गुहागरचे पक्षीनिरीक्षण
नेहेमीप्रमाणेच केलेला कंटाळा व इथे मायबोलीवर प्रकाशचित्र टाकणे हा मोठा कार्यक्रम असल्याने अनेक दिवस मनात असुनही ही प्रकाशचित्रे टाकु शकलो नाही. आज जरा उसंत मिळाल्यावर लिहुनच टाकले.
गेल्या सहा महिन्यात फक्त फोटोग्राफी करता असे गुहागरला जाणे झाले. तिथे आढललेले पक्षी इथे दाखवावे म्हणुन हा प्रपंच. सोबत थोडेफार इतरही प्राणी दिसल्याने तेही टाकुन पाणी वाढवले आहे. गुहागर, चिपळुण, दापोली, वेळणेश्वर या भागात इतके पक्षी दिसतात की लिहायला घेतले तर एका दिवसत ५० जाती दिसल्या असे सहज लिहीता येईल. गेले अनेक वर्ष दापोली, दिवेआगर वगैरे परीसरात सुट्टीत जाणे झाले पण पक्षीनिरीक्षणाचा छंद नव्हता. गेल्या दोन फेरीमधे अनेक पक्षी दिसल्याने कोकणाच्या ओढीच्या कारणामधे आणखी एक भर पडली.
खाली दिलेले सर्व फोटो आधी फेसबुकावर प्रकाशित आहेत पण इथले सर्वच जण तिकडे असतीलच असे नाही. त्यामुळे इथेही ते प्रकाशित करत आहे.
पोलादपुर मार्गे कोकणात चिपळुणपाशी पोचतानाच एक गाव आहे. तिथल्या तळ्यात मगरी दिसतात असे भाच्याने सांगीतले म्हणुन तिकडे मोर्चा वळवला. तळ्याकाठी चक्क Beware Crocodile Point अस बोर्डच दिसला. बघतो तर काय खाली चांगल्या ४-५ मगरी पहूडलेल्या होत्या. आम्ही कॅमेरे परजल्यावर एकीने लगेच आम्हाला दात वेंगाडुन दाखवले.
खरंतर आधीच्या भेटीत Brown Fish Owl दिसले होते पण समाधान होत नाही म्हणुन परत एकदा त्याच ठिकाणी गेल्यावर हे दिसलेच.
Brown Fish Owl
घुबड बघायच्या वाटेवर सुमधुर आवाजात कुठला पक्षी गातोय म्हणुन बघीतले तर हा तल्लीन होऊन गात होता.
Orange Headed Thrush
जेवतानाच अचानक हे महाशय काहीतरी टिपताना दिसल्यावर फोटो काढणे अनीर्वाय होते.
Puff Throated Babbler
बराच वेळ मला एक मित्र सांगत होता इथेच Vigor's Sunbird पण दिसतो पण मी फारसे लक्ष दिले नव्हते. जेव्हा याचे रंग बघीतले तेव्हा वेडा झालो. पुढच्या वेळी याच्याकरता आणखी वेळ द्यायच ठरवले आहे.
दापोलीकडुन गुहागरला आता गाडी बोटीत टाकुन जाता येते. त्या तिरावरच हे आजोबा स्थितप्रज्ञासारखे बसलेले होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पक्षीनिरीक्षक कोकणात जायचे मुख्य कारण म्हणजे Indian Pitta, Oriental Dwarf Kingfisher हे दोन पक्षी. यातील दोन्ही दिसल्यावर विशेष आनंद झाला होता. तसेच कोकणार दिसणारा निळ्या कानांचा खंड्याही (Blue Eared Kingfisher) दर्शन देऊन गेला.
हा पक्षी बघणे म्हणजे खरच सुख आहे. जुन जुलै मधे घरटी बांधण्याची लगबग असल्याने हा बराच दिसतो. अगदी घराजवळ वाडीतही येतो. फक्त वातावरण फोटो काढण्यास अजिबात अनुकुल नसते.
Indian Pitta नवरंग
वेळणेश्वर मंदीरासमोरच्या एका खराब झालेल्या झाडात दोन भोकं दिसल्यावर इथे हे महाशय असतील असा अंदाज आलाच होता. चांगले दुमजली घर असावे कारण आम्ही बघत असतानाच वरच्या मजल्यावरुन यांनी डोके बाहेर काढले.
Brown Headed Barbet
इथेच अजिबात अपेक्षा नसताना एके ठिकाणी हा पण दिसला.
Stork Billed Kingfisher
चिपळुणकडुन परत गुहागरला जाता एका झाडावर धनेश दिसल्यावर मित्र अक्षरशः ओरडला. आम्ही थांबेपर्यंत आणखी दोघे आले पण कावळा नामक पक्षी इतका त्रासदायक आहे ना की बास. त्याने दोघांना उडवुन पण लावले. काही मिनीटेच मिळाली त्यात खालील फोटो काढता आला.
Malabar Pied Hornbill
त्या फेरीतील सर्वात भारी क्षण म्हणजे Orange Breasted Green Pigeon चे दुर्मिळ दर्शन. धन्य वाटले त्याला बघुन. आपल्याकडे Yellow Footed Green Pigeon दिसतात पण हा पक्षी महाराष्ट्रात फारच क्वचीत दिसतो.
यापूर्वी केलेले प्रयत्न खाली बघता येतीलच.
उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग २ इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ४ इथे http://www.maayboli.com/node/51921 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ५ इथे http://www.maayboli.com/node/53885 बघता येईल.
सुंदर फोटो .
सुंदर फोटो .
वाह मस्तच, शेवटच्याचे दर्शन
वाह मस्तच, शेवटच्याचे दर्शन अजून झाले नाहीये
हे सगळे एकाच ठिकाणी बघायला मिळताहेत त्याची मजा काही औरच
म हा न फोटो आहेत सगळेच...
म हा न फोटो आहेत सगळेच...
सुरेख आलेत फोटो. अगदी क्लिअर
सुरेख आलेत फोटो. अगदी क्लिअर !!!
ढोलीतून डोकावणारा पक्षी मस्तच.
मस्तच Orange Breasted Green
मस्तच Orange Breasted Green Pigबेस्त्
ओ हो हो हो --- काय अप्रतिम
ओ हो हो हो --- काय अप्रतिम प्रचि आहेत --- पारणे फिटले डोळ्याचे ....
_______/\_______
नितांत सुंदर टिपलय केपी.
नितांत सुंदर टिपलय केपी. मस्तच
केपी, सर्वच फोटो अतिशय सुंदर.
केपी, सर्वच फोटो अतिशय सुंदर. खरंच डोळ्याचे पारणे फिटले.
रच्याकने, चिपळूणजवळच्या त्या गावाचे नाव लक्षात असल्यास जरूर सांगा पुढील वारीत मगरी बघण्याचा अनुभव घेईन.
केपी, आत्ताच्या आत्ता कोकणात
केपी, आत्ताच्या आत्ता कोकणात जावसं वाटतंय. जीव निवला सगळी प्रचि पाहून..
तो निळा खंडया किती वर्षांनी भेटला आणि धनेशचा तर काय रुबाब
आहाहा! आजोबा कोणेत?
आहाहा!
आजोबा कोणेत?
अ प्र ति म.
अ प्र ति म.
अप्रतिम फोटो रे. क्लास आहे
अप्रतिम फोटो रे.
क्लास आहे अगदी.
सु..प..र.. फोटोज केपी
सु..प..र.. फोटोज केपी
मस्त रे केप्या ! सिधला
मस्त रे केप्या ! सिधला दाखवते.
छान फोटो.......कांद्या
छान फोटो.......कांद्या
Sundar photo
Sundar photo
अप्रतिम आहेत फोटो
अप्रतिम आहेत फोटो
अप्रतीमच! त्या इन्डियन
अप्रतीमच! त्या इन्डियन पिटा(??) नवरंगच्या शरीरावरचे निळ्या रंगाचे छोटे फलकारे फार आवडले.
खरं म्हणजे इतके रंगीत पक्षी एके ठिकाणी मिळणं /टिपणं याला ती नजरच लागते.
कोकणात आमच्या गावी यातले बरेच पक्षी दिसतात.
चिपळूणजवळच्या त्या गावाचे नाव
चिपळूणजवळच्या त्या गावाचे नाव लक्षात असल्यास जरूर सांगा पुढील वारीत मगरी बघण्याचा अनुभव घेईन...>>
मिरझोली बहूतेक. वसिष्टी नदीजवळ आहे.
त्या इन्डियन पिटा(??) नवरंगच्या शरीरावरचे निळ्या रंगाचे छोटे फलकारे फार आवडले>>
तरी हा फोटो नीट आला नाहीये. नाहीतर अजुन खुलुन दिसतात त्याचे रंग. पुढुनही वा पाठमोरेही. Oriental Dwarf Kingfisher तर इतका लाजवाब असतो की आहाहा. भयंकर लाजाळु असल्याने फोटो खूप डिटेलमधे आले नाहीयेत पण.
मिरजोळी नावाचं गाव आहे चिपळूण
मिरजोळी नावाचं गाव आहे चिपळूण जवळ.
तेच ते मग. धन्यवाद!!
तेच ते मग.
धन्यवाद!!
रीया आजोबा म्हणजे Cattle
रीया आजोबा म्हणजे Cattle Egret गायबगळा आहे.
केप्या.. क्लास फोटो...
केप्या.. क्लास फोटो...
अप्रतिम फोटो
अप्रतिम फोटो
तीन फुल्या तीन बदाम
तीन फुल्या तीन बदाम
अफाट आहेत फोटो !
अफाट आहेत फोटो !
सही रे केप्या.. झकास फोटो .
सही रे केप्या.. झकास फोटो :).
फारच सुंदर!
फारच सुंदर!
सगळेच फोटो वाह वाह !! पुढच्या
सगळेच फोटो वाह वाह !! पुढच्या वेळी मालवण कुडाळ कर
अप्रतिम फोटो.
अप्रतिम फोटो.
Pages