खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, अजिबात सहानुभूती वाटत नाही त्याच्याबद्दल......अशी कोणती अगतिकता आहे दरवेळी नमतं घेण्या सारखी..?
बहुदा त्याला स्वतःलाच मूल होणं शक्य नसेल (आणि) हे त्याला माहितीये..आता अनायासे ती आहेच प्रेग्नंट तर कंटिन्यू...असं त्याने ठरवलं असेल...... Happy

आजीने विक्रान्तला दिलेली शिक्षा निलिमाला सुद्दा लागु केली कि काय? फोन केला तर कुणीही तिच्याशी बोलायला तयार नाही? ती कुणी परकी आहे का?

आज मोनिकाच्या केसाचा अवतार होता. हेअर स्टायलिस्ट सुट्टीवर गेली वाटत. Lol

मोहनने ज्या लेडी doctor ला घरी यायला फोन केला ती तिच आहे ना, जिच्याकडे मोनिका abortion करायला गेली होती? जिने मोनिकावर कागदाचा बोळा फेकला होता? Uhoh

या सिरियलचं टायटल साँग कसलं गोड आहे... प्लस सँड आर्ट>>>>>>>>>>> आणि प्लस प्लस प्लस माय फेव्हरीट श्रेया घोषाल>>>>> +१००००००

बहुदा त्याला स्वतःलाच मूल होणं शक्य नसेल (आणि) हे त्याला माहितीये..>>> बहुधा हाच मेन suspense असेल सिरीयलचा. काही महीन्यानन्तर उघड होईल ते.

मोहनने ज्या लेडी doctor ला घरी यायला फोन केला ती तिच आहे ना, जिच्याकडे मोनिका abortion करायला गेली होती? जिने मोनिकावर कागदाचा बोळा फेकला होता?>> हो, मला पण तीच वाटली ती. आणि मोहनने तिला घरी बोलावलेय. म्हणजे कैतरी लोच्या होणारसं दिसतंय.

<आजीने विक्रान्तला दिलेली शिक्षा निलिमाला सुद्दा लागु केली कि काय? फोन केला तर कुणीही तिच्याशी बोलायला तयार नाही? ती कुणी परकी आहे का? > ही गोष्ट या चार भिंतींच्या बाहेर जायला नको असा आजीने दम दिलाय.

ती कुणी परकी आहे का?>>> पण निर्मला म्हणजे शशिकला नव्हे,जी बाहेर जाऊन बोभाटा करील. आणि ति त्या घराची मुलगी आहे, कुणी परकी नाही. सो, तिला सत्य जाणून घ्यायचा पुर्ण हक्क आहे.

आजीने सांगितलं आहे ना घराबाहेर कोणाला कळता कामा नये. म्हणून निर्मलाला पण नसेल कळू द्यायचं. ही लेडी डॉक्टर आजीने बोलावली असणार.

बहुदा त्याला स्वतःलाच मूल होणं शक्य नसेल (आणि) हे त्याला माहितीये..>>> बहुधा हाच मेन suspense असेल सिरीयलचा. काही महीन्यानन्तर उघड होईल ते.

>> मग 'खुलता कळी खुलेना' ला वेगळाच अर्थ प्राप्त होतो एकदम. Uhoh

हायला मधेच निलिमा कुठुन आली?
कळलं कळलं निर्मला चं चुकुन निलिमा लिहिलंय Happy

बाकी सिरेल अतिच्शय फाल्तु आहे.

नशीब मोनिकाचे स्वयमपाक कौशल्य (?) बघून आजीने टिपीकल dialogues झाडले नाही," स्वयमपाक करणे बाईच(च) कर्तव्य असत, स्त्री ही अन्नपुर्णा असते. तु एक स्त्री असून तुला स्वयमपाक करता येत नाही." वै वै.

मालिका पुढे सरकतच नाहीए. फक्त विक्रान्त आणि मानसी हळू हळू एकमेकांकडे सरकताहेत. मोनिकाच्या डिलिव्हरीपर्यंत हे नवरात्र, दसरा, दिवाळी करत बसणार का? तेही सुतकी चेहर्‍याने?

निर्मला आत्या सुद्धा कल्प्रिट आहे आजीच्या नजरेत. तिनेच डिलिव्हरीची तारीख आजीला सांगितलेली.

परवा मानसीने छान उत्तर दिल मोनिकाला फोनवर. जशास तसे.<<< काय म्हणाली ती?>>> मोनिका तिला घरी मदतीसाठी, रेसिपीज शिकून घेण्यासाठी बोलावते. आधी मात्र तिला हि हिडिस-फिडिस करुन घरातून हाकलून द्यायची. तेच मानसीला खटकल. ती फोनवर म्हणाली," आधी तुला माझी लुडबुड नको होती ना तुझ्या घरात, मग आता कशाला मला बोलावतेस? मी नाही येणार जा."

मालिका पुढे सरकतच नाहीए. फक्त विक्रान्त आणि मानसी हळू हळू एकमेकांकडे सरकताहेत. >>>>:हहगलो:

निर्मला आत्या सुद्धा कल्प्रिट आहे आजीच्या नजरेत. तिनेच डिलिव्हरीची तारीख आजीला सांगितलेली.>>> तेच तर, म्हणुन तर सगळे बोलत नाही तिच्याशी. तिला सुद्दा शिक्षा दिलीये आजीने.

काल पण मस्त सुनावल मानसीने त्या मोनिकाला आणि विक्रांतने सुद्धा.

बाकी तिच पात्र फारच नकारात्मक दाखवताहेत.

सध्या काय चालू आहे? >>>>>>>>

१. सरकणे - विक्रांत चे मानसी कडे
२. काड्या घालणे - मोनिकाचे अगबाईंकडे
३. पाट्या टाकणे - बाकी इतर कलाकारांचे

या पलिकडे फारसं काहीच घडत नाहिये इथे

आणि आता तर प्रत्येक मालिकेत नायक नायिकेचं 'मला पाहा आणि फुलं वाहा' कार्यक्रम सुरु आहे...झी गौरव पुरस्काराच्या निमित्ताने....

Pages