पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23

महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"फेरफटका धाग्याच्या लायकीप्रमाणे प्रतिसाद द्या. तुमचा वरिल प्रतिसाद फाऊल धरण्यात आला आहे" - Happy

फेरफटका तुम्ही या धाग्यावर फेरफटका मारलात म्हणून तुमच्यासाठी क्रिकेट आणूया धाग्यावर.

सुरुवातीच्या काही प्रतिसादांत आढळून आले की बाहेरच्या लोकांनी पुण्यात येऊन कर्तुत्व गाजवले याचा मोठेपणा पुण्याकडेच घेण्याची चढाओढ पुणेकरांमध्ये लागली होती.

पण आयपीएलमध्ये पुण्याच्या क्रिकेट टीमने जे हरी हरी गोपाळा उटी उटी चंदना केले त्या नामुष्कीची जबाबदारी झटकायची घाई मी कैक पुणेकरांमध्ये पाहिली आहे.

या पुणे आयपीएल संघात एकही पुणेकर नाही (जसे सचिन कांबळी गावस्कर वेंगसरकर आगरकर रहाणे आदी मंडळी यांच्या पुण्याचीच होती) म्हणत या पुणे संघाशी आमचा काही एक संबंध नाही. पुन्हा पुन्हा येऊन स्कोअर काय झाला असे विचारू नये, अन्यथा अपमान करण्यात येईल..... अश्या आशयाच्य कैक फेसबूक पाट्या माझ्या पुणेकर मित्रांना फिरवताना पाहिले आहे.

तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लोकं फक्त आपल्या यशाचेच स्तोम का माजवता?

सिग्नलवरून आठवले,
जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक ती, जी लाल रंग पाहिल्यावर थांबतात. एक ती, जी लाल रंग पाहिल्यावर उधळतात.

* हा असाच डायलॉग सुचला, मारला. धाग्याशी संबंध जोडून स्तोम माजवू नका.

हर्पेन, भा, ऋ Lol

लिंबुंनी हे इतकच एवढंच लिहिल?? .. हे महान आहे.

फेरफटका तुम्ही या धाग्यावर फेरफटका मारलात म्हणून तुमच्यासाठी क्रिकेट आणूया धाग्यावर. >> फे फे चे स्तोम माजवू नकोस Lol

ऑन सिरिअस नोट ऋन्मेष!

अपयश एंजॉय करणारे वगैरे फक्त सिनेमात असतात. नाही तर सगळेच यशाचंच स्तोम माजवतात, अपयश कोणालाच आवडत नाही.

अभिनंदनाला विरुद्धार्थी शब्द सांग बरं ??

अभिनंदनाला विरुद्धार्थी शब्द सांग बरं ??
>>>>>
तू आधी स्तोम माजवणेला विरुद्धार्थी शब्द सांग. मग ईथल्या लोकांन ते करायला सांगता येईल. जो येईल तो स्तोम माजवत चाल्लाय.

पोल घे.... स्तोम माजवणे चांगले की वाईट यावर!!!

रच्याकने खरच अभिनंदनाचा विरुद्धार्थी शब्द काये?

अभिनंदन म्हणजे केलेल्या कामाबद्दल प्रशंसा करणे, असे म्हटले, तर कृतीबद्दल दोष देणे, असे म्हणता येऊ शकते कदाचित. (हा प्रतिसाद विथ स्ट्रेट फेस देतो आहे कसाबसा, रीया एवढी सिरीयस झाली म्हणून. :P)

लग्न झाल्यावर मुलीचे अभिनंदन केले जाते मुलाचे सांत्वन.
मुले x मुली , म्हणून दॅट्स व्हाय हेन्सफोर्थ देअरफोर.. अभिनंदन x सांत्वन

लग्न झाल्यावर मुलीचे अभिनंदन केले जाते मुलाचे सांत्वन. >> आता ह्या विधानामुळे कशाचेतरी स्तोम माजेल बहुधा. Lol

नाही भा असे नाही होणार.
मायबोली या फुटकळ स्त्री पुरुष वादाच्या फार पलीकडे निघून गेली आहे.
इथे समलिंगी संबंधांना लोक खुलेआम आपले समर्थन देऊ शकतात, ईथे माझ्यासारखे लैंगिकदृष्ट्या असमाधानी पुरुष बिनधास्त सल्ला मागू शकतात, ईथे नरभक्षक जीवांच्या खाद्यपदार्थांची मोठ्या चवीने चर्चा होते, पॉर्न सेक्स वगैरे शब्द तर ईथे चुईंगम चघळ्यासारखे लोकांच्या तोंडात असतात.... मी देखील वरचे वाक्य कुठलीही काडी टाकायला नाही तर व्याकरणदृष्ट्या मॅथेमॅटीकली माझा मुद्दा समजावून द्यायला दिले.

"फे फे चे स्तोम माजवू नकोस " - Happy Happy

ऋन्मेऽऽष, माझे क्रिकेट वरचे ईतके प्रतिसाद वाचून सुद्धा (तरी?) 'तू ने मुझे जाना नही, जाना है तो माना नही, मुझे पहचाना नही' असच म्हणावं लागेल. मी आजतागायत आयपीएल च्या पुण्याच्या टीम च्या समर्थनार्थ एक तरी पोस्ट टाकलेली दाखव आणी ५०० रू. कॅश (एका नोटेत) बक्षिस मिळव अशी योजना मी जाहीर करतोय. (का योजनेचं स्तोम माजवतोय असं म्हणू? Wink )

अरे ऋ, तू कशासाठी केलेस हा मुद्दा नसून लोकांची त्यावर रिअ‍ॅक्शन काय असेल, हा मुद्दा आहे. रिअ‍ॅक्शनचे फार स्तोम माजले आहे रे आजकाल मायबोलीवर. Lol

Pages