर्णा' नावाचा राहुल बोस बरोबर. त्याचा ट्रेलर बघा. ३१ मार्च ला रिलीज होतोय सर्वांनी सहकुटुंब बघा. तिची नातेवाईक म्हणून मार्केटिंग करत नाही पण खरंच अप्रतिम काम केलं आहे. १३ व्या वर्षी एवरेस्ट पर्वत चढणार्या मुलीची कहाणी आहे. नक्की बघा.
https://youtu.be/LRoowtgZCeU
आमच्या भाचीचा (आदिती इनामदार)
आमच्या भाचीचा (आदिती इनामदार) नवीन चित्रपट येतोय 'पूर्णा' नावाचा राहुल बोस बरोबर. >>> अरे वा अभिनंदन आणि शुभेच्छा भाचीला.
ट्रेलर फार सुंदर. मुवी छान असणार. भाचीबद्दल अजून माहीती द्या, प्रशिक्षण कुठे घेतलं वगैरे. छान काम केलंय तिने.
म् मशिन - अब्बास मस्तान
म्
मशिन - अब्बास मस्तान
अंजू तिने प्रशिक्षण वगैरे असं
अंजू धन्यवाद! तिने प्रशिक्षण वगैरे असं काही नाही घेतलंय. बर्याच मुलींमधून ऑडिशन देऊन निवड झाली. बाकी अजून डिटेल्स नणंदेला विचारून सांगते
पॉर्णा चा ट्रेलर पाहिला खुप
पूर्णा चा ट्रेलर पाहिला खुप आधीच..इंटरेस्टींग वाटतोय..राहुल बोस आवडता म्हणुन बघायच्या विचारात होतीच..पण माबोकरांची भाची आहे म्हटल्यावर नक्की बघेल.. अभिनंदन सांग तिला अंजली..
थँक्स राया..कधी नव्हे ती कमेंट टायपुन परत न वाचता पोस्ट केल्यामुळे तसं झालं..
टीना, बोसावडता ही अगदी शिवी
टीना, बोसावडता ही अगदी शिवी वाटतेय बघ
१३ व्या वर्षी एवरेस्ट पर्वत
१३ व्या वर्षी एवरेस्ट पर्वत चढणार्या मुलीची कहाणी आहे >>>>> ही भुमिका तुमच्या भाचीने केली आहे का? तिलाही हे ट्रेकिंग वगैरे जमते का?
सध्या तांत्रिक कारणाने ट्रेलर बघू शकत नाही. ते दूर होताच बघेन.
बेगम जानचा ट्रेलर बघितला .
बेगम जानचा ट्रेलर बघितला . भारी आहे . सरकारचा ट्रेलर ठीक ठाक वाटला.
लिपस्टिक अंडर माय बुरखाचा विषय ट्रेलर वरून तरी वेगळा वाटतोय पण नेमका विषय लक्षात येत नाहीये . पण परवानगी नाकारण्याइतकं त्यात काही आहे असं वाटत नाही . अर्थात आले सेंसारच्या मना ..
अंजली_१२ , तुमच्या भाचीला शुभेच्छा
विक्रमादित्य मोटवानी आणि राज
विक्रमादित्य मोटवानी आणि राज कुमार राव अभिनित trapped ट्रेलर बघितला . जबरदस्त आहे .
https://youtu.be/RJaj39jI-qk
Pages