खग ही जाने खग की भाषा -भाग ७ गोवा कर्नाटका पश्चिम घाट

Submitted by कांदापोहे on 17 May, 2016 - 06:37

खग ही जाने खग की भाषा -भाग ६

मायबोलीवर प्रकाशचित्र टाकणे हा एक सोहळा असतो खरच. Happy मागच्या वर्षअखेरीस खास पक्षीनिरीक्षणाकरता गोव्यात गेलो होतो व तिथुनच कर्नाटकात भटकंती करुन परत यायचे असे ठरले होते. जाताना विचार केला होता की रात्री निघायचे व जातानास सकाळी झुआरी नदीतील पक्षीनिरीक्षण उरकुन बोंडलाला प्रस्थान ठोकायचे. निघण्यापूर्वीच कामतांचा निरोप आला की सध्या भरती असल्याने सकाळी येऊ नका दुपारी २ नंतर या. त्यामुळे आधी बोंडलाला पोचुन सकाळच्या सत्रामधे थोडे पक्षीनिरीक्षण करुन मग झुआरीला गेलो.

Bronzed Winged Drongo कोतवाल

Black-rumped Flameback Woodpecker छोटा सोनपाठी सुतार

Malabar Giant Squirrel ही खार क्वचितच ताम्हीणी किंवा भिमाशंकर परीसरात दिसते. पण कर्नाटका, गोवा किंवा वेस्टर्न घाटमधे या भरपूर दिसतात. (खास खगमे ठग मिसळुन टाकलाय)

Asian Brown Flycatcher तपकिरी लिटकुरी, तपकिरी माशिमार

Rusty Tailed Flycatcher तांबुस शेपटीची माशीमार

कामत यांची बोट राईड हा पक्षी निरीक्षकांकरता खरच मोठा दिलासा आहे. राईड सुरु झाल्यावर दिसणारे काही पक्षी आपण परतीच्या मार्गे बघणार असल्याची त्यांनी आधीच तंबी दिल्याने आम्ही एकदम दुसरे टोक गाठले. तिथुन एक एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेत आम्ही परत आलो.

दुपारची वेळ असल्याने झुआरी नदीत हमखास दिसणारे काही पक्षी मात्र आम्हाल दिसले नाही. Collarded Kingfisher लांबुनच दिसला पण फोटो काढता आला नाही. White Bellied Sea Eagle व Peregrine Falcon दिसलेच नाहीत.

कामतांनी सांगीतल्याप्रमाणे येताना मात्र पक्षाच्या बरेच जवळ जाऊन व बोट बंद करुन आम्हाला फोटो काढायला वेळ दिला. वाटेत येताना काही ठिकाणी मगरी पण दिसल्या.

Osprey कैकर, मच्छीमार

Black Caped Kingfisher काळ्या डोक्याच्या खंड्या. सहसा कुठेही न दिसणारा हा खंड्या झुआरी, सुंदरबनसारख्या खारफुटी जंगलातच दिसतो.

तांबडी सुरला पक्षी अभयारण्यात जेव्हा पोचलो तेव्हा अपेक्षेपेक्षा फारक कमी पक्षी दिसले. थोडे निराश झालो होतो. पण वाटेतच पंकज लाड यांचे Canopy Goa नावाचे हॉटेल आहे. अतिशय उत्तम व्यवस्था असलेले हे हॉटेल पक्षीनिरीक्षकात बरेच प्रसिध्द आहे. जेवणाची उत्तम सोय असुन आजुबाजुलाच अनेक पक्षी नक्की दिसतात. आम्ही आदल्या दिवशी नुसता चहा पिऊन जवळच असलेल्या मोलेम इथल्या महावीर पक्षी अभयारण्यात रहायलो गेलो.

दुसर्‍य दिवशी परत एकदा त्या हॉटेला चहा व न्यायारीला गेलो तेव्हा हे पक्षी दिसले.
Loten's Sunbird Female लोटेनचा शिंजीर

Vernal Hanging Parrot पिचु पोपट. पोपट व पॅराकीट या दोन वेगळ्या जाती आहेत व पोपट जातीतील भारतात दिसणार हा एकमेव पोपट. आपल्याल्या नेहेमी दिसतात ते पॅराकीट.

Pied Kingfisher कवड्या खंड्या

तांबडी सुरलावरुन परत एकदा मोलेमला गेलो. तिथे अप्रतिम तंबु आहे अभयारण्याचे. मुख्य रस्त्यापासुन ७ किलोमिटर आतमधे असल्याने अत्यंत सुरेख जंगल आहे. इथेही थोडी निराशाच झाली. Great Pied Hornbill बघायच्या नादात Malabar Trogon कडे थोडे दुर्लक्ष केले. फोटो जरी मिळाले नसले तरी पक्षी दिसले हीच पर्वणी होती. रात्री दिसणारे Frogmouth तर अमेझींग होते. अक्षरशः बेडकासारखे तोंड असते Frogmouth या पक्षाचे.

मोलेममधुन निघालो व दांडेलीजवळ एका पक्षी अभयारण्यात राहीलो. तिथे थोडी निराशाच झाली. एकुणच ट्रीप मस्त झाली होती त्यामुळे आनंदात आम्ही परत आलो. परतीच्या मार्गातच आम्हाला गणेशगुडीचे Old Magazine House परीसर बघता आला. येतानाच ठरवले की इथे नक्की जायचे.

पुण्यात परत आल्यावर मायबोलीवरील पक्षीमित्रात गणेशगुडीच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर १५ दिवसातच मी, विनय भिडे, इंद्रा, केळकर असे चार जण गणेशगुडीला जायला निघालो. गणेशगुडीतील Old Magazine House म्हणजे पक्षीनिरीक्षकांकरता स्वर्ग आहे. तिथे समोरच असलेल्या पाण्याच्या ताटल्यांवर अनेक पक्षी हजेरी लावतात व सहज तुम्हाला फोटो काढता येतात.

Brown Headed Barbet तपकिरी डोक्याचा तांबट

Yellow Browed Bulbul पिवळ्या भुवईचा बुलबुल

Black Naped Monarch नीलपरी, जांभळी लिटकुरी

Emerald Dove पाचु होला

Brown Cheeked Fulvetta शिटीमार रानभाई

Dark Fronted Babbler काळ्या डोक्याचा सातभाई

White Bellied Blue Flycatcher पांढर्‍या पोटाचा निळा माशिमार

गणेशगुडी हॉटेलच्या बाहेरच एक झाड फळांनी डवरलेले आहे व त्यावर अनेक पक्षी सकाळी येतात असे कळल्याने दुसर्‍या दिवशी तिकडे गेलो. तिथे वेगळाच त्रास झाला तो म्हणजे प्रचंड धुके. त्या धुक्यात कॅमेराची सेटींग व नंतर केलेले प्रोसेसींग यामुळे खालील फोटो मिळाला. निलपरी हा पक्षी व पहाडी मैना बघणे म्हणजे सुखाची परमावधी असते.

Asian Fairy Bluebird निलपरी

Hill Myna Mickey Mouse Pose Happy पहाडी मैना

थोडे धुके गेल्यावर मात्र चंगळ होती. असंख्य मलबार बार्बेट, हळद्या, होले, बुलबुल, हराळी त्या फळांवर येत जात होते.

Malabar Barbet लाल कंठाचा तांबट

Grey Fronted (Pompodour) Green Pigeon राखी कपाळाची हरोळी

Black Naped Oriole सुरमा हळद्या

Ruby Throated Bulbul लाल कंठाचा बुलबुल

आता या वर्षीच्या नोव्हेंबरची वाट बघत आहे. लगेच गणेशगुडीला जायला. Happy

यापूर्वी केलेले प्रयत्न खाली बघता येतीलच.

उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग २ इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ४ इथे http://www.maayboli.com/node/51921 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ५ इथे http://www.maayboli.com/node/53885 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ६ इथे http://www.maayboli.com/node/54576 बघता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काका एक्दम जबरी!
एशियन फेअरी कुठे मिळाला तुला?

खार वगैरे म्हणजे खग मे ठग अस्तात कोण कोण मागे एकदा सरडा होता ठग

सुरेख फ़ोटो. मला खारुताई फ़ारच आवडली. Happy

Pied Kingfisher ची नजर बघा. डोळा काय दिसतोय. Happy

रच्याकने खारीला खगवर्गात कधी भरती केले?>>>>>>>>>.तिच्या नावाची सुरुवात "ख" ने आहे ना, म्हणून असेल. Happy

केप्या एकदम कडक फोटो..

मिकीमाऊस पोझ तर फारच भारी आलाय.

अर्र दिसायला लागले का. मी अजुन लिहीत होतो. मला वाटले सार्वजनीक केले तरच दिसतात. Sad असो. फोटो महत्वाचे. वर्णन हळुहळु लिहीनच. आजके दिन इतनाही काफी है. Happy

वाह वाह! एक से बढकर एक!

Osprey <<< हा गरूड नाही का?
असली तांबडी खारुताई पहिल्यांदा बघितली.
sunbird: ए कोण आहे रे तिथे बोलतोय, तास चालू असताना?
कवड्या खंड्याही पहिल्यांदाच बघितला.
नीलपरी: काय तो तोरा!
Asian Fairy Bird हा कोकिळाचा मावसभाऊ का?
Green Pigeon - पहिल्यांदाच पाहिले.

मराठी नावेबी लिवावी.

दुपारपासून ५ वेळा फोटो बघितले... अजून मन भरत नाहीये इतके सुंदर आलेत. बोट राईडमधून इतके स्पष्ट फोटो? फोटोकरता बोट थांबून वेळ देत होते का Image Stabilization lens चा परीणाम?

हम ऊडते हुए परिंदोंके पर गीन लेते है असं जरी नसलं तरी दूर बैठे परिंदोंके पर तक फोटो मे कैद करते है असं नक्कीच म्हणू शकतोस तू Happy बर्‍याच फोटोत तर पिसाची रेष न् रेष दिसतेय.

लेन्स कुठले होते?

वॉव! काय फोटो आहेत एकसे एक!!! Happy

मी आधीचे सगळे बघितले नाहियेत बहुतेक. आता बघते.

तांबडी कारवार जवळ का? फार पुर्वी मी कुंभारवाडा आणि बहुतेक तांबडी (नाव नीट आठवत नाही) ह्या कारवार जवळच्या जागी पक्षीनिरीक्षणाच्या एका कॅम्प ला गेले होते.

ओके, नाव आठवलं. तांबडी नाही, ते बहुतेक उळवी होतं.

Osprey <<< हा गरूड नाही का?
नाही. समुद्राच्या पाणथळीच्या जवळच शक्यतो दिसतो. याचे मुख्या खाद्य म्हणजे मासे. हवेत उडत येऊन पाण्याच्या आतले मासे हा जाता जाता पकडतो.

असली तांबडी खारुताई पहिल्यांदा बघितली.>>
आपल्याकडे भिमाशंकर भागात दिसते ही.

नीलपरी: काय तो तोरा!
Asian Fairy Bird हा कोकिळाचा मावसभाऊ का?>>
हो जबरदस्त असते नीलपरी. कमाल रंग असतात.

असो.. तर लोकहो नीट मांडणी करुन थोडी माहिती पण लिहीली आहे व आता धागा सार्वजनीक केला आहे. Happy

माधव धन्यवाद. माझ्याकडे Nikon D7100 with Tamron 150-600 Lens आहे. Happy

नीलपरी, लयच भारी. सगळे खग अगदी मुद्दाम पोझ दिल्यासारखे वाटत आहेत फोटोत...

कैकर एकदम राजबिंडा.

खुपच सुंदर फोटो. रंग, टेक्श्चर्स, आकार सगळंच किती वैविध्यपुर्ण आहे निसर्गात.

Pages