खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud वास्तविक यादीतल्या पहिल्याच आयटमला तिला आठवतं की पाय ३र्‍या महिन्यात सुजतात. पुढच्या लिस्टची गरजच नव्हती. किती माठ!

मॅथेमॅटिकली चॅलेंज्ड! Biggrin
आणि मला हे कळलं नाही की मॉनिका ला लोणावळ्याला न्यायचं मुळात विक्रांत ने सांगितलंच केव्हा? ती कशी काय तयार झाली आधी? आणि मग म्हणे की मला बॅगेज म्हणून जायचं नाहीये. काहीही. विक्रांत तिला स्पष्टपणे हेही सांगू शकत नाही का, की बाई गं, तुझे काही काम नाहीये तिथे, तू रहा घरीच! तो का तिला दबून वागतो?
लोणावळ्यातल्या (नसलेल्या -अथवा नामशेष झालेल्या) आकर्षणांची यादी वाचत होती.....

आता ती सांगून ऐकणार्‍यातली आहे का?
मागच्या वेळी 'नेत नाही जा' म्हटल्यावर हॉलमधून हाकामारी, मग ड्रायव्हर पाठवला म्हणून गायब आणि त्याला सगळ्यांची बोलणी खायला लावली. त्याच्या एका पेशंटला तिने मारलेच होते.
या वेळी त्याच्याकडे आत्याचा हुकुमी एक्का होता, तो त्याने योग्य वेळी काढला.

थोड्या दिवसांनी विक्रांतला मोनिकामुळे आपल्याच घरी सासुरवास होणार असं दिसतंय.

काल एक नोट केले का .. सेमिनार ला ३ चे नाव रजिस्टर केलेय.. आत्या आणि विक्रांत दोघेच आहेत..सो आता मानसी ची सोय केली बहुदा ...दोघांचे काही करुन जमवायचेय ना

मायबोली वरचे प्रेक्षक हे खरे हुशार आहेत हं!
हे शक्य आहे! मानसीची वर्णी लागणार बहुतेक सेमिनार ला! Happy
आणि काल गीता काकी चा किती टाईमपास दाखवला. मॉनिका बक्की बेरकी आहे. तिला ताकास तूर लागू देत नव्हती! आणि आधी मोनिका मारे म्हणे , "विक्रांत, मी बोलते आईंशी. तुम्ही जा! " आणि नंतर काय बोलली?

'पुढील भागात' मध्ये दाखवलं ऑलरेडी.. निर्मला आत्याने तिसरं बुकिंग मानसीसाठी केलं आहे ते.>>> हो का...म्हणजे आता आत्या ऑफिशिअली च जुळवणार वाटत... तसही तिला ती मोनिका आवडत नाहीच

पण शशिकलेला मानसीही फा ss र आवडत नाही........म्हणजे विक्रांत साठी तर नाहीच नाही!>>>
त्यासाठीच तर चालली ना आता ती सेमिनार ला.. ती तिथे तिच्या हुशारीची चुणुक दाखवणार, सुस्वभावी तर ती आहेच Happy मग अशी सर्वगुणसंपन्न मुलगी आत्याबाईना पसंत पडणार

पण ती अजून डॉक्टरकी शिकतेय ना ?
मग अनुभवी डॉ . बरोबर सेमिनार ला कशाला?
म्हण्जे शिकुन नुकतीच डॉ झाली दाखवली तरी ठीक होतं .

फक्त ऐकायला जाणार हो. पेपर फक्त आत्याबाई वाचणार.

पण मानसी नक्कीच तिकडे काहीतरी ब्रिलियंट मुद्दा मांडणार आणि मोनिका इकडे काहीतरी ब्रिलियंट करणार.

.<< म्हणजे आता आत्या ऑफिशिअली च जुळवणार वाटत... तसही तिला ती मोनिका आवडत नाहीच >> तसं नसावं; मोनिका मानसीवर जळते, हें आत्याबाईनी हेरलं असावं म्हणून त्या आगीत तेल ओतत असाव्यात. पण ही चाल उलटूंही शकते, हें लक्षांत आलं नसावं आत्याबाईंच्या !

डॉक्टरकी अजून शिकत्येय...तीही करस्पाँडंस कोर्सने! >>> करस्पाँडंस कोर्सने? का?

लाल ड्रेस घालून बहुदा पार्टी ला गेलेली दाखवलीय...>>> ती पबमध्ये जाताना दाखवलीय. ती तिकडे जुन्या boyfriend ला ( maybe) फोन करताना दाखवलीय.

मानसी बहुदा करस्पाँडंस कोर्स करत नसावी. मागे ती विक्रांतशी बोलताना म्हणाली होती, 'मी प्रॅक्टिकल्सला जाते आणि बाकीचे जुगाड मैत्रिणीकडुन करते.'

मेडिकल करस्पाँडंस कोर्स सुध्दा करता येतो का?

एवढी मस्त स्टारकास्ट अक्षरशः वाया घालवलीय या शिरेलमधे.
काय तो हिरो काय ती मॉनिका न काय ती आत्या... :रागः

त्याला काय ब्लेड मिळत न्हायी का काय शेव्ह करायला?

करस्पॉंडस कोर्स मी विनोदाने लिहिलेलं. लोक खरं धरून चालले.
तकरस्पॉंडन्सने naturopathy चा डॉक्टर होता येतं. मॉडर्न मेडिसिनचा नाही.

रच्याकने, उच्च न्यायालयाने निकाल दिलाय, गर्भपाताचा निर्णय सर्वस्वी त्या स्त्रीचाच. मोनिकाला सांगा.

रच्याकने, उच्च न्यायालयाने निकाल दिलाय, गर्भपाताचा निर्णय सर्वस्वी त्या स्त्रीचाच. मोनिकाला सांगा.>> आता काय उपयोग?? सगळ्यांना कळलंय की तिच्या प्रेगन्सीचं. आता ती अॅबाॅर्शन करायला गेली तर अलका कुबलला दिला तसा धक्का देऊन उषा आजी तिला घराबाहेर काढतील.

रमड Biggrin

पण आत्या मस्त! मला आवडतंय तिचं काम.
"मोनिकाचं काय हा विचार मला पडत नाही, विक्रांत.." असं अगदी ठेक्यात म्ह्णाली. एकदम ठाम आहे ती!
Happy

बाकी कालच्या एपिसोड मधे विनाकारण टाईमपास - लोणावळा,कणीस खाणं, ड्राईव्हिंग, हास्य विनोद, असं दाखवित बसले. मानसी तरी कणभर डॉक्टर वाटत्ये, पण विक्रांत अजिबात नाही!

बाकी कालच्या एपिसोड मधे विनाकारण टाईमपास - लोणावळा,कणीस खाणं, ड्राईव्हिंग, हास्य विनोद, असं दाखवित बसले. मानसी तरी कणभर डॉक्टर वाटत्ये, पण विक्रांत अजिबात नाही!

>> +१००. साधं गाडीतून कणीस खायला उतरणं इतकं स्लो दाखवलं.. वेळ काढायचा म्हणून किती पाणचटपणा Angry

मानसी तरी कणभर डॉक्टर वाटत्ये, पण विक्रांत अजिबात नाही!>>>>>>>>>>>.ती स्टार्च केल्यासारखी जास्त वाटते.

Pages