भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>
नूनू - हानामधल्या धुक्याची कथा
माउई बेटाच्या अग्नेय टोकाला हालेकालिआ शिखराच्या पायथ्याला पडणार्या पावसाने शिंपलेलं , हिरव्यागार पर्जन्यवनांनी अच्छादलेलं, नद्या, धबधब्यांनी , निळ्या समुद्रकिनार्यांनी सजलेलं हाना नावाचं बेहद्द सुंदर गाव आहे, जे आपल्या चमकणार्या पाण्याच्या गोष्टीत येऊन गेलंय.
इथे फार फार पूर्वी मेनेहून लोक रहायचे. काही दंतकथा मानतात की हे लोक अंगठ्याइतके उंच पण जादूई शक्ती असलेले असे होते. काही लोक मानतात की हे खरे तर हवाईला आलेलेआद्य इमिग्रन्ट्स होते आणि अनेक वर्षांनंतर ताहितीयन लोक जेव्हा इथे आले तेव्हा ते लोक संख्येने जास्त असल्याने ते आल्यावर हे मेनेहून लोक बेटांच्या आतल्या दुर्गम भागात लपून छपून राहून लागले.
तर गोष्ट या मेनेहून लोकांची नाहीच आहे मुळी. या मेनेहून लोकांना एकदा प्रत्यक्ष समुद्राचा देव कानालोआ याने भेट म्हणून एक मानवी मुलगा दिला. एकाच बोलीवर, की ठराविक वर्षांनी, एका ठराविक दिवशी तो मुलगा कानालोआकडे परत जाणार!
या मुलाचे नाव कौइकी. कौइकीला मेनेहुनांनी आपला मुलगा म्हणूनच वाढवलं. कौइकी समुद्रावरच आपला वेळ घालवी. लाटांवर स्वार होणे हा त्याचा आवडता खेळ होता.
माउई हा दैवी पुरुष त्यावेळी हानामधेच रहात होता. तोच सरड्याच्या गोष्टीतला माउई!
त्याला होती एक मुलगी, नूनू नावाची. नूनूचा अर्थ धुकं. माउई मासेमारी आणि नौकाबांधणीत पारंगत होता. तिथल्या समुद्राच्या लाटालाटांशी त्याचा परिचय होता. समुद्रावरच्या नेहमी दिसणार्या धुक्यावरूनच त्याने मुलीचे नूनू नाव ठेवले होते.
दर्यावर्दी माउईचीच मुलगी होती नूनू. तिलाही लहानपणापासून समुद्राचं आकर्षण होतं.
ती मोठी झाल्यावर एक दिवस समुद्रावरच तिची गाठ कौइकीशी पडली. प्रथमभेटीतच ते प्रेमात पडले. एकमेकासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू लागले. नूनू त्याच्याशी लग्न करून त्याच्याच सोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न बघू लागली.
एक दिवस कौइकीने नूनूला जे सांगितले त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली! कौइकीने सांगितले की तो समुद्रदेवाचा, कानालोआचा मुलगा असून त्याच्या पित्याकडे म्हणजे कानालोआकडे परत जाण्याचा दिवस आता जवळ आला आहे! आणि कानालोआकडे परत जायचं म्हणजे मानवी अवतार संपवण्याची वेळ! कौइकीचे नूनूवर कितीही प्रेम असले तरी कानालोआची इच्छा मोडण्याची त्याची ताकद नव्हती! म्हणजेच आपल्या प्रियकरासोबत आयुष्य घालवण्यचे नूनूचे स्वप्न लवकरच भंग होणार होते.
नूनू रडत रडत बापाकडे गेली. काहीही करून दोघांची ही ताटातूट थांबवावी म्हणून तिने माउईला साकडे घातले. माउई धर्मसंकटात पडला! त्याचे तर आयुष्यच समुद्रावर अवलंबून! त्याला समुद्रदेवाचा रोष तर पत्करून चालणार नव्हते आणि लेकीची तगमगही बघवत नव्हती! मग त्याने एक उपाय काढला. त्याला स्वतःलाच तो उपाय जड जाणार होता कारण लाडकी लेक त्याच्यापासून कायमची दुरावणार होती. पण नूनू ऐकायला तयार नव्हती!
तो उपाय म्हणजे कौइकीने मानवी अवतार संपवायचा, कानालोआकडे जायचेही आणि नाहीही. नूनूने त्याच्यासोबत आयुष्य तर घालवायचे .... आणि नाहीही !! हे कसं ?
तर असं - माउईने त्याच्या दैवी शक्तीने कौइकीचं एका टेकडीत रूपांतर केलं ! ही टेकडी अर्धी हानाच्या जमिनीवर आणि अर्धी समुद्रात घुसली होती. आणि नूनूचं रूपांतर खरोखरच्या नूनूमधे म्हणजे धुक्यात केलं !! या नूनूला त्यानं कौइकीच्या खांद्यावर कायमसाठी ठेवलं. माउईपासून त्याची लाडकी लेक दुरावली खरी, पण नूनूला तिचा कौइकी कोणत्या का रूपात असेना, पण कायमचा मिळाला.
या घटनेला आता अनेक शतकं उलटून गेली आहेत. अजूनही नूनू आपल्या प्रियकराला सर्वांगांनी बिलगून असलेली बघायला मिळते. सकाळच्या कोवळ्या उन्हात ती दवाच्या रुपात त्याच्यावर आवेगाने प्रेमाची बरसात करत रहाते. आणि ते पाहून तिचा बाप इन्द्रधनुष्याच्या रुपात समाधानाचं हसू हसतो!
--क्रमशः
सुपर आवडली. कानालोआ हा
सुपर आवडली.
कानालोआ हा त्यांचा सर्वात श्रेष्ठ देव आहे का? बेट असल्यामुळे समुद्राला सहाजीकच महत्वाचे स्थान असावे.
मस्त आहे ही पण कथा..
मस्त आहे ही पण कथा..
छान आहे.
छान आहे.
ही गोष्ट फार आवडली.
ही गोष्ट फार आवडली.
छान आहे ही पण गोष्ट.
छान आहे ही पण गोष्ट.
खुपच छान एक गोष्ट संपली की
खुपच छान एक गोष्ट संपली की लगेच पुढ्च्या गोष्टीसाठी उत्सुकता वाढतीये.
(No subject)
फार छान.
फार छान.
खूप सुंदर! पुढील कथेच्या
खूप सुंदर!
पुढील कथेच्या प्रतिक्षेत
हि गोष्ट सुंदर आहे पुभाप्र..
हि गोष्ट सुंदर आहे
पुभाप्र..
खुप सुंदर कथा.. कथेत नैसर्गिक
खुप सुंदर कथा.. कथेत नैसर्गिक घटकांना गुंफणे फारच आवडले.
mast. मस्त! छान आहेत या
mast.
मस्त! छान आहेत या सगळ्या सुरस गोष्टी.
फार छान.
फार छान.
छान आहे ही पण गोष्ट .
छान आहे ही पण गोष्ट .
मस्त कथा. आवडलीच पुभाप्र...
मस्त कथा. आवडलीच
पुभाप्र...
किती गोड गोष्टी आहेत ह्या!
किती गोड गोष्टी आहेत ह्या! मजा येतेय वाचायला
मस्त जमलाय हा भाग.
मस्त जमलाय हा भाग.
मस्त आहे ही गोष्ट ..
मस्त आहे ही गोष्ट ..
मस्त गोष्टी आहेत. वाचायला फार
मस्त गोष्टी आहेत. वाचायला फार मजा येतेय.
सहीच. क्युट आहे एकदम. या
सहीच. क्युट आहे एकदम. या सगळ्या गोष्टी रिव्हर्स इंजिनिअरड वाटतात.
अमित खरंच आहे! त्यामुळेच
अमित खरंच आहे! त्यामुळेच त्या लोकांच्या अचाट कल्पनाशक्तीचे आणि रसिकतेचे नवल वाटते!
माधव - समुद्रदेव हा मुख्य देवांपैकी एक आहेच, इतर मुख्य देव म्हणजे सूर्यप्रकाश, आकाश, नवनिर्माणाचा देव, पीक -पाणी पावसाची देवता, युद्धाचा देव असे आहेत. पण त्यांच्या सर्वांपेक्षा जास्त प्रसिद्ध आणि सगळ्या लोककथांमधे आपलं ठळक अस्तित्व दाखवून देणारी म्हणजे ज्वालामुखीची देवता पेले!! तिच्या कथा फारच इन्टरेस्टींग आहेत. त्या पुढच्या भागात लिहायचा विचार आहे.
अशा रिव्हर्स इंजिनिअर्ड कथा
अशा रिव्हर्स इंजिनिअर्ड कथा बनवायला मजा येइल आजुबाजुच्या निसर्गाच्या.
भारतत सुद्धा नद्यांचे - समुद्रांचे संगम, पर्वत रांगा, घळी ,धबधबे, गरम पाण्याचे झरे इ. वरून काय काय अफाट कल्पना लढवता येती, :).
जगात सगळ्याच निसर्गावर खरं तर !
मागे सरड्याची कथा आली तेंव्हा मला टर्की कप्पाडोकियाला पाहिलेले असे चित्रं विचित्रं ज्वालामुखीने बनवलेले आकार आठवले!
गणपतीत स्पर्धा ठेवा अशा कथा बनवायची :).
डीजे, यु सेड इट!!! वरची कमेंट
डीजे, यु सेड इट!!!
वरची कमेंट लिहिली तेव्हा असंच उलटं लॉजिक वापरून आपल्याकडे ऑल्रेडी असलेल्या कथांची मोडतोड डोक्यात येत होती. लोककथा रीडीफाइंड म्हणून. नवीन कथा इज अल्सो ऑसम आयडीया.
रादर गणपतीमध्ये करायचं असेल तर निसर्ग कशाला... आज ज्या शास्त्रीय कारणाने माहित असलेल्या किंवा मानव निर्मित गोष्टी आहेत त्या घेऊन त्यामागील विज्ञान विसरून त्या गोष्टी पूर्वजांनी पहिल्या असत्या तर काय कथा रचल्या असत्या... वाय फाय राउटर बघून एक राजकन्या होती तिचं नाव होतं फेडी. ती अपंग होती. त्याकाळी पायाना वायर म्हणत म्हणून तिला वायरलेस म्हटलं जाई. भिंतीवरच्या इथरनेट प्लग पर्यंत जाणे शक्य नाही व्हायचे तिला. मग राज्याने दवंडी पिटली....
सॉरी मै :p
अरारारा
अरारारा
मस्तं गोष्ट ही देखील.. गोड
मस्तं गोष्ट ही देखील.. गोड गोड!!!!!
अमितव
अमित, तुम्ही 'लोककथा कशा / का
अमित, तुम्ही 'लोककथा कशा / का बनतात' अशा धाग्याला निमंत्रण देत आहात
मस्त कथा.
मस्त कथा.
हवाई बेटावरच्या सुरस
हवाई बेटावरच्या सुरस गोष्टी...... सुरवातीपासुनचे सगळे भाग वाचले. खुप छान माहीती आहे. फोटो पण छान आहेत.
धबधब्याच्या गोष्टीतील 'सरड्याचे कलेवर' हा फोटो बघुन तर असे वाटते की लोक कथांवर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही.
छान गोष्ट, छान लिहुन
छान गोष्ट, छान लिहुन सांगितलिये,इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
मस्त गोष्ट! अमित
मस्त गोष्ट!
अमित
Pages