चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैराट खूपच गाजल्याने अति उत्साहाने कन्नड वर्जनचा ट्रेलर पाहिला आणि का? का? का? असे झाले.
तसाही सैराट ठिकच होता(माझ्या मते) पण कन्नड वर्जन पाहून पच्चाताप( आर्ची म्हणते तसेच) होइल.

आर्चीला ( अका: रिंकू राजगुरुला) फक्त आणि फक्त तेलुगु आणि कन्नद मूवीमश्येच काम मिळु शकेल असे तिचे रूप झाले आहे. भयानक जाडी वाढलीय आणि कन्नड सिनेमांधली ठोकळेबाज अभिनय. अरारा वाटेल इतका विचित्र रीमेक आहे. ...

फक्त लंगड्या आणि हिलाच घेतलेय , बाकी सर्व कन्नड ठोकळे आहेत...

Family Matter असे काहीतरी नाव होते त्या मुवीचे. मी बघितलाय तो ट्रेलर. फेक आहे तो.-- होय, तोच तो. मला फेक वाटला कारण वेक अप सिड मधले सीन आणि रणबीर आणि करिनाचा एकही एकत्र सीन नाहीये. दोघेही वेगवेगळे दाखवले आहेत. असे ट्रेलर का तयार करत असावेत?

होय, तोच तो. मला फेक वाटला कारण वेक अप सिड मधले सीन आणि रणबीर आणि करिनाचा एकही एकत्र सीन नाहीये. दोघेही वेगवेगळे दाखवले आहेत. असे ट्रेलर का तयार करत असावेत? >>> फक्त मनोरन्जनासाठी. त्यात वाईट असे काही नाही. काहीन्कडे कल्पनाशक्ती अचाट असते. मला तर आवडतात असे फेक ट्रेलर. कधी कल्पना केली नसेल अश्या गोष्टी असतात एकेक फेक पिक्चरच्या. काही विडिओजची एडिटिन्ग भारी असते.

'सायलेंस' मराठी सिनेमाचा ट्रेलर पाहिला. गजेंद्र अहिरंचा आहे. सत्यघटनेवर आधारित आहे. नागराज मंजुळेंचा अभिनय पहायला आवडेल.

वरच्या कन्नड सैराट च्या पोस्ट्ला अनुमोदन! महाभयानक! >> +१००००००००००००
आर्ची पाहावत नाहीए..आणि डिरेक्शनपन कुठच्या कुठ..
माझ्या कानावर आलं होत कि मंजुळेच डिरेक्ट करणार .. बघुन म्हटलं कि इतकं बेकार का दिसतय हे..
लंगड्या दिसलाच नाही मला..

कन्नड झिंगाट पाहिलं आताच, अर्धपण पहावल नाही Sad कुठे तो निरागस परश्या आणि आर्ची आणि कुठे हे अचकट विचकट (बीभत्स) झिंगाट! लोकांना मंजुळेंचे दिग्दर्शन आता प्रकर्षाने कळेल की काय चीझ होते ते.

काही पण असु दे... आम्हाला आर्ची आवडली ती आवडली. तुम्ही जाड म्हणा किंवा आजुन काही...!!! Happy
त्या सई, सोनाली आणि उर्मिला काकु पेक्षा कितीतरी पटीने छान दिसते....

त.क : डेस्कवर लावलेला तिचा बुलेट चालवनार फोटो आजुन आहे तसाच आहे.. आणि कोणी येनारे जाणारे माझे स्वीडीश सहकारी विचारतात तेव्हा मी सांगतो हि आमच्या मराठी मधील एक खुप सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे...!!!

>>>>परश्या म्हणुन घेतलाय तो बरा दिसतोय. आर्ची मात्र अवाढव्य
ती फेमस फांदी का तुटली असावी ह्याचा अंदाज येतोय Lol Light 1

परश्या म्हणुन घेतलाय तो बरा दिसतोय.>>> मला फक्त त्याचे डोक्यावरचे भरपूर वाढलेले केस दिसतात, चेहेरा दिसतंच नाही.

Sonakshi Sinha & Ranbir Kapoor - 1969 - Trailer (Kishore/Madhubala, 2016)
फेक आहे तो . ओझी प्रोडक्शन ने कॉमेंट्स मध्ये काय लिहिलंय ते वाचलत कि समजेलच.
सगळ्या क्लिप रणबीर आणि सोनाक्षीच्या मुव्हीज मधून घेतल्या आहेत

<<आर्चीला ( अका: रिंकू राजगुरुला) फक्त आणि फक्त तेलुगु आणि कन्नद मूवीमश्येच काम मिळु शकेल असे तिचे रूप झाले आहे. भयानक जाडी वाढलीय आणि कन्नड सिनेमांधली ठोकळेबाज अभिनय. अरारा वाटेल इतका विचित्र रीमेक आहे. ...>> + १११ .सैराट मध्ये दिसलेली आर्ची सुद्धा धष्ट्पुष्ट च आहे . अरे शूटिंग झालं तेव्हा फक्त तेरा - चौदा वर्षांचीच होती ती . इतक्या लहान वयाची वाटते का ती.? मोट्ठी दिसते "ती कायमच "आंटी दिसते "अशा कित्येक कॉमेंट यु ट्यूब वर आणि इंस्टाग्राम वर वाचल्या आहेत Happy

बापरे...मी आत्ता मनसु मलिंगे (?) मधलं झिंगाट पाहिलं...
अरारा झालं... सहन होत नाही ते सगळं.. निव्वळ टाकायच म्हणुन कुठ बी स्लो मोशन टाकतात यार हे लोकं.. बेक्कार एकदम..

अरे शूटिंग झालं तेव्हा फक्त तेरा - चौदा वर्षांचीच होती ती . इतक्या लहान वयाची वाटते का ती.? मोट्ठी दिसते >>> जनरली ग्रामीण भागात १३-१४ वयाच्या मुली त्यान्च्या शारीरीक ठेवणीमुळे मोठयाच दिसतात.

पण मंजुळेंनी ती सुंदर दिसेल अशा फ्रेम्स तरि केल्या होत्या. तो कन्नड सैराटचा डिरेक्टर नक्कीच माठ आहे. काय तो तिचा बटबटीत मेकअप. आठवा, परश्या विहिरीत तिच्या जवळुन जातो तेव्हा किती गोड, नितळ दिसलेय ती. तोच सीन कन्नडमध्ये पहावत नाही. तिचे फेशियल हेअर, पिंपल्स सगळे दिसते. आणि तो परश्या लल्लु दिसतो.

अरे शूटिंग झालं तेव्हा फक्त तेरा - चौदा वर्षांचीच होती ती . इतक्या लहान वयाची वाटते का ती.? मोट्ठी दिसते >>> जनरली ग्रामीण भागात १३-१४ वयाच्या मुली त्यान्च्या शारीरीक ठेवणीमुळे मोठयाच दिसतात. >>> फक्त ग्रामीण भागातल्याच नव्हे शहरी भागातल्या मुली पण जाड आणि धिप्पाड असतातच. प्रश्न तो नाहीये मंजुळेंना आवडली म्हणून त्यांनी तिला घेतली आहेच पण ती मोट्ठी दिसते . शुटींगच्या वेळी जे तिचं वय होत ( १२ -१३ वर्ष -आठवी नववी ) त्या पेक्षा ( वयापेक्षा ) ती मोट्ठी दिसते. आणि त्या कन्नड वर्जन मध्ये त्या विहिरीच्या सिन मध्ये तर भयाणच दिसते Happy

तिचे फेशियल हेअर, पिंपल्स सगळे दिसते. आणि तो परश्या लल्लु दिसतो << मराठीत दिसल अस्तं तर मंजुळेंनी हिंदी सारख्या चिकण्याचोपड्या हिरोईन न दाखता रियालीटी दाखवली आहे अस म्हणुन प्रेझ केल असत :प

तसे नव्हे. ब्लीच केलेला चेहरा, लाईट्स चुकीच्या अँगलने लावल्यामुळे केस दाखवतो. डायरेक्टर माठ आहे एवढेच. मंजुळेंनीही तिला ब्लीच, मेकाप केला असणारच पण ती त्या मेकअपसहित एकदम नॅचरल वाटली होती.

आर्चि रुढार्थाने सुन्दर हीरॉइन ( नाजुक्,गोरी ) अशी घ्यायची नव्हती मन्जुळेना, पण सैराट मधली रिन्कु इनोसन्ट वाटली, दिसली होती.

काय ईतके वाईट आहे त्या कन्नड सैराटमध्ये... कदाचित मी ईथल्या पोस्ट वाचून जरा जास्तच मनोरंजनाची अपेक्षा ठेवून गेलो असेन, पण मला तर ठिकठाकच वाटला ट्रेलर. हा ते झिंगाट गाण्याची वाट लावली आहे, अगदी गल्लीडान्स करून टाकलाय. ईतर काही द्रुष्यातील कॅमेरावर्क आणि यातील कॅमेरावर्क कमालीची तफावत कशी झाली हे समजत नाही. असो पण सैराट झालं रे गाणे चांगले वाटले.

सैराटचा उत्तरार्ध रिअलास्टीक बनवायच्या नादात बोर झालेला. हा सौथेंडीयन वर्जन म्हणजे फुल्ल मजेशीर असणार.
या गाण्यावरूनच समजते
https://www.youtube.com/watch?v=IpRAu78Sc58

https://www.youtube.com/watch?v=0SrIH0Efr6A
हे कन्नाड याड लागडं
मराठी वाले तर एक कोरीओग्राफीचा बेंचमार्क होते, त्याची बरोबरी करणे तर अशक्यच.
पण एक समजले नाही. हा कन्नड हिरो ऐश्वर्या राय सारखा का धावतो?

रिंकूला कपडेही नाचताना अवार्ड फंक्शन मधे इतके भयानक कपडे का देतात? मला तर मुद्दामहून शोषण वाटते ते नव्या कलाकारांचे असे कपडे देवून....

आता वरचे जे फोटो आहेत त्यातच तिला असा ड्रेस( हो , त्याला साडी म्हणवत नाही) दिलाय आणि बॅक स्टेजवर नाचणार्‍या मुलींना पदर वगैरे असलेल्या साड्या दिलाय्त.

Pages