खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय महामूर्खपणा आहे! असला नवरा प्रत्यक्षात कुठे असला तर सांगा. लकडीपुलावर जाहीर सत्कार करू!

गीताकाकीने आजीला सांगितले - मोनिका लग्नाच्या दिवशीच प्रेग्नंट होती. आजीने तिला बोलवून विचारले, त्यावर तिने हो. पण हे सगळं विक्रान्तचं काम. त्यानेच मला लपवून ठेवायला सांगितले. मी तर सांगा सांगा म्हणत होते असेही सांगितले.
विक्रान्त आल्यावर कोर्ट भरले. सगळ्यांसमोर आजीने विक्रान्तला विचारले, मोनिका लग्नाच्यावेळी तुझ्यापासून प्रेग्नंट होती का?
मोठा पॉझ घेऊन हो असे सांगितले त्याने.

यावेळी प्रत्येक पात्राचे टाइट क्लोजप तीन तीन अँगलमधून घ्यायची संधी सोडली दिग्दर्शकाने.

आजी पण महान , स्वतःच्या नातवावर विश्वास ठेवायच्या ऐवजी , काल आलेल्या मुलीवर विश्वास ठेवला.
गीताकाकीला पण आजोबानी एवढी हिस्ट्री सांगितल्यावर , मोनाबद्दल जराही संशय येउ नये.

नातवावर काय विश्वास... ? तोही होच म्हणतोय की! Happy

वादळवाट चा विषय निघाला म्हणून सांगत्ये..की ती सत्यजित ची बायको...तिचं काय नाव होतं बरं..तर तिला आधी मूल होणार नसल्याचं डॉक्टरांनी कंफर्म केलं असतं..पण मग बरीच भवती नभवती होऊन ती घरातून पळून जाते, नदीत उडी घेते, पाण्यात वाहत जाऊन एका कोळ्याला ( बहुतेक) सापडते, व ती प्रेग्न्ट असल्याचं निष्पन्न होतं. तेही असंच वादग्रस्त होतं...कारण त्या सत्याला म्हणे मूल होण शक्य नसतं...वगैरे. पण समहाऊ ते शेवटी 'जायज'.. केलं बुवा प्रूव्ह डायरेक्टरने ! आणि रमा दत्तक असते त्यात त्या ऊर्मी च्या आजीचा हात असतो. ती या कामात तरबेज असलेली डॉक्टरीण दाखवलीये. म्हणजे मुलं पळवून त्यांना दत्तक देणे वगैरे! Happy

अरे राम, उर्मिची आजी त्या वादळवाट मधे होती का ? मला समर आठवतोय आणि चिमा. सुबोध भावे छान दिसायचा त्यात.

यॅस मुलं पळवून नेण्याबद्दल अंधुकस आठवतयं पण मग रमा त्यातली आहे हे कस कळतं ? ती तर केतकर काकांची पुतणी असते आणि प्रसाद ओक आश्रित टाईप असतो.

मला तिने रमा ला का दत्तक दिलं असतं व ते कसं कळतं ते आठवत नाही.
सुबोध भावे तर बेस्टच दिसायचा....!! तो काहीतरी अंडरवर्ल्र्ड चा डॉन असतो...पण एकदम सॉफिस्टीकेटेड, मृदूभाषी!

Rama केतकर काकांची पुतणी असते,
तिच्या आई च्या मृत्यूनंतर तिचे वडील, केट काकांचा मोठा भाऊ, संन्यास घेऊन घरातून जातो, म्हणून ती केट काकांकडे वाढते, आणि काका तिला मुलगी मानतात

चिमाने पण भारी काम केलं त्यात. त्या रमालाच कळत नव्हतं कोणावर प्रेम आहे तिचं. आधी अक्षय पेंडसेमध्ये गुंतली, तो गेल्यावर समर मध्ये मग सुबोधमध्ये.

नाव नाही आठवत पण ट्रेनमधल्या मुलीबरोबर घडलेल्या वाईट घटनेचा साक्षीदार असतो, तेव्हा प्रतिकार नाही केला याचं त्याला दु:ख असतं.

अरे ए मुलींनो.. वादळवाटमध्ये ती डाॅ. मुलं पळवून दत्तक देत नसते.
एक महिला आधाराश्रम असतो ना. बहुतेक चौधरींनीच चालवलेला तर त्यात ज्या मुली फसवल्या गेलेल्या अशा आलेल्या असतात. आणि इथे हि डाॅ. बाई गायनॅक असते. चौधरींच्याच हाॅस्पिटलमध्ये. तर तिच्याकडे ज्या बायका इनफर्टिलिटीसाठीच्या ट्रिटमेंटसाठी येतात अन् ज्यांना कोणत्याही कारणाने मुलं होणं शक्य नसतं अशा फक्त बाईच्या आणि आश्रमात आलेल्या प्रेगनंट मुलीच्या संमतीने ती मुलं बदली करण्याचे काम करत असते. म्हणजे जसं प्रेगनंसीमध्ये पोट वाढत जाईल तसं त्या आई होऊ न शकणार्‍या बाईच्या पोटावर चिंध्या बांधून ती प्रेग्नंट असल्याचं भासवायची आणि आश्रमातल्या मुलीच्या डिलिव्हरीवेळी हिचीही डिलिव्हरी झाल्याची दाखवून तिचं मुलं हिच्या ताब्यात देत असे.
अशी बदली केलेली रमा ही पहिली मुलगी / बाळ असते.
डाॅ. च्या या कारनाम्याचा सुगावा देवराम खंडागळेला लागतो. आणि चौधरी किती नीच आहेत हे दाखवण्यासाठी तो ही बातमी फोडतो. मग डाॅ. शी बोलायला गेलेली रमा हे कधीपासून चाललय विचारते तर डाॅ. सांगते की बदलली गेलेली तू पहिली मुलगी आहेस. हे कळल्यामुळेच रमाचा बाबा/ आबासहेबांचा भाऊ संन्यास घेऊन निघून गेलेला असतो.

विक्रान्त आल्यावर कोर्ट भरले. सगळ्यांसमोर आजीने विक्रान्तला विचारले, मोनिका लग्नाच्यावेळी तुझ्यापासून प्रेग्नंट होती का?>>> हे प्रश्न विचारताना आवाज असा घुमवला होता ना,आणि आजी ताठच्या ताठ उभ राहून हे विचारत होती की, मी एखादी horror सिरियल बघते कि काय असा भास होत होता. Lol

मोठा पॉझ घेऊन हो असे सांगितले त्याने.>>> अजून हो नाही म्हणाला, आज हो म्हणणार आहे तो. मुर्खच आहे विक्रान्त. Angry

खरतर आधी आजीने आधी निर्मलाला फोन करुन बोलवायला हव होत, नन्तर विक्रान्तला,म्हणजे दुध का दुध, पानी का पानी नक्कीच झाल असत.

विक्रान्त-मोनिकाचे लग्न अरेन्जड आहे ना? मग मोनिका अस कस म्हणु शकते की, लग्नाआधी आमची मैत्री झाली, आम्ही एकमेकान्ना आवडू लागलो, नन्तर आम्ही जवळ आलो वै वै. मोनिकाच्या स्टोरी(खोटी असली तरीही) प्रमाणे मग ते लव marriage होईल ना? Uhoh

निधी....हो हो.....:खोखो:
वादळवाट आत्ता नीट आठवलं...... सोहम- विशाखा, भास्कर व त्याची बायको, अजून एक बहिण असते तिचं नाव विसरले व ऊर्मी च्या सासूबाई (वाशाची आई) .... आणि देवराम खंडागळे....तो मात्र नक्कीच शरद पोंक्षे होता हं...गॅरंटीने! जै मल्हार सारखं कंफ्युजन नकोय Happy

काल आज्जीनी शिक्षा काय सुनावली तर विक्रांतशी कुणी बोलायच नाही, गुन्हा काय शिक्षा काय Uhoh

पण त्या शिक्षेतून मोनिकाला सूट दिलीय ही आणखी मोठी शिक्षा.
बरं हे सगळं तो आत्यालाही सांगणार नाही.
मोनिकाचं कॅरॅक्टर जास्तच डार्क दाखवताहेत. तिच्याबद्दल प्रेक्षकांना जराही सहानुभूती वाटू नये इतकं.
पण अशात खरी मजा येत नाही.

ति मोनिकाची बहिण जरा जास्तच भोचकपणा करतेय अस नाही का वाटत? सगळे नेहमीसारखे रियॅक्ट नाही झाले, वादळापुर्वीची शांतता वगैरे. हिला काय करायचय, घेतील बघुन ते काय असेल ते.

मला विक्रांतचा जाहीर सत्कार (तेही शनिवार वाड्यात) करण्याची कल्पना आवडली.
खरेच असा कुठला नवरा करेल का आणि कशासाठी करेल?

शनिवार्वाड्यावर नको तिथे आता पार्किंगची सोय नाहिये आपण नदीपात्रातल्या रस्त्यावर करु म्हणजे वरती पुलावर उभे राहुन देखिल लोक बघु शकतील. Lol

पण एक अट ठेवू- विक्रांतला सत्काराला उत्तर द्यावे लागेल आणि कोणताही पॉज न घेता सलग एक तास बोलावे लागेल! Proud

खरतर आधी आजीने आधी निर्मलाला फोन करुन बोलवायला हव होत>>> हो ना . निआत्याने पण चेक अप केलं ना मोनाचं आणि आजीला सांगितलेलं की अप्रिल आहे डेलिवरी डेट.

विक्रान्त-मोनिकाचे लग्न अरेन्जड आहे ना? मग मोनिका अस कस म्हणु शकते की, लग्नाआधी आमची मैत्री झाली, आम्ही एकमेकान्ना आवडू लागलो, नन्तर आम्ही जवळ आलो वै वै. मोनिकाच्या स्टोरी(खोटी असली तरीही) प्रमाणे मग ते लव marriage होईल ना? >> हो ना
लेखकाची स्मरणशक्ति भलतीच कमकुवत आहे.. मानसी परवा तर college मधे जुगाड लावून लोणावळ्याला गेली होती.. आणि काल लगेच MBBS पण झाली..!! leap वगैरे घेतलाय का मध्येच?

MBBS व्हायला किती वर्ष लागतात आणि यांच्यात एक दोन महिन्यात क्रॅश कोर्स केल्याप्रमाणे डॉक्टर होतात. खरंच झी च आणि क्यालेंडरच वैर आहे बहुदा.

मानसीला ते फार दिवस शिकवत ठेवणं वगैरे यांना परवडलं नसणार..पुढील कथेच्या दृष्टीने...ती आता फ्री झाली ना...... आत्या कडे जॉइन व्हायला, विक्रांत ला कंपनी द्यायला, तै ला समजावयाला, आणि दळवींच्या हरी यायला.....

Pages