पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण त्याच रुप सर्वात खुलुन येत ते पावसाळ्यात. मी पहिल्यांदा गेले कोकणात तेच मुळी पावसाळ्यात. ढगांची दुलई पांघरलेला बावडा घाट श्वास रोखत पार करुन कोकणात प्रवेश केला आणि मग मात्र त्या हिरवाईने मनाला जी भुरळ घातली ती अगदी आज पर्यन्त. मग पुष्कळ वेळा पावसाळ्यात ही निरनिराळ्या वेळी कोकणात , घरी जाणं झालं आणि कोकणातलं पावसाळ्यातलं नित्य नव रुप ही तितकच मोहवणारं भासलं.
आंब्या, फणसांचा आणि रतांब्यांचा मोसम चालु असेतो पर्यन्त रोज " चार दिवस येऊ नको रे बाबा, तेवढी आंब्यांची काढणी होऊ दे.... मग ये " अस विनवलं जातं पावसाला. पण एकदा का सिझन संपला आंब्याचा की मग मात्र त्याची अगदी आतुरतेने वाट पहिली जाते. आठ पंधरा दिवस आकाशात ढग जमवून त्याने ही तयारी केलेलीच असते. एखाद दिवशी संध्याकाळी किंवा रात्री ताशे वाजंत्र्यांच्या गजरात आगमन होत या हव्या हव्याशा वाटणार्या पाहुण्याच. कितीही तयारी केली असली तरी पहिल्या पावसात तारांबळ उडतेच कारण घरावरची कौलं दरवर्षी शाकारली तरी कुठेतरी फट राहुन पाणी गळती होतेच. मग गड्याला वर चढवून ते गळतं काढलं जातं. मागील दारचा आणि खळ्यातला मांडव ही झापा कुजुन खराब होऊ नयेत म्हणून तातडीने काढला जातो. मांडव काढला की खळं खूप मोकळं मोकळं दिसायला लागत. मुलांचे क्रिकेट वैगेरे सारखे खेळ मांडवाचा अडसर नसल्याने अधिक रंगतात. पण ते थोडे दिवसच कारण एकदा का पावसाची झड बसली की आठ आठ दिवस संततधार सुरु असते कोकणात. मग खळ्यात खेळणं तर सोडाच पाच मिनीटं बसता ही येत नाही.
पावसाच्या आगमनाबरोबरच भात शेतीची कामं सुरु होतात. भर पावसात ही कामं करावी लागतात. आमच्याकडे काही जमीन उतारावरची आहे त्यामुळे तिथे वेगवेगळ्या लेवलला ( पायर्या पायर्यांची ) भात शेती केली जाते. ते शेत फार सुंदर दिसत . लावणीच्या वेळी भरपूर पाउस आणि चिखल ही लागतो . घरातली मुलं आवर्जून जातात मजा करायला आणि चिखलात लोळायला . आमचे काही गडी खूप गमत्ये आहेत. ते मुलांना मुद्दाम चिखलात लोळवितात वैगेरे . मुलांना काय तेच हव असत. (स्मित) घरातल्या बायका ही चहा, बिस्कीट, वडापाव वैगेरे द्यायच्या निमित्त्ताने जातात शेतावर. खाली गुडघाभर चिखल पाणी, वरतुन मुसळधार पाउस, गारठलेली हवा , आणि हातात तो लाल चहाचा कप !
आमच्या कडे रेडे ही जुंपले जातात शेतीकामाला
From mayboli
लावणी लावताना
From mayboli
हा एक दुसर्या शेताचा
From mayboli
From mayboli
रोपं वाढली की असं दिसत
From mayboli
ही आमची डोंगर उतारावरची शेती . ह्याला पॅनोरमा पॉइंट असं नाव आहे आमच्याकडे. " कशाला हवं आहे माथेरान बिथेरान ला जायला ? " असं ही जोडुन देतात पुढे ( स्मित)
From mayboli
डॉगर उतारावरची शेती जवळून
From mayboli
भात शेती बरोबरच नाचणी , वरी, हळद, आरारूट हे ही लावल जात थोडं थोडं. कसं काय ते महित नाही पण लावणीच्या दिवशी रात्रभर बेडकांच संगीत सुरु असतं . आमचं शेत तसं घराजवळच आहे, रात्री त्यांच डराँव डराँव घरी ही ऐकु येत. भात लावताना थोडं थोडं अंतर सोडुन रोपं लावलेली असतात पण थोडेच दिवसात रोपं वाढतात आणि एक हिरव्या रंगाचा गालिचाच तयार होतो शेतात. गणपतीच्या सुमारास काही पिकात गोड दुधाचा दाणा तयार होतो त्यावेळी शेतात अतिशय सुंदर सुवास पसरतो त्या दाण्यांचा. चारी बाजूने घनदाट झाडी, पावसाळी हवा, दुरुन येणारा व्हाळाच्या पाण्याचा खळखळाट आणि मध्ये आमचं शेत.... जगातल सर्वात सुंदर दृश्य असत ते. वार्यावर हे शेत जेव्हा डुलत ना तेव्हा तर विचारुच नका किती सुंदर दिसत ते.
लावणीचं मुख्य काम झालं की मग गडी आंब्यांच्या कलमांकडे वळतात. कलमांची टाळमाती, कलमांभोवती असलेले गडगे दुरुस्ती, नवीन कलमांची लागवड वैगेरे कामं असतात.
घराजवळ ही परसदारी काकडी, कार्ली, दुधी, पडवळ, यांचे वेल मांडवावर सोडले जातात .सड्यावरच्या मांगरावर लाल भोपळ्याचे वेल सोडले जातात. उन्हाळ्यात मरगळेलं अळू ही पावसाळ्यात चांगलच फोफावत.
त्रिपुरी पौर्णिमेला आमच्याकडे कोहाळा लागतो खरा पण कोकणात कोहाळा हा अशुभ समजला जातो. मुद्दाम लावला जात नाही. पण कधी कधी आपोआपच कोहाळ्याचे वेल ही रुजून येतात. घरच्या भाज्या काही ही मसाला न घालाता ही चवीला अप्रतिम होतात. काकडी तर मुलं एक ठेवत नाहीत मांडवावर. पावसाळ्यात आमच्याकडे फुलांचा महोत्सवच असतो जणू. अनंत, अनेक प्रकारच्या तगरी, कर्दळी, सोनटक्का, गावठी गुलाब,प्राजक्त, विविध रंगाच्या आणि आकारच्या जास्वंदी, संध्याकाळी फुलणारी गुलबाक्षी वैगेरे आमच्या आगराची शोभा वाढवत असतात.
जास्वंद
From mayboli
From mayboli
पावसात गुरांना ओला चारा मिळतो पण गुरांनी कुणाच्या शेतात तोंड घालुन नुकसान करु नये म्हणून ह्या दिवसात गुरांच्या पाठी राखण्ये ( गुराखी ) असतात दिवसभर. चार पाच राखण्ये मिळुन सड्यावर मजा करत असतात तेव्हा कृष्णाची आणि त्याच्या सवंगड्यांची आठवण येते पण त्याच वेळी ही मुलं शाळेत का शिकायला जात नाहीत हा ही विचार मनात आल्या शिवाय रहात नाही. सड्यावर हिरच्या कुरणात चरणारी गुरं फार लोभस दिसतात. पण सड्यावर जायच्या वाटेच्या दोन्ही बाजुला आपल्या कंबरेपर्यन्त गवत माजलेलं असतं. पावसाची काळोखी आली असेल तर तिथुन जाताना भितीच वाटते.
पावसाळ्यातली आणखी एक सनसनाटी घटना म्हणजे आमच्या घरा मागेच असणार्या व्हाळाला ( वहाळाला) येणारा हौर म्हणजे पूर. तीन चार तास जोरात पाउस झाला तर हा वहाळ दुथडी भरुन वाहु लागतो. पाण्याला प्रचंड वेग आणि खळखळाट असतो . ते चहा सारख्या रंगाचं पाणी पहायला मग मंडळी अगदी छ्त्र्या वैगेरे घेऊन व्हाळापर्यन्त जातात. कधी कधी पाणी साकवा वरुन ही वहात असत तेव्हा मात्र इकडची मंडळी तिकडे जाऊ शकत नाहीत. थोडावेळ सगळं ठप्प होऊन जातं. खूप मोठा हौर असेल तर व्हाळाच पाणी आमच्या आगरात ही शिरत कधी कधी. कोकणातल्या विहीरी खूप खोल असतात पण व्हाळाला हौर आला की आपसु़कच विहीरींच ही पाणी वर येतं इतक की रहाटाशिवाय ही काढता येईल. कोकणातला हौर तो ... जसा येतो अचानक तसा पाऊस जरा कमी झाला की ओसरतो हि लगेच. .. पण हौर येऊन गेला की व्हाळ मात्र अगदी साफ, स्वच्छ आणि नितळ होऊन जातो
पावसाळ्यात वादळ वार्यांमुळे कुठे अपघात वैगेरे होऊ नये म्हणून MESB लाईट घालवूनच टाकते कित्येकदा. ढगाळ हवेमुळे भर दिवसा ही घरात विशेष करुन माजघरात आणि देवघरात अगदीच कमी असतो उजेड. अशा वेळी देवघरात भर दिवसा ही निरांजनं तेवत ठेवली जातात त्यांचा मंद, शांत आणि स्निग्ध प्रकाश एक प्रकारची समाधानाची गुंगीच आणतो मनावर. लाईट घालवले म्हणून मनोमन आभारच मानते मी वीज मंडळाचे. असो.
घरातल्या बायकांची आंब्या फणसाची आणि इतर उन्हाळी कामं झाली असली तरी अगदी वटसावित्री पासुन ते गौरीगणपती पर्यन्त अनेक सण उत्सव असतातच पावसाळ्यात . नागपंचमीच्या दिवशी अगदी भक्तिभावाने आगरातच असलेल्या वारुळाचे पुजन केले जाते. पिकाची नासाडी करणार्या उंदरांचा नाश नागोबा करतात म्हणून. मंगळागौर, हरतालिका, श्रावणी सोमवार, शनिवार हे ही जोरात साजरे करतो आम्ही. त्यामुळे घरातही एकंदर उत्साहाचेच असते वातावरण .
कोकणात जनरली उन्हाळ्याच्या दिवसात जातात मंडळी. पण पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग असतो. मी तर मनाने कायमच कोकणात असते पावसाळ्यात आणि हे सर्व अनुभवत असते. ह्या अनुभुतीत तुम्हाला ही सामील करुन घेण्यासाठी हा लेखन प्रपंच......
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
ममो, किती सुरेख लिहिता
ममो, किती सुरेख लिहिता तुम्ही! फोटो देखील मस्त!
धन्यवाद सर्वाना. अंजू आपल्या
धन्यवाद सर्वाना.
अंजू आपल्या भागातले माबोकर बघून खूप छान वाटतंय ना
नाडण परिसरातल्याचं पावसाळी गटग ... भाऊ आवडलं हे.
नताशा , कोकणातला रत्नगिरी आणि राजापूर भाग डोंगराळ आहे . खूप टेकड्या आहेत . टेकड्यांच्या माथ्यावरच्या भागाला सडा अस म्हणतात. सड्यावरच पाणी पावसाळ्यात सखल भागात वाहून जात त्यामुळे सड्यावरच्या विहिरींना पाणीही लागेलच हि खात्री नसते . त्या मुळे सड्यावर घरं नसतात फारशी. मनुष्यवस्ती पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे टेकडीच्या खालच्या भागात जास्त असते . तसेच खूप वेळा कातळ असतो सड्यावर त्यामुळे झाडं हि फारशी नसतात . पण सड्यावर फिरायला जायला छान वाटत . कारण मोकळं वाटत सड्यावर गेलं की . थोडा एरियल व्ह्यू हि मिळतो .
असं मला वाटतंय . काही चूक असेल तर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
मस्त लिहिलंय! फोटो तर
मस्त लिहिलंय! फोटो तर सुरेखच!
लहानपणीची आठवण - अखंड पाऊस. हमरस्त्यावरून केशरी पाणी अखंडपणे आमच्या वाड्याजवळून वहातंय. तिन्हीसांजा उलटल्यायत. आईने देवाजवळ दिवा लावलाय, आमची शुभंकरोति आटपली आहे. ७ च्या बातम्या संपल्यायत, आता अभ्यासाला बसलोय आणि नेमके लाईट गेले! मग आम्ही तांदळाचा लहान डबा घेऊन त्यावर २ मोठ्या मेणबत्त्या लावून अभ्यास उरकतोय. आई आता रात्री स्वयंपाक काय करू या विचारात. जगभर अंधार पडलाय, त्यात ३-४ मैलावरच्या त्या अखंड अस्वस्थ समुद्राची गाज ऐकू येतेय आता. मग तांदळाच्या भाकरीचा बेत ठरतो. भाकरीचं नाव ऐकून अभ्यास लवकर उरकतो. आई भाकर्या करेपर्यंत काळा लोखंडी खलबत्ता मी बाहेर काढते आणि लसूण, सुकं खोबरं वगैरे जंगी तयारी होऊन लसणीचं तिखट करायला घेते. "भाकरी आहे त्यामुळे मला भात नको" असे प्रत्येकीचे फतवे निघतात कारण कोकणी असून भाताचं प्रेम तिघींनाही कमीच! कुणीकडून तांदूळ पोटात गेला की भाताला काट! अशा अद्भुत वातावरणात गरम भाकरी, घरचं लोणी, लोणचं, लसणीचं तिखट अशी मेजवानी होते!
प्रज्ञा, किती सुंदर लिहिलं
प्रज्ञा, किती सुंदर लिहिलं आहेस . खूप आवडलं. सगळं डोळया समोर उभं राहिलं.
मोंड, पडेल, मालपे, वाडा ,
मोंड, पडेल, मालपे, वाडा , मुटाट हि सगळी गावं छानच आहेत >>>>>>> वाडा, पडेल बरोबर यादीत पुरळ पण अॅड करा .............
स्वर्गिय एरिया आहे हा ................
अन्जू : फणसे आणि त्याच्यापुढचं पडवणं पण मस्त आहे.
हो अरुण फणसे आणि पुढचं पडवणं,
हो अरुण फणसे आणि पुढचं पडवणं, समुद्र आहे दोन्ही ठिकाणी.
आता मला हसू नका पुरळलापण सासरचे नातेवाईक रहातात. नव-याकडचे बरेच नातेवाईक देवगड तालुका झिंदाबाद. माहेरचे रत्नागिरी जिल्हा.
छान जमलंय आपलं gtg.
हेमाताई मस्त वाटतंय.
अन्जू: पुरळला माझा काका असतो
अन्जू: पुरळला माझा काका असतो आणि फणश्याला एक आजोबा. त्यामुळे दोन्ही ठिकाणं माहिती आहेत. तसा संपुर्ण देवगड तालुकाच प्रेक्षणिय आहे. Picture Perfect म्हणावं असं निसर्गसौंदर्य आहे.
<< छान जमलंय आपलं gtg. >> <<
<< छान जमलंय आपलं gtg. >> << अन्जू: पुरळला माझा काका असतो आणि फणश्याला एक आजोबा.>> गटग कसलं, हें तर आतां महासंमेलनच होत चाललंय ! मस्त !!
माझे पण नातेवाईक आहेत
माझे पण नातेवाईक आहेत रत्नगिरीला गोळप ला, राजापुराला म्हनूं मी पण आहे तुमच्या गटग टी सामिल.
भाऊ, महासंमेलन , मस्त शब्द .
मी नताशा, ममो, बसणीजवळ सडये
मी नताशा, ममो,
बसणीजवळ सडये नावाचं गाव आहे. पण सडयात जातो म्हणतात. सड्यावर जातो म्हणजे कातळ असलेल्या भागात. डोंगर/ टेकड्यांवर काळा कातळ असतो ज्यावर काही उगवत नाही. तो भाग सडा राहतो ( बिनलग्नाच्या पुरूषाला सडा म्हणतात). रत्नागिरीत मारूतीमंदीर, कुवारबांव भाग पण काही वर्षांपूर्वी केवळ सडा होता. हल्ली तो खूप विकसीत भाग झालाय. डोंगर उतारावरच्या जमीनीतशक्यतो आंब्याची कलमं असतात. त्या भागाला डाग (बाग) म्हणतात. डागेतून वर गेलं की डोंगरमाथ्याला सडा असतो.
ममो आणि सोनू शंकानिरसनाबद्दल
ममो आणि सोनू शंकानिरसनाबद्दल धन्स
प्रज्ञा, मस्त लिहिले आहेस.
मनीमोहोर, अजुन फोटो असले तर
मनीमोहोर, अजुन फोटो असले तर जमतील तसे नक्की टाका.
प्रज्ञा९ , फार सुरेख लिहिलं आहेस! मस्त!
ममो,अतिशय सुंदर लेखन!
ममो,अतिशय सुंदर लेखन!
ममो, लेख अगदी सुंदर आहे...
ममो, लेख अगदी सुंदर आहे... तुमचं हिरवंगार कोकण डोळ्यासमोर आलं..:) आम्हाला फिरवून आणल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद सर्वांचे परत एकदा.
धन्यवाद सर्वांचे परत एकदा.
स्वर्गिय एरिया आहे हा ................ स्मित >>> अरुण, अगदी बरोबर
महासंमेलनच >>> भाऊ मस्त शब्द आहे .
प्रज्ञा, येस्स, तु तर आहेसच महसंमेलनात
सोनु, सड्याची महिती आवडली.
खुपच सुंदर लेख! मी फक्त एकदाच
खुपच सुंदर लेख!
मी फक्त एकदाच प्रत्यक्ष पाहिले कोकण, आमच्या शाळेची ट्रीप गेली होती रत्नागिरी, सिंधुदुर्ग इ. तेव्हा. खुप आधी माझ्या ताईला एक स्थळ आले होते रत्नागिरीचे तेव्हा मी मनातल्यामनात हेच फिक्स होऊ दे अशी प्रार्थना करत होती कारण मला मस्त कोकणात जाऊन राहता येयील म्हणून, पण ते खुप दूर असल्यामुळे घरचेच नाही म्हटले. असो.
ममो मस्त लिहिलंय. हे सर्व मी
ममो मस्त लिहिलंय. हे सर्व मी आता अनुभवतेयच.
तुमच्या महासंमेलनात मला पण सामील करुन घ्या. मी प्राॅपर रत्नागिरीकर.
मस्त
मस्त
सुरेख, लोभस आणि मनाला भावणारं
सुरेख, लोभस आणि मनाला भावणारं वर्णन. वाचतानाच त्या पावसाळ्यातल्या कोंकणाची धुंदी अलगद चढत जाते मनावर!
कोकणापेक्षाही अधिक हिरवाकंच
कोकणापेक्षाही अधिक हिरवाकंच ईंडोनेशिया हा देश आहे.
>>बी तु केलेली ही तुलना आज्जिबातच आवडली नाही. मनीने इतका सुंदर लेख लिहिला आहे त्यावर योग्य प्रतिक्रियेऐवजी तु तुलनात्मक असं ते पण एकच वाक्य टाकलंस.
शेवटी सौंदर्य हे सौंदर्य असतं, हे श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ असं मुळात नसतंच. सर्व सौंदर्यस्थळं युनिक असतात.
मनी लेख आवडला खूप. आणि आपण कोकण अजिबातच न पाहिल्याची जाणिव होऊन खंत वाटली.
तुमच्या महासंमेलनात मला पण
तुमच्या महासंमेलनात मला पण सामील करुन घ्या. मी प्राॅपर रत्नागिरीकर<<< मी पण.
आम्ही सड्यावरच राहतो. मूळ रत्नागिरी खाली आहे, आमचा भाग वरतीकडे. त्यामुळे सर्रास बोलतानाही "खालचा बाजार" असंच म्हणतात.
रत्नागिरीजवळ मिर्या गावाचे हे तीन भागच प्रसिद्ध आहेत. सडामिर्या, जाकीमिर्या आणि मिर्याबंदर.
वर्णन वाचून शेतात फिरून आल्या
वर्णन वाचून शेतात फिरून आल्या सारखं वाटल. फोटोपण छानच आलेत.
दक्षे, खंत कसली बाळगतेस?
दक्षे, खंत कसली बाळगतेस? आम्ही एवढे सगळे माबोकर आहोत कि कोकणातले! उठ आणि ये कोणाच्याही घरी
खूपच छान ! कोकणात खूप वेळा
खूपच छान ! कोकणात खूप वेळा फिरणं झालंय. पण अर्थात सगळं कोकण नाही बघून झालंय. एकदा गोळप सड्याला जायचा योग आला होता. कोकण कितीही वेळा फिरलं तरी परत परत जायला आवड्तच!
<< रत्नागिरीजवळ मिर्या गावाचे
<< रत्नागिरीजवळ मिर्या गावाचे हे तीन भागच प्रसिद्ध आहेत. सडामिर्या, जाकीमिर्या आणि मिर्याबंदर.>> 'स्टर्लाईट'च्या कॉपर स्मेल्टर प्रकल्पावरून जें प्रचंड वादळ रत्नागिरीत उठलं होतं, तेंव्हां त्याच संदर्भात अनेक वेळां या भागात फिरलोंय, गाडीतून व पायींसुद्धां. 'साळवी' नांवाचे माझे सहकारी होते; त्यांचं किंवा त्यांच्या अगदीं जवळच्या नातेवाइकांचही घर त्याच भागांत होतं. छानच आहे तो परिसर.
धन्यवाद सर्वाना परत एकदा .
धन्यवाद सर्वाना परत एकदा . खरच कोकण आहेच छान. पवसाळ्यात तर अप्रतिम. म्हणुनच एवढे प्रतिसाद आलेत.
खुप आधी माझ्या ताईला एक स्थळ आले होते रत्नागिरीचे तेव्हा मी मनातल्यामनात हेच फिक्स होऊ दे अशी प्रार्थना करत होती कारण मला मस्त कोकणात जाऊन राहता येयील म्हणून, >>> आवडल हे फार
शेवटी सौंदर्य हे सौंदर्य असतं, हे श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ असं मुळात नसतंच. सर्व सौंदर्यस्थळं युनिक असतात. >>>+१११
मनी लेख आवडला खूप. आणि आपण कोकण अजिबातच न पाहिल्याची जाणिव होऊन खंत वाटली. >>>> दक्षिणा अग विचार कसला करतेयेस ? मॅगी म्हटली तस ऊठ आणि ये की आमच्या घरी.
नंदिनी, तु एवढी मोठी लेखिका...... तु आमच्या महासंमेलनात आहेस हा आमचा अभिमान आहे
नवीन फोटो अपलोड केलेत .
नवीन फोटो अपलोड केलेत .
मस्त आहेत नविन फोटोज .....
मस्त आहेत नविन फोटोज .....
मन तृप्त होणं म्हणजे काय याचा
मन तृप्त होणं म्हणजे काय याचा परत अनूभव घेतला.
Pages