Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला एक कळत नाही. मॉनि का
मला एक कळत नाही. मॉनि का सोडून घरात अजुन ३ बायका आहेत, त्या पण चांगला संसार करून मुरलेल्या, तरिही त्यांना या नव्या सुनेच्या लक्षणावरून ती प्रेग्नंट असावी असा साधा संशय सुद्धा येत नाही?
मोनिका सारखी अजारी पडते, सारखी अजारी पडते इतकंच बोलतात, बाकी खोलात जाऊन तिला नक्की झालंय काय याची चौकशी कुणीच करत नाही.
विक्रांत आडमुठे पणाने वागतोय.. धड वागत नाही आणि तिला सोडवत नाही.. कथालेखकाला नक्की काय अपेक्षित आहे?
काल तिला चक्कर आली तर घरदार
काल तिला चक्कर आली तर घरदार सगळे हॉस्पिटलमधे जातील मग डॉक्टर गुपित सांगतिलं असं वाटलं होत .. पण पुढ्च्या भागातल्या प्रोमोत हेच तिघे विक्रांत / आत्या/ तिची बहीण एवढेच लोक तिथे!
ही सिरीयल मी अजीबात बघत नाही,
ही सिरीयल मी अजीबात बघत नाही, पण सध्या तरी उदंड प्रतीसादांवरुन हा बाफ बघीतला. ती मोनिका दिसायला पण केवढी उग्र आणी खप्पड दिसते.( दिसण्याच्या या कमेंट वरुन सॉरी, पण ती सॉलिड डोक्यात जाते) ती अस्मिताच्या ५-६ एपिसोड मध्ये होती, ज्यात तिचा खून होतो. त्यामानाने ती मानसी बरी. प्रोमोत पाहिली तेवढीच.
रश्मी .. खरेच ती खप्पड आणि
रश्मी ..
खरेच ती खप्पड आणि उग्र, रागीट व अहंकारी वाटते.
हसते तेही कनिंगली.
काय त्या विक्रांत ला आवडत्ये कुणास ठाऊक!
विक्रांत कान्हा मुव्ही च्या
विक्रांत कान्हा मुव्ही च्या ट्रेलर मध्ये दिसला.
परवा या मालिकेचा एक सीन
परवा या मालिकेचा एक सीन पाहिला. त्या दळवींच्या घरच्या हॉलमधे जिकडे-तिकडे शोभेच्या किती वस्तू ठेवलेल्या आहेत !! भिंतींवर, शोकेसमधे, शोकेसवर, टीव्हीच्या वरती, बाजूला.... म्युझियममधे असल्यासारखं वाटलं! टीव्हीच्या मागे पिवळा दिवा
आणि ती धाक टी काकू कायम
आणि ती धाक टी काकू कायम स्टेरॉइड वर असल्याप्रमाणे नॉर्मल वागते. भैताड. विक्रांतचा थंड पणा लक्षात येत नाही वाट्टॅ. अन त्या अग्गो बाई ढग्गो बाई. कायम खाण्याचेच. घर मोठे आहे त्यामुळे कायम कोणाला तरी चहा नेउन देत असतात. मुलींचे माहेर तर आहे चाळीत. मग ही सोयरीक जमली कशी म्हणे. क्याच्याक्या.
काल चुकून हि सिरीयल लावायला
काल चुकून हि सिरीयल लावायला लागली, घरी भावंडं आली होती, त्यांना बघायची होती. छोट्या भाचीचं गाणं तोंडपाठ, ५ वर्षाची आहे. बहिण टीव्ही बघत नाही जास्त, लेक तिची बऱ्याचदा आमच्या आईकडे असते आणि बघते. बहिणीला म्हणाले बायगो हिला ह्या मालिका दाखवू नकोस, टायटल सॉंग बेस्ट. ते झाल्यावर बंद करत जा. तिला एरवीचे तिच्या आवडीचं पोगो वगैरे बघुदे.
काय चालू होतं काही धड कळलंच नाही मला. ती जान्हवीची आई इथे मला नाही आवडली. गुंतता आणि शशिकला म्हणून आवडली होती.
ते नवरे सेम त्या दुरावा सिरीयलच्या टोनातच इथेपण बोलतात.
नॉर्मल..? म्हणजे काय? मला तर
नॉर्मल..? म्हणजे काय? मला तर आवडतं कस्तुरीचं काम
आणि चहा कोण नेऊन देत असतं सारखं?
मॉनिका चे माहेर चाळीत आहे?
नाही! मलातर छान बंगला दिसला एकदा निर्मला आत्याने तिकडून गाडी आणली तेव्हा.........
सर्वात ती शर्वरी लोहोकरे फार
सर्वात ती शर्वरी लोहोकरे फार सहज काम करते आणि तीच आवडली मला. अर्थात पहिला एपिसोड आणि कालचा एपिसोड असे दोन बघून मी विधान केलंय.
लले, लोकांना आपापली घरं
लले, लोकांना आपापली घरं आपापल्या आवडीप्रमाणे सजवू देत की.. दळवींना घरात म्युझियम आणि टिव्हीच्या मागे पिवळा दिवा आवडत असेल, तुला काय प्रॉब्लेम आहे?
अन्जू, त्या नवर्यांना सगळीच कामं अशी भोचक माणसाची मिळतात. 'रमा माधव' सिनेमातही त्यांची भूमिका अशीच आगलावी होती.
शर्वरी मलाही आवडली या मालिकेत.. लोकेश गुप्तेही नेहमीप्रमाणे सहज अभिनय करतोय.
फक्त ती मानसी झालेली अभिनेत्री एकतर गालावरच्या खळ्या दाखवत इम्प्रेशन पाडत बोलते नाहीतर शंभरेक किलो काळजी तोंडावर घेऊन वावरते. बाकी दुसरे कुठले भाव चेहर्यावर नाहीतच.
मोनिकाचा खरा डाव हा होता की
मोनिकाचा खरा डाव हा होता की खेळात नाचून नाचून मूल पाडायचे, तिचा तो डाव यशस्वी झाला की नाही ते आज कळेल. नाहीतर मोनिका सारखी MBA झालेली modern मुलगी मन्गळागौरी सारख्या खेळात भाग का घेईल?
आश्चर्य म्हणजे, मोनिका मन्गळागौरीचे खेळ perfectly खेळते! कुठून आणि कधी शिकली हे सर्व? जर मोनिका आधुनिक मुलगी दाखवलीय तर तिला जमलच नसत ना, इथेच तिचे character मार खातेय. मला तर तिच्यापेक्षा मानसीच जास्त uninterested वाटली खेळात.
नाही! मलातर छान बंगला दिसला
नाही! मलातर छान बंगला दिसला एकदा निर्मला आत्याने तिकडून गाडी आणली तेव्हा.........>>>> नाही, शुक्रवार च्या एपिसोड मध्ये चाळ दाखवली होती.
सर्वात ती शर्वरी लोहोकरे फार सहज काम करते आणि तीच आवडली मला. >>> मला सुद्दा
मुलींचे माहेर तर आहे चाळीत.
मुलींचे माहेर तर आहे चाळीत. मग ही सोयरीक जमली कशी म्हणे.>>> पहील्या एपिसोड मध्ये विक्रान्तची आजी म्हणते ना, आम्हाला श्रीमन्त मुलगी नको , सन्सकारी मुलगी हवी ( मोनिका आणि सन्सकारी?)
काय त्या विक्रांत ला आवडत्ये कुणास ठाऊक!>>> विक्रान्तला मोनिका आवडते? त्याच्या वागण्यावरुन तरी तस दिसत नाही बुवा.
त्यांच्या घरातल्या शोभेच्या
त्यांच्या घरातल्या शोभेच्या वस्तू बघून मलाही घेरी यायची बाकी होती बरे पसारे आवरतात यांच्याकडे!
बाकी सिरिअल टोटल गंडली आहे. फक्त लोकेश गुप्ते (केवढा सुटलाय!) आणि शर्वरी लोहकरे हेच छान!
एवढ्या फुगड्या घालून काहीच
एवढ्या फुगड्या घालून काहीच झालं नाही.
मानसी मराठी मालिकेतली नायिका वाटण्यापेक्षा हिंदी सिनेमातली डेब्युटंट हिरोईन वाटते. छान छान कपडे, हेअर स्टाइल, प्रयत्नपूर्वक म्हटलेले संवाद.
काल मानसी विक्रांतमधले काही नि:शब्द क्षण बरे वाटत होते. पण बॅकग्राउंडला वाजणारी आलापी रादर हालापी भयानक आहे.
हो...बॅकग्राऊंड म्युझिक भयानक
हो...बॅकग्राऊंड म्युझिक भयानक आहे! कुणी विव्हळत आहे असा भास होतो! भेसूर पणे....
ते ताबडतोब बदलायला हवेय.
ते ताबडतोब बदलायला हवेय>
ते ताबडतोब बदलायला हवेय>
मोनिका मन्गळागौरीचे खेळ
मोनिका मन्गळागौरीचे खेळ perfectly खेळते! कुठून आणि कधी शिकली हे सर्व? > +१ लग्नानंतर उखाणा घेताना अगदीच निर्बुद्ध आणि आता एक्दम सांस्क्रुतिक खेळ? गोड दिसत होती पण प्रोमो मधे मन्गळागौरी च्या.
मोनिका ने आदल्याच दिवशी
मोनिका ने आदल्याच दिवशी काकेसासूकडून सगळे खेळ शिकून घेतलेले
काल काय झालं शिरेलीत ? काहीच
काल काय झालं शिरेलीत ?
काहीच घडलं नसेल अॅक्चुली... हो ना?
<<सगळे भाग पाहिले असते तर असे
<<सगळे भाग पाहिले असते तर असे प्रश्न पडले नसते>> हो ना
सध्या कुठल्याच मालिका सगळे भाग बघण्याच्या लायकीच्या नाहीयेत . मायबोलीवरच्या ह्या सगळ्या मालिकेनाबद्दलच्या कॉमेंट्स वाचते किव्वा नाही पण . बस पुरत तेवढं
पण ही प्रेग्नंट आहे हे
पण ही प्रेग्नंट आहे हे घरच्याना दारच्याना कळले तर सिरियल संपेलच का, कारण बाकी काहीच दाखवत नाहीत आणि हा विषय किती वाढवणार! की हे होसूमीयाघ सारखेच दोन वर्षे चालेल का?
मोनिकाच कॅरॅक्टर नाही आवडत..
मोनिकाच कॅरॅक्टर नाही आवडत.. पण ती दिसते छान आणि ऍक्टिंग पण छान करते. मानसी पेक्षा तरी मला तीच चांगली वाटते बा.. मानसी आपली डायलॉग पाठ केल्यासारखे म्हणते... सहज अभिनय नाही वाटत. विक्रांतविषयी तर काहीही न बोललेलंच बरंय
मोनिका ने आदल्याच दिवशी
मोनिका ने आदल्याच दिवशी काकेसासूकडून सगळे खेळ शिकून घेतलेले>>> तसे काही दाखवलेले काही आठवत नाही. पण काके सासू बरोबर सराव करण्या आधीच मोनिका आपल्या खोलीत नाचत होती.
हे होसूमीयाघ सारखेच दोन वर्षे
हे होसूमीयाघ सारखेच दोन वर्षे चालेल का?>> दु:स्वप्न!
आवरा रे... शशीकलाबाई पण इथे येऊन जास्त हळूबाई झाल्या आहेत..गेले ४ एपिसोड फक्त ५ मिनिटं शोधतायत बिंग फोडायला...
आमच्या टीव्हीत मोनिका आदल्या
आमच्या टीव्हीत मोनिका आदल्या दिवशी काकेसासूबरोबर फुगड्या घालताना दाखवली. काकेसासूबाईंनी कामंही मानसीवर ढकललेली. आता सगळी practice दाखवली तर आठवडा लागला असता.
आमच्या टीव्हीत मोनिका आदल्या
आमच्या टीव्हीत मोनिका आदल्या दिवशी काकेसासूबरोबर फुगड्या घालताना दाखवली. काकेसासूबाईंनी कामंही मानसीवर ढकललेली. आता सगळी practice दाखवली तर आठवडा लागला असता.
आजच्या भागाच्या शेवटी,
आजच्या भागाच्या शेवटी, 'पुढील भागात' ची झलक दाखवतात त्यात विक्रांत आत्याला सांगतो की मी तुझं वचन पाळणार आहे आणि आधी मॉनिकाच्या घरच्यांना सांगणार आहे. मग म्हणतो की आपल्या घरातल्यांनाही सांगणार की ती प्रेग्नंट आहे आणि ते मूल आमचं आहे
म्हणजे सिरियल संपणारच्की मग बहुधा मानसी आणि विक्रांत प्रेमात पडणार.
दक्षु मी ऑलरेडी स्टोरी
दक्षु मी ऑलरेडी स्टोरी प्रेडीक्ट केली आहे
>>> सारीका | 10 August, 2016 - 18:07
मी फुडची इष्टोरी सांगते
मोनिकाचं बिंग फुटेल न फुटेल असं नाटक होऊन एकदाची मोनिका प्रेग्नंट आहे हे समजणार, घरात्ल्यांना ते विक्रांतचं मूल आहे असं वाटणार मग थोडेकौतुक सोहळे, नंतर तिची प्रिमॅचुअर डिलीव्हरी झाली असे सांगून बाळ फायनली जन्माला येणार, मोनिका बाळाची जवाबदारी नको म्हणून घर सोडून जाणार, मग माय मरो मावशी जगो या म्हणीप्रमाणे मानसी दळवींकडे बाळ सांभाळायला येणार मग घरात दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु होणार आणि मोनिका परत माझे बाळ माझा संसार करत परतणार
Pages