मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..
'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..
'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'
चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..
'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'
चांदो हसला,
चांदणीला म्हणाला,
'तू हो पुढे, मी आलोच जरा'
मला घेऊन मग चंद्र
मागल्या दरी आला
पायऱ्यांवर विसावत
हळूच मला म्हणाला..
'पोरखेळ नाही गं!
तुला चिडवत होतो जरा..'
'चांदो, का रे असं नेमका
माझ्या वर्मावर बोट ठेवतोस?
रोज रोज आकाशातून
मलाच का असा छळतोस?
मुकी माझी प्रीत आता
मनामध्ये मावत नाही
रात्रीशी बोलावं म्हटलं,
तर तुलाही माझ्याविना करमत नाही!
जा तुझ्या चांदणीकडे..
बिलगून बस तिला..
रोजच्या सारखंच आभाळातून
वेडावून दाखव मला!'
चांदो म्हणाला..
किती चिडतेस राणी?
तुझ्या त्या वेड्याची
आज सांगणारे तुला कहाणी..
तो ही अस्साच..
तुझ्यासारखा..खुळ्यागत वागतो,
ढगांवर तुझंच नाव लिहितो
'असं कसं नाव पुसलं?'
म्हणून वाऱ्याशी भांडतो!
तू इथे, अन तो तिथे
एकट्यानंच झुरताय!
तुम्हा दोघानाही खरं
थोडं एकांत हवाय!
तेवढ्यात समोर
पावलं काही वाजली..
'त्याला' घेऊन चांदणी
माझ्या अंगणी आलेली!
'thank you चांदो!
तुला रे कसं माझ्या मनातला
अचूक किडा कळला?'
हसला गालात अन म्हणाला,
'अस्साच नाही चांदणीशी माझा टाका भिडला!'
हात माझा चंद्रानं हळूच
त्याच्या हाती गुंफला,
चांदणीला कवेत घेऊन,
तो ही मग ढगांत दडला!
फारच गोड कविता. चांदो आणि
फारच गोड कविता. चांदो आणि चांदणी- ती आणि तो ही संकल्पना खूप आवडली. मस्तं प्रसन्न, फील गुड कविता आहे.
महेश, हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.
कविता आवडली. महेशजी, धागा वर
कविता आवडली.
महेशजी, धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.
नविन वाचकांसाठी धागा वर आणत
नविन वाचकांसाठी धागा वर आणत आहे.
नविन वाचकांसाठी धागा वर आणत
नविन वाचकांसाठी धागा वर आणत आहे.
नविन वाचकांसाठी धागा वर आणत
नविन वाचकांसाठी धागा वर आणत आहे.
नविन वाचकांसाठी धागा वर आणत
नविन वाचकांसाठी धागा वर आणत आहे.
बालपणीचा चांदोमामा ते Teen
बालपणीचा चांदोमामा ते Teen age मधला स्वप्नील चंद्र आणि चांदण्या हा प्रवास म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय.... त्याला बघत बघतच मोठे झालो आपण... आणि पहिल्या प्रेमाच्या आणाभाका...रुसणं ...रागावणं ....मनवण ..... अगदी शेवटची भेट पण त्याच्याच साक्षीने.... खूपच सुंदर कविता ..अगदी हृदयाचा कप्प्यात खोलवर जपून ठेवावी अशी ..... थँक्स भानुप्रिया
महेश धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद >>>जणू काळजात रूतून बसलीये एखाद्या रूपेरी बाणासारखी.
कदाचित जरा स्वानुभवाशी जुळणारी असल्याने असे होत असेल >>>> +१०००
धन्यवाद समृद्धी
धन्यवाद समृद्धी
Pages