सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
अन्जूटले...आय ई लय म्हणजे
अन्जूटले...आय ई लय म्हणजे लय्यच आउटडेटेड झालय गं.. बस कर ते आता अन इतर ब्राऊझर इंस्टॉल कर पाहु...
टीनाताय म्याच outdated झालीय
टीनाताय म्याच outdated झालीय गो आता
.
अग सगळं आहे क्रोम आहे , मोझीला आहे पण म्याच सवयीने आय इ वर आहे. नवरा वापरतो की मोझीला फायरफॉक्स आणि क्रोम.
(No subject)
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! सगळे फोटो सुंदर . हे आहे लीक आणि टोमॅटो चे डेकोरेशन
जाऊन आले क्रोमात. जागू, सायु
जाऊन आले क्रोमात.
जागू, सायु आणि हेमाताई फोटो भारीच सर्व.
सुंदर जास्वंद सायु.. सजावट
सुंदर जास्वंद सायु..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सजावट छानच ममो... ते लिक पातीच्या कांद्या सारख वाटतयं
जागूचं पक्षी अभयारण्य जोरात
जागूचं पक्षी अभयारण्य जोरात दिसतंय ! सही...
सगळ्यांचे फुलांचे फोटो मस्त आहेत. किट्टु२१ ते 'लाल' कृष्णकमळ किती सुंदर आहे.
ममो, वेळ मिळाला तर या सजावटीविषयी लिहा ना, कसं बनवलं ते.
धन्स सगळ्यांनाच!!! हेमा ताई
धन्स सगळ्यांनाच!!!
हेमा ताई अप्रतिम सजावट!!
फुड्/सलाद कार्विंग बद्दल
फुड्/सलाद कार्विंग बद्दल ममोचा एक धागा आहे ना सुलक्षणा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थांब लिंकते..
हा बघ.. माझे व्हेज कार्विंग आणि सॅलड डेकोरेशन- http://www.maayboli.com/node/52248
तू तिचा आयडी पन बघ... मस्त प्रोफाईल पिक आहे
जागू, तू तो सोनकावळा म्हणून
जागू, तू तो सोनकावळा म्हणून फोटो टाकलायस तो कोणता पक्षी आहे?
रायगड तो भारद्वाज
रायगड तो भारद्वाज आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुलक्षणा
आमच्याकडे वसंत ऋतू तसा आता
आमच्याकडे वसंत ऋतू तसा आता संपतच आलेला आहे.. माझ्या बिल्डींगच्या बागेतले हे काही फोटो..
इथे हा राजस कांचन मुद्दाम जोपासलेला आहे. याची झाडे मर्यादीत उंचीचीच राखली आहेत, त्यामूळे फुले नजरेच्या टप्प्यातच असतात.
इतर झाडेही अशीच सुंदर राखलेली
इतर झाडेही अशीच सुंदर राखलेली आहेत..
हा टिकोमा..
हा काल बागेत दिसलेला एक पक्षी. इथे असे छोटे पक्षी बरेच दिसतात पण या झाडात सहज लपून बसतात ते ( फोटो काढता येत नाहीत ! ) नाव अर्थातच माहीत नाही !
इथे शिरिषही खुप फुलतो. आपल्या काव्यात वर्णन केलेला तो सुगंध, सुंदरींच्या कानातील गळून गेलेल्या फुलांमूळे माश्याना होणारा शैवालाचा आभास, शेंगांच्या आवाजातून होणारा युवतींच्या पैंजणाच्या आवाजाचा भास, सगळे
अनुभवता येते !!!
दिदा, बे बी पिंक कांचन, पिवळा
दिदा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बे बी पिंक कांचन,
पिवळा पफ,
अन लाल चिमणी...मस्तच
मस्त फोटो दिनेशदा! राजस
मस्त फोटो दिनेशदा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राजस पांगारा>>>>>.याची पाने, कांचनची, आणि फुलाची एक वेगळी पाकळी, गुलमोहराची आठवण देते
खुप मंदावला हा धागा.. काय बर
खुप मंदावला हा धागा.. काय बर कारण असावं?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आजकाल माबोवर येणं कंटाळवाणं होउ लागलयं ना?
खुप छान छान लेख, ललित, माहिती, अनुभव वाचायला मिळतात हे मुख्य कारण होतं माझं माबोवर येण्याकरिता पण सद्ध्या सगळीकडे वादविवादच दिसतात..जवळपास हरेक धाग्यावर
सिरीयल, तडका अन् वादविवादाचे विषय हेच सारं पहिल्या पानावर असत... असो...
आत्ता कोब्रा, किंग कोब्रा तसेच इतर सापांविषयी चर्चा चालु होती अन् Romulus Whitaker (उगा उच्चारताना गोंधळ नको म्हणुन)यांचे नाव समोर आले..
काही वर्षापूर्वी सापांबद्दल वाचताना या अवलियाचे फोटो बघितले अन मग पाठोपाठ सवयीने गुगल केले.. जालावर त्यांची बरीचशी माहीती मिळाली. त्यातली काही तुमच्याशी शेअर करते.
Romulus Whitaker हे एक herpetologist आहेत(मराठीत उभयसृपशास्त्रज्ञ).
जन्माने अमेरिकन असलेले ते त्यांच्या आईने एका भारतीय व्यक्तीशी विवाह केल्यानंतर भारतात आले.
पुढे १९७० नंतर त्यांनी भारतात विवाह केला आणि सध्या ते तामिळनाडू मधील एका गावी राहतात.
त्यांनी मद्रास येथे स्नेक पार्क ची स्थापना केली ज्यामुळे तेथील सापांना पकडण्यात पारंगत असलेल्या इरुला आदिवासी जमातीला रोजगार मिळायला तसेच सापांचे रक्षण करायला मदत झाली. इरुला आदिवासी लोकांच्या मदतीने आता तेथील विषारी सापांना जपायला तसेच त्यांचे विष मिळवून Antivenomous Drugs बनवायला मदत होते.
ते Madras Crocodile Bank Trust Centre for Herpetology चे संस्थापक आहे.
मागच्या निग च्या धाग्यात आपण मगर, सुसर, घरियाल बद्दल माहिती पाहिली होती. त्यातील घरियाल हे आता Critically endangered species खाली येतात. भारतातील त्यांची संख्या रोडावून आता २५० पेक्षा कमी झाली आहे. रोमुलस हे यांच्या संरक्षण तसेच जपणूकीसाठी सुद्धा कार्यरत आहे.
सगळे फोटो आणि गप्पा मस्त
सगळे फोटो आणि गप्पा मस्त आहेत. बऱ्याच दिवसाने येणे झाले...
गेल्या आठवड्यात ऐरोली पुलावरून जाताना अचानक ५-६ फ्लेमिंगोंचा थवा उडत जाताना दिसला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्यावर्षी दहिसर नदीत टिटव्या आल्या आहेत बहुधा... दिवसा नाही दिसत पण रात्री त्यांच्या ओरडण्याचा आवाज येतो.
कुठे कुठे आंब्याच्या झाडाला मोहोर आलेत... मस्त कोवळा पिवळसर रंग दिसतोय.
पिंपळाची झाड अंगावर लाल
पिंपळाची झाड अंगावर लाल रंगाची सुंदर कोवळी ह्रुदय मिरवु लागली आहेत.
सगळे फोटो मस्तच. भोगी आणि
सगळे फोटो मस्तच.
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला'.
पिंपळाची झाड अंगावर लाल
पिंपळाची झाड अंगावर लाल रंगाची सुंदर कोवळी ह्रुदय मिरवु लागली आहेत.
ईनमीनतीनच्या दोन सारख्या
ईनमीनतीनच्या दोन सारख्या प्रतिसादात चक्क अन्जूनं मधे येउन बाजी मारली...जियो...
बाकी २.५ ३ दिवसांसाठी टाटा...
(No subject)
दिनेश कांचन आहे तो, राजस
दिनेश कांचन आहे तो, राजस पांगारा का म्हणताय?कि तुम्हाला दुसरे फोटो टाकायचे होते आणि कंचनाचे फोटो टाकले गेले
हो साधना, कांचनच तो. आपली
हो साधना, कांचनच तो. आपली दुसरीकडे पांगारावर चर्चा चालली होती, म्हणून बहुतेक तेच टाईप झालं !
Khup surekh rang aahe
Khup surekh rang aahe kanchancha…. Aamchya ithe service road var dutarfa lal kanchan lavlay. Sadharan majhya unchichya done fandya evdhach apsara, pan fule matra bharbharun yetat. Mi bi uchlun anun lagleli, tyala hi dusarya varshi fule aleli.
दिनेशदा खुप सुंदर फोटो.
दिनेशदा खुप सुंदर फोटो.
खरच टिना धागा खुप स्लो झालाय. ह्याचे कारण वॉट्सअॅप पण असू शकेल. पण अशी माहीती शेयर करत रहा इथे.
होला
होला
![](https://lh3.googleusercontent.com/nEHksLKONjVWTif042jIrvGyJgMQA06lUBmNATXqDueWRXzY28jUH11T0AbxY4yORAL1UuX7WD1vXdrhYmWCIFYAMRAI660QXxK95YU=w1366-h768-no)
फोटो साईज कशी ठेवायची काहीच
फोटो साईज कशी ठेवायची काहीच कळत नाहीये.
विलायती चिंचा.
विलायती चिंचा.
![](https://lh3.googleusercontent.com/9hxRUV2ypZtQNPCbMy00imO1RBFa407H50PGvyxOTrOmtHGVakpCgXJIRZMq2bOcUNHvBCkQuCNDH2xNk_SmdiQ60QLTeitpdtvxVVc=w1366-h768-no)
![](https://lh3.googleusercontent.com/GTwKJsl1wNw6szwjqEE4dwrFjugfraRF45nSM3Muj6EcjjDD-2I8Sl0bXBS9EHzQc8KxBcvbzzDJllf9aY339T9iF65Umt2QLYfU0Ac=w1366-h768-no)
या चिंचा बाजारात असतात का
या चिंचा बाजारात असतात का जागू आता ? माझा घसा नेहमी धरायच्या या खाल्ल्या कि !
Pages