सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
चला रे पावसाळा आला आता तरी
चला रे पावसाळा आला आता तरी बरसा जरासं इथपन.. नै बदा बदा तर रोज चालणार्या झडीप्रमाणे थोड्या थोड्या पोस्ट तरी येउदेत..
म्याच सुरु करते थांबा उलीसकं...
एक सर्पमित्राची मध्यंतरी ओळख झाली.. ते इथं माबोवर नाही नाहीतर सापांबद्दलच्या माहितीचा खजिना इथंपन ओतता आला असता.. जयवंत सरांबद्दल बर्याच जणांना इथं माहिती आहे.
तर चर्चेत त्यांनी विंचु बद्दल माहिती हवी होती.. तस मला सुद्धा खुप काही माहिती नाही पण वरचेवर घरी असलेले विश्वकोषाचे खंड, डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट, पुस्तक, आणि जालाच्या मदतीने ब्रिफ मधे माहिती गोळा केलेली इथे देते..
आता बरीचशी माहिती शांकली,शशांक,निरू अन ईन मिन तीन पण देतीलच..
पावसाळा सुरु होतोय. या काळात साप आणि विंचु असे प्रकार भरपुर बाहेर येतात तेव्हा काळजी घेतलेली बरी.. नाही काही तर निदान त्यांच्याबद्दलची बेसिक इन्फॉरमेशन तरी असावी म्हणुन हा प्रपंच.. ( बापरे लयच पुस्तकी बोल्ली का मी ?
) .
टिना, खुप छान माहिती. लक्षात
टिना, खुप छान माहिती. लक्षात ठेवण्यासारखी.
हा पक्षी रोज सकाळी आमच्या
हा पक्षी रोज सकाळी आमच्या बाल्कनीत येतो...कधी कधी ४-५ जणान्चा ग्रूप पण येतो...
छान आहे ना!
मनस्वीनी, भाग्यवान आहात.सुरेख
मनस्वीनी, भाग्यवान आहात.सुरेख पक्षी आहे.
टिना, खुप छान माहिती.
टिना, खुप छान माहिती.
मनस्विनी फार गोड आहे तो पक्षी. नाव कळेलच इथे.
हा Australian Cockatoos आहे
हा Australian Cockatoos आहे ना ?
मोठ्या प्रमाणात आढळतो आणि माणसांना घाबरत पन नै..
खुप धीट असतात हे पक्षी आणि
खुप धीट असतात हे पक्षी आणि आवाजही मोठा असतो.
पण ऑस्ट्रेलियात ते आणि त्याचे भाईबंद बरेच उपद्व्यापही करत असतात. यू ट्यूबवर एक क्लीप बघितली होती, त्यात तर काही पक्षी अगदी डांबरी रस्त्यावरची बारीक खडी पण उचकटून टाकतात.. उगाचच !!
टीना छान माहीती. मनस्विनी
टीना छान माहीती.
मनस्विनी पक्षी खुप सुंदर आहे. आणि तुमच कढीपत्याच झाडही कीती टवटवीत आहे.
दोन शेपट्यांची खार आहे का ही?

मनस्विनी.. खूपच क्यूट आहे
मनस्विनी.. खूपच क्यूट आहे पक्षी.. टिना नाव सांगितल्याबद्दल धन्स
जागु.. दुसरी खारुताई भित्री असेल.. लपून बसलीये
लगेच फोडल्स. मला वाटल कोणीतरी
लगेच फोडल्स. मला वाटल कोणीतरी आश्चर्य व्यक्त करेल दोन शेपटीवाली खारूताई आहे म्हणून.

ही फुल निशिगन्धा सारखी
ही फुल निशिगन्धा सारखी दिसतात...नक्की माहीत नाही कोणती आहेत...
वा खुप सुंदर आहेत फुले. किरण
वा खुप सुंदर आहेत फुले.
किरण पुरंदरेंच पक्षी पाणथळीतले हे नविन पुस्तक आले आहे. पुस्तकातील लिखाण आणि त्यातले सर्व फोटो सुंदर आहेत.
@दिनेशदा....हो हे पक्षी खुपच
@दिनेशदा....हो हे पक्षी खुपच आवाज करतात ४-५ जण एकत्र येतात तेव्हा...पण उपद्व्याप तर काही केले नाहीत अजुन!
आम्ही बिस्किट देतो, ते खातात आणि जातात
हे दोन्ही फोटो काढताना ५ पक्षी होते..पण फोटोत ३ च आलेत...
आणि हा बिस्किट खाताना...:)
जागुले.. मनस्विनी
जागुले..
मनस्विनी भारीच्च क्यूट्सीपाय आहेत ही पाखरं...
या फुलांचं दर्शन मी पण घेतलंय पूर्वी..Agapanthus फॅमिलीतलंय पण
जागू, आम्ही आता फसत नाही. तु
जागू, आम्ही आता फसत नाही. तु फसवतेस ते माहित झालयं आम्हाला.
टीना, उपयुक्त माहिती.
मनस्वीनी, छान फोटो.
जागुतै मनस्विनी भारीच्च
जागुतै
मनस्विनी भारीच्च क्यूट्सीपाय आहेत ही पाखरं... +१
(No subject)
मनस्वीनी, हे पक्षी चिडले
मनस्वीनी, हे पक्षी चिडले किंवा एक्साइट झाले कि डोक्यावरचा तूरा फुलवतात. पण तरी त्यांचा चावा वाईट ठरू शकतो. जपून.
हि निळी फुले ( आणि तशीच पांढरी ) न्यू झीलंड मधे खुप दिसतात. मोठा गुच्छ असतो त्यांचा.
जागू, पेरुची फुले ना ? पेरू,
जागू, पेरुची फुले ना ?
पेरू, लवंग, जांभूळ, जाम सगळे भाईबंद. फुलांमधे खुप साम्य असते.
जागू, पेरुची फुले ना
जागू, पेरुची फुले ना ?>>>>>>>>>.साखर जांभ दिसतायत.
सर्व फोटो मस्त मस्त.
सर्व फोटो मस्त मस्त.
पेरुचीच फुले वाटत आहे मलापन
पेरुचीच फुले वाटत आहे मलापन
मस्तच..
Surangi
Surangi
मनस्विनी भारीच्च क्यूट्सीपाय
मनस्विनी भारीच्च क्यूट्सीपाय आहेत ही पाखरं...>> +१
सगळ्यांचे फोटो मस्त
व्वा - मस्त फोटो, सुरेख
व्वा - मस्त फोटो, सुरेख माहिती..... लगे रहो....
नाही नाही जाम ची फुले आहेत.
नाही नाही जाम ची फुले आहेत. शोभाचे बरोबर आहे उत्तर. पण त्या जाम ला साखर जाम म्हणतात का ते माहीत नाही.
ह्या कळ्या

ही फुले

फुलांच्या पाकळ्या खळल्यावर जाम धरायला सुरुवात होते.

जाम वाढताहेत.

तयार जाम.

तयार जाम पाढरट असतात फोटो डार्क असल्याने हिरवट दिसतोय.
आह्हा.. भारतात अजूनही हे
आह्हा.. भारतात अजूनही हे फळ ट्राय करणे बाकी आहे... इंडोनेशिअन भाषेत याचं नाव जांबु असे आहे.
इंग्लिश नाव,'रोज अॅपल"
हअमारे इधर पेरुकोच जाम बोलते
हअमारे इधर पेरुकोच जाम बोलते इसिलीए मेरा उत्तर करेक्ट था
जागू , सही फोटो... तयार जाम
जागू , सही फोटो...
तयार जाम पाढरट असतात>>>>>

मला मध्यंतरी असे लाल मिळले होते.
आमच्याकडे विरारहून भाजीवाली येते, तिने आणले होते.
हो असेच वरच्या आकाराचे लाल
हो असेच वरच्या आकाराचे लाल भडकही असतात. काही पुर्ण पाढरे तर काही मी फोटो दिल्याप्रमाणे. माझ्याकडेच तिन जाती आहेत. एक वरचा एक हिरवट पण लांबट एक पुर्ण पांढरा.
Pages