पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> ऋन्मेऽऽष | 14 December, 2016 - 14:59

एक वैयक्तिक प्रश्न आहे. धाग्यावर आलेले जाणकारांचे प्रतिसाद पाहता विचारायची हिंमत करतोय.

मी लैंगिकदृष्ट्या असमाधानी आहे हे काही आता माबोकरांपासून लपलेले नाही. मुंबईने मला सर्वकाही दिले पण हे सुख समाधान देण्यात कमी पडली.

तर या समाधानाच्या शोधात पुण्यात आलो तर काही फायदा होईल का?<<<<

येऊन बघायला हरकत नाही, तुमचा फायदा नाही झाला तर पुणेकरांचा होईल.

अरारा , धागा तर धागा पण काय एकेक प्रतिसाद हाहा....+११११
हसुन हसुन पुरेवाट
@ऋन्मेऽऽष ...तुम्ही सातार्‍याचे कंदी पेढे खाल्ले की काय?..भारी गाडी सुटलीये..सुसाट! Happy

येऊन बघायला हरकत नाही, तुमचा फायदा नाही झाला तर पुणेकरांचा होईल.
>>>>>>
बेफिकीर ईकडे नक्की कोणता फायदा ते प्लीज क्लीअर करा... मी मगासपासून विचार करतोय की मी पुण्याला आल्याने पुणेकरांचे लैंगिकदृष्ट्या समाधान कसे होणार.. काही सुचत नाहीये..

>>>>बेफिकीर ईकडे नक्की कोणता फायदा ते प्लीज क्लीअर करा... मी मगासपासून विचार करतोय की मी पुण्याला आल्याने पुणेकरांचे लैंगिकदृष्ट्या समाधान कसे होणार.. काही सुचत नाहीये..<<<<

पुणेकरांचे लैंगिकदृष्ट्या समाधान कशाला व्हायला हवे आहे? मुंबईतही ज्याचे समाधान होत नाही असा माणूस पुण्यात आला तर मान उंचावणार नाही का पुण्याची आणि पर्यायाने पुणेकरांची? ज्या गोष्टीसाठी देशभरातून लोकं आर्थिक राजधानीत लँड होतात तेथील एक तडफदार युवक मुंबईच्या झगमगीत लाईफस्टाईलवर लत्ताप्रहार करून सांस्कृतीक राजधानीत ते सुख शोधायला येतो ही बाब सामान्य नव्हे.

{{{ . मी मगासपासून विचार करतोय की मी पुण्याला आल्याने पुणेकरांचे लैंगिकदृष्ट्या समाधान कसे होणार.. काही सुचत नाहीये.. }}}

त्यांनी असं कुठेच लिहिलेलं नाहीये.

त्यांचं विधान असं आहे -

{{{ येऊन बघायला हरकत नाही, तुमचा फायदा नाही झाला तर पुणेकरांचा होईल. }}}

{{{ येऊन बघायला हरकत नाही, तुमचा फायदा नाही झाला तर पुणेकरांचा होईल. }}}

जस्ट टु अ‍ॅड
सध्या रामलाल बेरोजगारीच आयुष्य जगत आहेत पुण्यात असं म्हणतात
बिचार्‍यास जुन्या धन्याकडे जुनाच रोजगार मिळेल

सध्या रामलाल बेरोजगारीच आयुष्य जगत आहेत पुण्यात असं म्हणतात
बिचार्‍यास जुन्या धन्याकडे जुनाच रोजगार मिळेल>>>>

हे एपिक आहे. Biggrin Wink

>>>> अदित्य सिंग | 14 December, 2016 - 19:08

{{{ येऊन बघायला हरकत नाही, तुमचा फायदा नाही झाला तर पुणेकरांचा होईल. }}}

जस्ट टु अ‍ॅड
सध्या रामलाल बेरोजगारीच आयुष्य जगत आहेत पुण्यात असं म्हणतात
बिचार्‍यास जुन्या धन्याकडे जुनाच रोजगार मिळेल
<<<<

??

हे काय? कशाबद्दल आहे? विचारायचे कारण म्हणजे मी नोकरी करत नाही ह्यावरून खूप पर्सनल रिमार्क्स वाचून झालेले आहेत आजवर! त्याच विषयावर हाही रिमार्क आहे का? थेट लिहायचे नाही म्हणून रामलाल वगैरे, असे काही?

ओके.

सिंथेटीक जिनीयस, असा घाऊक प्रमाणात ५८ लाख लोकांना दोष देणं किंवा त्यांचं गुणगान करणं हे खूप अपरिपक्व मतप्रदर्शन आहे. उडदामाजी काळे-गोरे सगळीकडे असतात. ती काही चांदोबातली गोष्ट नाही की एका गावात सगळे सज्जन/दुर्जन लोक रहात असतात. आपला मुद्दा सिद्ध करायला आपण नेहेमीच स्वतःच्या सोयीची उदाहरणं पहातो.

तुम्हाला आलेले अनुभव, झालेला त्रास आणी मनस्ताप खरा असेल, पण तो प्रातिनिधीक नाही.

दुसर्या महायुद्धाच्या वेळी जर्मन सैन्याने पी.जी. वूडहाऊस ला अटक केली आणी त्या कैदेत त्याचे बरेच हाल झाले. त्याच्या सुटकेनंतर त्याला जेव्हा विचारलं की तू जर्मन लोकांचा तिरस्कार करतोस का, तेव्हा तो म्हणाला , 'my friend, i don't hate in plurals'. असो, ईतकी प्रतिक्रिया पुष्कळ झाली.

अरे, चवथ्या व पाचव्या पानांवर काय भयानक हसवुन ठेवलंय तुम्ही लोकांनी Rofl Rofl Rofl
लिंबुंनी हे इतकच एवढंच लिहिल?? , पार्वती >>> Rofl
उरलेल नंतर वाचते.

तसे बघायला गेले तर सर्वर मायबोलीचा अमेरिकेत आहे मग काय सत्कार स्टॅच्यु ऑफ लिबर्टी जवळ करणार? अ ओ, आता काय करायचं

आमच्याकडे शीव आहे म्हणून मला वाटले तुमच्याकडे पार्वती असेल.

पुण्यात वेगळ्या वस्तुसंग्रहालयाची गरज काय? >>> मुंबईत राणीबागेची आहे तेवढीच. फिदीफिदी

बगलेचा मोठेपणा खराच असणार इतके प्राणी पाळायचे म्हण्जे डोळा मारा

मी लैंगिकदृष्ट्या असमाधानी आहे हे काही आता माबोकरांपासून लपलेले नाही.>

पुण्यात पराकोटीची स्पर्धा असते सर्वच क्षेत्रात. त्यामुळे जिथे आहात तिथेच स्पर्धेत उतरुन यश मिळवा.

पुण्यातील लोकं फारच रिझर्व्हड अस्तात, अन या क्षेत्रात तुमच्या त्या "बाकीच्या रिझर्वेशनचा" तसा उपयोगही नाही...

लिंबाजीपंत आले खिंड लढवायला. काड्यांचे स्तोम माजवून ठेवले आहे. मिपावर १२३ प्रितीसाद आले.
मी तुळशीबागेपत्तोर जाउन येते.

Rofl
म हा न. अशक्य हसवलंय तुम्ही लोकांनी. हा धागा बहुधा हॉल ऑफ फेम मध्ये हलवायला लागणार. Lol

भ यं क र आवडलेत प्रतिसाद Rofl

हर्पेन, भा, ऋ __/\__ Lol यू मेड माय डे

मामीच्या धाग्यात टाकायला हवं याला Rofl

टिप : मामीच्या धाग्याचं स्तोम माजवत नाहीये

फेरफटका धाग्याच्या लायकीप्रमाणे प्रतिसाद द्या. तुमचा वरिल प्रतिसाद फाऊल धरण्यात आला आहे.:-)

Pages