खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण माझ्या मते, काल विक्रांत पहिल्यांदाच असं म्हणाला की तो हे मूल त्यांचं म्हणून स्वीकारणार आहे व सगळ्यांना तसं सांगणार आहे.....जेव्हा की इथे लोक ते तो आधीच म्हणाल्याचं सांगताहेत!

अगं चिंचे, तो जेव्हा माॅनिकाला पहिल्यांदा ती प्रेग्नंट असल्याचं विचारतो, तेव्हाच तो तिला सांगतो की लग्नात दिलेल्या वचनाप्रमाणे तुला आणि न दिलेल्या वचनाप्रमाणे बाळाला तो आयुष्यभर सांभाळणार आहे असं काहिसं. वाक्य थोडं वेगळं असू शकतं.. आत्ता नेमकं आठवेना.
आणि परवाच्या एका एपित पण तो स्पष्टच सांगतो की, तुला नको असणारं बाळ मी सांभाळणार आहे म्हणून. मी तरी पाहिलं ते.
कालचा भाग नाही पाहिला मी.

इथे कलाची निर्मला झालीये. पण कलाच बरं वाटतं. Happy
कलाबाई 'गोष्ट सांगते छोट्टुशी बाई छोट्टुशी' म्हणताना मानेला झटके देत होत्या. Lol

सो मोनिकाचा गर्भपात न करण्याची मला उमजलेली कारणे:
१. तिचे ३.५ महिने झाले आहेत, त्यानंतर गर्भपातासाठी नवर्‍याचीही परवानगी लागते हा कायदा आणि विक्रांत ती परवानगी देणार नाही. त्यामुळे नुसत्या मोनिकाच्या इच्छेनुसार आता गर्भपात शक्य नाही.
२. आत्याबरोबर गुप्तपणे ते करायचे म्हटले तरी जिवाला धोका आहे त्यामुळे ते शक्य नाही.
३. विक्रांतने मोनिकाचे रहस्य उघड करायचे किंवा घटस्फोट द्यायचे ठरवले तर मोनिका गर्भपात करून आपल्या/बाळाच्या जिवाचे बरेवाईट करू शकते जे विक्रांतच्या एथिकल स्वभावात बसत नाही, त्यामुळे मोनिकावर सक्त पाळत आहे.
४. एकूण, बाळाला जन्म देणे आणि विक्रांतने ते आपले म्हणून सांभाळणे अशा गोष्टी आता घडणार आहेत!

हुश्श!! लागले एकदाचे संदर्भासहित स्पष्टीकरण Happy

मोनिका गर्भपात करून आपल्या/बाळाच्या जिवाचे बरेवाईट करू शकते जे विक्रांतच्या एथिकल स्वभावात बसत नाही, त्यामुळे मोनिकावर सक्त पाळत आहे.>>> मोनिकावर त्याचे प्रेम नाही, फक्त त्याच्या 'एथिकल स्वभावात बसत नाही म्हणून तो तिच्यावर पाळ्त ठेवणार आहे. त्यापेक्षा तिला तो सोडून का देत नाही, तिच्या जीवाची तिलाच पर्वा नाही, तर त्याने का करावी?

नवीन प्रोमो

अहो वहिनी, उलटी होतेय, मळमळतय, चक्कर येतेय, तिखट खावस वाटतय, कुछ समझे क्याया आप? इति गीताकाकू
अय्या म्हणजे गुड न्यूज? म्हणजे मी आजी होणार? इति सासूबाई

Monika mazi jau aahe...Abhidnya Bhave Atitkar >> अभिज्ञा छान दिसते खरंच.. ग्रेसफुल वाटते. निगेटिव्ह रोल मध्ये आहे म्हणून ती बाकीच्यांना चांगली वाटत नसेल तर माहित नाही..
खरं तर लीड हिरो हिरवीन सोडले तर सगळेच छान करतात ऍक्टिंग...
(अर्थात काहींचा अभिनय डोक्यात जातो ती गोष्ट वेगळी.. Proud )

तो हिरो कसला मख्ख चेहर्‍याचा आहे, मख्खिलाल आहे अगदी, सध्या नविन्च आलेल्या दोन्हीतली जास्त इरिटेटिन्ग कोणती अस असाव बहुधा ते!

जे मालिका बघतायेत त्या बऱ्याच जणांना नायिकेपेक्षा अभिज्ञा आवडतेय (परवा भाऊ-बहिण पण म्हणाले). मी बघत नाही पण मी मागेच लिहिलंय की अभिज्ञा दिसते सुंदर. ती लगोरीमध्ये व्हिलन नव्हती बाकी व्हिलनच दाखवतात तिला. लगोरी काही भाग बघितले होते. लगोरीमध्ये ह्या सिरीयलपेक्षा छान दिसत होती.

mala kay vaatat mahitiye? bahutek vikrant madhech kahitari problem asava mhanje toh baap hou shakat nasava mhanun toh monika cha mulala sambhalayla ready zhalay. mhanje tyala mothepana pan milela aani tyachatla dosh pan ughadkis yenaar nahi

हेमाताई नाही ती वेगळी, अभिज्ञा मोनिका झालीय ना. माधवी नेमकर सध्या पुढचं पाऊल मधे काम करतेय.

काल मानसी ताईच्या खोलीत, विक्रांत ची एन्ट्री, मानसीला पाहून आधी २-३ मिनिटं बघतच राहतो मग विचारतो तु कधी आलीस... Uhoh त्यासाठी आधी २-३ मिनिटं बघत बसायची काय गरजे?

आजी ड्यांजर आहेत. Fbi मध्ये होत्या वाटतं आधी>>> नाही, पवित्र रिश्ता मध्ये होत्या. तो ड्यांजरपना तेव्हापासूनचा.

अरे..हा साई प्रसाद महणून तरी जरा बरा अभिनय करत होता..हसायचा तरी छान मनमोकळं...रजनी मॅडम सोबत!
आता म्हणजे अगदीच ऑकवर्ड वागतोय. म्हणजे त्याला काही खंबीर विचार आणि डिसीजन आहे असे वाटत नाही.
सारखा आपलं मुकं मुकं, संकोचून, दबून वावरतोय
अभिज्ञा चा राग आला तरी ती काम छानच करत्ये.

आजी (उषा नाडकर्णी)च्या मराठीला काय झालं? तू विसरली, तू जेवला हे काय? स कुठे गेले?

--
ज्याची बायको लग्नाआधीच प्रेग्नंट आहे , हे त्याला घरच्या मंडळींना कळू द्यायचं नाहीए, या वरताण म्हणून ती बायको शक्य त्या सगळ्या प्रकारचे गोंधळ घालतेय, अशा नवर्‍याने प्रसन्न हसतमुख राहावे ही अपेक्षा जरा जास्त नाही का?
नक्की कुठे खंबीर विचार नाहीत? बायकोची बदनामी होऊ नये, तिचा गर्भ मारला जाऊ नये हे त्याने पहिल्यापासूनच ठरवलेलं. मुलाच्या बाबत घरच्यांना काय, कधी सांगायचं हे ठरवायला वेळ लागला. पण इतक्या मोठ्या मुद्द्यावर ते साहजिक आहे.
अजूनही ती किती महिन्यांची प्रेग्नंट आहे ते सांगितलं नाही, म्हणजे पुढे प्रिमॅच्युअर डिलिव्हरी असं सांगण्याची शक्यता आहे.

शिवाय त्याचं हे असं घुम्यासारखं वागणं लेखक दिग्दर्शकाने ठरवलेलं दिसतंय. आजी त्याला म्हणते, ही बघ कसं बोलून मोकळी होते. तू बोलतच नाहीस., इ.

आजी (उषा नाडकर्णी)च्या मराठीला काय झालं?>>> हिन्दी मध्ये सतत काम केल्यावर असच होत सर्वान्च(अपवाद नाना पाटेकर आणि सचिन ).

मोनीकाच्या आजीआजोबांचे घर बघून अगदी, 'वागले की दुनीया' चे घर आठवले. तीच दाराची दिशा, खिडकीची जागा, डायनिंग टेबलाची जागा. का कोण जाणे Happy

प्रिमॅचुअर डिलीव्हरी दाखवणार ठीक आहे, पण आता काही महीन्यातच तिचं पोट दिसू लागेल, घरात इतक्या अनुभवी बायकांना शंका नाही का येणार ?

Pages