एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
शंतनू, रोचक. 'ह' हा कण्ठ्य
शंतनू, रोचक.
'ह' हा कण्ठ्य आहे म्हणूनच कदाचित उत्तर भारतात 'सिंहचा उच्चार 'सिङ्ह' असा होत असावा, जो आपल्याला 'सिंघ' असा ऐकू येतो आणि आपण मराठीत 'सिंग ' असा लिहितो. उत्तर भारतीय लोक मात्र लिहिताना 'सिंह' असेच लिहितात. मनमोहन सिंग, विश्वनाथप्रताप सिंग, मुलायम सिंग या सर्व नावातला 'सिंग' हिंदी/गुजराती वर्तमानपत्रात 'सिंह' असाच लिहिलेला असतो. ते लोक इंग्लिश स्पेलिंग singh असे करतात त्यावरून आपण 'सिंघ' असे लिहीत असू कदाचित.
तू असं वागायला नको हवं
तू असं वागायला नको हवं होतंस."
<<
तूने ऐसा करना नही चाहिये था, या हिंदीचं ते भाषांतर आहे. व आजकाल इतके रुळले आहे, की चुकीचे ठरत नाही.
ह्यापैकी शब्दांचे शुद्ध रुप
ह्यापैकी शब्दांचे शुद्ध रुप कुठले आहे:
१) कैक पटींनी?
२) कितीतरी पटींनी?
३) अनेक पटींनी?
मला शुद्ध स्वच्छ रुप हवे आहे. कैक, कितीतरी, अनेक तिन्ही बरोबर आहे पण त्यातल्या त्यात शुद्ध स्वच्छ कुठले? आभारी आहे.
मला वाटते. तिन्ही शुद्ध आहेत.
मला वाटते. तिन्ही शुद्ध आहेत. आपल्याला भावना किती तीव्र पद्धतीने व्यक्त करावयाच्या आहेत, यावर काय वापरायचे ते अवलंबून आहे. फक्त कितीतरी असे न लिहिता किती तरी असे लिहायला पाहिजे, असे वाटते.
धन्यवाद बेडर. तिन्हीपैकी
धन्यवाद बेडर.
तिन्हीपैकी संस्कृतप्रचुर कुठले आहे?
इशारत की इशरत?
इशारत की इशरत?
लवकर की लौकर?
लवकर की लौकर?
मी रहातो कि राहतो? त्यांचे
मी रहातो कि राहतो?
त्यांचे रहाणे कि राहणे?
>> लवकर की लौकर? लवकर >> मी
>> लवकर की लौकर?
लवकर
>> मी रहातो कि राहतो?
>> त्यांचे रहाणे कि राहणे?
राहणे
दोन्ही बरोबर आहेत.
दोन्ही बरोबर आहेत.
राहणे. राहतो. राहत. राहातो /
राहणे. राहतो. राहत.
राहातो / राहात ही रूपं बोलीभाषेत वापरली जातात. ती आणि रहाणे / रहातो / रहात ही रूपं वापरू नये.
बरं!
बरं!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/12152 इथला नियम क्र. १६ बघावा.
प्रश्नकर्त्याने केवळ योग्य रूप कुठलं हा प्रश्न विचारला आहे. इथे बोलीभाषेचा संबंध नाही.
(No subject)
किती लोक कितीदा एडिटताय? आता
किती लोक कितीदा एडिटताय?

आता मीच एडिटते!
>> राहातो / राहात ही रूपं
>> राहातो / राहात ही रूपं बोलीभाषेत वापरली जातात. ती आणि रहाणे / रहातो / रहात ही रूपं वापरू नये.
अनुमोदन. माझ्या प्रतिक्रियेत चुकून "रहाणे"च शब्द गेला. दुरुस्ती केली आहे.
नोंद घेतली. आपणां सर्वांचे
नोंद घेतली. आपणां सर्वांचे आभार!
एवढे कि एव्हढे? एवढा कि
एवढे कि एव्हढे?
एवढा कि एव्हढा?
एवढे एवढा
एवढे
एवढा
माहिती देण्याकरिता करीता
माहिती देण्याकरिता करीता धन्यवाद!!!
बऱ्याच लोकांना मी बोलताना
बऱ्याच लोकांना मी बोलताना पहातो कि "पेन भेटला, कंगवा भेटला, नोट भेटली, वही भेटली" त्याऐवजी ते पुढीलप्रमाणे हवे ना?
"पेन मिळाला, कंगवा मिळाला, नोट मिळाली, वही मिळाली"
तर लोकं कोणतीही वस्तू मिळण्याला भेटणे शब्द का वापरतात? आणि हा शब्दप्रयोग मी बहुतेक लोकांकडून ऐकतो. का लोकं हा शब्द वापरत असतील? आपल्याला शाळेत तर असं काही शिकवलं नव्हतं! कुठून लोकांना असं बोलायची सवय लागली?
भेटणे हा शब्द सापडण्याला नसून
भेटणे हा शब्द सापडण्याला नसून मिळण्याला वापरला जातो. पेन मिळाला.बाजारात नोटा भेटत नाहीत म्हणजे मिळत नाहीत. वास्तविक भेटतात त्या व्यक्ती मिळतात त्या वस्तू.
तरीपण पाकिटातून नाहीतर
तरीपण पाकिटातून नाहीतर बॉक्सातून 'भेट' देतात नै!
मिळाले - हिंदीत मिले - परत
मिळाले - हिंदीत मिले - परत मराठीत भेटले असं भाषांतर होत असेल कदाचीत.
खानदेशात मिळण्याला भेटणे हा
खानदेशात मिळण्याला भेटणे हा शब्दप्रयोग सर्रास होतो.
हिंदी भाषक पट्ट्याजवळचा प्रदेश असल्याने, दोस्त मिला = मित्र भेटला, चाय मिली = चहा भेटली असे सिंपल रूपांतरण होते. हो. चा पिली का? असं विचारतात. तो चहा ती होतो इकडे.
@ साती, तुमचा 'नै' शब्द
@ साती, तुमचा 'नै' शब्द वाचायला नेहमीच गोड वाटतो.
@ अअअ, आपलं म्हणणं बरोबर आहे. 'सापडण्याच्या' ठिकाणी 'मिळणे' बदल करतोय. धन्यवाद. तरी प्रश्न तोच राहतो. लोकं मिळणेच्याऐवजी भेटणे शब्द का वापरतात?
@ अल्पना, आपले उत्तर संयुक्तिक वाटते. जसे कि हिंदीत "आ रहा है" मराठीत "येऊन राहिलंय" हिंदीत "जा रहा है" मराठीत "जाऊन राहिलंय" तसंच "मिळाले - हिंदीत मिले - परत मराठीत भेटले "
मला वाटते महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील लोकांनी मिळणेकरीता भेटणे हा शब्द रूढ केला असावा.
@ झाडू, धन्यवाद!!! मी सुद्धा
@ झाडू, धन्यवाद!!! मी सुद्धा नेमका हाच प्रतिसाद लिहित होतो.
सजीव भेट्तात,निर्जीव मिळतात.
सजीव भेट्तात,निर्जीव मिळतात.
सजीव भेट्तात,निर्जीव मिळतात.
सजीव भेट्तात,निर्जीव मिळतात. >> हरवलेले सजीव परत सापडतात किंवा मिळतात जसे हरवलेला कुत्रा सापडला
मला खुप वर्षांपासून (माबोवर
मला खुप वर्षांपासून (माबोवर आल्यापासून) एक शंका आहे. इथे अनेकदा "मी पळायला गेलो, रोज पळण्याचा व्यायाम करतो" असा शब्दप्रयोग वाचते. "पळणे" ही माझ्या मते एक रिअॅक्शनरी क्रिया आहे. म्हणजे "कुत्रं मागे लागलं म्हणून तो जोरात पळाला", "पोलीस आल्याची चाहुल लागून चोर पळाला" किंवा "चल, पळ इथून" अशा प्रकारे हे क्रियापद वापरले जाते.
स्वतःहून, स्वयंस्फुर्तपणे मा़णुस "धावतो". त्यामुळे " मी रोज धावायला जाते, मी धावण्याच्या व्यायाम करते" हे बरोबर आहे, असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटतं?
Pages