काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया
रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लागा चुनरी में दाग.
लागा चुनरी में दाग. Don 2 (शाहरुख चा)
मोहोब्बते हा पहिला सिनेमा जो
मोहोब्बते हा पहिला सिनेमा जो पहाताना मी, 'आता काहीतरी घडेल' असं म्हटल्यावर शेजारी बसलेल्या मित्रानं (आधीच सिनेमा बघून परत माझ्याबरोबर पाहिल्याबद्दल त्याच्या धैर्याला सलाम), 'आता?, अरे संपणार आहे पुढच्या १० मिनिटात' असं सांगितलं होतं.
प्यारवाली लव्हस्टोरी फोटोकॉपी
प्यारवाली लव्हस्टोरी
फोटोकॉपी
मला वाटलेले रटाळ, तरीही
मला वाटलेले रटाळ, तरीही बघितलेले अलिकडचे बाजीराव्-मस्तानी (मिसो होता हा प्लस point मात्र),
दुसरा दुनियादारी (मला हाणू नकोस ऋ. ). दोन्ही टीव्हीवर बघितले.
बाकी आठवले की लिहीन.
थेटरात त्या टायगर श्रॉफचा
थेटरात त्या टायगर श्रॉफचा जबरदस्ती बघावा लागला, छोट्या भाचीमुळे. नाव पण विसरले. त्यात त्याच्या भावाचं काम केलेला आवडला. अरे हा फ्लाईंग जाट नाव त्याचं.
बाहुबली पण रटाळ वाटला, मला काही कळलाच नाही तो मुवी. पण टीव्हीवर बघितला.
मी या वीकेंडलाच दिलवाले
मी या वीकेंडलाच दिलवाले नावाचा सिनेमा पाहिला. अर्ध्या तासात बसून संपूर्ण पटकथा लिहिली असावी असे वाटत होते. वरुण धवन व इतर कॉमेडी करणारे लोक हे इतक्या निकृष्ट दर्जाचा अभिनय करत होते की ते पाहून एकदाही हसू आले नाही. बी ग्रेड सिनेमेसुद्धा अधिक कन्विक्शन व सिन्स्सीरीटीने बनवलेले असतात.
तशन
तशन
हो. दिलवाले अगदीच बालिश
हो. दिलवाले अगदीच बालिश सिनेमा आहे. नुकताच नेटफ्लिक्सवर पाहिला. दोन दिवस पुरवुन पुरवुन पाहिला. एका वेळेस तासाभरापेक्षा पाहुच शकत नाही. एरवी सगळे नॉनसेन्स मुव्हीज एंजॉय करणार्या माझ्या मुलालाही नाही आवडला. शाहरुख खान चिंब भिजुन येतो दोन सीन्समध्ये, तेवढेच काय ते नयनरम्य आहे.
मी या वीकेंडलाच दिलवाले ... >
मी या वीकेंडलाच दिलवाले ... >>> +१ एक गाणे मात्र आवडले.
अग अन्जू मला आवडला फ्लाईंग
अग अन्जू मला आवडला फ्लाईंग जाट. शहिद आणि आलियाच काम आवडलं
हिरोपंती ते पण एकटीने थेटरात
हिरोपंती ते पण एकटीने थेटरात जाऊन पाहिलेला...
मला पाठशाला आवडला होता.
>>>>मला आवडला फ्लाईंग जाट.
>>>>मला आवडला फ्लाईंग जाट. शहिद आणि आलियाच काम आवडलं
हे लोकं कुठे आहेत त्याच्यात? तुम्हाला उडता पंजाब म्हणायचंय का?
बहुतेक कन्फ्युजन उडता/ फ्लाईंग आणि जाट्/पंजाब
होहो.. फ्लाईंग जाट कोणता
होहो.. फ्लाईंग जाट कोणता माहीत नाही.
उडता पंजाब आणि फ्लाईंग जाट..
उडता पंजाब आणि फ्लाईंग जाट.. कसलं डेडली क्रॉस कनेक्शन लागलंय... दोन्ही चित्रपटांत, पिक्चर आहेत हे सोडल्यास कसलाही संबंध नाहीये...
कुछ कुछ होता है, दिवाना, डॉन
कुछ कुछ होता है, दिवाना, डॉन, के३जी, दिलवाले, हॅपी न्यू इयर, बादशाह, डुयुप्लिकेट (मुव्ही) , रब ने बना दी जोडी, जब तक है जान, मै हू ना, दिल तो पागल है, अंजाम, दुनियादारी, फुगे, प्यार वाली लव्ह स्टोरी, पुढे धोका आहे
अजून एक आहे. प्रेमासाठी भारतीय हवाई दलाचा एक (बे) जबाबदार अधिकारी पाकिस्तान मधे प्रवेश करतो आणि जेल मधे सडतो... येरझारा की असेच काही नाव होते.
येरझारा की असेच काही नाव होते
येरझारा की असेच काही नाव होते.>>>>
सपना, वीरझारा गं
खरच की...
खरच की...
उडता पंजाब आणि फ्लाईंग जाट..
उडता पंजाब आणि फ्लाईंग जाट.. कसलं डेडली क्रॉस कनेक्शन लागलंय... दोन्ही चित्रपटांत, पिक्चर आहेत हे सोडल्यास कसलाही संबंध नाहीये...>>>> भयंकर हसले मी
मी थेटरात जाउन पाहिलेले.
मी थेटरात जाउन पाहिलेले. पुर्ण .
गायब - तुषार कपुर
जीना सिर्फ मेरे लिये - तुषार कपुर-करीना कपुर
वादा - अर्जुन रामपाल,अमिशा पटेल,झायेद खान
लगान, जोधा अकबर, मेरा नाम
लगान, जोधा अकबर, मेरा नाम जोकर, बेशरम
टीव्ही वर बरेच
टीव्ही वर बरेच
मोहब्बते
लाल बाद्शाह
कोहराम
सुर्यवंशम
हॅप्पे न्यु इयर
मोहेंजो दारो
अजुन खुप सारे
चेन्नै अेक्सप्रेस
चेन्नै अेक्सप्रेस
मैन प्रेम कि दीवनि हून
मैन प्रेम कि दीवनि हून
मी थेटरात जाउन पूर्ण पाहिलेला
मी थेटरात जाउन पूर्ण पाहिलेला रटाळ चित्रपट - सावरीया
कल हो ना हो
कल हो ना हो
चांगला धागा.
चांगला धागा.
थेटरात - मवाली , तोहफा , कैदी , लोहा , संजोग (जितेंद्र चा ), लव लव लव , रामा ओ रामा
टीवी - दामूल , खंहहर (नवीन टीवी आणलेला त्या काळात) ;
धोबीघाट , सूर्यवंशम
ऋन्म्या,
ऋन्म्या,
मस्त धागा काढलायस ! भडास काढायला एक हक्काची जागा मिळाली..
थिएटरमध्ये जाऊन मी असंख्य रटाळ सिनेमे पाहिले आहेत. यादी करायची म्हटलं, तर दिवसभर आठवण्यातच जाईल. पण टीव्हीवरही कमी पाहिलेले नाहीत. १९५० ते १९७० पर्यंतच्या काळातले अनेक सिनेमे फक्त गाण्यांसाठी पाहिलेयत. सिनेमे एकापेक्षा एक सुमार होते. ते हर तऱ्हेने सुमार होते. इतके सुमार की त्या सिनेमांची स्टोरीलाईन नक्की होती तरी काय हेही आता लक्षात राहिलेलं नाही. कारण आम्ही फक्त गाणी पाहिली. त्या गाण्यांचं चित्रीकरणही बहुतेक वेळेस हास्यास्पद असायचं. आज विचार करताना असं वाटतं की कसे पाहिले ते सिनेमे.. पण त्या वेळी मात्र तसं वाटत नव्हतं. कारण सगळ्या सुमारपणाला पुरून उरेल इतकं सुंदर संगीत त्याच्या जोडीला होतं.
बादवे, तुझ्या धाग्याचं शीर्षक वाचल्या वाचल्या एक नाव झटक्यात आठवलं...
'कोर्ट'.
कमाल बकवास आणि रटाळ मूव्ही. (का, कसं ते सांगायचाही मला कंटाळा आलाय आणि त्यावर लेखही लिहून झालेला आहे. त्यामुळे राहू देतो.)
मै प्रेम कि दिवानी हु
मै प्रेम कि दिवानी हु
या दशकातील सर्वोत्तम चित्रपट.
थेटरात जाउन शिव्या देत देत
थेटरात जाउन शिव्या देत देत पुर्ण पाहिलेले चित्रपट -
गलगले निघाले ( असा काहितरी भरत जाधव चा मुव्ही होता )
माहेरची साडी ( आज्जीला पाहायचा होता म्हणुन मला घेउन गेलेली )
क्यु हो गया ना ( ऐश, विवेक ओबोरॉय, बच्चन )
काटें ( बहुतेक मांजरेकरांचा )
डी कंपनी
जय हो ( सल्लु )
हम साथ साथ है
मै प्रेम की दिवानी हु
रब ने बना दी जोडी
आणि सध्याचा अगदीच लेटेस्ट
कुंग फु योगा ( हा चित्रपट बघुन असं वाटलं की लेक बघते ते छोटा भीम चे एपिसोड जास्त भारी असतात..
या पिक्चर मधे सिंह उलटी करतो, साप कानाला चावलेला माणुस जिवंत राहातो फक्त त्याचा कान लांब होतो,जॅकी चॅन नाचतो, अचानकच एक सेकंदात खलनायकाचं मन बदलुन तो जॅकी सोबत नाचु लागतो. ई ई हे बघायचं असेल तर नक्की बघा)
रेडिओ, द एक्सपोझे, १३ सुरूऊऊर
रेडिओ, द एक्सपोझे, १३ सुरूऊऊर, क्या दिल ने कहा, ना तुम जानो ना हम, दिल दिया है, कुंवारा, राम गोपाल वर्मा की आग, फूंक, शॉर्टकट, हे आत्ता आठवतायत...
बाकी ही बरेच आहेत.
मधेच सोडून दिलेला एकमेव सिनेमा : हमशकल्स
Pages