Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी कधी तयार ब्रेड क्रंब्जचं
मी कधी तयार ब्रेड क्रंब्जचं पाकिट पाहिलेलं नाही, त्यामुळे आयडिया येत नाही. खूप कुडकुडीत, कोरडे असतात का ते? फोडणीत कांदा, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता परतून त्यांत ब्रेड क्रंब्ज घालून ब्रेडचा चिवडा करता आला तर पाहा. कुडकुडीत वाटला तर पाण्याचा हबका मारायचा. अर्थात ते क्रंब्ज किती कोरडे असतात हे माहीत नसल्यामुळे मी हे अंदाजपंचेच सुचवत आहे. चुकीचा सल्ला असेल तर सरळ दुर्लक्ष करा.
गरम दुधात ब्रेड क्रंब्ज मऊ करून भिजवून तसेही काही करता येऊ शकते का, विचार करा. गोड काहीतरी.
ज्या डाळी, कडधान्य ऑरगॅनिक,
ज्या डाळी, कडधान्य ऑरगॅनिक, अनप्रोसेस्ड असतात त्यांना ठराविक काळानंतर किडीचा प्रादुर्भाव जास्त पटकन होतो, अशा अर्थाने ती एक्स्पायरी डेट असू शकते. ग्रीन शॉपमधून आणलेल्या मूग, चवळीच्या पाकिटावरही उघडल्यावर अमुक दिवसांमधेच वापरा किंवा हवाबंद ठिकाणी ठेवा अशा सूचना असतात. त्यामुळे मी ऑरगॅनिक कडधान्य लहान पाकिटांत आणून उघडल्यावर सिलिंग क्लिप लावून फ्रिजमधे ठेवते. एक्स्पायरी डेटचा विचार न करता.
अरुंधती, ब्रेड क्रंब्ज
अरुंधती, ब्रेड क्रंब्ज भगरीसारखे असतात पण आकाराने थोडे जास्त मोठे असतात. त्यामुळे कटलेट वगैरे घोळवायला बरे पडतात. निसर्गा त्याची चव घेऊन बघ. मी १०-१२ वर्षापूर्वी वापरले आहेत त्यामुळे टेस्ट लक्षात नाही. नाहीतर सरळ उपम्या सारखे करुन बघ.
अरुंधती, तुझा सल्ला बरोबर आहे, उपम्यासारखे वापरायला हरकत नाही
ब्रेड क्रंब्ज असे असतात? मग
ब्रेड क्रंब्ज असे असतात? मग नुसते गार दुधात घालून वरून साखर घालून सुद्धा मस्त लागतील.
उपमा केला तर गरमा गरम खावा लागेल, गार झाला की लगदा होईल बहुधा.
how to use up bread crumbs
how to use up bread crumbs असे गूगल करुन पहा. अनेक आयडिया सापडतील
केक्/बिस्किटे मस्त बनतील.
केक्/बिस्किटे मस्त बनतील.
कारण लहानपणी सूट्ट्या डाळी,
कारण लहानपणी सूट्ट्या डाळी, मैदा, रवा भरपूर प्रमाणात आणल्या जायचा पण त्यांची कधी एक्सपायरी झालेली ऐकली नाही. या अशा एक्सपायरी डेट्स मुळे आम्ही काहि पाकिटे न वापरता टाकून दिली आहेत.
>> एक तर थोडे पाकीट उघडून स्वतःच्या तारतम्याने कळू शकेल की ते एक्स्पायर झाले आहे कि नाही. दुसरे म्हण जे. ते खायचेच नसेल तर अगदी डस्टबिन मध्ये न टाकता कचरा नेणारा सोसयटीचा स्टाफ किंवा जनरल जिथे दान अॅक्सेप्ट करतात तिथे देता येइल म्हणजे अन्न पूर्ण वाया न जाता वापरले जाईल. शिजवलेले अन्न पण स्वीकारणार्या एन जीओ असतात तिथे विचारून बघा. चांगल्या प्रतीचे वापरण्या जोगे असेल तर त्या डाळींचा कोणाला तरी उपयोग होईल.
धन्यवाद सर्वांना. बरीच
धन्यवाद सर्वांना. बरीच उपयुक्त माहिती मिळाली.
एकदा अशी एक्स्पायर्ड डाळ मोलकरणीला दिली होती, पण आपल्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून काही उरलेले एक्स्पायर्ड डाळी टाकून दिल्या.
घरी ३००-४०० ग्रॅम जवस आहेत>>
घरी ३००-४०० ग्रॅम जवस आहेत>> chioo, १-२ दिवसात जवसाची एक सचित्र कृती देते.
Chioo, जवस, तीळ, ओवा, शोपा,
Chioo, जवस, तीळ, ओवा, शोपा, बाळंतशोपा, सगशं भाजून सैंधव घालून मुखशुध्दी करता येईल . तीळ जीरे लसूण (ऐच्छीक) चटणी ...
माझ्याकडचे ब्रेड क्रंब्ज
माझ्याकडचे ब्रेड क्रंब्ज ब्राऊन कलरचे रव्यापेक्षा जरा मोठे आहेत... पूर्ण कोरडे आहेत, खास अशी काही चव नाही त्याला... कटलेट्स बनवायला आणलेले... १-२ वेळा वापरलेत.
धन्यवाद सगळ्यांना... उपमा वगैरे काही जमतयं का बघते
आम्ही डाळींना एक्स्पायरी बघत
आम्ही डाळींना एक्स्पायरी बघत नाही.काही किड वगैरे असली तर कडकडीत उन्हात वाळवतो/नंतर भिजत घालून पूर्ण स्वच्छ झाल्याची खात्री करुन आप्पे करतो.
पण उद्योग फार होतो.हल्ली पुर्वानुभवाने ह. डाळ तू. डाळ या प्रोटिन्स चा साठा कमी ठेवतो.प्रोटिन्स ला पोरकिडे लवकर लागतात.(हरभरा डाळीला तर फार लवकर)
धन्यवाद नलिनी आणि
धन्यवाद नलिनी आणि मंजूताई.
इथे शोपा आणि बाळंतशोपा मिळणे अवघड आहे पन चटणी करता येईल.
चिऊ, शोपा वगळल्या तरी चालेल.
चिऊ, शोपा वगळल्या तरी चालेल. रोज कुठल्या न कुठल्या प्रकारे खावे त्यामुळे कोलोस्टॉल आटोक्यात राहते
.हल्ली पुर्वानुभवाने ह. डाळ
.हल्ली पुर्वानुभवाने ह. डाळ तू. डाळ या प्रोटिन्स चा साठा कमी ठेवतो.प्रोटिन्स ला पोरकिडे लवकर लागतात.(हरभरा डाळीला तर फार लवकर) >>>> बंद पिशवीमध्ये फ्रिझर मधे ठेवुन बघा किड नाही लागत, आम्ही तसेच
ठेवतो भरपुर टीकतात अगदी वर्षभर सुद्धा.
जवस नक्की का वापरतात सांगु शकेल का कोणी
हो मी रवा आणि तांदूळ पिठी
हो मी रवा आणि तांदूळ पिठी ठेवते, आता डाळी पण ठेवेन (स्वगतः चला जुना फ्रिज बदलून मोठा फ्रिजर असलेला नवा घेता येईल )
जास्तीचं वाणसामान ठेवायला मी
जास्तीचं वाणसामान ठेवायला मी एक स्वतंत्र छोटा फ्रिज घेतला आहे म्हणजे सारखा-सारखा उघडला जात नाही.
आता पुन्हा वाणसामानाचा साठा करावाच का असा प्रश्न येइल
सिंडरेला, मी तर म्हणेन चांगली
सिंडरेला, मी तर म्हणेन चांगली युक्ती. इतक्या महाग डाळींना किडे लागले की फार वाईट वाटतं.
जवसामुळे कोलेस्टेरॉल कमी होत
जवसामुळे कोलेस्टेरॉल कमी होत असे वाचलयं, तसेच त्याच्यात ओमेगा ३ असल्याने ते हृदयास बळकटी देते.
.
.
जवसाचं मुखशुद्धी सारखं केलं
जवसाचं मुखशुद्धी सारखं केलं तर मस्त होतं.
१०० ग्रॅम जवस आणि त्याच्या प्रमाणात बडीशोप, हवं असेल तर पांढरे तीळ आणि ओवाही घेता येईल.
जवस मंद आचेवर भाजायचे. तीळ जसे चटकतात भाजल्यावर तसेच हे ही होतात. तसे झाले की लगेच त्यावर मिठाचं पाणी शिंपडायचं आणि कोरडे होईपर्यंत परतायचे. त्यात भाजलेली बडीशोप घालायची. हवं तर भाजलेले तीळ आणि ओवाही घालता येईल पण तशीच काही गरज नाही.
जवस म्हणजे काय नक्की?
जवस म्हणजे काय नक्की?
जास्तीचं वाणसामान ठेवायला मी
जास्तीचं वाणसामान ठेवायला मी एक स्वतंत्र छोटा फ्रिज घेतला आहे म्हणजे सारखा-सारखा उघडला जात नाही.>
आता पुन्हा वाणसामानाचा साठा
आता पुन्हा वाणसामानाचा साठा करावाच का असा प्रश्न येइल>>>> एग्जॅक्टली!
मी पण हाच विचार करत होते की एवढं वर्षभरासाठीचं वाणसामान डाळी कडधान्या का घेता तुम्ही सगळ्या?
आम्ही महिन्याचं जेमतेम
आम्ही महिन्याचं जेमतेम घेतो.
ते पण वेळ नाही झाला तर राहून जातं.मग बाहेरचा किराणेवाला झिंदाबाद.
काही हाय फाय मॉल्स मध्ये आम्हाला पाहिजे त्या वस्तू मिळत नाहीत(उदा.ज्वारी पीठ असतं पण ज्वारी नाही,आंबेमोहोर नसतो, साळीच्या लाह्या नसतात्,गोल वालं लायझॉल फ्लोर ब्लीच नसतं,हार्पिक ऐवजी डोमेक्स असतं.डोमेक्स हे मी पाहिलेलं पहिलं अती घाण वासाचं क्लिनर आहे.)
पूर्वीच्या फूडवर्ल्ड मध्ये, किंवा सध्या फूड प्लस मध्ये त्यातल्या त्यात सर्व मिळतं.
हरभरा डाळ फ्रीजर मध्ये मी पण
हरभरा डाळ फ्रीजर मध्ये मी पण ठेवते. कडधान्य, रवा , मैदा (फारच कमी लागतो त्यामुळे थोडा उरला कि फ्रीजरमध्ये ) dry fruits, मसाले, हे सगळ फ्रीजर मध्येच.
आक्रोड, बदाम अजिबात खवट होत नाहीत
कडधान्य/ डाळींना बोरिक पावडर
कडधान्य/ डाळींना बोरिक पावडर नाही लावून ठेवत का तुम्ही? अतिशय सामान्य, टिकाऊ आणि सोपा उपाय आहे तो! आपण खाण्याच्या आधी कडधान्य/ डाळी धुवून घेतोच, त्यामुळे धोका काहीच नाही.
योकु हे सगळं बारिक करायचं की
योकु हे सगळं बारिक करायचं की नाही. चव छान येईल.
पूनम, धुवून सगळी पावडर जाते का? कधीच हा उपाय केला नाहिये त्यामुळे उगीच शंका.
पूर्वी बोरिक पावडर लावायचे मी
पूर्वी बोरिक पावडर लावायचे मी .त्यवेळी जास्त दिवसाचे समान भरायचे मी
पण आजकाल स्वयपकामध्ये खूप विविधता आल्यामुळे सामान कमी प्रमाणात लागते .
आता मुळातच जास्त आणत नाही मी ह्या गोष्टी. त्यामुळे केमिकल न लावता फ्रीझर मध्ये चांगल्या राहतात.
मी नेहमीच बडीशोप, ओवा,
मी नेहमीच बडीशोप, ओवा, धनाडाळ, तीळ आणि जवस भाजुन ठेवते. मुखवास.
Pages