महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????
Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
उठा ले रे बाबा
उठा ले रे बाबा
ऋन्मेष, हे मुद्दाम आजच्या
ऋन्मेष, हे मुद्दाम आजच्या वारी विचारतोयस ना?!
ऋन्मेष, हे मुद्दाम आजच्या
ऋन्मेष, हे मुद्दाम आजच्या वारी विचारतोयस ना?! >>>>>>मग आहेच तसा तो थोडा थोडा चावट!:फिदी:
ऋन्मेष सर तुम्ही शोलेतले
ऋन्मेष सर तुम्ही शोलेतले ठाकूर आहात का?

ऋन्मेष सर, समाधानाचे स्तोम
ऋन्मेष सर, समाधानाचे स्तोम माजवू नका
भास्कराचार्य नाही.. खरं तर
भास्कराचार्य
नाही..
खरं तर पुण्यात बुधवारपेठ आहे तसे मुंबईत कामाठीपुरा आहे. पण या दोन्ही जागा दोन्ही शहरांना अभिमानास्पद नाहीयेत.
माझा रोख खरे तर पुण्याच्या गोड गुलाबी थण्डीकडे होता.
परवाच पुण्याचे एक स्नेही बोलत होते की पुणे ज्या गुलाबी थंडीसाठी प्रसिद्ध होते (पक्षी: स्तोम माजवले जात होते) ती थंडी आताशा प्रदूषण आणि वाढत्या फाफटपसारयात गुदमरली आहे. हे खरे आहे का?
हर्पेन.. ठाकूर.. कायच्या काय
हर्पेन.. ठाकूर.. कायच्या काय हा
ऋन्मेष सर तुम्ही शोलेतले
ऋन्मेष सर तुम्ही शोलेतले ठाकूर आहात का?>>>

नाही,मुंबई पेक्षा प्रदूषण
नाही,मुंबई पेक्षा प्रदूषण नक्कीच कमी आहे (लोकसंख्या विचारात घेता) त्यामुळे थंडी मस्त गुलाबी आहे
लिंब्या लंबर वन प्रतिसाद.
लिंब्या लंबर वन प्रतिसाद. तुम लडो हम चार बजे चायका आधण रखता है सब के लिये.
पाव पाव कप. पण स्वतःचा कप घेउन यावे. धन्यवाद कृपया.
बिस्किट खारी मागू नये मिळणार नाही. हे मुंबईचे इराणी कॅफे नव्हे.
नखे कापू नये
केस विंचरू नये.
पत्ते विचारू नये
सुट्टे मागू नये
पेटीएम नाही.
ऋन्मेष सर तुम्ही शोलेतले
ऋन्मेष सर तुम्ही शोलेतले ठाकूर आहात का? >>>>>

मी लैंगिकदृष्ट्या असमाधानी
मी लैंगिकदृष्ट्या असमाधानी आहे हे काही आता माबोकरांपासून लपलेले नाही.>>> ऋन्म्या ,चांगला डॉक्टर बघुन त्याच्याकडुन उपचार घे . होशील लवकर बरा कालजी करु नकोस .
LOLs...LOLs अमा तुमचा
LOLs...LOLs
http://www.maayboli.com/node/35004
अमा तुमचा आतिथ्यशीलपणा बघून या दोन बेस्ट फ्रेंड्स चा चहा आठवला
हर्पेन माझा रोख खरे तर
हर्पेन
माझा रोख खरे तर पुण्याच्या गोड गुलाबी थण्डीकडे होता. >> तुला गुलाबी थंडीतून *लैंगिक* समाधान मिळते?! कोणाचे काय तर कोणाचे काय! असतात म्हणा एकेकाच्या इच्छा.
अरे कुठे नेउन ठेवलास रे धागा
अरे कुठे नेउन ठेवलास रे धागा आचरटा
अरे काय हे, महान प्रतिसाद
अरे काय हे, महान प्रतिसाद आहेत एकसे एक
भारतात "साहित्य" मिळत असतील
भारतात "साहित्य" मिळत असतील तर मायबोलीकरांनी वर्गणी काढून ऋन्म्याला पाठवून द्या.
पण 'साहित्य' सहवास मुंबईतच
पण 'साहित्य' सहवास मुंबईतच आहे ना !
भास्कराचार्य मग काय मिळते
भास्कराचार्य मग काय मिळते त्या गुलाबी थंडीतून
मला माझे पुण्याचे मित्र तरी तेच सांगून जळवायचे
मुंबईत आहे पन ते रुन्म्याला
मुंबईत आहे पन ते रुन्म्याला मिळत नाही.
हे पा, धाग्याचा विषय,
हे पा, धाग्याचा विषय, ऋन्मेषचे लैंगिक असमाधान हा नसुन, पुण्याचे स्तोम हा आहे.
कृपया विषयाला धरुन लिहावे.
हुकुमावरुन!
विषयाला धरून लिहिण्याचे फार
विषयाला धरून लिहिण्याचे फार स्तोम माजवतात ही माबोकर मंडळी !
लिंबूजी, हजार पोस्टींची ताकद
लिंबूजी, हजार पोस्टींची ताकद असलेला धागा आहे. त्यातल्या पाचपन्नास पोस्टी माझे लैंगिक असमाधान दूर करण्यास सत्कारणी लागत असतील तर पुण्याचे काय जातेय हो. एकदा ते झाले तर बघा जीव देतो तुमच्या पुण्यासाठी..
आणि हो, एखाद्याचे लैंगिक
आणि हो, एखाद्याचे लैंगिक असमाधान दूर करणे हे देखील पुण्याचे काम आहे
तुम्हाला खरच दंडवत घालावं असं
तुम्हाला खरच दंडवत घालावं असं वाटतंय.धाग्याचा विषय काय लोक बोलतात काय..
डबल सेंचुरी होते वाटतंय आज.......
त्या उंदराच्या धाग्याशी
त्या उंदराच्या धाग्याशी स्पर्धा करणार वाटतं हा धागा!
तो उंदीर नुसता भारतीय नाही, तर पेठी पुणेकर होता.
http://www.maayboli.com/node/44433
अरारा , धागा तर धागा पण काय
अरारा , धागा तर धागा पण काय एकेक प्रतिसाद
बाकी पुण्याची महती (???) धागा
बाकी पुण्याची महती (???) धागा वाचल्यावरच कळली आणि आजवरच्या माझ्या अज्ञानाचे (पुण्याविषयीच्या) फार फार वाईट वाटले.
शुभे, शोनाहो
शुभे, शोनाहो
एखाद्याचे लैंगिक असमाधान दूर
एखाद्याचे लैंगिक असमाधान दूर करणे हे देखील पुण्याचे काम आहे >>> पुणेकर असले "काम" पण करतात हे माहीत नव्हते ब्वॉ.
Pages