सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
दिनेशदा , वाढदिवसाच्या
दिनेशदा , वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!
वर्षु दी, मानुषी ताई, मस्त
वर्षु दी, मानुषी ताई, मस्त माहिती, प्र.ची...
मानुषी, मस्त माहिती. वर्षूची
मानुषी, मस्त माहिती.
वर्षूची माहिती वाचून मला आसाममध्ये पाहिलेल्या नारळाएवढ्या उंच केळीच्या झाडांची आठवण झाली. ताडमाड वाढलेली झाडे पाहुन यांची केळी कशी काढत असतील असे आधी वाटलेले. नंतर लक्षात आले कि केळी काढायची म्हणजे बुंध्याला घाव सोसावा लागतो.
वर्षू,. नोव्हेंबरात मी मलेशियाला जातेय, तुझा सल्ला तिथे कितपत धावेल माहित नाही पण लक्षात ठेऊन आचरणात आणला जाईल हे नक्की
वर्षुताई मस्तच माहीती आणि
वर्षुताई मस्तच माहीती आणि फोटोही नेहेमीप्रमाणे.
साधना.. मी इंडोनेशियात
साधना.. मी इंडोनेशियात राहिलेय बरीच वर्षं.. पण मलेशिया पण पाहिलेलंय.. डिपेंड्स तू कुठे जाते आहेस..
ऑलदो इंडो आणी मले. या दोन देशांच्या धर्म,भाषा,खानपान मधे पुष्कळसं साम्य आहे,पण मला मलेशिया त्या मानाने बराच कन्झर्वेटिव देश वाटला.. असो.. तुझे प्रश्न कळव..
नारळाएव्हढी उंच केळीची झाडं..
नारळाएव्हढी उंच केळीची झाडं.. बापरे..कल्पना सुद्धा करता नाही येत.. खरंच आश्चर्य्कारक..
आभार मित्रांनो.. मलेशिया तसा
आभार मित्रांनो..
मलेशिया तसा थोडा धार्मिक आहेच. पण तरी बरेच आहे बघण्यासारखे तिथे. साधनाचे अनुभव बघून मग ठरवेन.
वर्षू.. ती टोमॅटोची झाडे, दार्जीलिंग, बाली, मॉरिशियस मधे पण बघितली. फळ नीट पिकलेले असेल तर चांगले लागते चवीला. केनयात त्याचा ताजा ज्यूस पण मिळायचा. पण अगदी फार चवीचा असायचा, असे नाही.
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षूच्यापनामापोतडीतूनकायकायन
वर्षूच्यापनामापोतडीतूनकायकायनवीनचमाहितीमिळ्तेय!
फळ काय छानेय ते!
शुभ रात्री
शुभ रात्री
लवली रात्र, वर्षुताई.
लवली रात्र, वर्षुताई.
.
.
सुप्र
सुप्र
वॉव, वर्षूदी.... कुठली फुले
वॉव, वर्षूदी.... कुठली फुले आहेत ही ??? पनामातील का ??
यस्स.. बुकेते गावातली..
यस्स.. बुकेते गावातली..
दिनेशदा, वाढदिवसाच्या
दिनेशदा, वाढदिवसाच्या (उशीराने) खूप खूप हार्दिक शुभेच्छा! (वर्षात किती वेळा असतो? )
वर्षू, मानुषी, अचाट फ़ोटो आणि अफ़ाट माहिती.
मानुषी, त्या हिरवळीवर अलगद पहुडावसं वाटतयं. मस्त हिरवागार निसर्ग !
वर्षू, टोंमॅटो किती वेगळे ना. तुझी फ़ुलं तर सुंदरच!
वर्षु, बुकेत मधला फुलांचा
वर्षु, बुकेत मधला फुलांचा बुके झकास !!!
डाव्या बाजूची राणी कलरची फ़ुलं
डाव्या बाजूची राणी कलरची फ़ुलं सुपारी (आम्ही त्याला भुतेमं म्हणतो) तशी वाटतायत. तीच आहेत का?
आज नॅट जिओ वरच्या कॉट इन द
आज नॅट जिओ वरच्या कॉट इन द अॅक्ट मधे, एक पाळीव हरण, कोंबडीचे पिल्लू खाताना दाखवले.
चितमपल्लींनी पण नीलगायी, जिवंत कासवे खाताना बघितल्याचे नोंदवलंय.
गुड मॉर्निंग.. मी आहे फोर्क
गुड मॉर्निंग..
मी आहे फोर्क टेल्ड फ्लाय कॅचर..
मागे एकदा त्याचा उडतानाचा फोटो मोबाईल वर काढला होता.. वेरी ग्रेसफुल फ्लाईट
वर्षूदी.. Fork-tailed
वर्षूदी.. Fork-tailed flycatcher मस्तच
वर्षू, छानच!
वर्षू, छानच!
माझा अत्यंत आवडता पक्षी
माझा अत्यंत आवडता पक्षी ,'टुकान'.. पनामा ला घरच्या खिडकीतून दिसणार्या समोरच्या झाडावर एक रोज दर्शन द्यायला का घ्यायला यायचा.. हा फोटोतला मात्र एका रिझॉर्ट च्या मालकिणीने प्रेमाने पाळलेला आहे.
हा धागा गप्पं गप्पं का आहे??? चला.. निगप्रेमी.. नवीन भागा च्या ऑनर मधे नवीन माहिती शेअर
करू या!!!
वर्षू, मानुषी शुरु हो ज्जा !
वर्षू, मानुषी शुरु हो ज्जा !
नमस्कार. सुट्टी संपून आजपासून
नमस्कार. सुट्टी संपून आजपासून ऑफिसमध्ये पुन्हा रुजू झाले. आता रोज येईन ह्या धाग्यावर.
जागू, येताना खंड्याला घेऊन
जागू, येताना खंड्याला घेऊन आलीस का?
चल, पटापट फोटो दाखव बरं.
वर्षू, दर्शन घ्याय्लाच येत
वर्षू, दर्शन घ्याय्लाच येत असणार गं.
आणि त्या फोर्क टेल्ड्वाल्याला म्हणावे, तुझा फोर्क आता स्वोर्ड झालाय....
ह्या वर्षी बुलबुल्च्या
ह्या वर्षी बुलबुल्च्या पिलांचा बुलबुलाट तर ऐकला पण ती कधी उडून गेली काही कळलेच नाही.
आजकाल सर्वच पिल्लाना, सगळे
आजकाल सर्वच पिल्लाना, सगळे प्रगतीचे टप्पे भराभर ओलांडायचे असतात.
सगळे प्रगतीचे टप्पे भराभर
सगळे प्रगतीचे टप्पे भराभर ओलांडायचे असतात. >>> खरय
Pages