बाहेर पडलं कि जग कळतं म्हणतात ..जग पाहायचे असें तर रेल्वे सारखी दुनिया नाही . दुनिया भली कि बरी हे जाणायचं असेन तर रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव म्हणजे एक शाळा ..
दररोज प्रवास करतात त्यांना हे असेन मी तर फक्त शनी -रवी प्रवास करायचे पण स्वतःचे आणि दुसऱ्याचे अनुभव दरवेळेस येतातच ..
असेच काही माझे अनुभव ..तुम्ही पण share करा !!
**********************************************************************
दहा पंधरा दिवसां पूर्वीची गोष्ट असेन , मला पुण्याहून मुंबई ला सकाळी जायचे होते . सकाळची ट्रेन होती ७:५० ची पण नेहमीप्रमाणे घाई झालीच ! वाटलं चुकतेय कि काय ट्रेन ! (हो... पण मुंबई वरून पुण्याला येताना कधी ट्रेन चुकली नाही कि उशीर झाला नाही अगदी ६:५० ची मुंबई-पुणे इंटरसिटी असली तरी ) सकाळी कसंबसं आवरून ७:३० एकदाची निघाले घरातून. ७:३३ ला रिक्षा मिळाली. रिक्षावाल्या काकांना सांगितलं लवकर पोहोचवा स्टेशन वर. रिक्षात बसताना समोर पहिलं तर लिहिलेलं "श्री स्वामी समर्थ " माझा चेहराच पडला खरंतर ते माझे आराध्य दैवत पण सध्या त्यांच्यावर नाराज होते त्यामुळे त्यांचा नाव पाहिल्यावर कसंसच झालं आणि आपल्याला काही ट्रेन मिळायची नाही असच वाटलं पण म्हंटलं try तर करू तसंही धावती रेल्वे गाडी पकडायची fantasy अगदी DDLJ पासून होती मग काय ! पण रिक्षा काही ३५ च्या स्पीड पुढे जात नव्हती तसं ही पुण्यातले रिक्षावाले कधीच स्पीड ने रिक्षा पळवत नाही. सगळा कसा रमतगमत मामला असतो पुण्यात घाई फक्त two wheeler वाल्यांना. मी दोनदा जोरात चालवा म्हणाले पण पालथ्या घड्यावर पाणी ! ते ऐकतील तर पुण्यातले रिक्षा वाले कसले !! त्यात जाताना प्रत्येक देवाला नमस्कार करत जात होते आणि हसून म्हणतात अहो आता गाडी मिळेल कि नाही कोण जाणे !! मला खूप राग आला म्हणे देवाचे भक्त आणि दुसऱ्याच्या अडचणींवर हसतात . मनातल्या मनात स्वामींना म्हणाले बघा तुमचे भक्त दुसऱ्याला हसतात आणि असुरी आनंद मिळवतात.
असो , मग शेवटचा सिग्नल लागला जो अगदी १:३० मिन असतो आणि माझ्या घड्याळात तर ७:४७ झाले होते पण नंतर लक्षात आले माझे घड्याळ तर ४ मिन पुढे आहे सो अजून ७ मिनिटे होती आणि कधी कधी १-२ min उशीर पण होतो ट्रेन सुटायला ! पण हाय रे दैवा... रिक्षावाल्या काकांनी signal तोडलाच. मी अजिबात सांगितले नव्हते पण त्यांना उपरती झाली असावी मला मदत करायची. स्वामींचीच कृपा म्हणायची ! पण नेमका पुढे पोलिसमामा दिसला मग काय अबाऊट टूर्न ! त्यांनी मग दुसऱ्याच लांब रस्त्याने रिक्षा पळवली कारण परत सिग्नलला थांबलो असतो आणि मग सिग्नल सुटल्यावर पोलिसमामाने पकडले असते . पोलीस ला २०० रुपये देण्यापेक्षा माझी ट्रेन सुटली तरी रिक्षावाल्या काकांना परवडले असते (त्यांनी स्वतःचाच विचार केला..टिपिकल मेन्टॅलिटी) शेवटी माझी train हुकलीच ! (ही पण स्वामींचीच कृपा वाटतं ... कारण दुसऱ्या रस्त्याने स्टेशन वर यायचा तब्बल १० min लागले ) मग काय .. चेन्नई मेल ची ९:३० पर्यंत वाट पाहायची किंवा लोणावयावरून दुसरी ट्रेन पकडायची असं ठरलं .पण मुंबई ला लवकर पोहोचणे महत्वाचे होते. मग शेवटी पुणे ते लोणावळा(लोकल ) , लोणावळा ते कल्याण (हैद्राबाद एक्सप्रेस ), कल्याण ते माझं स्टेशन (लोकल) प्रवास केला आणि कशीबशी १:३० पर्यंत पोहोचले. नंतर मी हा प्रसंग विसरून गेले .
नंतर एक आठवडयांनी t.v न्यूज वर बातमी आली कि एक मुलगी एक्साम ला उशीर होत होता म्हणून धावती इंद्रायणी एक्सप्रेस पकडायला गेली आणि तिला पाय गमवावे लागले !! अगदी त्या प्रसंगाचे CCTV फुटेज पण दाखवत होतें .जीव खूप हळहळला. थोडा उशीर परवडतो पण उगाच घाई कशाला करायची होती दुसरी गाडी मिळाली असतीच कि ! मग एकदम strike झालं आपलं पण त्या दिवशी असंच झाला असतं तर?? आपल्याकडे luggage पण होतं ट्रेन कदाचित मिळाली पण असती पण अशी धावती ट्रेन पकडणे जमले असते का ??? जर रिक्षावाले काकांनी सिग्नल तोडलाच नसता तर ?? त्यांनी रिक्षा खूप जोरात पळवली असती तर ?? मन २ min सुन्न झालं ..
पण एक धडा शिकले.... जे होत ते चांगल्यासाठीच... ... कधी आपल्याला लवकर कळतं तर कधी उशिरा ... -- वृंदा
(प्लिज व्हिजिट माय ब्लॉग - http://vrundavani.blogspot.in/ )
>>जन्माने पुणेकर असूनही
>>जन्माने पुणेकर असूनही पुण्यापेक्षा मुंबई भारी आहे बोलणारी पुणेकर व्यक्ती आज मी पहिल्यांदा पाहिली आहे.
मीपण त्यातलीच. जन्म पुण्याचा, पण आयुष्याचा अर्धा काळ मुंबईत आणि जवळपास अर्धा पुण्यात गेला. मला आणि आईला मुंबईच आवडते पुण्यापेक्षा. मुंबैत जास्त कंफर्टेबल वाटतं. आणि मुंबईकरांकडे माणुसकी जास्त आहे पुणेकरांपेक्षा असं मलाही वाटतं. (आई म्हणते पुणेकर स्वतःला पेशवेच समजतात
).
ऋन्मेषजी .. निदान माणुसकी
ऋन्मेषजी .. निदान माणुसकी मध्ये भारीच आहे मुंबई!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांगितलं ना .. खूप आदर आहे मुंबईबद्दल ! त्याच्या ग्रेटपणा बद्दल चुकूनही doubt नाही ! ग्रेट आणि ग्रेटच आहे मुंबई !
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण पुण्याचीही मजाही खूप और आहे !! बरेच हौशी , रसिक लोकं आहेत पुण्यात !!
(गर्व नव्हे )
पुणे म्हणजे आनंदीपणा ,भरभरून जगणे ..पुणे म्हणजे गोव्यातले 'सुशेगात' जगणे .. पुणे म्हणजे स्वतः वरचे प्रेम !!
कधीकधी वाटते देवाला विशेष 'माया' आहे पुण्याबद्दल
.. हा हा .. अशीच मज्जा केलीये ! देवाला सगळे सारखेच ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@मानिनी ताई तुमचे किस्से
@मानिनी ताई तुमचे किस्से भारीच आहेत !! ती गरोदर बाई ची गोष्ट ऐकून तर डोळ्यांत पाणी आले .. खूपच छान प्रसंग सांगितलात ..एकदम पॉसिटीव्ह![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून रेल्वे / लोकल चे किस्से वाचायला मिळाले तुमच्याकडून तर खरंच आवडेल !
keep it up
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्लिज ताई नका म्हणु मला,
प्लिज ताई नका म्हणु मला, लहानच आहे हो मी ईतकी हि मोठी नाहीये
काल हे सगळे किस्से शेअर करत होत, अन आज सकाळी ट्रेन बंद.
बघु वेळेत चालु झाली तर , नाही तर गेली एक CL
ट्रेन मध्ये बसूनच हा किस्सा
ट्रेन मध्ये बसूनच हा किस्सा लिहीतेय
दिब्रुगढहून गुवाहाटीला जायला स्टेशनवर दोन वाजता (पावणे तीनची गाडी) आले. इंटरसिटीची चौकशी केली. ट्रेन एक तास उशिरा असल्याचं अखमिया मध्ये सांगितले . एक नं फलाटावर दारासमोरच्या बाकड्यावर बसले. समोर रात्री सुटणारी राजधानी उभी होती व प्लैटफॉर्मवर मी एकटी! टीपा करायला हा धागा उघडला ,वाचण्यात गुंग झाले. किती वेळ गेला कळलंच नाही. मध्येच केव्हा तरी गाडीची शिटी ऐकली पण लक्ष दिलं नाही. काही वेळाने अनाऊंसमेंट झाली असमियात व इंग्रजीत पण दोन्ही मला कळल्या नाही. काचेच्या भिंतीतून त्या अनाऊंसकला मी दिसत होते त्याला लक्षात आलं की मला काही कळलं नाही. त्याने दोन बोटं उभी केली माझ्याकडे बघून. दोन नंबरवर आले व गाडीत बसले. गाडीत लोकं बसलेली होती. बसल्या वर लक्षात आलं की ती अनाऊंसमेंट फक्त माझ्यासाठी
होती.
मी मानिनी , डोळे पाणावले.
बसल्या वर लक्षात आलं की ती
बसल्या वर लक्षात आलं की ती अनाऊंसमेंट फक्त माझ्यासाठी होती.>>> व्वा:!!! त्या अनाउन्सरला सलाम!!! ये है इंडिया!!!
मंजूताई भारी. लेटेस्ट
मंजूताई भारी. लेटेस्ट अनुभव. फिलिण्ग स्पेशल. रेल्वेस्टाफचेही कौतुक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सचिन, रुन्म्या फार भारी
सचिन, रुन्म्या फार भारी वाटलं ! शिडी दूर व ऊंच होती त्यामुळे माझी इतकी धावपळ झाली ना ...मी स्थिरस्थावर झाल्या वर हे लक्षात आलं....
अशी अचानक, ना ओळखीची ना पाळखीची माणसं भेटतात निरपेक्षपणे मदत करतात पण कृतद्न्यता व्यक्त करायचे राहूनच जाते...
मग त्यांना मनोमन च धन्यवाद देऊन टाकते...
व्वा:!!! त्या अनाउन्सरला
व्वा:!!! त्या अनाउन्सरला सलाम!!! ये है इंडिया!!!>>>> this happens only in India.
मानिनी भारी किस्सा
मानिनी भारी किस्सा![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
काचेच्या भिंतीतून त्या
काचेच्या भिंतीतून त्या अनाऊंसकला मी दिसत होते त्याला लक्षात आलं की मला काही कळलं नाही.
<<
अनाउन्सक हा शब्द आवडला.
Pages