बाहेर पडलं कि जग कळतं म्हणतात ..जग पाहायचे असें तर रेल्वे सारखी दुनिया नाही . दुनिया भली कि बरी हे जाणायचं असेन तर रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव म्हणजे एक शाळा ..
दररोज प्रवास करतात त्यांना हे असेन मी तर फक्त शनी -रवी प्रवास करायचे पण स्वतःचे आणि दुसऱ्याचे अनुभव दरवेळेस येतातच ..
असेच काही माझे अनुभव ..तुम्ही पण share करा !!
**********************************************************************
दहा पंधरा दिवसां पूर्वीची गोष्ट असेन , मला पुण्याहून मुंबई ला सकाळी जायचे होते . सकाळची ट्रेन होती ७:५० ची पण नेहमीप्रमाणे घाई झालीच ! वाटलं चुकतेय कि काय ट्रेन ! (हो... पण मुंबई वरून पुण्याला येताना कधी ट्रेन चुकली नाही कि उशीर झाला नाही अगदी ६:५० ची मुंबई-पुणे इंटरसिटी असली तरी ) सकाळी कसंबसं आवरून ७:३० एकदाची निघाले घरातून. ७:३३ ला रिक्षा मिळाली. रिक्षावाल्या काकांना सांगितलं लवकर पोहोचवा स्टेशन वर. रिक्षात बसताना समोर पहिलं तर लिहिलेलं "श्री स्वामी समर्थ " माझा चेहराच पडला खरंतर ते माझे आराध्य दैवत पण सध्या त्यांच्यावर नाराज होते त्यामुळे त्यांचा नाव पाहिल्यावर कसंसच झालं आणि आपल्याला काही ट्रेन मिळायची नाही असच वाटलं पण म्हंटलं try तर करू तसंही धावती रेल्वे गाडी पकडायची fantasy अगदी DDLJ पासून होती मग काय ! पण रिक्षा काही ३५ च्या स्पीड पुढे जात नव्हती तसं ही पुण्यातले रिक्षावाले कधीच स्पीड ने रिक्षा पळवत नाही. सगळा कसा रमतगमत मामला असतो पुण्यात घाई फक्त two wheeler वाल्यांना. मी दोनदा जोरात चालवा म्हणाले पण पालथ्या घड्यावर पाणी ! ते ऐकतील तर पुण्यातले रिक्षा वाले कसले !! त्यात जाताना प्रत्येक देवाला नमस्कार करत जात होते आणि हसून म्हणतात अहो आता गाडी मिळेल कि नाही कोण जाणे !! मला खूप राग आला म्हणे देवाचे भक्त आणि दुसऱ्याच्या अडचणींवर हसतात . मनातल्या मनात स्वामींना म्हणाले बघा तुमचे भक्त दुसऱ्याला हसतात आणि असुरी आनंद मिळवतात.
असो , मग शेवटचा सिग्नल लागला जो अगदी १:३० मिन असतो आणि माझ्या घड्याळात तर ७:४७ झाले होते पण नंतर लक्षात आले माझे घड्याळ तर ४ मिन पुढे आहे सो अजून ७ मिनिटे होती आणि कधी कधी १-२ min उशीर पण होतो ट्रेन सुटायला ! पण हाय रे दैवा... रिक्षावाल्या काकांनी signal तोडलाच. मी अजिबात सांगितले नव्हते पण त्यांना उपरती झाली असावी मला मदत करायची. स्वामींचीच कृपा म्हणायची ! पण नेमका पुढे पोलिसमामा दिसला मग काय अबाऊट टूर्न ! त्यांनी मग दुसऱ्याच लांब रस्त्याने रिक्षा पळवली कारण परत सिग्नलला थांबलो असतो आणि मग सिग्नल सुटल्यावर पोलिसमामाने पकडले असते . पोलीस ला २०० रुपये देण्यापेक्षा माझी ट्रेन सुटली तरी रिक्षावाल्या काकांना परवडले असते (त्यांनी स्वतःचाच विचार केला..टिपिकल मेन्टॅलिटी) शेवटी माझी train हुकलीच ! (ही पण स्वामींचीच कृपा वाटतं ... कारण दुसऱ्या रस्त्याने स्टेशन वर यायचा तब्बल १० min लागले ) मग काय .. चेन्नई मेल ची ९:३० पर्यंत वाट पाहायची किंवा लोणावयावरून दुसरी ट्रेन पकडायची असं ठरलं .पण मुंबई ला लवकर पोहोचणे महत्वाचे होते. मग शेवटी पुणे ते लोणावळा(लोकल ) , लोणावळा ते कल्याण (हैद्राबाद एक्सप्रेस ), कल्याण ते माझं स्टेशन (लोकल) प्रवास केला आणि कशीबशी १:३० पर्यंत पोहोचले. नंतर मी हा प्रसंग विसरून गेले .
नंतर एक आठवडयांनी t.v न्यूज वर बातमी आली कि एक मुलगी एक्साम ला उशीर होत होता म्हणून धावती इंद्रायणी एक्सप्रेस पकडायला गेली आणि तिला पाय गमवावे लागले !! अगदी त्या प्रसंगाचे CCTV फुटेज पण दाखवत होतें .जीव खूप हळहळला. थोडा उशीर परवडतो पण उगाच घाई कशाला करायची होती दुसरी गाडी मिळाली असतीच कि ! मग एकदम strike झालं आपलं पण त्या दिवशी असंच झाला असतं तर?? आपल्याकडे luggage पण होतं ट्रेन कदाचित मिळाली पण असती पण अशी धावती ट्रेन पकडणे जमले असते का ??? जर रिक्षावाले काकांनी सिग्नल तोडलाच नसता तर ?? त्यांनी रिक्षा खूप जोरात पळवली असती तर ?? मन २ min सुन्न झालं ..
पण एक धडा शिकले.... जे होत ते चांगल्यासाठीच... ... कधी आपल्याला लवकर कळतं तर कधी उशिरा ... -- वृंदा
(प्लिज व्हिजिट माय ब्लॉग - http://vrundavani.blogspot.in/ )
साधारण दीड महिन्यापुर्वीची
साधारण दीड महिन्यापुर्वीची गोष्ट आहे .खूप दिवस मनात होत लिहायचं कोणी वाचू किंवा ना वाचू पण जे वाटलं ते सांगायचंय म्हणून लिहीत आहे.
माझा handsome मावस भाऊ सुरज सहजच घरी आला होता खूप दिवसांनी .. खरंतर त्याचं बोलणे मला खूप छान आणि पॉझिटीव्ह वाटतं. खुश असते त्याला भेटले कि त्यालाच काय पण सौरभ , श्रीधर भेटले कि पण छान वाटतं कंदाचीत मी आई वडिलांची एकुलती एक असल्यामुळे .. मुख्य म्हणजे बाहेरील जगाच्या अनेक गोष्टी कळतात . माहित नाही पण सुरज चा easy going , cool attitude भारीच वाटतो .आणि त्यात त्याचे मुद्देसूद बोलणे कधी कधी समोरच्याची योग्य पद्धतीने बोलती बंद करतो .
असंच खूप गप्पा झाल्या आणि तो निघाला. जाताना सहज म्हणाला मग कसा आहे अनुभव मुंबईचा , फरक कळला का पुणे आणि मुंबई माणसामध्ये . मुंबईची माणसे मदत करतात, माणुसकी असते . पुण्यातली पण वाईट नाहीत पण माणुसकीही नाही जवळजवळ . जेव्हा तो म्हणाला तेव्हा खूप राग आला आणि म्हणाले काही काय ... नाही वाटला असा काही फरक .. उलट तिथली लोकं किती robotic एकाच्या पण चेहऱ्यावर एक्स्प्रेशन नसतात . सारखे घाईतच असतात . कसं काय life एन्जॉय करतात कोण जाणे ... पुण्यातले बघ कसा life एन्जॉय करतात.. दार वीकेंड ला बाहे रouting , हॉटेलिंग किंवा movie पाहतात (सगळीच नाही काही पण शक्यतो ).. अगदी हौशी रसिक आहेत ..life कसं भरभरून जगतात ... तसंही आजकाल कुणाच्यातच माणुसकी दिसत नाही .. सगळे स्वतःचाच विचार करतात .. दुसऱ्यांना मदत करणे तर आता "out dated " झालाय न मुंबई तर कुणाला वेळ पण नसतो मदत करायला ...
सुरज माझ्या बोलण्यला ला हसत हसत म्हणाला ... कळेल ..... कळेल आणि असं बोलून घरी निघाला ...
नंतर २-४ दिवसात एक प्रसंग घडला. ..माझ्याबद्दल नाही पण तरीही मला खूप काही सांगून जाणारा ..
दिवस : धनत्रयोदशी २८/१०/२०१६
वेळ :साधारण ४:३० वाजता
ठिकाण : ठाणे स्टेशन
त्यादिवशी प्रगती ने पुण्याला जायचंच होता कारण दुसऱ्या दिवासापांसून दिवाळी सुरु होणार होती आणि माझा मन काही इथे रमत नव्हतं आणि घराचं ओढ पण खूप वाटत होती . अर्थात दिवाळी मुळे माझा नंबर वेटिंग लिस्ट ला होता पण १ तास अगोदर कन्फर्म तिकीट चा sms आला होत पण तरी खात्री करावी प्लॅटफॉर्म लिस्ट ला म्हणून लवकरच निघाले तसा अजून अर्धातास वेळ होता त्यामुळे मी बोर्ड वरची waiting list चेक करत होते .सगळे पेपर्स पहिले पण माझा नावाचं नव्हतं अगदी एकूण एक पेपर list चेक करत होते, अगदी खाली जमिनीवर पडलेले पण पेपर list पण बघत होते आंही आश्चर्य करत होते मग कन्फर्म चा message कसा आला. तिथली काही माणसे माझे एक्स्प्रेशन आणि असं वागणं पाहून आश्चर्याने बघत होते ( खूप वेळा नंतर कळलं मी तिकीट बुक तर "दादर to पुणे "केला होतं मग माझ्या नावाची list दादर ला दिसणार ना .. वेडेपणा माझा आणि काय
) शेवटी दमून तिथेच एका खांबाच्या बेंच वर बसले आणि ट्रेन ची वाट पाहत बसले
त्यादिवशी लोकल ला खूप गर्दी दिसत होती. संध्याकाळची वेळ त्यानुंले down ला तशीही गर्दी होती पण आज दिवाळी मूळे सगळ्या लोकल इतक्या भरलेल्या होत्या कि एखादा फुगा फुगतो तसा आणि कधी स्फोट होईल गर्दीचा असाच वाटत होतं. कर्जत ची लोकल तर इतकी भरली होती कि मी थोडी किंचाळतेच "बाप रे .!!!!. इतकी गर्दी !! " माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझ्याकडे पाहायला लागावी कि हिला काय झाले.. अशी गर्दी नॉर्मल च असते असेच तिचे एक्स्प्रेशन होते.
तेवढयात दुसरी लोकल आली कल्याण ला जाणारी .प्रचंड गर्दी होती इतकी कि उतरणारे खूप आणि तेवढेच चढणारे .. आणि लोकल तर अर्धा मिनिट थांबते. तेवढया माझ्या समोर थांबलेला डब्यातून उतरताना थोडा आवाज येत होता माणसांचा ओरडल्यासारखा आंणी कोणा माणसाला बाकीच्यांनी धरलेले मला वाटलं चोर आहे कि काय पण नंतर कळले एका माणसाला चक्कर आली म्हणून सगळ्यांनी पकडलंय तो पडू नये म्हणून. मग त्याला बाकीचा २-३ माणसांनी माझ्या समोरच्या खांबाच्या बेंच वर बसवलं आणि तिथेच एक २३-२४ वर्षांचा साधा गरीब मुलगा बसला होता त्याला म्हणाले ह्यांची काळजी घे आम्ही निघतो पुढची ट्रेन आहे तो पण म्हणाला मी बघते काळजी करू नका . मग बाकीचे सगळे निघाले .तो माणूस जवळ जवळ बेशुद्ध होता .चेहऱ्यावरून खूपच थकला ला होता. बहुकेत मध्यमवर्गीय नॉर्थ इंडियन होता एकंदर दिसण्यावरून आणि पेहरावावरून. ५ -१० मिन झाली तो जवळ जवळ बेशुद्ध होता असं वाटत होता त्याला आता attack येतो कि काय मी शेवटी न राहवून म्हणाले त्या मुलाला रेल्वे पोलीस ना बोलवा त्यांना ऍडमिट करा हॉस्पिटल मध्ये किंवा त्यांच्या घरच्याना कॉल करा. माझ्या शेजारी बसलेल्या हिंदी बोलणाऱ्या ऑंटी पण तेच बोलत होत्या तो मुलगा मात्र शांत होता म्हणाला थांबा थोड त्यांना शुद्धीवर तर येऊ दे. ५ मिन ने त्या माणसाला शुद्ध आली आणि तो पाणी पाणी म्हणत होता मग त्या मुलाने पाण्याची बाटली दिली . पण त्याला खुपच तहान लागलेली मग शेवटी तो मुलगा मला म्हणाला "मॅडम प्लीज सामानाकडे आणि माणसाकडे लक्ष ठेवा मी लगेच येतो " मी म्हणाले ' डोन्ट वरी मी आहे इथे . मी लक्ष ठेवते." तो पर्यंत तो बरं नसलेला माणूस बेंच वरच झोपला २-३ मिन मुलगा पाण्याच्या बाटली घेऊन आला होता समोरचा माणूस आता शुद्दीवर होता बऱ्यापैकी त्या मुलाने पाण्याची बाटली दिल्यावर तो पैसे द्यायला लागला मुलाला पण त्याने घेतले नाही उलट अजून एक बाटली तुमच्याकडे ठेवा असं हिंदी मध्ये बोलत होता. त्याने पाणी पिले आणि अचानक त्याला उलटी झाली ती हि प्लॅटफॉर्म वरच . परत जेव्हा उलटी सारखं त्याला वाटलं तेव्हा तो प्लॅटफॉर्म वरच पण ट्रॅक जवळ गेला उलटी करायला नशीब!! मागून कुठली लोकल येत नव्हती नाहीतर तेव्हाच खेळ खल्लास झाला असता (कारण दर ३ मिन ट्रॅक वर एक तरी लोकल येतेच !).
२-४ उलटी झाल्यावर मात्र त्याला खूपच बारा वाटलं. आता चांगलाच जागा झाला होता मग त्या मुलाशी बोलत होता ... मुलगा म्हणत होता तुम्हाला घरी सोडू का पण तो माणूस म्हणाला मी आता ठीक आहे मी जातो एकटा ..मग त्याने रुमालाने तोंड स्वच्छ पुसले .चष्मा पुसला आणि एकदम शांतपणे जणू काहीच झालं नाही असा निघाला.. फक्त शिट्टी वाजवायची राहिली होती इतका cool पणे निघाला . ... आणि मी बघत राहिले
तो प्रसंग पाहून त्या मुलाचा कौंतुक वाटलं. म्हण्टलं तर साधाच प्रसंग काही खास नाही पण त्या मुलाने दाखवलेली माणुसकी आणि आणि त्या माणसाने तो प्रसंग सहज पचवला हे पाहून आश्चर्य वाटलं आणि आनंद पण वाटलला.
शेवटी ५:१० माझी लाडकी प्रगती एक्सप्रेस आली तो मुलगा बहुतेक त्याच गांधींची वाट पाहत होता कारण तो general डब्यात आणि मी ladies डब्यात चढले . मी तर कन्फर्म आणि तेही window सीट मिळाल्यामुळे खुश होते . तेवढ्यात एक ऑंटी ज्या थोड्यावेळापुर्वी प्लॅटफॉर्म वर शेजारी बसल्या त्या माझ्या जवळ आल्या आणि मोठ्या आवाजात हिंदी मध्य म्हणाल्या " वो आदमी गया क्या घर पे ठीक से ??? " . आजूबाजूचे सगळ्या बायका मुली माझ्याकडेच बघायला लागल्या . मी ऑन्टी ना एक मोठी smile दिली आणि म्हणाले " ऑन्टी , वो आदमी ठीक से खुद्द चलते चलते . गया .एकदम ठीकठाक होके .. वो लडके ने बहुत मदद की "... ऑन्टी पण खुश होऊन त्यांचा सीट वर बसायला गेली ..
माहित नाही पण त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य आणि खूपसं समाधान होतं ... मनातल्या मनात सुरज ला म्हणाले तुझंच बरोबर होतं. पण Half Truth कारण पुण्याची माणसांना माणुसकी नसते हे कुठं सिद्ध झालंय कदाचित हे सिद्ध करायला अजून एक प्रसंग घडला असावा..
दिवस : शुक्रवार ०४/११/२०१६
वेळ :साधारण ३ वाजता
ठिकाण : " विष्णू जी कि रसोई " थाळी रेस्टॉरंट , एरंडवणें
त्या दिवशी काकाचा birthday असल्यामुळे फक्तं घरचे मिळून बाहेर जेवायचे ठरले. मी कटाक्षाने घरच्यांच्या बर्थडे बाहेर जातो. मजा म्हणून नाही पण त्या दिवशी सगळ्यांनाच विश्रांती म्हणून .. नाहीतर वर्षभर बाहेरचे जास्त खात नाही आम्ही ... अगदी हौशी पुणेकर असूनही ....
जरा हटके मेनू आणि बऱ्यापैकी जवळ म्हणून विष्णू जी कि .. ला जायचे ठरले .
खरंतर आज खूप उदास आणि चिडचिड होत होती त्यात reception वर असणारी मुलगी फोन वर बोलत होती आणि आमच्याकडे लक्ष देत नव्हती (कारण साधी माणसं ..श्रीमंत नाही ना ..) असं कोणी ignore केलं कि मला खूप राग येतो अजूनच चिडचिड होत होती पण राग कंट्रोल केला आणि कूपन घेऊन आत गेले . आतमधील ambiance खूप आवडला. साधाच पण ओपन space होता . सेल्फ सर्विस बुफे होतं जे मला नाही आवडत फारसं . पण जे आहे ते accept करणे भाग होतं . जेवणात खूप variety होती. मुगाचा हलवा,वांग्याची भाजी,शेवेची भाजी मूग आणि चवळी उसळ, नागपुरी वडाभात (जो थोडा शिळा वाटला ..सगळ्यांनाच ).. जवळ जवळ नागपुरी बेत पण पुण्याचा चवीचा ( इथे जास्त कोणी तिखट खात नाही )..चव तशी छान होती पण हळू हळू लक्षात आलं सगळंच खूप तेलकट आणि तुपकट आहे ज्याची आम्हाला अजिबात सवय नव्हती. पोळी ला पण आम्ही खूप कमी तेल वापरतो.असो .
जवळ जवळ ३ पर्यंत जेवण होत आलं होतं .. काकाचे पण जेवण संपलेलं तेवढ्यात काका म्हणायला लागला मला खूप चक्कर येतीये .. सुरुवातीला वाटलं असाच म्हणत असेन वय झाला कि माणूस थोडं झाला तरी खूप झालंय असं म्हणतो पण मग लगेच लक्षात आले त्याला खरंच चक्कर येतीये. मग जेवण अर्धवट टाकून उठले लगेच मी आणि हात धुतला. त्याच्या समोरच ताट दुसऱ्या टेबले वर ठेवली आणि त्याच्याशी बोलायला लागले. सारखा चक्कर येतीये असं म्हणत होता . आई ला सांगितलं कदाचित त्याचा लो बाप झालंय तू त्याची पल्स चेक कर मी काय करता येईन का बघते.रिक्षा बोलावते आई म्हणाली पल्स लागत नाहीये मग मात्र खूप घाबरले . २ मिन ब्लॅक झाले मग ठरवलं डॉक्टर कडे न्यायला पाहिजे अशा प्रसंगात आपण ऍम्ब्युलन्स ला फोने करतो पण मी वेडी रिक्षा आणायला धावले ( अशा प्रसंगात कधी कधी योग्य सुचत नाही ). एरंडवणं तास शांत भाग. त्यात दुपार त्यामुळे जास्त गाड्यांची गर्दी नव्हती शेवटी रिक्षा मिळाली त्याला विनंती केली २ मिन थांबा मी patient ला घेऊन येते. आत मध्ये गेले तर काका अजूनही बेशुद्ध होता मग लक्षात आले त्याला पाणी द्यावे मग बारा वाटेनं त्याने २ घोट नाही पिला आणि लगेच उलटी झाली जेव्हा उलटी झाली तेव्हा लगेच लक्षात आले हा तर ऍसिडिटी चा अटॅक आहे आता काका नक्की बारा होणार ( कारण मुंबई चा प्रसंग आठवला..त्या माणसाला उलटी झालव्यावरच बरं वाटलं) मी म्हणले आई ला २ मिन त्याला रेस्ट घेऊ दे मी रिक्षावाला अजून थांबलाय का बघून येते पण बाहेर आले तर रिक्षावाला गायब !!!!!
मग परत आतमध्ये "तानमान " बघायला गेले .काका बराच शुद्धीवर होता आणि बोलत पण होता मग हे पाहून रिलॅक्स झाले .तिथलं कॉ-ऑर्डीनटोर मग विचारायला लागला काय झालं . खरंतर इतक्या वेळ कुणाचा साधा लक्ष पण गेला नाही कि कोणी आम्हाला विचारायला आला नाही अगदी तिथे काम करणारे गांधी टोपी वाले वेटर पण धावून आले नाहीत. सगळी कडे एक कटाक्ष टाकला.. सगळे शांतपणे enjoyy जेवत होते त्यातला एकाच पण लक्ष नव्हता हे शक्यच नव्हतं .. त्यातले अनेक जण श्रीमंत होते काही तर नवश्रीमंत इथे येणारे काही काही पुण्याचे तर काही नागपूर विदर्भाचे असतील पण एक जण मदतीला धावून ला नाही कि साधं विचारलं पण नाही हेल्प हवी का ? म्हणून... फक्त एक कॉ-ऑर्डीनटोर काकाला उलटी झाल्यावर विचारायला आला कारण त्याला त्याच्या रेस्टॉरंट च्या रेप्युटेशन ची पर्वा होती माणुसकी ची नाही !!!! माणसाचा एक चेहरा कळला ..... तो पाहून नकळत डोळ्यात पाणी आलं पण सावरला स्वतः ला आणि आई ला म्हणाले मी परत रिक्षा बघते डायरेक्ट हॉस्पिटला काकाला ने ( अजूनही ambulance बोलवावे सुचले नाही...... .हद्द झाली ..एक दम बत्थड आहे मी ..hopeless ) कारण मी स्कुटी टी वर आले होते रेस्तरॉ ला आणि बाकीचे रिक्शा ने. कॉ-ऑर्डीनटोर बोलले व्हील चेअर असेल तर बघा तो म्हणाला आहे मी म्हणाले मी रिक्षा बघते आणि मिळाली कि सांगायला येते. नशिबाने एक रिक्षा मिळाली मी त्याला तंबी दिली सोडून जाऊ नका... मी लगेच येते. एक मात्र बरं तो खरंच थांबला होता मग व्हील चेअर वर त्या कॉ-ऑर्डीनटोर ने थोड्या अंतरावर नेले मग पायरी होती मी म्हणाले दरवाजापर्यंत कुणाला याला सांगा हि विनंती आहे मग एक नोकर जो गांधी टोपी घातलेला कसाबसा तयार झाला मग दरवाजा ते रिक्षा मी आणि आई ने नेले .तो माणूस साधा रिक्षा पर्यंत पण आला नाही उलट झिडकारल्या सोडलं काकाला . ...
मग शेवटी डॉक्टर ना दाखवले ते म्हणाले ऍसिडिटी चा अटॅक आहे बाकी काही नाही ( कारण सकाळी काका नेहमी प्रमाणे नाश्ता न करता direct जेवला होता )
दुसऱ्या दिवशी आई ने सांगितलं .अगं वृंदा ..व्हील चेअर वरून दरवाज्यापर्यंत सोडायला तिथले कुठलेच नोकर तयार नव्हते सगळे म्हणाले आमचा काही हे काम नाही म्हणून पण त्या हायफाय कॉ-ऑर्डीनटोर ने शेवटी आणलं व्हील चेअर वरून दरवाज्यापर्यंत.. ...चांगला होता तो .. तेव्हा हसून तिला म्हणाले..ते काही माणुसकी म्हणून नाही आणला काही... त्यांना त्यांचा रेस्तरॉ च्या रेप्युटेशनची काळजी होती आणि अशी ब्याद(प्रसंग) लवकर बाहेर गेलेलीच हवी होती ह्यांना कारण कमी जास्त झाला तर त्यांच्या हॉटेल ची बदनामी व्हायची ...
आता मात्र माझ्या डोळ्यासमोर आता तो २३-२४ वर्षाचा गरीब मुलगा, तो मुंबई चा आजारी माणूस आणि सुरज आले .. आणि टचकन डोळ्यातून पाणी आले ...
हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही .. पुणे कि मुंबई हा वाद नको कारण माणुसकी हि वृत्ती आहे पण एक मात्र नक्की गरीब असो कि श्रीमंत मी दोन रूपे बघितली.. एक माणुसकी असलेली आणि एक माणुसकी अजिबात नसलेली ... ---- वृंदा
वृंदातै - तुमच्या एकुणातच
वृंदातै - तुमच्या एकुणातच सर्व गोष्टींकडे बघण्याचा, सर्व माणसांकडे बघण्याचा तक्रारीचा दृष्टीकोन आहे, सिनिकल दृष्टीकोन आहे. इतकेच काय, तुमच्या स्वताबद्दल पण तक्रारीच आहेत. तुम्ही स्वकेंद्रीत विचार करत असुन, तुमचा स्वभाव जजमेंटल आहे.
अश्या स्वभावामुळे तुम्ही कोणताही क्षण आनंदानी जगु शकणार नाही, त्यामुळे लवकरच स्वताकडे निरखुन बघा. विचारसरणी , वृत्ती बदला ही कळकळीची विनंती. कारण तसे केले नाहीत तर त्रास तुम्हालाच आणि तुमच्या जवळच्या माणसांना होणार आहे.
पुणे कि मुंबई हा वाद नको>> पण
पुणे कि मुंबई हा वाद नको>>
पण एक नक्की सांगेन. मुंबई सारखी माणुसकी पुर्ण जगात कुठेचं बघायला मिळणार नाही. २६ जुलै असो, आतंकवादी हल्ला असो, बॉम्बब्लास्ट असो. जात पात धर्म कर्म न पाहता सच्चा मुंबईकर सदैव मदतीला तयार असतो.
ह्म्म्म, शिर्षक बदलून "मला
ह्म्म्म, शिर्षक बदलून "मला आलेले वेगवेगळे अनुभव" असे काहीतरी ठेवा,
कारण तुमचा लेख आणि दीर्ध प्रतिसाद यामधे रेल्वे आणि प्लॅटफॉर्म कमी आहेत.
प्लीजच कोणतीही टीका कुठल्याही
प्लीजच कोणतीही टीका कुठल्याही शहरावर करायची नाही.पण काहीवेळा वेगवेगळे अनुभव येतात.
१.चिंचवडवरुन पुण्याला जायच्यावेळी बसस्टॉपवर पाहिले तर सकाळच्यावेळी,बस थांबली न थांबल्यासारखे करुन निघून गेली.एक ८३ वर्षांचे वर्षांचे गॄहस्थ स्टॉपवर होते,ते म्हणाले की जरा मनपाची बस आली की सांगा.जेव्हा ती बस आली तेव्हा स्टॉपवर असूनही हात दाखवून आधी त्यांना बसमधे शिरायला सांगितले.मुंबईत म्हातारे कोतारे असतील तर बस बराचवेळ थांबलेली पाहिली आहे.
२.बिबवेवाडीवरून परत येताना पाहिले तर वृद्धांसाठी बसायच्याजागी १ प्रेमी युगुल होतेआणिअ दुसर्याजागी ३५-४० वयाच्या बायका बसल्या होत्या.पुढच्या स्टॉपवर एक अपंग चढला,त्याला या कपलला सांगावे लागले की तुम्ही उठा.दुसर्या स्टॉपवर एक ७५ चे गॄहस्थ चढले.कपलमधल्या मुलीने उठायचे कष्ट घेतेले नाहीत..त्यामाणसाने त्या २ बायकांना 'वृद्धांसाठी जागा' हा फलक दाखवला तरी त्या म्हणाल्या 'स्त्रिंयासाठी लिहिलेल्या जागेवर पुरुष बसल्यामुळे
आम्ही एथे बसलो आहोत.आजूबाजूच्या बाकांवर २२-२७ वयाच्या मुलींनीही/पुरुषांनी कनाडोळा केला.शेवटी मी ओरडले की अरे म्हातारे माणूस आहे,उठा म्हणून सांगावे लागते का?.तर ऐकूच न आल्यासारखे केले.३५-४० मिनिटे ते गॄहस्थ पाठीवर बॅग घेऊन उभे होते.नंतर त्यांना जागा मिळाली. थोडयावेळाने मलाही एका तरुण मुलाने बसायला दिले.
३.माझ्या एका हाताला फ्रॅक्चर्,दोन्ही हातांना अॅक्यूट फ्रोझन शोल्डर असतानाही मी एकही दिवस रजा न घेता ऑफिसमधे लोकल्ने प्रवास करत होते.भले फर्स्ट्क्लासचा पास असला तरीही जरा धक्का लागला तरी वाट लागली असती.माझ्या ह्या स्थितीस ३.५ वर्षे लागली.त्यावेळी माझा प्रवास व्यवस्थित होण्यास कारण माझी मुंबई आणि मुंबईकर! अर्थात त्यावेळी फास्ट ट्रेन्सने जात नव्हते हाही एक भाग वेगळा.
देवकी, ग्रेटच!
देवकी, ग्रेटच!
हा धागा
हा धागा आठवला:
http://www.maayboli.com/node/57549
याचे कारण अेवढेच, की त्याच जागीचे वेगळे अनुभव.
आजच प्रगतीचा अप-डाऊन
आजच प्रगतीचा अप-डाऊन मुद्दामहून प्रवास करून आलो. प्रगतीला २५ वर्षे पूर्ण झाली ना आज म्हणून प्रवासाचा बेत आखला.
सल्ला दिल्या त्याबद्दल
सल्ला दिल्या त्याबद्दल धन्यवाद टोच्यादादा ..तुम्ही बरोबर ओळखलंत पण जसा अनुभव तशी दृष्टी .....पण मी जरूर विचार करेन आणि बदलण्याचा प्रयत्न करेन... सतत वाईट अनुभव म्हंटल्यावर त्रास तर होणारच आहे .. त्यात प्रोत्साहन देण्यापेक्षा टोचून बोलणारच लोक जास्त आहेत जगात ..तुम्ही सल्ला वेगळ्या शब्दात दिला असता तर बरं वाटलं असतं .. चांगलेही गुण वाईट माणसात असतातच की !! तरी पण तुम्ही चांगल्या अर्थाने बोललात त्याबद्दल परत एकदा धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान देवकीताई !! अशी
खूप छान देवकीताई !!
अशी माणुसकीची माणसे पहिली ना कि मला खूप आनंद होतो .. माहित नाही का पण मूड वेगळाच आणि आनंदी होतो !!
मुंबई ला जाताना प्रगती किंवा
मुंबई ला जाताना प्रगती किंवा डेक्कन क्वीन आणि मुंबईवरून येताना "पुणे -मुंबई इंटरसिटी " गाड्या भारीच आहेत !! इंटरसिटी तर एकदम फास्ट आहे .. इंटरसिटी पहिली कि लहान मुलासारख्या उड्या माराव्याशा वाटतात इतका आनंद असतो !!
आपल्या घराची शहराची ओढ असतेच ना !!
वृंदा तुमच्या वरील दोन्ही
वृंदा तुमच्या वरील दोन्ही पोस्ट्स आवडल्या.
पराग, माझा रेल्वे प्रवास जरी खूपच असला तरी, तुमच्या दृष्टीकोनाला सलाम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठले ईंजीन? डब्यावर वापसी वगैरे काय लिहीतात? असे लक्ष घालु लागलोय आजकाल.
रिक्षात बसताना समोर पहिलं तर
रिक्षात बसताना समोर पहिलं तर लिहिलेलं "श्री स्वामी समर्थ " माझा चेहराच पडला खरंतर ते माझे आराध्य दैवत पण सध्या त्यांच्यावर नाराज होते त्यामुळे त्यांचा नाव पाहिल्यावर कसंसच झालं आणि आपल्याला काही ट्रेन मिळायची नाही असच वाटलं
>>>
हे मला सगळ्यात आवडलं. दैवतावर टेम्परवारी नाराज असणे व ते दिसल्यामुळे कससंच होणे हे दोन्ही जबरीच.
प्रोत्साहन दिल्याबद्दल
प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद मानवजी आणि टण्याजी ..
हो ! मी होते मी नाराज कधीकधी .. .. अगदी हक्काने होते .. कुणाला तो वेडेपणा पण वाटेन
शेवटी ज्याच्याबद्दल काहीतरी वाटतं , प्रेम वाटतं त्या लोकांबद्दल नाराज होतो ना !!
एक सिरीयल मधील ओळ सहजच आठवली ' नफरत है जो मन मै .. चाहत की निशाणी है ! '![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुण्यातल्या माणसांमधे माणुसकी
पुण्यातल्या माणसांमधे माणुसकी नसते काय?
हम्म्म.... असेल बुवा....!
पुण्यातल्या माणसांमधे माणुसकी
पुण्यातल्या माणसांमधे माणुसकी नसते काय?>>>>>> असे नाही ग टीना! मला आलेले अनुभव सांगितले इतकेच.बाकी आपल्या आयुष्यात इतकी माणसे सहजपणे अशी ना तशी मदत करतात की त्यांच्यामुळे हमाणसांवरचा उडत चाललेला विश्वास परत दॄढ व्हायला मदत होते.
या वर्षीच्या फेब किंवा मार्च
या वर्षीच्या फेब किंवा मार्च मधील एक किस्सा....
घाटकोपर स्टेशनवरुन संध्याकाळी ६.२१ ची बदलापुर फास्ट ट्रेन पकडली रोजच्यासारखी.
सवयीने सेकंड डोर पकडुन सीएसटी साईडला आत गेली नेहमीच्या जागी. पण नेहमीसारखी तुफान गर्दी असुन ही तीथे बायका कुणाला येऊ देत नव्हत्या. फ्रेंडसना विचारले तर कळाले की एक प्रेगनन्ट बाईला लेबर पेन चालु झाले होते. ती तीची लहान बहीण आणी आई बरोबर प्रवास करत होती. डोंबिवलीला जायचे होते पण प्रवासाचा काही अनुभव नसल्या मुळे त्यानी जास्त गर्दीची बदलापुर ट्रेन पकडली आणी भायकळा यायच्या आत तीला त्रास होऊ लागला. त्यातही तीला कामा हॉस्पिटलमधुन जस्ट डिस्चार्ज दीला होत , रात्रीपर्यत डोंबिवलीला जिथे तीचे नाव नोंदविले होते तीथे तीला भरती करायचे होते कारण जुळे होते आणी काहीतर कॉम्प्लीकेशन मुळे सिझरच करणे भाग होते
मुळात ती, तीची बहीण आणी आई याही ईतक्या हुशार वाटत नव्हत्या की काहीही निर्णय घेतील, कुणाला काहीच कळेना की आता नेमके काय करावे.
एकतर संध्याकाळी ६.३० - ७ ची वेळ मध्ये कुठे ऊतरावे तरी शक्य नाही. मग कोणीतरी रेल्वे मदत क्रमांकवर संपर्क करायचा प्रयत्न केला, रेल्वे पोलीसांना फोन लावुन पाहीले, बट नो युझ.
शेवटी असे ठरले की डोंबिवली स्टेशनआल्यावर जितक्या बायक्या विन्डो सीट वर आहेत त्यांनी जोरात ओरडायचे की कोणीही चढु नका आणी ऊतर्नार्यांनी लगेच निघुन न जाता रस्ता मोकळा करायचा जेणेकरुन त्या बाईला ऊतरवता येईल. रोज सीट वरुन भांडनार्या आज जागा असुन देखील न बसता त्या बाईला मदत करत होत्य.
पण तीच्या सुदैवाने म्हणा हव तर जेव्हा गाडी डोंबिवली स्टेशनला पोहचली तेव्हा तीथे ४ आरपीफ अगोदरच स्ट्रेचर घेऊन ऊभे होते आणी अगदी विजेच्या चपळाईने तीला घेऊन गेले रेल्वे हॉस्पीटलमध्ये.
नंतर कळाले की ट्रेनमधल्या एका बाईने तीच्या नवर्याला फोन करुन सर्व सांगीतले होते जो तेव्हा डोंबीवली स्टेशन वर्च होता आणी त्याने स्टेशन मास्तरला सर्व सांगुन अॅम्ब्युलन्स आणी स्ट्रेचरची सोय केली होती
या वर्षीच्या फेब किंवा मार्च
या वर्षीच्या फेब किंवा मार्च मधील एक किस्सा....>>> १११११ (टाळ्या!!!!)
या वर्षीच्या फेब किंवा मार्च
या वर्षीच्या फेब किंवा मार्च मधील एक किस्सा....>>> १११११ (टाळ्या!!!!)
टाळ्या कश्याकरीता काही कळले नाही
मानिनी, हृद्य अनुभव
मानिनी, हृद्य अनुभव आहे.
गावोगावचे एस टी कर्मचारी पण अशी मदत करताना बघितले आहेत.
मागील आठवड्यातला प्रसंग.
मागील आठवड्यातला प्रसंग. बोरोली रेल्वे स्टेशनवर उभा होतो, जायचं होतं चर्चगेटला. आधीच उशीर झाल्यामुळे जलदगती लोकलने जायचं होतं म्हणुन तेथले बोर्ड बघत होतो पण नीट कळेना की जलद लोकल कुठल्या फलाटावरुन मिळेल, म्हणुन जवळच उभ्या असलेल्या ३-४ जणांना विचारले की जलद लोकल कुठल्या फलाटावरुन निघते. पण सगळ्यांनीच ऐकुन न ऐकल्यासारखे केले. बहुतेक माझ्या चेहर्यावरुन त्यांना कळाले असावे की की पुणेकर आहे. शेवटी समोरच्याच फलाटवरुन निघणार्या धिमी ट्रेनने गेलो.
@ मी मानिनी, टाळ्या
@ मी मानिनी, टाळ्या कश्याकरीता काही कळले नाही>>> अशा अवघड प्रसंगात सगळ्यांनी जे सहकार्य केले, जशी मदत केली, ते वाचून माझा उर भरून आला. अक्षरशः डोळ्यात पाणी आले. माणुसकीच्या दर्शनाने मी गद्गद् झालो. आणि <<< त्याने स्टेशन मास्तरला सर्व सांगुन अॅम्ब्युलन्स आणी स्ट्रेचरची सोय केली होती>>> हे वाचताक्षणीच मी मनातल्या मनात आनंदाने टाळ्या वाजवल्या. जोराने 'भारत माता कि जय!!!!' ओरडावेसे वाटले.
आणि हे सर्व आपला किस्सा लिहिण्याच्या कलेचंसुद्धा यश आहे. आवडलं.
आणि हे सर्व लिहिताना पुन्हा दोनदा डोळ्यात पाणी आले, पहा!
मी मानिनी,ह्रदयस्पर्शी
मी मानिनी,ह्रदयस्पर्शी किस्सा! प्रसंगावधान masyach.
ओह... मला कळालेच नाही तुम्ही
ओह... मला कळालेच नाही तुम्ही टाळ्या का लिहिल्या/ मारल्या
आमची दोन घरे आहेत एक ठाण्याला अन एक बदलापुरला
जेव्हा पासुन घाटकोपर - बदलापुर प्रवास चालु केलाय असे भरपुर किस्से आहेत ट्रेन चे.
वेळ मिळेल तसे टाकते ईथे.
खरेतर मुंबई लोकल प्रवास खुपच
खरेतर मुंबई लोकल प्रवास खुपच छान.
रोज एकत्र प्रवास करताना आपोआप तयार होणारे ग्रुप, त्यातले रुसवे-फुगवे, सेलीब्रशन सगळच छान फक्त ते तुम्हाला एन्जोय करता यायला पाहीजे
माझ्या एका मित्राने सांगीतलेला एक किस्सा..
वेस्टर्न रेल्वेचा.
मला वेस्टर्न साईडची ईतकी माहीती नाही, सो जे त्याने सांगीतले ते असे
एकदा एक माणुस चुकुन बोरीवली फास्ट ट्रेनमध्ये चढला खरतर त्याला गोरेगावला ऊतरायचे होते जिथे फास्ट ट्रेन थांबत नाही.
तेव्हा एकाने त्याला सजेस्ट केले की गोरेगाव स्टेशनला खुप स्लो होते सो पटकन चालु मध्ये ऊतराय चे पण थोडे ट्रेन सोबत धावायचे म्हणजे तोल जाऊन पडणार नाही.
त्या व्यक्तीने अगदी तसेच केले, पटकन ऊडी मारुन थोडा धावायला लागला आणी त्याला तसे धावताना पाहुन माग च्या डब्यातील लोकांना असे वाटले की त्याला ती ट्रेन पकडायचीये सो त्यांनी त्याला खेचुन आत घेतले.
अजुनही आम्ही हे नुसते आठवुन सुद्धा पोट दुखे पर्यंत हसतो
सल्ला दिल्या त्याबद्दल
सल्ला दिल्या त्याबद्दल धन्यवाद टोच्यादादा .
<<
तो "टोचा" (उलट केलं तर "चाटो" होतं. लक्षात ठेवायला सोपे.) नामक ट्रॉल आहे. टोच्या नामक सेन्सिबल आयडी नाही, हे कृपया ध्यानी घ्या.
धन्यवाद!
वृंदाजी, किस्से आवडले. छान
वृंदाजी, किस्से आवडले. छान फुलवून लिहिलेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक सूचना - पुण्यातल्या माणसांना माणुसकी नसतेचा किस्सा प्रतिसादात न घेता, हेडरमध्ये घेता येईल का
आणि एक बारीक निरीक्षण - अबाऊट टूर्न ! हे तुम्ही टर्नची ईंग्रजी स्पेलिंग टाईपल्याने झालेय
त्यानंतर असेच "ऍम्ब्युलन्स ला फोने करतो" ईथेही झालेय.
पण "आई ला सांगितलं कदाचित त्याचा लो बाप झालंय" हे कसं झालंय समजत नाही
मी मनिनी,
नंतर कळाले की ट्रेनमधल्या एका बाईने तीच्या नवर्याला फोन करुन सर्व सांगीतले होते जो तेव्हा डोंबीवली स्टेशन वर्च होता आणी त्याने स्टेशन मास्तरला सर्व सांगुन अॅम्ब्युलन्स आणी स्ट्रेचरची सोय केली होती
>>>>
हे एक नंबर !
गिरीकंद,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जवळच उभ्या असलेल्या ३-४ जणांना विचारले की जलद लोकल कुठल्या फलाटावरुन निघते. पण सगळ्यांनीच ऐकुन न ऐकल्यासारखे केले.
>>>>>>
कदाचित त्यांनाही माहीत नसावे आणि आपले अज्ञान प्रकट करायची लाज वाटल्याने त्यांनी दुर्लक्ष केल्यासारखे भासवले असावे. नवीन नवीन लोंढे मुंबईत येतात त्यांना मुंबईकर बनायला काही काळ जावा लागतो. या काळात उगाच आमच्या मुंबईकरांच्या माणूसकीच्या इमेजची ते वाट लावतात. चालायचंच
ट्रेनमधले किस्से मात्र खरेच अफाट असतात. काय लिहू काय नाही असे व्हावे. नुसते मरतामरता कितींदा वाचलोय हे लिहायचे ठरवले तरी त्याचा एक स्वतंत्र धागा बनेल.
ट्रेनमधले किस्से मात्र खरेच
ट्रेनमधले किस्से मात्र खरेच अफाट असतात. काय लिहू काय नाही असे व्हावे. नुसते मरतामरता कितींदा वाचलोय हे लिहायचे ठरवले तरी त्याचा एक स्वतंत्र धागा बनेल >>>> + १
मुंबई लोकल ट्रेन हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय.
नुसते एक-एक किस्से जरी लिहायचे ठरवीले तरी एक पुस्तक तयार होईल
मुंबई जगायला खरंच शिकवते
मुंबई जगायला खरंच शिकवते ..मुख्य म्हणजे पटकन निर्णय घ्यायला शिकवते ... वेगळीच आहे मुंबई ! ग्रेट्च ! मुख्य म्हणजे सगळे समान आहेत इथे !!
माझा एक मामा म्हणतो मुंबईला सगळेच 'जात्यात ' आहेत ..कारण कोणी 'सुपात ' आणि कोणी 'जात्यात ' असा प्रकार नाही इथे ..कारण सगळेच जाणून आहेत की आज दुसऱ्यावर आलेला वाईट प्रसंग कदाचित उद्या माझ्यावर येईन ?!!(very true ) म्हणून सगळेच जमेल तशी मदत करतात ..माणुसकी दाखवतात.
पुणे जगणे कसं एन्जॉय करावे असे शिकवते .. मी पुण्याची असून सांगते पुण्यातल्या लोकात थोडी मुंबईकरांपेक्षा नक्कीच माणुसकी कमी आहे .. कदचित मला असेच अनुभव त्यमुळे हे चुकीचे(की बरोबर??) मत बनले असावे.
कुणाला हे बोलणे आवडणार नाही ..पटणार नाही ..दुखावतीलाही.. पण हे वाईट वाटले तरी थोडेतरी सत्य आहे !!
(मला स्वतःला पण कोणी पुण्याला वाईट बोललेले आवडत नाही .. जास्तकरून असे लोक जे पुण्यात शिकतात , जॉब करतात अगदी लग्न करून सेटल होतात तरी ह्या कर्म भूमीला नावे ठेवतात ! धिस इस रिअली नॉट फेअर.. खूप म्हणजे खुपच वाईट वाटते .. Gratitude is always important in life ) असो .
माणसातही गुण आणि दुर्गुण असतात तसें शहरातही असतील उलट ही संधी आहे सुधारण्याची !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काहीतरी कमी आहे means ती भरून काढण्यास नक्कीच scope आहे !!( Area of Improvement )
पण कसंही असू.. पुणे हे माझे जन्म स्थान आहे ! सो पुण्याबद्दल खूप प्रेम आहे आणि मुंबई बद्दल आदर व कौतुक !!
आपली जन्मभूमी म्हणजे आपली ' आई ' असते जिच्याबद्दल
by default प्रेम वाटते पण शेवटी मुंबई ही सगळ्याच शहरांची " बाप " आहे हेच खरे !!!
वाह वृंदा, जन्माने पुणेकर
वाह वृंदा, जन्माने पुणेकर असूनही पुण्यापेक्षा मुंबई भारी आहे बोलणारी पुणेकर व्यक्ती आज मी पहिल्यांदा पाहिली आहे. यात खरेच कोण भारी आहे या वादात नको पडूया. पण मुंबई मात्र खरेच बापच नाही तर मायबाप आहे. लेकरांना पदराखाली सामावून घेणारी माय, तर आधार देणारा बाप. दोन्ही आहे मुंबई !
Pages