खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्या तिच्या बाजुने नाहीये. मोनिका सांगते की तुम्ही मला मोकळं करा मी विक्रांत काय त्या घराकडेही फिरुन बघणार नाही. विक्रांतला सोडुन देइन. मग आत्या तयार झालीये तिला मोकळं करायला.

होक्का?
आणि आता हे अ‍ॅबॉर्शन शक्य नाही म्हणल्यावर लगेच ही मॉनिका पलटली. विक्रांत ला सोडणार नाही म्हणते.
नाक कापलंय तरी भोकं आहेत म्हणाणारीची जात. Proud

दक्षिणा, अगं तिच्या आणि आत्यात डील झालं ना..की आत्या तिला अ‍ॅबॉर्ट करायला मदत करणार व ती त्या बदल्यात विक्रांत ला घटस्फोट देणार! म्हणून आता गोड गोड आहे दोघींचं.
आणि प्रेग्नंसीत कळतेच की बाईच्या जीवाला धोका आहे ते....म्हणजे किती वीक्स ची प्रेग्नंसी आहे त्यावरुन ती काढणं सेफ आहे अथवा नाही ते!
सविता प्रभुणे इज वेस्ट!! Happy
आत्या मस्त. जान्हवी च्या वेळीही त्या तशा स्ट्रिक्टच दाखवलेल्या नै?
आणि बायकोचा 'दर्जा' म्हणजे नेमकं काय द्यायला हवंय त्याने?
आता तसंही, मला वाटतं जरी ती सोडून गेली तरी तिच्या प्रेग्नंसी वर ऑथराइज्ड असा शिक्का बसेलच ना....!! काही प्रॉब्लेम नाही आता इतके दिवस सासरी राहिल्यावर!

सस्मित, पब्लिक सेंटी होतंय की तुम्ही? Happy

बाकी आत्याबाई आणि मोनिकामधलं हे डील नवी खबर आहे माझ्यासाठी... राहिलेले भाग बघून काढायला हवेत Wink
विक्रांत अनैतिक आणि बेकायदेशीर कामं करत नाही आणि आत्याबाई बरी करते अशी कामं Uhoh

आता मोनिका सुटका झाल्यावर विक्रांतने कसं तिला फसवलं ह्याचा गाजावाजा करणार. आधीच विक्रांत माझ्याकडे लक्श देत नाहीत म्हणून सासू, आजेसासूकडे लाडे लाडे तक्रार करून झाली आहेच. वरून आता मानसी विक्रांतचं लफडं असल्याची काडी लावून देईल ती सुटका झाल्यावर.

मला एक कळत नाहीये एकीकडे हा विक्रांंत म्हणतो की माॅॅनिका प्रेग्नंंट आहे हे कुणाला कळायला नको आणि दुसरीकडे तिला अबाॅॅर्शन करून देत नाही ह्या दोन्ही गोष्टी कश्या शक्य आहेत , माॅॅनिका बाई च पोट दिसायला लागल्यावर कळणारच ना !! Uhoh

स्टोरीलाइन अत्यंत फाल्तु आहे. लिहिणारा माणुस जरासुद्धा लॉजिकल विचारत करत नाहीए. स्टारकास्ट साठी किती दिवस पहाणार ना सिरियल.

झालं असं कि आत्याने सांगितलं तु विक्रांतला डिवोर्स दे, मी तुला मो़कळं करते. दोघींच्या फायद्याचं डील असल्यामुळे दोघी टेम्प. खुष होत्या. पण अ‍ॅबॉर्शन आधी मेडिकल चेकअप केला त्यात कळल कि it is late आता अ‍ॅबॉर्शन शक्य नाही. लगेच मोनिकाने आत्याना सांगितलं कि ठिक आहे मग मी पण विक्रांतला डिवोर्स देणार नाही. लगेच आत्याच्या चेहर्‍यावर प्रचंड धक्का आणि दु:ख, पण गायनॅक आत्याला इतकं डोकं नाही का, कि लग्नाला एक महिनाही झाला नसताना जर मुलगी ३ महिने प्रेग असेल तर त्या ग्राउंड्स वर डिवोर्स मिळेल. ( मला कायद्याचं ज्ञान नाही, पण अनैतिकता या बेसिसवर डिवोर्स होतात आणि इथे तर जबरदस्त प्रुफ आहे).

हिरोला जर मोनिकाला बायको मानायचं नाहीए तर त्याला बाळ जन्मायला घालायचा अट्टाहार का आहे?
लग्नानंतर ४-५ महिन्यात बेबी झालं तर आई आणि आजीला धक्का बसणार नाहीए का? कारण त्यांना धक्का बसु नये म्हणुन त्याने लग्नात तिची प्रेग्नन्सी डिसक्लोज केली नाही आणि लग्नानंतरही लपवुन ठेवलं आहे. Crapola !

माॅॅनिका बाई च पोट दिसायला लागल्यावर कळणारच ना !! >>>>>>>
मनाली, अनुमोदन. तु जे थोडक्यात मांडलंस त्यासाठी मी मात्र भसभस लिहिलं Proud

मी असं ऐकलंय की साधारण ३ महिन्यानंतर पोट वाढलेलं दिसायला लागतं.. नक्की कै ते माहित नाही.
मग लग्नाच्या वेळी साडेतीन महिन्यांच्या प्रेग्नंट मोनिकाचं लग्न होऊन आता महिना झाला असेल की म्हणजे साडेचार महिने झालेच की तिला. अजून पोट सपाटच आहे की तिचं. Uhoh

हिरोला जर मोनिकाला बायको मानायचं नाहीए >>>> तेच ना, जर तिला बायकोच मानायच नसेल तर मग तिच्याशी लग्नच का केल?

आणि " मी तुला तुझ्या गुण-दोषा सकट स्विकारतो" हे पण किती रडक्या चेहर्याने सान्गितले त्याने.

आधीच विक्रांत माझ्याकडे लक्श देत नाहीत म्हणून सासू, आजेसासूकडे लाडे लाडे तक्रार करून झाली आहेच. >>> मला तिची हि तक्रार अगदीच अवाजवी वाटली नाही. कारण तिने साध "मुव्ही" ला जाऊया म्हटल तरी विक्रान्त चा काहीच response नाही. प्रेग्नन्ट बाईच्या मनाचा विचार करावा हे सुद्दा मेडिकल मध्ये शिकवल जात हे त्याला कळत नाही का.

बाकी, मोनिका बेजबाबदार पणे वागली हे १००% मान्य!

मी तुझं abortion करणार नाही आणि ते होऊ देणार नाही हे जेव्हा विक्रांत मोनिकाला सांगतो तेव्हा तिच्या जागी असणाऱ्या कोणत्याही मुलीने हा प्रश्न विचारला असता कि या बाळाच्यख भविष्याचं काय? घरातल्यांना कधी आणि कसं सांगणार आहेस? कारण महिन्याभरातच सगळयांना.कळेल किंवा संशय येईल. पण या महत्वाच्या विषयावर कोणी बोलताना दिसतच नाही आहे. Angry
मी ही मालिका पाहणं बंद केलं आहे पण इतर मालिका पाहताना प्रोमोज पहायला मिळतात त्यावरून इतकं कळलंय की यावर काहिही चर्चा झालेली नसावी.

विकीने माॅनिकाला सांगितलं ना "तुला नको असलेलं बाळ मी सांभाळेन." म्हणून. (हे मी प्रोमो मध्ये बघितलं कि शिरेलीत ते आठवेना मला.. कारण मी तेव्हढंच पाहिलं. )

सिरीयल कसेही असले तरी, सगळ्यांचा वॉर्डरोब चांगला आहे.
नाहितर इतर सिरीयल्समध्ये तेचतेच आणि बर्यापैकी साधेच कपडे असतात.

मी बाळ सांभाळेन असं विक्रान्त म्हटलेलं आमच्या टीव्हीवर तरी दिसलं बुवा.
याच धाग्यावरही काही पानं आधीही त्याने तसे आश्वासन मागेही दिल्याचे लिहिले गेले आहे.

मोनिका विक्रान्तला डिव्होर्स द्यायला एका पायावर तयार होती असं दिसलं त्याच्या आधीच्याच एपिसोडमध्ये तिने विक्रान्त आणि आत्याचं बोलवणं चोरून ऐकलं. आत्या विक्रान्तला डिव्होर्सबद्दल सुचवत होती. (हे ती लग्न झाल्यापासून विक्रान्त आणि मोनिकाला सांगतेच आहे. विक्रान्तने प्रेग्नन्सी कळूनही लग्न करणं तिला मान्य नव्हतं.)
तर ते चोरून ऐकल्यावर पुढच्याच प्रसंगात मोनिकाने "तू मला डिव्होर्स देणार का? नको ना देऊ" असा गयावया, लाडीगोडी, इ.इ. विक्रमकडे केला.
मग तिच्या आत्याबरोबरच्या खेळीचा भाग म्हणून ती डिव्होर्सच्या बदल्यात अ‍ॅबॉर्शनला तयार झाली.
तिला अ‍ॅबॉर्शन करून हवंच आहे. पण विक्रान्त ते करू देत नाहीए.(त्याची कारणं नैतिक , मानवतावादी आहेत पण ती वैद्यकीयही आहेत हे पुढे आत्याच्या लक्षात येतं) मोनिका सहजासहजी विक्रान्तला सोडेल असं मला तरी (मालिका पाहून) वाटत नाही.

विक्रान्त तिला का सोडू शकत नाही याची कारणे त्याने लग्नाच्या एपिसोडमध्येच दिली होती.काल त्या कारणांना मोनिकाच्या आजोबांनी गळा काढून पुष्टी दिली.
मोनिकाला फक्त तो गर्भ नकोय. आपण लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचं तिला कोणाला कळूही द्यायचं नाहीए.गुपचूप जाऊन गर्भपात करून यायचंय. एकदा घरच्या सगळ्यांना सांगते म्हणून तरातरा बाहेर गेल्यावर तिचा पुतळा झालेला.

आत्याने मोनिकाला धडा शिकवण्यासाठी तिच्या माहेरी सोडले.(कारण त्या सकाळी मोनिकाने आत्याबरोबर बुद्धिबळाचे डावपेच सुरू केलेले. उठसूट माहेरी येण्याबद्दल टोमणे मारलेले) विक्रांतने मोनिका प्रेग्नंट असल्याचं कोणालाही न सांगण्याची आत्याला शपथ घातल्याचं आठवतं.

विक्रांतने आपल्या घरच्यांना न सांगण्याचं कारण "दळवी काय लोकं आहेत (म्हणजे काय करतील आणि काय नाही) हे तुला माहीत नाही असं मोनिकाला सांगितलं. so he is trying to protect her.

मोनिकाचं कॅरॅक्टर प्रचंड लबाड, आपमतलबी, दुसर्‍यांची पर्वा न करणारं असं दाखवलंय.

मालिकेचा गाभा तकलादू आहे हे मान्य आहे. कथारंभ वामन पात्रीकरांच्या कथेवर आहे असं श्रेयनामावली म्हणतेय.

यापुढे मालिका अर्धवट बघून किंवा इथल्या पोस्टी वाचून त्यावर आधारित टोकाच्या कमेंट्सनी फक्त मनोरंजन करून घेण्यात येईल.

डोक्याला ताप देवून या मालिकेतले सर्व 'गर्भित' अर्थ शोधत बसण्यापेक्षां ही सिरीयल न बघितलेलीच बरी, अशा निर्णयाप्रत मीं आलोय ! बाssssय !!

तेच विचा रायला आले गौप्य स्फोट झाला का? मी ९.५० परेन्त पाहिले पण नुसतीच फु गड्या नाच गाणी. गाणी देखिल पारंपारिक नव्हती. मग बोअर झाले.

विक्रांत झोपाळ्या मागे उभा असतो व आत्या त्याला काय बाय सुनवते तो शॉट फार विचित्र आहे.
विक्रांत हाफ पँट घालून उभा आहे असे वाट्ते त्या झोक्यामुळे. नौवारीत धाकटी काकू मस्त दिसत होती.

काल फक्त मंगळागौर बघायची म्हणुन मी ही सिरीअल लावली होती Proud
आत्याबाई गाण्यात गातात 'घरची नवरी पोटुशी' आणि उत्तर द्यायला मोनिकाची बहीण पुढे येते..दोघी आज्जी न प्रभुणेबाई यांना फारसं कळतं नाही.. प्रभुणेबाई 'ऑ' असं हावभाव करतात फक्त!

नवरोबा म्हणे बघ आता कोणाला कळतं नाहीयं पण कार्यक्रम झाल्यावर मोनिकाला चक्कर येणार .. अस्चं झालं फुगडी घालताना तिला चक्कर आली! बाकी आजच्या भागात दाखवतील Proud

महाभागात नेहमीप्रमाणे टाईमपास झाला!

मी पण चक्कर कधी येतेय त्याची वाट बघत होतो. आत्याबाई यायच्या आधीची नाच गाणी फास्ट फॉर्वर्ड करत बघितली.
विक्रांतपण कधी चक्कर येतेय याची वाट बघत उभा होता. पण चक्कर आल्यावर धावायच्या ऐवजी बाकीच्या मालिकांप्रमाणे विक्रांत, मानसी यांचे धक्का बसल्याचे एक्स्ट्रीम क्लोज अप्स दाखवले.नशीब फक्त एकदाच दाखवले. सगळ्यात आधी विक्रांतची आजीच उठल्याचे दाखवलेय.

त्या वयस्कर बायका म्हणजे नानु मामांच्या मैत्रिणी का? मंडळातल्या?

दुस रे म्हणजे इतक्या अनुभवी मुरलेल्या घरगुती बायका असून चक्कर उलटी = बेबी ऑन द वे हे का कळत नाही कोणासही? आता स्टेज चक्करच्या पुढची आहे खरेतर. पहिले तीन महिने गेलेत कधीच.

मोनिका छान दिसत होती नवुवा री व दागिन्यांमध्ये. अगदी कमर पट्टा घातला होता त्यात पोट एकदम फ्लॅट. कमॉन आता तर करीनाचा पण बेबीबंप दिसू लागला आहे.

आत्या खरंतर impromptu गाणे म्हणायला लागते, पण लगेच कोरस "काय बाई, असं कसं झालं..." वगैरे चालीत बांधलेले गाणे घेऊन तयार असतो.

हा इतका घाट घालून 2 ओळींची सूचक सुरवात करण्या ऐवजी आत्या सरळ बोलली असती तर.......?

हो,आत्यांनी गाण्यातून सांगते 'गोष्ट सांगते छोटुशी, घरात नवरी पोटुशी'. आणि मानसीला उत्तर द्यायला सांगते, मानसी काहीतरी जड बोलून शेवटी 'पोटात आनंद माईना, म्हणून ताई पोटुशी' वगैरे उत्तर देते.

Pages