सूत्रधारः
नमस्कार, आदाब, गुड मॉर्निन्ग.
तर रसिकहो. जमाना बदलला,
डायनासोर गेले डास राहिले.
पंत गेले राव गेले.
शुक्ल अन श्रिवास्तव आले.
थालीपीठ गेले अन बर्गर आले
एक उत्साही आवाजः हो वॉफल्स व क्रीम सुद्धा आले..
ट्रिंग ट्रिंग फोन जाउन स्मार्ट फोन आला.
नौवारी सहावारी पाचवारी ब्यागेत बंद झाले..
प्रेक्षकातून आडून आवाजः तरीही दुपारी दोन ते चार बंदच राहिले चितळे.
सूत्रधारः
हे बघा, नका करू युध्द सुरू
जीवनातला बारक्या लढाया जिंकून आम्ही
पुरून उरू.......
प्रेक्षकातून ठाणेकर स्त्रीच ठसकून आवाजः
भारीच बाई आत्मविश्वास.
इथे लोकलमधल्या गर्दीत
रोज गुदमरतोय श्वास.
पुणेरी पेठी स्त्रीचा प्रतिआवाजः
अहो पुरे ते लोकलचे कौतूक
जरा रिक्षा मिळवून दाखवा बरे बिनचूक!!!
कोरसः
ढोलकीचा ठेका
रिक्षा बरी कि लोकल खरी
रिक्षा बरी कि लोकल खरी
बसनेच जाउ की सायकल मारू
स्कूटर की कार कि हेली कॉपटर!?!
रिक्षा बरी की लोकल खरी
पावसाने रस्ते तुंबलेत
बोटच बरी बोटच बरी बोटच बरी.......( आवाज कमी कमी होत जातो.)
सूत्रधारः
तर मित्रों ......... आपलं ते हे ... सॉरी सॉरी सॉरी, मित्रांनो.
आणि मैत्रिणींनो. पुणे तिथे काय उणे( स्वगतः असं म्हणावंच लागतं)
पुण्यनगरीत रिक्षा मिळवणे आणि त्याने इच्छित स्थळी जाणे हे
अगदी गुलबकावलीचे फूल मिळवण्या इतके अवघड आहे महाराजा....
( मनात " हे फूल नक्की दिसते कसे? दिसते कसे दिसते कसे.....")
कर्वेनगर ते हिंजेवडी ( मागून एक टपली मारण्याचा आवाज)
कर्वेनगर ते हिंजवडी,
चांदणी चौक ते विमान नगर.
अहो ते सोडा डेक्कन ते जंगली महाराज रोड.
प्रभात रोड ते नळ स्टाप....
अभिनव शाळा ते टेलिफोन एक्स्चेंज....
कोथरूड ते कुठेतरी. ......
कुठे कुठे म्हणून जायला रिक्षा एकतर मिळत नै..
अन मिळालीच तर रिक्षा वाला येत नै.
एक म्हातारा बोळक्यातला आवाजः
आमच्या वेळी पण हे ऑस्सचं होतं
चालत जायला काय होतं
वन टू वन टू करत जाउ
अकरा नंबरची बस पकडू
पण हे गुढगे साथ देइना जाहले....
रिक्षेची वाट पाहणे नशीबी आले....
कोरसः
श्री कांता कमळ कांता अस्से कस्से झाले. अस्से कस्से झाले माझ्या नशीबी आले
श्री कांता कमळ कांता अस्से कस्से झाले. अस्से कस्से झाले माझ्या नशीबी आले
स्थळः पुण्यात कुठेतरी..
पात्रे: पर्ण पेठे सारखी दिसणारी गोड पुणेरी छोकरी.
कुशाल बद्रिके सारखा दिसणारा रिक्षावाला
एक रिक्षा: जी आहे पण आणि नाही पण. म्हणजे आहे पण आपल्या साठी नाही.
मांजराचे म्याव म्याव( हे श्रोडिंजर साहेबांचे मांजर. खोक्यात आहे पण खोक्यात नाही.
( जसे रिलायन्स जिओ. फ्री कॉल्स आहेत पण आपल्या साठी नाहीत टिंग टाँग . दिस इस नॉट अ वर्ड
फ्रॉम अवर स्पॉन्सर्स वी आर एक्सरसायझिंग फ्री स्पीच फॉर अॅज लॉंग अॅज इट इज अवेलेबल. )
तर मुलीला कुठेतरी जायचे आहे. व ती रस्त्यावर उभी आहे.
मुलगी : रिक्षा... रिक्षा ....... रिक्षा..........
रिक्षा रिक्षा रिक्षा........काय ही नसती शिक्षा.
किती हे ऊन अन. जायचे आहे दूर.
सिटी प्रायडात पिक्चर अन मल्टि स्पायसात जेवण...
प्लॅन तर आहे भारी पण पोहोचावे कसे बाई....
नेमकी आजच स्कूटर दिलि सर्विसिंगला
तरी मी सांगत होते बघा आईला.
रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा....
एक जण मेला थांबायला तयार नाही
रिकामी गाडी पण तुच्छ कटाक्ष टाकत जाई.
पिक्चरची वेळ होईल आता थोड्या वेळात...
पोहोचले नाही तर मैत्रीणे घेतील घोळात...
काय बाई करू कशी मी जाउ रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा.
थांबला बाई एक जण
येता का हो सिटि प्राइडला?
रिक्षावाला: नाही.
पंधरामिनिटांनी दुसरा रिक्षा वाला: नाही.
अर्ध्यातासाने तिसरा रिक्षेवाला: शाळेची गाडी आहे.
चौथा: भवानी पेठेत गाडी द्यायची आहे.
पाचवा: दुसृया बाजूला विचारा.
सहावा: किदर जाना है तेरेको?
सातवा: काही सबब सापडेना. गिर्हाइक हातचे घालवेना.
मुलगी: वैतागलेल्या टोन मध्ये: येता का हो ....
रिवा: कुठे?!!
मु: सिटी प्रायडास जाउ.
रिवा: गॅस नाही ताई गॅस नाही.
पहिले गॅस भरून घेउ.
कोरसः गॅसच्या तिथे लाइन मोठ्ठी. लाइन मोठ्ठी
रडकुंडी ला आली पोट्टी...
श्री कान्ता कमळ कांता अस्सं कस्सं झालं अस्सं कस्सं झालं माझ्या नशीबी आलं
मु: अहो वेळ फार जातोय हो. अजून दूर जायचे आहे
रिवा: हे बघा ताई. मी लाइन मोडणार नाही. यायचं तर या नाहीतर पाय उतार व्हा.
मु: सात्विक संतापाने. : मग आधीच सांगायचे ना?! वैताग आहे नुसता.
पिक्चरचा प्लॅन कॅन्सल करावा लागेल तापला आहे रस्ता..
धाड्कन उतरते रिक्षेतून
मु: हे घ्या अर्ध्या रस्त्यात पैसे. भरा गॅस इतका कि जाल चंद्रावर.
रिवा: इतका राग बरा नव्हे गोर्या नकट्या नाकावर.
मु: रिक्षा रिक्षा रिक्षा रिक्षा....... काय ही शिक्षा शिक्षा शिक्षा शिक्षा.
करतेच डाउनलोड उबरचे अॅप. रिक्षावाला काय नाही म्हणेल हा आहे रिक्षाचा बाप.
उबरची बाई टॅक्सी गं पाच मिनिटात येते ग.
एका म्हातारीचा आवाजः मुली कडे जाईन ग तूप रोटी खाईन ग.
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक.
मु: आली आली माझी उबरची गाडी कार्ब्युरेटर धूर सोडी.
टॅवा: बैठो अंदर. इदर रुकने को मना है.
चलो जल्दी जाना है.
मु: चलो जल्दी. पिक्चर शुरू होने वाला है.... पॉपकॉर्न भी लेना है.
भुर्र भुर्र........
रिक्षावाले कोरसः ताई कुठे जायचे आहे ताई कुठे जायचे आहे. ....... ताई ताई ताई... रिक्षा रिक्षा रिक्षा.
काय ही शिक्षा...
हे हे हे छान आहे. सगळ्यांचेच
हे हे हे
छान आहे. सगळ्यांचेच संवाद आणि स्वगतं पण!
भारी आहे. फुकटात उबरची का
भारी आहे.
फुकटात उबरची का जाहीरात केलीत? रॉयल्टी घ्या.
भारी आहे. फुकटात उबरची का
भारी आहे.
फुकटात उबरची का जाहीरात केलीत? रॉयल्टी घ्या.
किती मस्त लिहिलय्त..
किती मस्त लिहिलय्त..
मस्त लिहिलेय.
मस्त लिहिलेय.
मस्त लिहिलंय अमा!
मस्त लिहिलंय अमा!
सॉळ्ळिड!!! मस्त जमलंय.
सॉळ्ळिड!!! मस्त जमलंय.
मस्त!
मस्त!
जबरदस्त..
जबरदस्त..
मस्तच जमलंय
मस्तच जमलंय
हाहा!! सॉल्लिड सिटी प्रायडात
हाहा!! सॉल्लिड

सिटी प्रायडात पिक्चर अन मल्टि स्पायसात जेवण...>> पक्की माबोकरीण दिसतेय
मस्तच जमलय
मस्तच जमलय
मस्त
मस्त
लोकेशन्स कुठली चुकली असली तर
लोकेशन्स कुठली चुकली असली तर सांगा. मी पुणे १९८५ मध्ये सोडले. ( हाय रे कर्मा.)
संयोजक : मधून मधून फाइन ट्यून करत एडिट केले तर चालेल का?
मस्त !
मस्त !
भारीच जमलयं! पुणेरी रिक्षा
भारीच जमलयं!
पुणेरी रिक्षा म्हणजे खासच शिक्षा
मागु एक वेळ भिक्षा पण नको सौजन्याची दिक्षा
सही जमलय, अमा. धम्माल आली
सही जमलय, अमा. धम्माल आली वाचायला.
मस्त जमलंय !
मस्त जमलंय !
अमा, मुद्रित शोधनातील चुका
अमा, मुद्रित शोधनातील चुका सुधारू शकता (अनंत चतुर्दशीपर्यंत) पण पूर्ण वाक्य बदलू नका.
मस्तच
मस्तच
झक्कास जमलय!
झक्कास जमलय!
छान आहे.
छान आहे.
भारी लिहिलंय ईथे कोण कश्या
भारी लिहिलंय
ईथे कोण कश्या फॉर्म मध्ये लिहीतेय बघायची उत्सुकता होती..
मस्त
मस्त
छान लिहीलय अमा.
छान लिहीलय अमा.
मस्त जमलंय अमा एकदम
मस्त जमलंय अमा
एकदम खुसखुशीत..मजा आली वाचताना!
मस्त जमलय!
मस्त जमलय!
(No subject)
मस्त जमलंय अमा!
मस्त जमलंय अमा!
मस्त जमलय !
मस्त जमलय !
Pages