Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>Becoz it's a glass can't
>>Becoz it's a glass can't use hot water.>>
हे समजले नाही. असो. पाण्यासाठीच वापरली असल्यास व्हाईट विनेगर आणि पाणी घालून जरा खळखळवा. त्यात थोडा बेकिंग सोडा घाला. पुन्हा जरा खळखळवा. बुडबुडे येतील. शेवटी कोमट पाण्याने धुवून टाका.
Tried to prepare paneer
Tried to prepare paneer today. But it didn't turn out hard cake types which we get in shop. It's little soft n wet. What recipes can I try with this paneer. Please suggest.
पनीर भुर्जी, पराठा...
पनीर भुर्जी, पराठा...
काला जामून !
काला जामून !
Kala jamun kasa banavtat?
Kala jamun kasa banavtat?
http://www.premascook.com/201
http://www.premascook.com/2012/11/kala-jamun-with-paneer-khoya-stuffing....
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/36941.html?1200810249
http://www.maayboli.com/node/13624
कैरी घातलेली (चैत्रातली ह.कु.
कैरी घातलेली (चैत्रातली ह.कु. ची ) डाळ उरली आहे २ वाट्या. त्याचं ( तशीच संपवणे सोडून) काय करता येइल ?
कैरी घातलेली (चैत्रातली ह.कु.
कैरी घातलेली (चैत्रातली ह.कु. ची ) डाळ उरली आहे २ वाट्या. त्याचं ( तशीच संपवणे सोडून) काय करता येइल ? >>
वाटली डाळं करता येइल...जरा जास्त तेलाची फोडणी करुन डाळं कोरडी होईपर्यंत परता...आणि त्यात ओलं खोबरं घालुन द्या म्हणजे कैरी चा आंबटपणा पण बॅलन्स होईल...
रावी, कर्माची फळं - उरलेल्या
रावी, कर्माची फळं - उरलेल्या आंबाडाळीचे कोफ्ते तळून कैरीच्या कढीत घालायचे.
अरे वा! दोन्हीही युक्त्या
अरे वा! दोन्हीही युक्त्या मस्त! दोन्हीही करून बघेन १ /१ वाटीचं . धन्स स्मिता आणि मंजुडी.
Thanks Manjutai, Dinesh,
Thanks Manjutai, Dinesh, Rashmi!
उत्साहाच्या भरात ग्रीन टोकरी
उत्साहाच्या भरात ग्रीन टोकरी चे सन ड्राईड टॉमेटो चे पाकिट आणले आहे. काय रेसिपी करता येईल? पिझ्झा आणि पेस्तो सोडून?
मृण्मयीची एक रेसिपी आहे सन
मृण्मयीची एक रेसिपी आहे सन ड्राईड टॉमेटो ची.
http://www.maayboli.com/node/14368
हे लोणचं फार भारी लागतं.
हे लोणचं फार भारी लागतं.
सनड्राइड टोमॅटो सीपीकेच्या पेस्तो पास्त्यात असतात, चांगले लागतात. थोडा वेळ पाण्यात भिजवून (उलटी गंगा :फिदी:) टोमॅटोची चटणी करतो तशी करता येइल.
प्रसादाचा शिरा करताना रवा आधी
प्रसादाचा शिरा करताना रवा आधी न भाजता तूपातच भाजावा की आधी भाजून घेऊन मग तूपात परत भाजावा ?
रवा कोणत्या प्रकारे भाजला आहे ह्याने चवीत काही फरक पडतो का?
दिड किलो रव्यासाठी दूध किती घ्यावे?
मी शिरा करताना कायम तूपावरच
मी शिरा करताना कायम तूपावरच भाजते रवा.
प्रसादाच्या शिर्याकरता सगळं सेम प्रमाण असतं ना? रवा, साखर, तूप, दुध, पाणी सगळं एक वाटी?
नुसते दुध घेतले तर
नुसते दुध घेतले तर प्रसादाच्या शि-याला अडीच पट दुध + पाणी लागते. एका फुलपात्र रव्याला मी अडीच फुलपात्रे (१.५ दुध + १ फुलपात्रे पाणी) घेते. आणि रवा इथे टिकत नाही म्हणून साधारण भाजलेला असतो तो तुपात खरपुस भाजावा. दोन्ही प्रकाराने करून पाहिला नाही त्यामुळे चवीचे माहित नाही. प्रसादाचा शिरा भर्पूर तूप, सु.मे. इ. मुळे यम्मी लागतोच.
प्रसादाच्या शिर्याला
प्रसादाच्या शिर्याला सव्वापट तूप, जेवढ्यास तेवढी साखर आणि अडीचपट दूध लागतं. मी पण रवा तुपातच भाजते कुठलाही शिरा करायचा असेल तर.
रवा, साखर, तूप, दुध, पाणी
रवा, साखर, तूप, दुध, पाणी सगळं एक वाटी >> आई 'सव्वा वाटीचा प्रसाद' म्हणून सव्वा वाटी करायची. केळ पण सव्वा पण ते आयत्या वेळी घालायचे. इन शॉर्ट, रेशियो-प्रपोर्शन ह्या यत्ता ५ अ गणित प्रमाणे यू म्हणिंग राईट.
मी _अनु, सन ड्राइड टोमॅटो
मी _अनु, सन ड्राइड टोमॅटो चं एक मस्त डिप खाल्लं होतं एका रेस्टॉ. मधे. ते टोमॅटो, थोडे व्हिनेगर, मीठ , मिर पूड, लसूण असं चटणीसारखं वाटून घ्यायचं आणि त्यात ऑलिव्ह ऑइल घालून जरा पातळ डिप सारखी कन्सिस्स्टन्सी आणायची. ब्रेडस्टिक्स वगैरे बरोबर अप्रतिम लागते हे डिप.
डिप चांगली आयड्या वाटतेय,
डिप चांगली आयड्या वाटतेय, लोणची वगैरे मी घालत नसल्याने आत्मविश्वास पातळी कमी आहे.
शिरा करताना रवा आधी
शिरा करताना रवा आधी मंदाग्नीवर कोरडाच मग तूप घालून भाजला तर छान खमंग होतो. लवकर भाजला जातो, हात दुखून येत नाहीत, चांगला टिकतो सुद्धा.
अनघा, सशल, सिंडरेला,
अनघा, सशल, सिंडरेला, सीमंतिनी, मंजूडी, धन्यवाद!
सर्वांचे मनापासून आभार.
घरात बर्यापैकी जास्त काकवी
घरात बर्यापैकी जास्त काकवी आलीये.. ती गुळासारखी भाज्या - आमट्यात घालता येइल का?
घरात जरा जुनी परदेशी
घरात जरा जुनी परदेशी चाॅकलेट्स उरली आहेत. ती वाटून टाकायला (उरली म्हणून) नको वाटते आणि नुसती संपत नाहीत. त्याचे काय करावे?
चॉकलेट? उरली? नॉट फेअर्/नॉट
चॉकलेट? उरली?
नॉट फेअर्/नॉट नॅचरल.
सहा महिन्यांपूर्वीची चॉकलेट्स
सहा महिन्यांपूर्वीची चॉकलेट्स असतील तरच त्यांना जुने म्हणण्यात यावे. ~ हुक्मावरून.
आशु तरी संपत नसली तर चॉकलेट
आशु तरी संपत नसली तर चॉकलेट मूस कर ना, रेसिपी विपु मध्ये देते
कच्च्या केळीचा घड मिळाला आहे
कच्च्या केळीचा घड मिळाला आहे आज. त्याचे काय करता येइल?
कच्च्या केळ्यांची उकडून
कच्च्या केळ्यांची उकडून दाण्याचे कूट घालून भाजी छान होते. सुक्या बटाट्याच्या भाजी सारखी. उपासाला चालते.
किसून त्यात शिंगाडा पीठ, उकडलेला बटाटा, मीठ मिरची इ घालून कटलेट्स.
वेफर्स करुन तळून किंवा फिंगर चिप्स सारखे तळून, मीठ तिखट भुर्भुरवून.
उकडून, खवा मिसळून गोळे करुन गुलाबजाम
किसून, तांदूळ (अथवा वरई) पीठात मिसळून गूळ व थोडा नारळ घालून गोड घावनं......
Pages