पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबो वर स्तोमाबरोबर हल्ल्कल्लोळ माजलाय !! वेगवेगळे धागे पळताना पायात पाय अडकून पडत आहेत असं वाटतय

मग झाले/संपले की नाही पुण्याचे "स्तोमपुराण" ?

(पुराण शब्द आला म्हणजे हा काहीजणांच्या [काक]दृष्टीने बामणीकावाच अस्तो..... Proud )

पुरे हं आता
माझी मागणी पण दुर्लक्षित करताय सगळे तुम्ही. ६५ वा सवाई महोत्सव सातार्‍याला झालाच पाहिजे.
चला आपण सारे मिळून सातार्‍याचं स्तोम माजवूया.
जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी साधं कराड पेक्षा भारी होता येत नाही ये हो त्याला.
वर्षानुवर्षे म्हणजे गेली अनेक वर्षे तिकडं जाताना बुगडी सांडत्ये ते आणिक वेगळेच.

>>> ६५ वा सवाई महोत्सव सातार्‍याला झालाच पाहिजे. <<<<
हो हो चालेल की.... मग कधी जाताय? चौफुल्याला हो? तमाशा-लावणीच्या सुपार्‍या द्यायला नगं ?
आता येवढा पासस्टावा सवाई महोत्सव सातार्‍यात, तर पासस्ट बार्‍या नाय लावल्या तरी किमान धाबारा बार्‍या तरी वाजल्यागाजल्याच पायजेल, होय की नाय?

सातारा कराडला धागा आणला आणो थांबला. त्याला पुन्हा पुण्याला न्या.

काल मी पुणे १ ते ४ वर एक मस्त वाक्य वाचले.

पुण्यात एटीएम १ ते ४ बंद ठेवायला पाहिजेत... मग त्यांना समजेल.

काय समजेल ते नाही सांगितले.
पुणेकरांना यातून खरेच काही समजले असेल तर समजवा.

पुणेकरांना यातून खरेच काही समजले असेल तर समजवा. >>> एक मुंबईकर पुणेकरांकडुन काहितरी शिकायला बघतोय. #टडोपामोमेंट Proud

काल मला एक वॉअप आलंय. महाराष्ट्राची माहिती. त्यात सर्वाधिक निरक्षर लोक म्हणे पुण्यात आहेत. Uhoh

Lol वाह वाह...you ppl made my day...सकाळी सकाळी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसले Lol

म्हणजे शेवाळ असलेला पूल चालू ठेवला ? हो त्यात मासे आणि कासवं देखिल आहेत. मगर होती ती कात्रजला का खडकवासल्याला सोडली.

सस्मित, वॉअप वर आलय म्हणजे नक्की खरे असणार!>>>> Lol

नाही ओ. असं म्हणायचं नव्हतं. फक्त ह्या धाग्यवर पोस्टायला हवं हे आठवलं ते वाचुन. Happy

हो त्यात मासे आणि कासवं देखिल आहेत >>> चला म्हणजे पुण्यात असलेल्या काही कोकणी लोकांची सोय झाली.
इकडे तिकडे रिकामटेकडी टीपी करण्यापेक्षा तिथे गळ टाकून बसतील. त्यांच्या घरी रात्री गरम भात आणि माशाचे कालवण फक्कड बेत जमेल Happy

मगर होती ती कात्रजला का खडकवासल्याला सोडली.
>> हो हो मी अंडर वॉटर पोहत असे तिथे तेव्हा तिला पाहिली आहे. दुपारी झोपते ती. किशोर मासिकात अ‍ॅक्टिंग करत असे.

>>>> चला म्हणजे पुण्यात असलेल्या काही कोकणी लोकांची सोय झाली.
इकडे तिकडे रिकामटेकडी टीपी करण्यापेक्षा तिथे गळ टाकून बसतील. त्यांच्या घरी रात्री गरम भात आणि माशाचे कालवण फक्कड बेत जमेल <<< बरोब्बर....
अस्सल बनलेला पुणेरी मात्र "आपापले गळ नेमक्या ठिकाणी टाकून ठेवतो" '
फक्त मासे/खेकड्यांकरता नाही तर "माणसांकरताही (व माणसातील बकरे बनु शकणार्‍यांकरताही)" गळ टाकून ठेवतो. Proud
अन बरेच बकरे त्या गळाला सापडतात...... Biggrin
जसे ते या धाग्यावर अधेमधे सापडताहेत..... Lol

>>> दुपारी झोपते ती. किशोर मासिकात अ‍ॅक्टिंग करत असे. <<< Lol
ओ मामी, उगा पुणेरी मगरीचे स्तोम माजवू नका..... क्काय?

मगर ही १ ते ४ झोपते ??>>>>

म्हणजे काय!! ती साधी सुधी मग आहे का? अस्सल पुणेरी मगर!
रच्च्याकने मगरपट्टा देखिल आहे पुण्यात! Wink

हो त्यात मासे आणि कासवं देखिल आहेत >>> चला म्हणजे पुण्यात असलेल्या काही कोकणी लोकांची सोय झाली.
इकडे तिकडे रिकामटेकडी टीपी करण्यापेक्षा तिथे गळ टाकून बसतील. त्यांच्या घरी रात्री गरम भात आणि माशाचे कालवण फक्कड बेत जमेल

प्रसाद 'क', हे 'ड' दर्जाचे होते Wink Light 1

कोकणी लोकांना गोड्या पाण्यातले मासे नाही चालत.
शिवाय टिटॅ मधले मासे गप्पी आहेत त्यांना खात नाहीत. त्यांच्याशी बोलतात आणि ते आपले पेडीक्युअर करतात. एक फिशी थेरपी आहे.
इतकं पण माहीत नाही.
पण ठीके तुम्ही पुण्याचे नसालच त्यामुळे चालायचंच Wink

हो हो मी अंडर वॉटर पोहत असे तिथे तेव्हा तिला पाहिली आहे. दुपारी झोपते ती. किशोर मासिकात अ‍ॅक्टिंग करत असे. >>> Rofl

Pages