खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशु,
सायु नावाचा आयडी आहे त्यांनी दिलीए रेस्पी..
हि बघा http://www.maayboli.com/node/51579
अन अशा प्रश्नांसाठी पाककृती हवी आहे. माहिती आहे का? या नावाचा धागा आहे.. http://www.maayboli.com/node/42617

बदकासोबत त्याचा तुराही दिलाय Happy

एक आठवण - लहानपणी काकांबरोबर त्यांच्या एका ख्रिश्चन मित्राच्या घरी जेवायला जात बदक खाल्लेले. म्हणजे ते बोल्लेले तरी तसे. मी खूप लहान असल्याने चव ओळखावी वा आता ती आठवावी असे नाही. पण समोर एक छानपैकी भाजलेला भलामोठा पक्षी होता एवढे आठवतेय. आणि ती कोंबडी नव्हती हे नक्की. माझे ईतर भाऊ मात्र मला कबूतर खाऊन आला म्हणून चिडवत होते. अशी ती आठवण आहे

ऋ मस्त धागा. Happy

सगळ्यांनी फोटो पण एकसोएक टाकलेत.

आमचा कोकणी पदार्थ..
या मोसमातल्या ताज्या कैरीचं जीवंत फोडणी देऊन केलेलं ताजं लोणचं.

20161221_140032_opt.jpg

जीवंत फोडणी>>>>. पदर्थावर्,वरुन घातलेली फोडणी म्हणजे जिवंत फोडणी.

त्या दुसर्‍या धाग्यावर मी मला चीज आवडत नाही असे लिहिले खरे. पण आज हे आवडीने खाताना आठवले. माझी गर्लफ्रेंड म्हणते यात चीज असते Happy

20161226_233316.jpg

आज आमच्याकडे पुरण पोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, मुग भजी आणी जीरा राईस.

काल मम्मीकडे सहज फर्माईश केली कि हे सगळे खावेशे वाटते आणी आज लगेच मिळाले.
मोबाईल वरुन फोटो टाकता येत नाहीये

अरे कुर्डया आणी पापड सांगायचे राहीले होत

माझी गर्लफ्रेंड म्हणते यात चीज असते << ते पिवळ दिसणार तुला काय वाटत होत? हळदीची पेस्ट का?? नाही अंड्याच बलक वाटत असणार :प

जीवंत फोडणी>>>>. पदर्थावर्,वरुन घातलेली फोडणी म्हणजे जिवंत फोडणी.> हो का? लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतीचित्रे' मधे ` जिवंत फोडणी ' म्हणजे तेल किंचित पेट घेते ती. असा उल्लेख वाचला होता.

आप्पे माझेही आवडते. मगाशी चक्कर मारली तेव्हा फोटो उघडत नव्हते. निराश झालो. आता परत आलो. तर अपेक्षेपेक्षा सुण्दर निघाला. संध्याकाळची हलक्या नाश्त्याची वेळ. भूक चाळवली Happy

मानसी, पोटावर लॅपटोप ठेवून हे आपले एवढाले भलेमोठे फोटो पाहिलेत.. काय सुरेख तोपासू आहेत.. मजा आली बघूनच

आपण कोकणातील का Happy

Pages