युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वर्ष भराची चणाडाळ, तुरडाळ घेते. उन्हात २ - ३ दिवस तापवते आणि भरुन ठेवते. अजुनपर्यंत एकदाही डाळी खराब झालेल्या नाहीत.

कुठे रहाता तुम्ही ? मराठवाड्यात ही आमच्या लहानपणी उन्हे दाखवून धान्ये, डाळी टिकायची. पण इकडे अमदावादला रवा, शेंगदाणे ही आणले की लगेच भाजून ठेवावे लागतात. डाळी १-२ महिने राहील इतकेच आणते म्हणून अजून तरी खराब झाले नाही.

शेंगदाणे, ओल- सुके खोबरे सुद्धा ठेवतो आम्ही, छान राहतात, मुख्य म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलीले असे गार आणी टणक दाणे कच्चे खायला खुप छान लागतात.

मी वर्ष भराची चणाडाळ, तुरडाळ घेते. उन्हात २ - ३ दिवस तापवते आणि भरुन ठेवते. अजुनपर्यंत एकदाही डाळी खराब झालेल्या नाहीत.>> +१.. मी वर्षभराची नाही तरी तीन चार महिन्यांची तांदू़ळ डाळी (सगळाच किराणा) एकदम भरते. ऊन्हं दाखवून झालं की औषधाच्या गोळ्या आनि कडुलिंब घालून डब्यात ठेवते. पंधरा दिवसांची लागणारी डाळ फक्त छोट्या डब्यात काढून घेते. आजवर कधी खराब झाली नाही. रवा, शेंगदाणे भाजून ठेवते.

मी रवा वगैरे भाजून ठेवते नेहमी पण कच्चा असेल तर फ्रिजात. बेसनाचं पीठ, कडधान्य खोबरं फ्रिजर मध्ये. (सुकं खोबरं भाजून)
सुकामेवा फ्रिज मध्ये की फ्रिजर मध्ये? मि आक्रोड ठेवले होते ते किंचित खवट झाले आणि सादळले फ्रिज मध्ये. पण बदाम एकदम मस्त कुडकुडीत. Happy

आता युक्ती सांगा, मध्यंतरी एका पुजेसाठी सुपार्‍या आणि नारळ आणले होते, नारळ तर कारणी लागले, आता त्या सुपार्‍यांचं काय करू? Uhoh १२-१५ आहेत.

मंजूडी, एवढं हसण्यासारखं काय आहे त्यात?

सस्मित, वर्षभराचं सामान नाही हो. इंग्रो दूर आहे त्यात दर आठवड्याला उठून किराणाखरेदीत अजिबात इंटरेस्ट नाही. त्यामुळे दोन महिन्यातूक एकदाच चक्कर होते. त्यात वालासारखी कडधान्य नाही संपत लवकर. डाळींचं पण तेच. पिठं-बिठं तर आमच्या हातात पडेपर्यंत आधीच जुनी झालेली असतात. काही खास आपल्या त्या तिकडून आणलेली पिठं म्हणजे मिलियन डॉलर अ‍ॅसेट. ती तर मी कडीकुलुपात सुद्धा ठेवेन Proud

दक्षिणा,
आक्रोड मुळातच खराब असतील कदाचित. फ्रीजमधे नाही खराब व्हायचे.

सुपार्‍या पण नाही खराब होत. तूला आवड असेल तर मसाला सुपारी कर.
नाहीतर सरळ दुकानात किंवा पान खाणार्‍याला देऊन टाक.

दक्षे १०/१२ तर आहेत सुपार्‍या. त्यात ही त्या पूजेच्या. कशा आहेत त्या नीट पाहून घे आधी अन मग कर काय करायचंय त्यांचं ते.
तशीही १०/१२ सुपार्‍यांची मुखवास सुपारी टाईप फारच थोडी होईल.
त्यात अजून थोडी चिकणसुपारीची भर घालून मस्त तुपावर भाजून + बाकी मालमसाला घालून मुखवास तयार होईल.
त्यात अस्मांतारा/ थंडाई असं घालायला विसरायचं नाई. Happy

मी रवा भाजून ठेवते नेहमी पण कच्चा असेल तर फ्रिजात.>>>>+१
कडधान्यापैकी मटकी,मूग फक्त फ्रीजमधे.हरभरे वगळता बाकी कडधान्ये(पां.वा.,हि.वा.,छोले,लाल/पांढरी चवळी) भाजून ठेवते.कडवे वाल बोरीक पावडर आवून ठेवते.काळे वाटाणे पाव किलोच्यावर क्वचितच आणते.थोडक्यात ज्यांना मोड आणायचे असतील ती कडधान्ये न भाजता ठेवायची,पण कमी आणायची.
हरभर्‍याची डाळ भाजून दळणाला देत असल्यामुळे २-३ महिने टोक्यांशिवाय बेसन मिळते.मूगडाळ, उडीदडाळ भाजून ठेवते
तुरीच्या डाळीत सुके खोबरे ठेवायचे असते.मी फ्रीजमधे ठेवते.कारण त्याचा वापर फारसा होत नाही..

आंबेमोहर,बासमती तांदळाला बोरीक पावडर असते.रोजच्या कोलम तांदळाला नाही लावत.

म्हणजे सारखा-सारखा उघडला जात नाही >> हे मंजूडीने हसल्यावर कळले. Lol Wink
>> डाळींचं पण तेच. पिठं-बिठं तर आमच्या हातात पडेपर्यंत आधीच जुनी झालेली असतात. काही खास आपल्या त्या तिकडून आणलेली पिठं म्हणजे मिलियन डॉलर अ‍ॅसेट. ती तर मी कडीकुलुपात सुद्धा ठेवेन फिदीफिदी >> +१

मी सगळ महिन्यापुरतच आणते पण तरी सुद्धा जास्तीत जास्त वस्तु फ्रीज मध्येच ठेवते कारण वस्तु जरी कमी आणली तरी ही ती कधी कधी वापरली जातेच सगळीच्या सगळी अस नाही, फ्रीज मध्ये ठेवली की बघावे नाही लागत . माझा फ्रीज खूप मोठा आहे आणि घरात माणसं कमी म्हणूनच शक्य होत फ्रीज मध्ये सगळ ठेवणं

ओके @ सिंडरेला.
आपल्या त्या तिकडून आणलेली पिठं म्हणजे मिलियन डॉलर अ‍ॅसेट. ती तर मी कडीकुलुपात सुद्धा ठेवेन>>>> Happy

काय योगायोग आहे! मी चणाडाळीबद्दल प्रश्न विचारायला आले आणि तीच चर्चा चालू आहे.

माझ्या कडे चणाडाळी ला फारसा खप नाही आणि दोन-तीन पाकीटं झाली आहेत पँट्रीत. आमच्याकडे मुंबई सारखी दमट हवा नाही त्यामुळे वरच्या चर्चेवरून बहुदा ती टिकावी आणि अगदीच गरज पडल्यास फ्रीजर मध्ये टाकावी अशी युक्ती दिसत आहे. पँट्री साफ सफाई मोहिम पुकारली आहे तेव्हा आहे ते संपल्याशिवाय नवीन काही आणूच नये असं वाटतं पण आता खूप दिवस झाले मुगाची खिचडी खाऊन किंवा मसूर डाळ वापरून. त्यामुळे ती चणाडाळ पार्कींग लॉट मध्ये टाकून या डाळी बहुतेक आणेनच.

जोक मलाही कळला नाही BTW

चणाडाळ विषय आहे म्हणून हा बारका निबंध: आटोवाला चणाडाळ नावाखाली वाटण्याची डाळ विकत, मला अधून मधून पुरण खायला भारी आवडतं, त्या वाटणाडाळीचं भंगार लागतं. गेल्या वेळेच्या भारतवारीत हौशीने (म्हणजे भरपूर) चणाडाळ घेऊन आलेलो, ती खपली नाहीच पटकन. तर तिला कीड लागत्येय असं वाटलं, फ्रीज मध्ये टाकली . नंतर टोरोंटो वरून आणखी हौशीने डाळ आणली तर तिला कीड लागली नाही.
कॅनडाची हवा प्रचंड कोरडी आहे, तर कोरड्या हवेतही कीड लागू शकते, (फक्त पुरेशी हौस आणि वेळ दिला पाहिजे)
आता पुरण केलं पाहिजे. Happy

>> कोरड्या हवेतही कीड लागू शकते, (फक्त पुरेशी हौस आणि वेळ दिला पाहिजे)

हौस आणि वेळ हे दोन्हीं कीड बाबतीत वापरले आहेत का? Lol

आमच्याकडची माणसं बेभरवशाची आहेत. पुरणच काय त्याच्या पोळ्या जरी केल्या तरी माणशी दोन ह्यापेक्षा जास्त खपत नाहीत. मग तो भातुकलीचा खेळ करायचा वैताग येतो.

पुरेशी हौस आणि वेळ>>> Lol असं होतं कधी कधी

हौस असते वेगवेगळे पदार्थ करायची म्हणून साहित्य आणले जाते. पण त्यासाठी जास्तच वेळ दिला जातो Proud

सशल तू ती मागे सिंडरेलाने सांगितलेली फ्रीजर जिंदाबाद मेंबरशीप घेऊन टाक. मग मध्येच कधीतरी आज खूप दिवसांनी पुपो, त्यावर भरपूर तूप आणि धारोष्ण दूध अशी फोटो अपडेट टाक. Proud

कोथिंबीर वड्या करताना, ( आपल्या मराठमोळ्या पद्धतीच्या , हॉटेलमधे मिळतात त्या पिठल्याच्या वड्या नाहीत ) कधी कधी पिठ सैल झाले तर वळकटी पसरट होते. ती सुबक गोल होण्यासाठी कुठलाही रिकामा टीन वापरता येतो. टिनला आतून तेलाचे बोट लावून, मिश्रण भरायचे. वर थोडी जागा सोडायची, कारण पिठ फुगते.

मग कूकरमधे तो टीन उभा ठेवून वाफवायचे. पुरता थंड झाला कि टिनमधले मिश्रण सहज बाहेर येते. नाहीच आले तर खालच्या बा़जूने टीन कापून, तो रोल काढता येतो. या वड्या खुप सुबक दिसतात, टिनमधे अळू वडीचा रोल मिळतो, त्यावरून हे सुचले. त्याचे फोटो ...

हि तयारी

DSCN2257

DSCN2258

हा रोल

DSCN2259

या वड्या

DSCN2261

DSCN2262

Pages